नि.16 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 33/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.08/07/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.01/09/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.नारायण दत्तात्रय फडके रा.691 आर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द श्री.राहुल शंकर जोशी रा.मोरेश्वर सदन, फलॅट नं.4, साळवी स्टॉप, नाचणे रोड, स्वामी समर्थ केंद्रासमोर, छत्रपतीनगर, नाचणे, ता.जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.आठवले. सामनेवाले : व्यक्तिशः -: आदेश :- तक्रारदार व सामनेवाला यांनी याकामी उपस्थित राहून नि.14 वर तडजोड पूरशिस दाखल केली आहे. सदर तडजोड पूरशिस अशी की सदरहू कामात अर्जदार व सामनेवाला यांची आपसात तडजोड झाली आहे व सामनेवाला यास अर्जदार याची रक्कम रु.61,710/- ची मागणी मान्य आहे. असे असले तरी उभय पक्षकार यांच्यामध्ये तडजोडीने ठरल्याप्रमाणे सामनेवाला याने अर्जदार यास रक्कम रु.52,000/- देणेचे आहेत. सामनेवाला याने अर्जदार यास सदरची रक्कम 4 सारख्या हप्त्यात दयावयाची आहे. पहिला हप्ता रक्कम रु.13,000/- तारीख 20/9/10 अगर त्यापूर्वी देणेचे आहे व पुढील 3 हप्ते प्रत्येकी रक्कम रु.13,000/- चे तारीख 20/10/10, 20/11/10 व 20/12/10 अगर त्यापूर्वी सामनेवाला याने अर्जदार यास देणेचे आहेत. सामनेवाला याने यातील कोणताही हप्ता नेमलेल्या तारखेस न दिल्यास अर्जदार यास या अर्जाची रक्कम रु.61,710/- सामनेवाला याजकडून वसूल करणेचा अधिकार राहिल. सामनेवाला याने अर्जदार यास हप्त्याची रक्कम दिल्यानंतर अर्जदार याने रक्कम पोहोचल्याची पावती सही तारीख घालून देणे अत्यंत जरुरीचे आहे. येणेप्रमाणे तडजोड पूरशिस आहे. सदर तडजोड पूरशिसप्रमाणे प्रस्तुत तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. आदेश सदर नि.14 वरील तडजोड पुरशीसप्रमाणे प्रस्तुत तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. रत्नागिरी दिनांक : 01/09/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |