सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.52/2015
1) श्री आदिनाथ विठ्ठल गवस (नाव कमी केले)
वय 35 वर्षे, धंदा – नोकरी,
2) श्री जयवंत सुरबाजी नाईक
वय 35 वर्षे, धंदा – नोकरी,
3) श्री बाबुराव गंगाराम गावडे
वय 45 वर्षे, धंदा – नोकरी,
4) श्री एकनाथ कृष्णा गावडे (नाव कमी केले)
वय 45 वर्षे, धंदा – नोकरी,
5) श्री शाम बाळकृष्ण राऊळ (नाव कमी केले)
वय 35 वर्षे, धंदा – नोकरी,
6) श्री संजय महादेव सावंत (नाव कमी केले)
वय 34 वर्षे, धंदा – नोकरी,
7) श्री. विनोद तानाजी सावंत
वय 62 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त
8) श्री जयवंत मारुती सातपुते
वय 45 वर्षे, धंदा – व्यापार
9) श्री मंगेश परशुराम सावंत (नाव कमी केले)
वय 38 वर्षे, धंदा- नोकरी,
10) सुचिता सुभाष मोरजकर
वय 37 वर्षे, धंदा- नोकरी
सर्व राहा. ज्युस्तिन रेसीडन्सी,
न्यु खासकीलवाडा, चराठा रोड,
सावंतवाडी, ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
पिन-416510
तक्रारदार नंबर 2 स्वतः करीता व तक्रारदार
नंबर 1 व 3 ते 10 करीता कुलअखत्यारी. ... तक्रारदार
विरुध्द
1) श्री. प्रविण बाबली परब
वय 41 वर्षे, धंदा – डेव्हलपर्स,
राहा.दुर्वांकुर अपार्टमेंट, जुना शिरोडा नाका,
सालईवाडा, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
2) श्री. अमरत खेमजी पटेल
वय 41 वर्षे, धंदा – डेव्हलपर्स,
राहा. माजगाव नाला, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री परिमल नाईक, अॅड. सुशिल राजगे.
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री शैलेश मराठे.
आदेश नि.1 वर
(दि. 05/04/2016)
द्वारा : प्रभारी अध्यक्ष, मा. श्री.कमलाकांत कुबल.
1) विरुध्द पक्ष यांनी बांधलेल्या इमारतीमध्ये त्रुटी ठेवलेल्या असून त्यामुळे झालेल्या नुकसानी व मानसिक त्रासापोटी रक्कम विरुध्द पक्ष यांचेकडून वसूल होऊन मिळावी यासाठी सदरचे प्रकरण तक्रारदार यांनी दाखल केलेले आहे.
2) सदर प्रकरण दाखल झालेवर विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठवण्यात आली. दरम्यान तक्रारदार यांनी नि.25 वर तांत्रीक अडचणीमुळे केस मागे घेत असलेबाबत व त्याच कारणाकरीता नव्याने प्रकरण दाखल करण्यास परवानगी मिळणेबाबत अर्ज दाखल केला. त्यावर विरुध्द पक्षाने म्हणणे दाखल केले. सदरचा अर्ज मंजूर करण्याचा झाल्यास रक्कम रु.5,000/- एवढी कॉस्ट करावी असे विरुध्द पक्ष यांनी म्हणण्यात नमूद केले आहे.
3) सबब हे जिल्हा मंच तक्रारदाराच्या नि.25 च्या अर्जाला अनुसरुन सदरचे प्रकरण निकाली काढीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांना तक्रार अर्ज पुन्हा दाखल करण्यासाठी मागे घेण्यास परवानगी देण्यात येते.
2) विरुध्द पक्ष यांना झालेल्या तक्रार अर्जाचे खर्चापोटी विरुध्द पक्ष क्र.1 यांस रक्कम रु.500/- (रुपये पाचशे मात्र) आणि विरुध्द पक्ष क्र.2 यांस रक्कम रु.500/- (रुपये पाचशे मात्र) 8 दिवसांत अदा करण्याचे आदेश पारीत करण्यात येतात.
3) तक्रार प्रकरण निकाली करण्यात येते.
4) मूळ तक्रार अर्जासोबत दाखल पुराव्याचे कागद आणि सदस्यांकरीता देण्यात आलेली कागदपत्रे तक्रारदार यांस परत करण्यात यावीत.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 05/04/2016
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.