::: आ दे श :::
( पारित दिनांक : २७/०४/२०१६ )
आदरणीय सौ.एस.एम.उंटवाले, अध्यक्षा यांचे अनुसार
१. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणे प्रमाणे,
तक्रारकर्ते यांनी वृध्दापकाळातील येणा-या संभाव्य अडचणीचा विचार करुन आयुष्यभर थोडे थोडे पैसे वाचवून विरुध्दपक्ष यांच्या शाखा वाशिम येथिल पतसंस्थेत अनुक्रमे
दिनांक ०३.०१.२०१४ रोजी रक्कम रु.१,००,०००/-
दिनांक २८.०२.२०१४ रोजी रक्कम रु.१,००,०००/-
दिनांक २६.०३.२०१४ रोजी रक्कम रु.१,५०,०००/-
दिनांक ०३.०४.२०१४ रोजी रक्कम रु.१,००,०००/-
दिनांक ३०.०४.२०१४ रोजी रक्कम रु.१,५०,०००/-
पतसंस्थचे सेव्हींग खात्यामध्ये अकांउंट नं.१००१२७ मध्ये मुदत ठेव पावती बनविण्यासाठी जमा केले होते. वरील रक्कम गैरअर्जदार यांचे पतसंस्थेकडुन जमा केली त्याच दिवशी तक्रारदार यांचे नावाने मुदती ठेवी मध्ये वळती करण्यात आली होती.
तक्रारकर्ते दि.०५.०६.२०१४ रोजी मुदत ठेवीची रक्कम काढण्यासाठी पतसंस्थेमध्ये गेले असता त्या दिवशी त्याला विश्वासात घेवून वरील रकमेच्या पाच मुळ पावती ठेव पावत्या पतसंस्थेने परत घेतल्या व रक्कम उद्या देतो असे सांगुन मुदत ठेव पावत्यांची व्याजासह होणारी रक्कम रु.५,२०,७८०/- तक्रारकर्ते यांचे संव्हींग खात्यात पतसंस्थे मार्फत दि.०५.०६.२०१४ रोजी जमा करण्यात आली. त्यानंतर दिनांक ०६.०६.२०१४ पतसंस्थेत रक्कम काढण्यासाठी गेले असता तक्रारकर्त्यास रु.३,००,०००/- देण्यात आले व बाकी रक्कम देण्यात टाळाटाळ केली. तसेच गैरअर्जदाराने बँकिग सेवेच्या नावावर अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. सर्व गैरअर्जदार हे वैयक्तीक व संयुक्तीकरीत्या तक्रारदारास रु.२,२०,८८०/- व १८ % द.सा.द.शे.व्याज दाराने तसेच शारिरीक व हालअपेष्टा व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत.
तक्रारकर्त्याने वि.न्यायमंचात एकत्र कुटूंबाची एकत्र तक्रार सी.सी.१९/२०१५ प्रमाणे दाखल केली होती परंतु कागदोपत्री पुराव्या अभावी सदर प्रकरण निकाली काढण्यात आले होते व तक्रारदारास पुनश्च कागदपत्रासह प्रकरण दाखल करण्याची मुभा देण्यात आलेली होती. त्यामुळे कागदपत्रासह पुनश्च तक्रार दाखल करीत आहे.सी.सी.१९/२०१५ या प्रकरणातील आदेशा विरुध्द कुठेही अपील दाखल केली नाही. त्याच प्रमाणे सदर रकमेबाबत कोणत्याही न्यायालयात तक्रार दाखल केली नाही.
तक्रारकर्ता यांची विनंती कि, तक्रार मंजुर व्हावी, गैरअर्जदाराकडुन वैयक्तीक व संयुक्तीकरीत्या मुदत ठेवीची रक्कम रु.२,२०,८८०/- व दि.०६.०६.२०१४ पासुन १८ % द.सा.द.शे. व्याजदाराने तसेच शारिरीक, हालअपेष्टा व मानसिक त्रासापोटी रु.२०,०००/- तसेच प्रकरणाचा खर्च रु.१०,०००/- मिळण्यासाठी गैरअर्जदाराच्या विरुध्द तक्रारकर्ते यांचे हितात आदेश पारीत करण्यात यावा.
सदर तक्रार तक्रारकर्ते यांनी शपतेवर दाखल केलेली असुन त्या
सोबत एकुण ०१ दस्ताऐवज पुरावे म्हणुन दाखल केलेले आहे.
२. विरुध्दपक्ष क्र.१ ते ३ यांना दि.०५.१०.२०१५ रोजी नोटीस काढण्यात आली, सदरहु नोटीसचे हमदस्त पॉकिट स्वत: तक्रारकर्त्याने नेवून जिल्हा कारागृह जळगांव येथील अधिक्षक, यांच्या मार्फत बजावले असता विरुध्दपक्ष क्र.१ ते ३ यांचेकडुन कोणीही हजर न झाल्याने. सबब त्यांच्या विरुध्द दि.२४.०२.२०१६ रोजीच्या आदेशान्वये तक्रार एकतर्फी चालविण्यात आली.
३. कारणे व निष्कर्ष –
या प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज व तोंडी युक्तीवाद बध्दलची पुरसीस यांचे अवलोकन करुन खालील निष्कर्ष नमूद केला कारण विरुध्दपक्ष क्र.१ ते ३ यांना नोटीस बजावल्या नंतर देखील ते गैरहजर राहील्यामुळे प्रकरण सर्व विरुध्दपक्षा विरुध्द एकतर्फी चालविण्यात यावे असे आदेश मंचाने पारित केले होते.
दाखल दस्तांवरुन तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाकडे गुंतवणूक केलेली रक्कम तक्रारकर्त्याच्या सेव्हींग खात्यात जमा असल्याचे व विरुध्दपक्षाने त्यावर व्याज दिल्याचे दिसुन येते, म्हणुन तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ठेवीदार व विरुध्दपक्ष हे गुंतवणूकदार असल्याचे सिध्द होत असल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असल्याचे ग्राहय धरण्यात येते,
तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त “विरुध्दपक्षाचे शाखा वाशिम येथील तक्रारकर्त्याचे सेव्हिंग खाते” यावरुन असा बोध होतो कि, तक्रारकर्त्याच्या विरुध्दपक्षाकडील सेव्हींग खात्यात रु.२,२०,८८०/- ईतकी रक्कम शिल्लक आहे, यावर तक्रारकर्त्याचे असे कथन आहे कि, त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थेत शाखा वाशिम येथे खालील प्रमाणे रक्कम जमा केली होती.
दिनांक ०३.०१.२०१४ रोजी रक्कम रु.१,००,०००/-
दिनांक २८.०२.२०१४ रोजी रक्कम रु.१,००,०००/-
दिनांक २६.०३.२०१४ रोजी रक्कम रु.१,५०,०००/-
दिनांक ०३.०४.२०१४ रोजी रक्कम रु.१,००,०००/-
दिनांक ३०.०४.२०१४ रोजी रक्कम रु.१,५०,०००/-
सदर रक्कम विरुध्दपक्षाने त्याच दिवशी मुदती ठेवीत वळती करुन घेतली होती, तक्रारकर्ता दि.०५.०६.२०१४ रोजी ही मुदत ठेवीची रक्कम काढण्याकरीता गेला असता, विरुध्दपक्षाने त्यांच्याकडुन वरील रकमेच्या पाच मुळ मुदती ठेव पावत्या परत घेतल्या व रक्कम नंतर देतो म्हणत, सदर मुदत ठेव पावत्यांची व्याजासह होणारी रक्कम रु.५,२०,७८०/- तक्रारकर्त्याच्या सेव्हिंग खात्यात जमा करण्यात आली त्यानंतर तक्रारकर्ता दि.०६.०६.२०१४ रोजी पतसंस्थेत रक्कम काढण्यासाठी गेला असता, त्यास फक्त रु.३,००,०००/- ईतकी रक्कम देण्यात आली व बाकी रक्कम देण्यास विरुध्दपक्षाने टाळाटाळ केली व त्यानंतर शाखा कायमची बंद झाली.
तक्रारकर्त्याचे सदर कथन त्याने दाखल केलेल्या दस्तांशी मिळते-जुळते आहे. शिवाय विरुध्दपक्षातर्फे सदर कथनाला कोणतेही नकारार्थी कथन उपलब्ध नाही.म्हणुन तक्रारकर्ते विरुध्दपक्ष क्र.१ ते ३ कडुन जमा रक्कम रु.२,२०,८८०/- (अक्षरी, दोन लाख, विस हजार,आठशे ऐंन्शी केवळ) व्याजासह मिळण्यास पात्र आहे. असे मंचाचे मत आहे तसेच त्यांची रक्कम व्याजासह परत न करुन विरुध्दपक्षाने सेवा देण्यात त्रुटी केल्याच्या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्दपक्षाकडुन शारीरिक,मानसीक,आर्थिक नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.५,०००/- व सदर प्रकरणाचा न्याईक खर्च रु.३,०००/- मिळण्यास पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सबब अंतिम आदेश पारित केला तो येणे प्रमाणे.
अंतीम आदेश
१. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
२. विरुध्दपक्ष क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक वा संयुक्तपणे
तक्रारकर्त्यास त्यांची उर्वरीत जमा रक्कम रु.२,२०,८८०/- (अक्षरी, दोन लाख, विस हजार,आठशे ऐंन्शी केवळ) द.सा.द.शे.८% व्याज दराने दि.०५.१०.२०१५ (प्रकरण दाखल दिनांक) पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदाईपर्यन्त व्याजासहीत दयावी.
३. तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरीक, मानसीक, आर्थिक नुकसानी पोटी रु.५,०००/- (रुपये पाच हजार) व प्रकरणाचा न्याईक खर्च रु.३०००/-(रुपये तिन हजार) विरुध्दपक्ष क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक वा संयुक्तपणे तक्रारकर्त्याला द्यावा.
४. विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून
४५ दिवसाच्या आत करावे.
५. उभयपक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
मा.श्री.ए.सी.उकळकर, मा.सौ.एस.एम.उंटवाले,
सदस्य अध्यक्षा
दि.२७.०४.२०१६
स्टेनो/गंगाखेडे