Maharashtra

Gadchiroli

CC/16/2014

Shri. Subrat Sunil Adhikari - Complainant(s)

Versus

Shri. Prakash Sunil Datt & 1 Other - Opp.Party(s)

Adv. Sanjay L. Janbandhu

22 Sep 2014

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli, M.I.D.C. Road, Tea Point, Navegaon, Tah. Dist. Gadchiroli, Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/16/2014
 
1. Shri. Subrat Sunil Adhikari
Age- 42 Yr., Occu.- Service, R.B.D.D.s. Office, Police Sankul, Police Head Quater, Gadchiroli, Th. Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri. Prakash Sunil Datt & 1 Other
Occu.- Medical Store, Prakash Medical Stores, Mulchera, Th. Mulchera, Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
2. Branch Manager, H.B.N. Dearies & Alloied Ltd. Chandrapur
Behind Patrakar Nagar, Near Adarsh Petrol Pump, Baypass Road, Chandrapur, Th.dist. Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 HON'BLE MS. Roza F. Khobragade MEMBER
 
For the Complainant:Adv. Sanjay L. Janbandhu, Advocate
For the Opp. Party:
ORDER

आदेश

(निशाणी क्र.1 वर )

(मंचाचे निर्णयान्‍वये, रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्‍य)

(पारीत दिनांक : 22 सप्‍टेंबर 2014)

 

1.                 अर्जदाराने मय्यत पत्‍नीची पॉलिसीची रक्‍कम व्‍याजासह व अपघात विम्‍याची भरपाई मिळण्‍याकरीता दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

2.          अर्जदाराची पत्‍नी दि.23.3.2009 रोजी मौजा मच्‍छीघाट (लगाम), वनविभाग चौकीचे चेकींग नाक्‍याजवळ, ता.मुलचेरा, जि. गडचिरोली येथे वाहन अपघातात मरण पावली. अर्जदाराच्‍या मृतक पत्‍नीने गैरअर्जदार क्र.2 कडून पॉलिसी क्र.DO 7 BB 3527 रुपये 8500/- व  DO 7 BB 3139 रुपये 8500/- ञैमासीक पॉलिसी काढलेली होती. अर्जदार श्री सुब्रत सुनिल अधिकारी हे नॉमीनी होते.  गैरअर्जदार क्र.2 यांनी सांगितल्‍याप्रमाणे संपूर्ण मुळ दस्‍ताऐवज व नोटरी शपथपञ व नॉमीनी सर्टीफिकेट दि.3.4.2010 रोजी गैरअर्जदाराकडे दाखल केले. त्‍यावरही गैरअर्जदाराने कोणतेही दखल घेतली नाही व अर्जदारास विमा क्‍लेम दिला नाही. अर्जदार यांनी दि.9.8.2014 रोजी अधि.जनबंधू यांचे मार्फतीने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी नोटीस पाठविली.  गैरअर्जदार यांनी नोटीसाचे उत्‍तर दिले नाही.  गैरअर्जदाराने रक्‍कम परत न केल्‍यामुळे अर्जदाराचे फार मोठे नुकसान झाले. त्‍यामुळे अर्जदाराचे मा‍नसीक व शारिरीक प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला.  अर्जदाराची मृतक पत्‍नी कमला सुब्रत अधिकारी यांची पॉलिसी क्र.DO 7 BB 3527 रुपये 8500/- व  DO 7 BB 3139 रुपये 8500/- कंपनच्‍या नियमानुसार अपघात विमा तसेच 18 टक्‍के व्‍याजासह अर्जदारास वरील पॉलिसीचे नॉमीनी असल्‍यामुळे गैरअर्जदारांनी देण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच अर्जदाराला शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- व अर्जाचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्‍याची प्रार्थना केली.

 

3.          अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 22  दस्‍ताऐवज दाखल केले.  

 

4.          अर्जदाराचे वकीलाने केलेली प्राथमिक सुनावणी ऐकूण घेण्‍यात आली. अर्जदाराचे वकील यांनी केलेली प्राथमिक सुनावणी, दाखल दस्‍ताऐवजावरुन खालील मुद्दे निघतात.

 

मुद्दे                                   :  निष्‍कर्ष

1)    अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?           :  होय.

 

2)    सदर तक्रार मुदतीत दाखल करण्‍यात आली आहे काय ?     :  नाही.

 

3)    अंतिम आदेश काय ?                             :  अंतिम आदेशाप्रमाणे.  

                                                      

- कारण मिमांसा

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-  

 

5.           अर्जदाराच्‍या मृतक पत्‍नीने गैरअर्जदार क्र.1 च्‍या मार्फत गैरअर्जदार क्र. 2 कडून  पॉलिसी क्र.DO 7 BB 3527 रुपये 8500/- व  DO 7 BB 3139 रुपये 8500/- ञैमासीक पॉलिसी काढलेली होती. अर्जदार श्री सुब्रत सुनिल अधिकारी हे त्‍या पॉलिसीमध्‍ये नॉमीनी होते ही बाब अर्जदाराने नि.क्र.4 वर दाखल दस्‍ताऐवजावरुन सिध्‍द होते म्‍हणून अर्जदार गैरअर्जदाराची ग्राहक आहे हे सिध्‍द होते. म्‍हणून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 2 बाबत :-  

 

6.           अर्जदाराची पत्‍नी दि.23.3.2009 रोजी मौजा मच्‍छीघाट (लगाम), वनविभाग चौकीचे चेकींग नाक्‍याजवळ, ता.मुलचेरा, जि. गडचिरोली येथे वाहन अपघातात मरण पावली. अर्जदाराच्‍या मृतक पत्‍नीने गैरअर्जदार क्र.2 कडून पॉलिसी क्र.DO 7 BB 3527 रुपये 8500/- व  DO 7 BB 3139 रुपये 8500/- ञैमासीक पॉलिसी काढलेली होती. अर्जदार श्री सुब्रत सुनिल अधिकारी हे नॉमीनी होते.  गैरअर्जदार क्र.2 यांनी सांगितल्‍याप्रमाणे संपूर्ण मुळ दस्‍ताऐवज व नोटरी शपथपञ व नॉमीनी सर्टीफिकेट दि.3.4.2010 रोजी गैरअर्जदाराकडे दाखल केले. त्‍यावरही गैरअर्जदाराने कोणतेही दखल घेतली नाही व अर्जदारास विमा क्‍लेम दिला नाही ही बाब अर्जदाराची तक्रार व अर्जदारातर्फे अधिवक्‍ता यांनी केलेल्‍या प्राथमिक युक्‍तीवादावरुन स्‍पष्‍ट झाली.  सदर तक्रार दाखल करण्‍याचे कारण दि.4.4.2010 रोजी घडले, जेंव्‍हा गैरअर्जदाराने अर्जदाराचे मुळ दस्‍ताऐवज व नॉ‍मिनी सर्टीफिकेट घेवून सुध्‍दा अर्जदाराचे विमा क्‍लेमवर कोणतीही दखल घेतली नाही.  सदर तक्रार मंचासमक्ष दि.2.9.2014 रोजी दाखल करण्‍यात आली म्‍हणून सदर तक्रार कलम 24 अ (1) ग्राहक संरक्षण कायदा 1986 प्रमाणे मुदतीत दाखल करण्‍यात आली नाही. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.       

मुद्दा क्रमांक 3 बाबत :-  

 

7.          मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.       

                 

अंतिम आदेश  -

 

(1)   अर्जदाराची तक्रार मुदतीचे बाहेर असल्‍यामुळे अस्विकृत करण्‍यात येत आहे.

  

(2)   अर्जदाराच्‍या तक्रारीची मुळ प्रत सोडून उरलेली प्रत व दस्‍ताऐवज अर्जदारांना परत करण्‍यात यावी.  

 

(3)   अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.