तक्रार दाखल दिनांक – 07/10/2008 निकालपञ दिनांक – 25/02/2010 कालावधी - 01 वर्ष 04 महिने 18 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर तक्रार क्रमांक – 427/2008 श्री. शिवाजी गोविंद जाधव जोमापाटील चाळ, शिवाजी नगर, बेलापुर रोड, कलवा, जि - ठाणे. .. तक्रारदार तक्रार क्रमांक – 428/2008 श्री. विजयसिंग रमेशरे चौहान जोमापाटील चाळ, शिवाजी नगर, बेलापुर रोड, कलवा, जि - ठाणे. .. तक्रारदार तक्रार क्रमांक – 444 /2008 श्री.चंद्रीभान इंद्रपती पांडे जोमापाटील चाळ, शिवाजी नगर, बेलापुर रोड, कलवा, जि - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द श्री. प्रकाश नामदेश महात्रे प्रोप. मे. आनंद कनस्ट्रक्शन, मंदाकीनी को.हॉ.सो. कलवा, जिल्हा - ठाणे 400 605. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र.अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल पुनम माखिजानी वि.प तर्फे वकिल प्रदिप पिल्लाई आदेश (पारित दिः 25/02/2010) मा. प्र.अध्यक्ष सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रारी क्र.427/2008, 428/2008 व 444/2008, अनुक्रमे श्री. शिवाजी जाधव, श्री. विजयसिंग चौव्हान व श्री. चंद्रभान पांडे, यांनी श्री. प्रकाश नामदेव म्हात्रे प्रोपरायटर मे. आनंद कंन्स्ट्रक्शन यांचे विरुध्द दाखल केली आहे सर्व तक्रारदारांनी यामध्ये उभयपक्षात झालेल्या करारनाम्यानुसार संबंधीत सदनिकेचा ताबा नुकसान भरपाईसकट व पर्यायी जागेच्या भाडयासकट मागितले आहेत.
2. विरुध्द पक्षकार हे पेशाने बिल्डर व्यवसायाशी संबंधीत आहेत. सदर तक्रारीमधील सर्व तक्रारदार ’जोमा पाटील’ या चाळीत प्रत्येकी 150 चौ. .. 2 .. फुटच्या सदनिका मध्ये भाडयाने राहत होते. या चाळीचे मालक श्री.रमेश जोमा पाटील यांच्याशी ठराव करुन सदर जागा नव्याने बांधुन त्यामधील भाडेकरुंना सेल्फ कंटेंट सदनिका देण्याचे कबुल केले व त्यानुसार विरुध्द पक्षकार यांनी सदर तक्रारदार भाडेकरुशी दि.06/07/2001 मध्ये स्वतंत्र करारनामा केला व त्यामध्ये अनुक्रमे प्रत्येकी 270 चौ.फुट क्षेत्रफळाच्या तळमजल्यावरील सदनिका नं. 05, सदनिका नं. 02 व सदनिका नं. 06 देण्यास तत्सम अटीनुसार बांधील झाले. तसेच या सदनिकांचा शांततापुर्ण ताबा देईर्पयंत पर्यायी जागेचे भाडे देण्याची विरुध्द पक्षकार यांना तयारी दाखवली परंतु प्रत्यक्षात मात्र विरुध्द पक्षकार हे सदर कबुल केलेल्या सेवा देण्यास असमर्थ ठरले विरुध्द पक्षकार यांनी चाळ पाडुन नवीन बांधलेल्या सदनिकेचा ताबा देऊ न शकल्याने त्यांच्या सेवेत त्रृटी आहेत असे तक्रारकर्ता यांचे म्हणणे आहे सदर चाळ म्युनिसीपालीटीने धोकादायक म्हणुन घोषीत केली होती.
3. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत वरील तिन्ही तक्रारीमध्ये दि.17/12/2008 रोजी दाखल केल्या आहेत यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सदर जोमा पाटील चाळ A व B अशा दोन भागामध्ये बांधली जाणार होती. त्यापैकी Bबींग मधील भाडेकरुनी पर्यायी जागेत स्थलांतर करुन पुर्ण रिकामा ताबा विरुध्द पक्षकार यांचे कडे दिल्यामुळे त्यांची चाळ पाडुन नवीन इमारतीचे बांधकाम केले व त्यामध्ये जादा जागेची वाढीव किंमत भरणा-या 3 भाडेकरुला 3 सदनिका दिल्या व उरलेल्या 18 सदनिका बाजारभावाने नवीन गि-हाईकांना विकुन टाकल्या. परंतु Aवींग मधील काही भाडेकरु सदर भाडयाची जागा सोडण्यास तयार होत नसल्याने व त्यांच्या अवाजवी अटी विरुध्द पक्षकार यांना मान्य करता येत नसल्याने पुर्ण वींग खाली होऊ शकत नाही व त्यामुळे विरुध्द पक्षकार यांच्या सदर वींग पाडुन नवीन सदनिका बांधुन करारनाम्यानुसार त्या संबंधीत भाडेकरुंच्या ताब्यात देण्यामध्ये बांधा निर्माण झाली आहे पुर्ण चाळ भाडेकरुंनी खाली करुन पर्यांयी जागेत ते स्थलांतरीत झाले तरच पुढील बांधकाम सुरळीत होऊ शकेल. परंतु श्री.लक्षमण परब व इतर काही भाडेकरु घर सोडण्यास तयारच होत नाहीत त्यामुळे विरुध्द पक्षकार कोणालाच ठरलेल्या सदनिकेचे बांधकाम करुन ताबा देऊ शकत नाहीत असे विरुध्द पक्षकार यांचे म्हणणे आहे. तसेच विरुध्द पक्षकार यांच्या मते तक्रारकर्ता यांना दिलेल्या पर्यायी जागेत स्थलांतरीत करण्यात आले होते. विरुध्द पक्षकार यांच्या म्हणण्यानुसार करारनाम्यातील अटीनुसार बांधकाम सुरू झाल्यानंतर 18 महिन्यात बांधकाम पुर्ण करुन सदनिकेचा ताबा देण्याचे उभयपक्षात ठरले होते परंत इथे भाडेकरु भाडयांच्या जागा सोडत नसल्याने बोधकाम होऊच शकले नाही.
.. 3 .. 4. उभयपक्षातील शपथपत्रे, करारनामे पुराव्याची कागदपत्रे, लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद मंचाने पडताळुन पाहीले व मंचापुढे पुढील एकमेव प्रश्न उदभवतो. प्र. विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत त्रृटी, निष्काळजीपणा आढळतो का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रार क्र.444/2008 व 427/2008, 428/2008 यामधील तक्रारदार हे जोमा पाटील चाळीतील भाडेकरु आहेत ते सदर चाळीच्या मालकास श्री. रमेश जोमा पाटील यांस त्यांचे ठरलेले भाडे नियमित भरत होते. परंतु म्युनिसीपालीटीने सदर इमारत धोकादायक म्हणुन ठरवल्यानंतर विरुध्द पक्षकार यांनी सदर चाळ पाडुन नवीन FSI प्रमाणे रहात्या भाडेकरुना तिथेच नवीन जागा व सदनिका उपलब्ध करुन देण्याबाबत दि.06/07/2001 रोजी सर्व इमारत बांधुन सदनिका देईपर्यंत पर्यायी जागेची व्यवस्था करुन देण्याची जबाबदारी विरुध्द पक्षकार यांचीच राहील बांधकाम सुरू झाल्यापासुन 18 महीन्यात सदनिकेचा ताबा देण्याचेही कबुल झाले. विरुध्द पक्षकार यांनी ’B’ वींगचे बांधकाम करुन त्यामध्ये जादा FSI ची जादा किंमत भरणा-या 3 भाडेकरुना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. परंतु इतर भाडेकरुना पर्यांयी जागेतच ठेवण्यात आले कारण विरुध्द पक्षकार यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उरलेल्या 18 सदनिका भाडेकरुच्या रहाण्याच्या व्यवस्थेची पर्वा न करता नवीन लोकांना विकुन टाकल्या व भाडेकरुच्या मुलभूत अधिकाराला ठेच पोहोचवली आहे. विरुध्द पक्षकार यांचा ’A’ वींग रिकामी होत नाही कारण काही भाडेकरु जागा खाली करण्यास तयार नाहीत हा युक्तीवाद स्वतःच्याच फायद्याचा हिशोब लावणारा वाटतो कारण तक्रारकर्ताशी करारनामा कायदेशीर नोंदणीकृत केल्यानंतर तो प्रत्यक्षात कार्यान्वीत करण्याची जबाबदारी विरुध्द पक्षकार यांचीच राहील. व तोपर्यंत भाडेकरुला दिलेल्या पर्यायी जागेचे भाडे भरण्याची जबाबदारीही विरुध्द पक्षकार यांच्यावरच आहे. परंतु जे भाडेकरु स्वतःच्या भाडयाच्या त्याच चाळीत रहात असतील तर त्या जागेचे भाडे मात्र भाडेकरुंनी मालकास दिले पाहीजे असे या मंचाचे मत आहे. विरुध्द पक्षकार यांनी करारनाम्याशी बांधील राहुन सर्व भाडेकरुंना त्यांच्या मालकिची व मूलभुत अधिकाराची जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी न टाळता पुर्तता करणे कायदेशीर व योग्य ठरेल. अंतीम आदेश
1. तक्रार क्र.427/2008, 428/2008 व 444/2008 ही अंशतः मंजुर करण्यात येत आहे व या तक्रारीचा खर्च प्रत्येकी रु.1,500/- (रु.एक हजार पाचशे फक्त) विरुध्द पक्षकार यांनी प्रत्येक तक्रारदारास द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
.. 4 .. 2.विरुध्द पक्षकार यांनी दि.06/07/2001 रोजी तिन्ही तक्रारदार बरोबर झालेल्या करारनाम्यानुसार जोमा पाटील चाळीचे नवीन बांधकाम करुन प्रत्येकाला अनुक्रमे तळमजल्यावरील 270 चौ. फुट क्षेत्रफळाच्या सदनिकां नं.02, नं.05, नं.06 द्याव्यात सदर जागाचा ताबा अनुक्रमे तक्रारदारांना देताना त्याबद्दलचे सर्व कायदेशीर सोपस्कार पुर्ण करावेत व तोपर्यंत तक्रारदार ज्या पर्यायी रहाण्याच्या जागेत स्थलांतरीत होतील त्या व्यवस्थेचा भाडयाचा खर्च विरुध्द पक्षकार यांनीच उचलावा. 3.वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्षकार यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 3 महिन्याच्या आत करावे. या दरम्यान सदर सर्व तक्रारदारांच्या इच्छेनुसार व त्यांच्या पुर्व मान्यतेनुसार विरुध्द पक्षकार त्यांना त्याच परिसरातील दुसरी सदनिका देऊ शकतील परंतु त्याबाबत करारनाम्याच्या नोंदणीचा सर्व खर्च विरुध्द पक्षकार यांना करावा लागेल. 4.विरुध्द पक्षकार यांनी मानसिक त्रास व नुकसान भरपाईपोटी सर्व तक्रारदारास प्रत्येकी रु. 2,500/-(रु.दोन हजार पाचशे फक्त) द्यावेत. 5.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
6.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदतीनंतर मंचाची जबाबदारी नाही.
दिनांक – 25/02/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट ) (सौ. भावना पिसाळ ) सदस्य प्र.अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|