Maharashtra

Nagpur

CC/462/2019

SHRI. KONA KRISHNARAO NAYADU - Complainant(s)

Versus

SHRI. NITESH VINODRAI DIVECHA - Opp.Party(s)

ADV. HARSH I. KOTHARI

22 Jun 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/462/2019
( Date of Filing : 22 Aug 2019 )
 
1. SHRI. KONA KRISHNARAO NAYADU
R/O. 502-A, FOREST CASTLES, KOREGAON PARK, NORTH MAIN ROAD, PUNE-411036
PUNE
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHRI. NITESH VINODRAI DIVECHA
R/O. PLOT NO. 3, KAPILESWAR NAGAR, BEHIND POLICE LINE TAKLI, KATOL ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. JITESH VINODRAI DIVECHA
R/O. PLOT NO. 3, KAPILESWAR NAGAR, BEHIND POLICE LINE TAKLI, KATOL ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. MISS BHARTI VINODRAI DIVECHA
R/O. PLOT NO. 3, KAPILESWAR NAGAR, BEHIND POLICE LINE TAKLI, KATOL ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
4. SHRI. HARSH VINODRAI DIVECHA
R/O. PLOT NO. 3, KAPILESWAR NAGAR, BEHIND POLICE LINE TAKLI, KATOL ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
5. M/S. AASHIRWAD BUILDERS, THROUGH PARTNER, MRS. REKHA DARSHAN RANGARI
R/O. FLAT NO. T-04, KRISHNA VIHAR APARTMENT, NAVNEET SOCIETY, NARENDRA NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. HARSH I. KOTHARI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 22 Jun 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 हे स्‍व. विनोदराय रनजीभाई दिवेचा यांचे वारसदार श्री. विनोदराय रनजीभाई दिवेचा यांचे पुत्र असून ते सदरच्‍या जागेचे एकमेव मालक आहेत.  त्‍याचे महानगरपालिका घर क्रं. 207(जुने) 33 (नविन), क्षेत्रफळ  4916.86 चौ.फु., वार्ड क्रं. 37/65, सर्कल नं. 23/26, विभाग क्रं. VIII , सिटी सर्व्‍हे नं. 1896, शिट नं., 185/29, मौजा- सिताबर्डी असून सदरची जागा गड्डीगोदाम, जि.नागपूर येथे स्थित आहे. विनोदराय दिवेचा यांनी सदरच्‍या जागेवर इमारत बांधण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष क्रं. 5 यांच्‍याशी जागा विकसनाचा करारपत्र दि. 30.04.1987 रोजी केला. सदरच्‍या करारपत्रानुसार श्री. दिवेचा यांनी सदनिका विकत घेणा-या व्‍यक्‍तीं सोबत करार करण्‍याचा अधिकार दिला व श्री. दिवेचा यांनी विरुध्‍द पक्ष क्रं. 5 यांना कधीही रद्द न होणारे आममुख्‍यत्‍यारपत्र ऑक्‍टोंबर 1993 मध्‍ये करुन दिले होते. त्‍यानंतर दि. 20.03.1989 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं. 5 ने शासना तर्फे बिल्‍डींग परमिट क्रं.  TK/788/192 प्राप्‍त केला व “Anne-Rebacca Apartment” असे इमारतीचे नांव ठेवले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रं. 5 ला आर्थिक अडचणी उद्भवल्‍यामुळे त्‍यांनी M/s. Shelters, प्रोप्रा. श्रीमती तारु केशवराव नायडू, राह. मोहननगर, नागपूर यांच्‍या सोबत दि. 09.01.1994 रोजी समझोता पत्र केले व त्‍यानुसार M/s. Shelters यांनी उपरोक्‍त बिल्‍डींग परमिटचे नुतनीकरण क्रं. 3/EPR/55, दि. 05.04.1994 रोजी केले.  त्‍यानंतर दि. 10.07.1998 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं. 5 ने  दुय्यम निबंधक, नागपूर यांच्‍याकडे नोंदणी क्रं. 897 प्रमाणे “Deed of Declaration” नोंदविले व त्‍यानंतर सदर इमारतीचे नांव “Anne-Shelters” असे ठेवण्‍यात आले.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, त्‍याने सदरच्‍या इमारतीतील दुस-या मजल्‍यावरील दोन सदनिका (S1आणि S2) प्रत्‍येकी 750 चौ.फु. रक्‍कम रुपये 7,50,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचे ठरले व त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला  धनादेश क्रं. 011951,  दि. 31.03.1994 अन्‍वये रुपये 1,15,000/- ,  धनादेश क्रं. 011952 , दि. 01.05.1994 अन्‍वये रुपये 1,35,000/-, धनादेश क्रं. 011953,  दि. 01.06.1994 अन्‍वये रुपये 1,00,000/-, धनादेश क्रं. 047068 , दि. 21.11.1994 अन्‍वये रुपये 2,00,000/-,  दि. 31.12.1994 ला नगदी स्‍वरुपात रुपये 18,000/- , दि. 30.04.1995 ला नगदी स्‍वरुपात रुपये 27,000/-, दि. 21.05.1995 ला नगदी स्‍वरुपात रुपये 1,12,000/- व धनादेश क्रं. 030663  दि. 26.08.1995 अन्‍वये रुपये 28,000/- अदा केले होते व इलेक्‍ट्रीक मीटर पोटी रुपये 15,000/- अदा केलेले आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 31.07.1995 पूर्वी सदनिकेचे संपूर्ण बांधकाम पूर्ण करुन ताबा देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिकेचे बांधकाम पूर्ण होण्‍यापूर्वीच संपूर्ण रक्‍कम अदा केलेली आहे व त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून वरीलप्रमाणे रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याची दि. 05.05.1996 च्‍या पत्राप्रमाणे स्‍वीकृती दिलेली आहे. आधिचे डेव्‍हल्‍पर्स हे सदरच्‍या सदनिकेकरिता दरवाजे, खिडक्‍या व व्‍हेन्‍टीलेटरच्‍या फ्रेम लोखंडी पुरविणार होता, परंतु तक्रारकर्त्‍याला दरवाजे, खिडक्‍या व व्‍हेन्‍टीलेटर हे सागवानी लाकडाचे हवे होते. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने स्‍वतःहून चांगल्‍या दर्ज्‍याचे सागवनीचे दरवाजे, खिडक्‍या व व्‍हेन्‍टीलेटर्स तयार केले. त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला 58.30 cubic feet सागवन लागले व ते तक्रारकर्त्‍याने रुपये 58,000/- ला विकत घेतले व बनविण्‍याची मजुरी खर्च रुपये 21,700/- इतकी आहे. सदरचे दरवाजे, खिडकी, व्‍हेन्‍टीलेटर सन 1996 ला बसविण्‍यात आले. विरुध्‍द पक्षाने सदनिकेच्‍या एकूण किंमती मधून दरवाजे, खिडक्‍या व फ्रेमच्‍या किंमती कमी करणार असल्‍याचे आश्‍वासन ही दिले होते. तक्रारकर्त्‍याकडून दोन्‍ही सदनिकेची संपूर्ण रक्‍कम स्‍वीकृत करुन ही विरुध्‍द पक्षाने दोन्‍ही सदनिकेचे बांधकाम पूर्ण केलेले नाही. 

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, काही दिवसांनी विनोदराय दिवेचा यांचा मृत्‍यु झाला, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 यांचे नांव तक्रारीच्‍या नि.क्रं. 1 वरील अभिलेखावर आणले व थोडया दिवसातच M/s. Shelters, प्रोप्रा. श्रीमती तारु केशवराव नायडू हया अविवाहित असून त्‍यांचा देखील मृत्‍यु झाला, त्‍यामुळे आता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 5 यांनीच तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देणे आवश्‍यक आहे. विरुध्‍द पक्ष यांना अनेक वेळा सदरच्‍या सदनिकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता विनंती करुन ही त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या मागणीकडे दुर्लक्ष केले. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 यांना दि. 16.04.2019 ला रजिस्‍टर्ड पोस्‍टा द्वारे पाठविलेली नोटीस लेफ्ट या पोस्‍टाच्‍या शे-यासह परत आली व विरुध्‍द पक्ष क्रं. 5 यांना नोटीस प्राप्‍त होऊन ही त्‍यांनी सदरच्‍या नोटीसचे उत्‍तर दिलेले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 5 विरुध्‍द प्रस्‍तुत  तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 5 यांनी दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्ष 1 ते 5 यांनी उपरोक्‍त दोन्‍ही सदनिकेचे (S1 आणि S2) नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे महानगरपालिका यांच्‍याकडून occupancy certificate (रहिवासी दाखला) प्राप्‍त करुन द्यावे. हे कायदेशीररित्‍या शक्‍य नसल्‍यास उपरोक्‍त सदनिकेची आजच्‍या बाजारभावाप्रमाणे रक्‍कम तक्रारकर्त्‍यास मिळावी. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास  रक्‍कम रुपये 7,50,000/-, 18 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा अशी मागणी केलेली आहे.

 

  1.         विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 यांच्‍या विरुध्‍द दैनिक भास्‍कर या वृत्‍तपत्रातून दि. 06.12.2019 रोजी जाहीर नोटीस प्रसिध्‍द करण्‍यात आली होती, त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 हे मंचासमक्ष हजर झाले नाही अथवा त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 ते 4  यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 30.01.2020 रोजी पारित करण्‍यात आला.

    

  1.      विरुध्‍द पक्ष 5 ने दि. 30.01.2020 रोजी नि.क्रं. 18 प्रमाणे आपला लेखी जबाब दाखल करण्‍याच्‍या परवानगीचा अर्ज सादर केला होता. परंतु सदरचा अर्ज हा उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्‍यानंतर दि. 06.03.2020 रोजी नाकारण्‍यात आला. सबब विरुध्‍द पक्ष क्रं. 5 यांचा कोणताही लेखी जबाब अभिलेखावर नाही.

 

  1.             तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवजाचे  व विरुध्‍द पक्ष 5 यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद याचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तसेच त्‍यांच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

  अ.क्र.     मुद्दे                                    उत्‍तर

 

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे काय ? होय

 

  1.       विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय? होय

        3.     काय आदेश                              अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 हे स्‍व. विनोदराय रनजीभाई दिवेचा यांचे वारसदार आहेत. विरुध्‍द पक्ष 5 आर्शिवाद बिल्‍डर्सचे पार्टनर श्रीमती रेखा दर्शन रंगारी,  यांनी स्‍व. विनोदराय दिवेचा यांच्‍या सोबत महानगरपालिका घर क्रं. 207(जुने) 33 (नविन), क्षेत्रफळ  4916.86 चौ.फु., वार्ड क्रं. 37/65, सर्कल नं. 23/26, विभाग क्रं. VIII , सिटी सर्व्‍हे नं. 1896, शिट नं., 185/29, मौजा- सिताबर्डी असून सदरची जागा गड्डीगोदाम, जि.नागपूर येथील जमीन विकसन करण्‍याचा व त्‍यावर इमारत बांधकाम करण्‍याचा करार केला होता. तसेच विरुध्‍द पक्ष 5 यांना कधीही रद्द न होणारे आममुख्‍यत्‍यारपत्र ऑक्‍टोंबर 1993 मध्‍ये करुन दिले होते व सदर इमारती मधील सदनिका विकण्‍याचा सुध्‍दा संपूर्ण अधिकार दिला असून त्‍याबाबतचा लेखी करार सुध्‍दा केला होता. विरुध्‍द पक्ष क्रं. 5 ने सदर इमारतीचे नांव “Anne-Rebacca Apartment” असे ठेवले होते. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रं. 5 ला आर्थिक अडचणी उद्भवल्‍यामुळे त्‍यांनी M/s. Shelters,च्‍या प्रोप्रा. श्रीमती तारु केशवराव नायडू, यांच्‍या सोबत दि. 09.01.1994 रोजी समझोता पत्र केले व दि. 10.07.1998 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं. 5 ने  दुय्यम निबंधक, नागपूर यांच्‍याकडे नोंदणी क्रं. 897 प्रमाणे “Deed of Declaration” नोंदविले व त्‍यानंतर सदर इमारतीचे नांव “Anne-Shelters” असे ठेवण्‍यात आले.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने “Anne-Shelters” या इमारती मधील दुस-या मजल्‍यावरील दोन्‍ही सदनिका ( S1 आणि S2) प्रत्‍येकी 750 चौ.फु. याप्रमाणे एकूण रक्‍कम रुपये 7,50,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचे ठरले होते व त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दोन्‍ही सदनिकेचे बांधकाम पूर्ण होण्‍यापूर्वीच संपूर्ण रक्‍कम अदा केलेली आहे हे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याने सागवनी दरवाजे, खिडक्‍या व व्‍हेन्‍टीलेटर फ्रेमकरिता खर्च केलेली रक्‍कम वजा करुन देण्‍याचे ही आश्‍वासन दिले होते.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 5 ला उपरोक्‍त नमूद दुस-या मजल्‍यावरील दोन्‍ही सदनिकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता अनेक वेळा विनंती केल्‍यावर ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोन्‍ही सदनिकेचे कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिलेले नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून त्‍याने अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                   अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 5 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे महानगरपालिका घर क्रं. 207(जुने) 33 (नविन), क्षेत्रफळ  4916.86 चौ.फु., वार्ड क्रं. 37/65, सर्कल नं. 23/26, विभाग क्रं. VIII , सिटी सर्व्‍हे नं. 1896, शिट नं., 185/29, मौजा- सिताबर्डी असून सदरची जागा गड्डीगोदाम, जि.नागपूर येथे स्थित असलेल्‍या “Anne-Shelters” या इमारतीतील  दुस-या मजल्‍यावरील दोन सदनिका (S1 आणि S2) प्रत्‍येकी 750 चौ.फु. चे कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 5 यांनी सक्षम अधिका-याकडून विहित मुदतीत रहिवासी दाखला प्राप्‍त करुन विक्री कराराप्रमाणे इमारतीतील सदनिकेचे अपूर्ण असलेले बांधकाम मुळ सुख-सोयीसह पूर्ण करुन तक्रारकर्त्‍याला सदनिकेचा प्रत्‍यक्ष ताबा द्यावा. 

 

  • अथवा

उपरोक्‍त सदनिकांचे कायदेशीररित्‍या किंवा तांत्रिक दृष्‍टया विक्रीपत्र नोंदवून देणे  शक्‍य नसल्‍यास किंवा अडचण असल्‍यास विरुध्‍द पक्षाने  1500 चौ.फु. इतके क्षेत्रफळ असलेल्‍या सदनिकांसाठी मौजा –सिताबर्डी , गड्डीगोदाम, सिटी सर्व्‍हे नं.1896, शिट नं. 185/29 , तह.,जि. नागपूर, या मिळकतीच्‍या झोन मधील अथवा वादातीत सदनिकां पासून सर्वात जवळ असलेल्‍या इतर  झोन मध्‍ये 1500  चौ.फुटाच्‍या सदनिकेकरिता शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या दिनांकापासून एक महिन्‍याच्‍या आंत द्यावी आणि  सदरहू रक्‍कम एक महिन्‍याच्‍या आत न दिल्‍यास त्‍या रक्‍कमेवर आदेशाच्‍या दिनांकापासून द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द्यावे.   

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 5 यांनी तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या दोन्‍ही सदनिकेकरिता स्‍वखर्चाने बसविलेले सागवनी दरवाजे, खिडक्‍या व व्‍हेन्‍टीलेटरकरिता खर्च केलेली रक्‍कम रुपये 79,700/- (रुपये 58,000+ 21,700/-) व त्‍यावर दि. 01.08.2019 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याजासह परत करावी.

 

  1. विक्रीपत्र नोंदणी करते वेळी विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 यांनी सहमतीदार म्‍हणून त्‍यावर स्‍वाक्षरी करावी. 

 

  1. सदनिकेचे विक्रीपत्र नोंदणीकरिता लागणारा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 5 यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/-द्यावे.

 

  1. वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 5 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.  

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.