मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली प्रकरण क्र. : 14/2007 (क.27). वसुली प्रकरण दाखल झाल्याचा दि.16/03/2007 वसुली प्रकरण निकाली झाल्याचा दि. 03/08/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्रीमती सुलोचना रघुनाथ साळुंखे रा.मु.पो.हर्णे, ता.दापोली, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द श्री.मनोहर भिकू कंरजीवकर रा.जालगांव, ता.दापोली, जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे – प्रतिनिधी उपस्थित सामनेवाले - अनुपस्थित आ दे श तक्रारदार अनेक तारखांना गैरहजर असलेने तक्रारदार यांना सामनेवाला विरुध्द योग्य ती तजवीज करणेसाठी समक्ष उपस्थित राहणेसाठी दि.01/07/2010 रोजीचे आदेशान्वये नोटीस काढणेत आली. तक्रारदार या स्वतः उपस्थित झाल्या नाहीत आज रोजी तक्रारदारतर्फे त्यांचे प्रतिनिधी म्हणून पती रघूनाथ रामा साळुंखे उपस्थित. प्रतिनिधी यांनी नि.111 वर पूरशिस सादर करुन सामनेवाला याने मंचाचे आदेशाप्रमाणे पूर्तता केली असलेने वसूली प्रकरण निकाली करणेत यावे अशी विनंती केली. सदर प्रतिनिधी यांना प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारतर्फे उपस्थित राहणेबाबत अधिकारपत्र नि.10 अन्वये देणेत आले आहे. तक्रारदार यांना रजि.पोस्टाने उपस्थित राहणेबाबत कळविले असता तक्रारदार गैरहजर राहीले त्यामुळे तक्रारदार यांना प्रस्तुत वसूली प्रकरण यापुढे चालविणेत स्वारस्य नसलेचे दिसून येते. सबब तक्रारदार गैरहजर असलेने व नि.111 वरील पूरशिसचे अनुषंगाने सदरचा वसूली अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी (अनिल गोडसे) दिनांक : - 03/08/2010 अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |