(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 28 डिसेंबर 2011)
तक्रारकर्ती हिने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
... 2 ... (ग्रा.त.क्र.3/2011)
1. गैरतक्रारकर्ता क्र.1 हे माणिक ईंटरप्राईजेस या दुकानाचे मालक असून, त्यांचा मोबाईल फोन, घडयाळ, चष्मे व इतर सामान विक्रीचा व्यवसाय आहे. गैरतक्रारकर्ता क्र.2 ही मोबाईल फोन व मोबाईल फोनचे सुटे भाग उत्पादन करुन वितरक व एजेंन्सीचे मार्फतीने उत्पादीत मालाची विक्री करणारी खाजगी कंपनी आहे. गैरतक्रारकर्ता क्र.1 हे गैरतक्रारकर्ता क्र.2 या कंपनीचे एजंट आहेत. तक्रारकर्ती हिने दि.31.8.2010 रोजी गैरतक्रारकर्ता क्र.1 चे दुकानातून मायक्रोमॅक्स कंपनीचा मॉडेल क्र. क्यु 55 एम-आइएमइआइ नं.910044903593124 व एस-आइएमइआइ नं.910044904113120 हा मोबाईल फोन रुपये 5600/- नगदी रक्कम देऊन, बिल क्र.370 अन्वये खरेदी केला. खरेदीचे वेळी गैरतक्रारकर्ता क्र.1 ने गैरतक्रारकर्ता क्र.2 मोबाईल कंपनीच्या वतीने 1 वर्षाची दुरुस्ती व अदलाबदली करुन देण्याची हमी दिली. मोबाईल फोन खरेदी करुन नेल्यानंतर लगेच दुस-या दिवशी अचानकपणे तो मोबाईल फोन बंद पडला. तक्रारकर्ती हिने, गैरतक्रारकर्ता क्र.1 शी संपर्क साधून मोबाईल बंद पडल्याची सुचना दिली. गैरतक्रारकर्ता क्र.1 ने मोबाईल फोनमध्ये अगोदरच काही तांञीक बिघाड असेल व त्यामुळे सदरचा मोबाईल बंद पडला असेल, मोबाईल दुरुस्तीसाठी गैरतक्रारकर्ता क्र.2 कडे पाठवून, मोबाईल दुरुस्त न झाल्यास त्याच कंपनीचा दुसरा मोबाईल फोन देण्याचे आश्वासन अर्जदारास दिले. मोबाईल फोन सर्व साहित्यासह व पॅकिंगच्या डब्यासह गैरतक्रारकर्ता क्र.1 चे स्वाधीन केले.
2. यांनतर, तक्रारकर्ती हिने दि.21.9.2010 व 15.10.2010 ला गैरतक्रारकर्ता क्र.1 चे दुकानात जावून मोबाईल बाबत विचारणा केली असता, ‘‘तुमचा मोबाईल फोन दिल्लीला दुरुस्तीसाठी पाठविलेला आहे, तुम्ही एक महिण्यानंतर या किंवा सदरचा मोबाईल फोन दुरुस्त होऊन आल्यानंतर मी स्वतःच तुम्हाला फोन करुन सांगतो.’’ असे उत्तर दिले. परंतु, गैरतक्रारकर्ता क्र.1 ने एक महिण्यापेक्षा जास्त कालावधी होऊनसुध्दा अर्जदार हिला फोन केला नाही. तक्रारकर्ती हिने दि.27.12.2010 रोजी अधि.जगदीश मेश्राम याचे मार्फतीने गैरतक्रारकर्ता क्र.1 यास नोटीस पाठवून मोबाईल फोन दुरुस्त करुन देण्याची किंवा एकाच कंपनीचा व मॉडेलचा नविन मोबाईल फोन देण्याची सुचना दिली. परंतु, गैरतक्रारकर्ता क्र.1 ने दि.6.1.2011 ला अधि.अमोल कानकाटे यांचे मार्फतीने नोटीसाचे उत्तर पाठविले. सदरचा मोबाईल फोन दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी ही गैरतक्रारकर्ता क्र.2 या कंपनीची सुध्दा आहे. परंतु, गैरतक्रारकर्ता क्र.2 ने दिलेली माहिती पुस्तिका गैरतक्रारकर्ता क्र.1 ने तक्रारकर्तीस न देता स्वतःकडे ठेवलेली आहे. गैरतक्रारकर्ता क्र.1 व 2 हे दोघेही मिळून तक्रारकर्तीची फसवणूक करुन तिचे आर्थिक नुकसान करु इच्छीत आहे. तक्रारकर्ती ही व्यवसायाने डॉक्टर आहे. तिला रुग्णांचे व इतर महत्वाचे फोन येत असतात. परंतु, सदर मोबाईल फोनचा कोणताही उपयोग तक्रारकर्ती हिला झाला नाही. उलट, अर्जदार हिचे आर्थिक नुकसान व मानसिक ञास झाला. गैरतक्रारकर्ता क्र.1 ने गैरतक्रारकर्ता क्र.2 च्या वतीने दिलेल्या वॉरंटीनुसार कोणतीही सेवा तक्रारकर्ती हिला न
... 3 ... (ग्रा.त.क्र.3/2011)
दिल्यामुळे, तसेच 4 महिने पर्यंत तक्रारकर्ती हिचा वेळ वाया घालविल्यामुळे तक्रारकर्ती हिला नाईलाजास्तव तक्रार दाखल करावी लागत आहे. त्यामुळे, गैरतक्रारकर्ता क्र.2 चे वतीने दिलेल्या वॉरंटीनुसार तक्रारकर्ती हिचा मोबाईल फोन दुरुस्त करुन देण्याचा आदेश गैरतक्रारकर्ता क्र.1 व 2 यांना देण्यात यावा. सदर मोबाईल फोन दुरुस्त होत नसल्यास त्याच कंपनीचा व त्याच मॉडेलचा नविन मोबाईल फोन तक्रारकर्ती हिला देण्याचा आदेश गैरतक्रारकर्ता क्र.1 व 2 यांना देण्यात यावा. गैरतक्रारकर्ता क्र.1 ने तक्रारकर्ती हिला मानसिक व आर्थिक ञासापोटी रुपये 10,000/- देण्याचा आदेश व्हावा. तक्रारकर्ती हिला तक्रार दाखल करण्याचा खर्च रुपये 10,000/- गैरतक्रारकर्ता क्र.1 व 2 कडून देण्याचा आदेश व्हावा, अशी प्रार्थना केली आहे.
3. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 5 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरतक्रारकर्ता क्र.1 हजर होऊन नि.क्र.11 नुसार लेखी उत्तर व सोबत 2 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गैरतक्रारकर्ता क्र. 2 यास नोटीस तामील होऊनही हजर झाला नाही. करीता, नि.क्र.1 वर गैरतक्रारकर्ता क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश दि.29.10.11 ला पारीत करण्यांत आला.
4. गैरतक्रारकर्ता क्र.1 ने लेखी उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्ती हिने दि.31.8.2010 रोजी गैरतक्रारकर्ता क्र.1 चे दुकानातून मायक्रोमॅक्स कंपनीचा मॉडेल क्र. क्यु 55 एम-आइएमइआइ नं.910044903593124 व एस-आइएमइआइ नं.910044904113120 हा मोबाईल फोन रुपये 5600/- नगदी रक्कम देवून खरेदी केला. खरेदीचे वेळी गैरतक्रारकर्ता क्र.1 ने कंपनीच्या वतीने सदर मोबाईल फोनची एक वर्षाची दुरुस्ती करुन देण्याची हमी दिली, हे तक्रारकर्ती हिचे कथन गैरअर्जदारास मान्य आहे. मोबाईल अदलाबदल करुन देण्याची हमी दिली, हे तक्रारकर्ती हिचे कथन खोटे व बनावटी असल्याने अमान्य आहे. गैरअर्जदाराने मोबाईल फोन खरेदी केल्याबाबतचे बिल क्र.370 दि.31.8.2010 अर्जदारास दिले आहे, हे तक्रारकर्ती हिचे कथन गैरअर्जदारास मान्य आहे. तक्रारकर्ती ही व्यवसायाने डॉक्टर आहे हे तक्रारकर्ती हिचे कथन गैरअर्जदारास मान्य आहे.
5. गैरतक्रारकर्ता क्र.1 ने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्ती हिने गैरअर्जदाराकडून मोबाईल फोन विकत घेतला व त्यानंतर तक्रारकर्ती हिचा मोबाईल फोन बंद पडलेला आहे असे सांगून, तो तुटलेला मोबाईल गैरतक्रारकर्त्याच्या दुकानात आणून दिला. तक्रारकर्ती हिचा मोबाईल फोन तिच्या मोलकरनीच्या हाताने खाली फर्शीवर पडला. तक्रारकर्ती हिने तो पडलेला फोन गैरअर्जदाराकडे घेवून आले, त्यावर गैरअर्जदाराने तक्रारकर्ती हिला सांगीतले की, फोनचे चार्जींग सॉकेट, तसेच वॉरंटी सील तुटलेली आहे. वॉरंटी सील तुटलेली असल्यामुळे कंपनी मोबाईल दुरुस्ती करीता घेत नाही, याबाबत तक्रारकर्ती हिला दिलेल्या बिलावर स्पष्टपणे नमूद आहे. बिलावर अटी व शर्ती लिहिलेल्या आहेत. अटी व शर्ती कबूल असल्याने बिल बुकवर तक्रारकर्ती हिने सही केली
... 4 ... (ग्रा.त.क्र.3/2011)
आहे. तक्रारकर्ती हिने गैरअर्जदारास विनंती केली की, मोबाईल फोन कंपनीच्या केअर सेंटरमध्ये (गोंदिया) दुरुस्तीला पाठवा व दुरुस्तीसाठी लागणारा संपूर्ण खर्च तक्रारकर्ती ही स्वतः देईल अशी कबूली दिली. तक्रारकर्ती हिच्या आग्रहास्तव गैरअर्जदाराने मोबाईल फोन कंपनीच्या केअर सेंटरमध्ये पाठविला. सदर कंपनीच्या केअर सेंटरने गैरअर्जदारास कळविले की, सदर मोबाईल फोन हा आमच्याकडे दुरुस्त होऊ शकत नाही, तो दिल्ली येथे कंपनीच्या मुख्य केअर सेंटरमध्ये पाठवावे लागते. तक्रारकर्ती हिचा मोबाईल फोन दुरुस्त न होता, तसाच कंपनीच्या केअर सेंटरमधून वापस आला व गैरअर्जदाराने अर्जदारास फोन दुरुस्त न झाल्याचे व तो घेवून जाण्याबाबत कळविले, तरी तक्रारकर्ती हिने मोबाईल फोन घेऊन न जाता खोटी व बनावटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमुळे गैरअर्जदारास फार मानसिक, शारीरीक ञास झालेला आहे. गैरअर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरीक ञासापोटी रुपये 20,000/- दंड अर्जदारावर बसविण्यात यावा व तक्रार अर्ज खारीज करण्यात यावा.
6. अर्जदार हिने तक्रार शपथपञावर सादर केले आहे. गैरतक्रारकर्ता क्र.1 ने नि.क्र.28 नुसार पुरावा शपथपञ दाखल केले. गैरतक्रारकर्ता क्र.2 विरुध्द प्रकरण एकतर्फा असल्याने, गैरतक्रारकर्ता क्र.1 ने युक्तीवाद केला नाही. त्यामुळे, सबब प्रकरण उपलब्ध रेकॉर्डवरुन तक्रार गुणदोषावर (Merits) निकाली काढण्याकरीता ठेवण्यात यावे, असा आदेश नि.क्र.1 वर दि.27.12.2011 ला पारीत केला. तक्रारकर्ती व गैरतक्रारकर्ता क्र.1 यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, गैरतक्रारकर्ता क्र.1 यांनी दाखल केलेले शपथपञ, व अर्जदाराचे वकील यांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
7. अर्जदार/तक्रारकर्ती हिने दि.31.8.2010 ला गै.अ.क्र.1/गैरतक्रारकर्ता याचे दुकानातून मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल मॉडेल क्र.क्यु 55 आयएमइआय क्र.910044903593124, व आयएमइआय नं.910044904113120 हा मोबाईल गै.अ.क्र.2 निर्मीत रुपये 5600/- मध्ये बिल क्र.370 माणिक इंटरप्रायजेस कडून विकत घेतला, याबाबत वाद नाही. अर्जदार व गै.अ. यांचेतील वादाचा मुद्दा असा आहे की, दि.31.8.2010 रोजी घेतलेला मोबाईल बंद पडल्यामुळे तो दुरुस्त करुन मागीतला. परंतु, दुरुस्त करुन देण्यात आला नाही, त्यामुळे गै.अ.यांनी दिलेल्या आश्वासनाचे पालन केले नाही व सेवा देण्यात न्युनता केली, असा विवादीत मुद्दा आहे.
8. गै.अ.क्र.1 यांनी लेखी उत्तरात अर्जदाराकडून मायक्रोमॅक्स मोबाईल मिळाला व त्यासोबत, पॅकींग बॉक्स, चार्जर व मोबाईल मिळाला हे मान्य केले आहे. गै.अ.यांनी अर्जदाराचा मोबाईल सर्वीस सेंटर गोंदीया येथे पाठविला, त्यांनी दुरुस्त होत नसल्याचे
... 5 ... (ग्रा.त.क्र.3/2011)
सांगितल्यामुळे दिल्ली येथे सर्वीस सेंटरला पाठविला, तरी अर्जदार हिने घेतलेला मोबाईल दुरुस्त झालेला नाही. अर्जदार ही मोबाईल दुरुस्त करुन मिळण्यात यावा आणि मोबाईल दुरुस्त होत नसल्यास त्याच कंपनीचा, त्याच मॉडेलचा नवीन दुसरा मोबाईल द्यावे, अशी मागणी केली आहे. अर्जदार हिने केलेली मागणी संयुक्तीक आहे. गै.अ.क्र.1 यांनी लेखी उत्तरात, तसेच त्याचे वकीलांनी केलेल्या युक्तीवादात सांगितले की, वॉरंटी ही कंपनीच्या शर्ती व अटी नुसार देण्यात आले. अर्जदाराचा मोबाईल पडल्यामुळे चार्जींग सॉकेट तुटले होती, तसेच वॉरंटी सील तुटलेला होता, त्यामुळे वॉरंटीत मोबाईल दुरुस्त करुन देण्यात आला नाही. गै.अ.क्र.1 यांनी मोबाईल तुटलेला होता. गोंदीया केअर सेंटर यांनी मोबाईल दुरुस्त होत नाही, दिल्लीला पाठवावे लागेल, असे सांगितले. दिल्ली केअर सेंटर यांनी मोबाईल दुरुस्त होत नाही असे म्हणून परत पाठविले, या गै.अ.क्र.1 च्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. वास्तविक, अर्जदार हिने भ्रमणध्वनी गै.अ.क्र.1 कडून घेतला असून, त्याबाबत बिल दि.31.8.2010 ला अर्जदार हिला दिला. त्यात असे नमूद केले आहे की, Note – Warranty covered by company service Center not our risk. यावरुन, सदर बिलात कंपनीने कोणत्या शर्ती व अटी लादल्या आहेत हे स्पष्ट होत नाही, तर गै.अ.क्र.1 यांनी कंपनीच्या शर्ती व अटीचा उल्लेख करुन अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला असल्याचे स्पष्ट होतो. उलट, नोट मधील 2 मध्ये असे नमूद केले आहे की, We are the dealer of the above said company Authorized Service Center गै.अ.क्र.1 यांनी सदर दस्त अ-1 वरील बिल हे माणिक एंटरप्राईजेस, मेन रोड आरमोरी या नावाने दिलेला असून, त्यात नमूद केलेल्या नोंदी ह्या कंपनी नुसार आहेत की, स्वतः गै.अ.क्र.1 ने नमूद केल्या आहेत हे सिध्द होत नाही, तर उलट ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(आर) नुसार अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला. गै.अ.क्र.1 ने स्वतःच सर्वीस सेंटर असल्याचे मान्य करुन, दुसरीकडे म्हणजेच गोंदीया केअर सेंटरला पाठविले, हे म्हणणे न्यायोचीत नाही.
9. गै.अ.क्र.1 यांनी सदर बिलामध्ये अधिकृत सर्वीस सेंटर असल्याचे मान्य केले आहे. अशास्थितीत, अर्जदार हिने भ्रमणध्वनी दुरुस्तीकरीता आणला तेंव्हा त्यात कोणता बिघाड होता, याबद्दलचा जॉबकार्ड दाखल केलेला नाही. तसेच, गोंदीया केअर सेंटरने भ्रमणध्वनी मध्ये कोणता बिघाड आहे व तो बिघाड मोबाईल हातून पडल्यामुळे आला आहे, असे दाखविले नाही, किंवा त्याबाबतचा जॉबकार्ड दाखल केलेला नाही. अशास्थितीत, गै.अ.क्र.1 ने घेतलेला बचाव, पुराव्या अभावी ग्राह्य धरण्यास पाञ नाही.
10. अर्जदार हिने, तक्रार दाखल केल्यानंतर गै.अ.क्र.2 ला पक्ष करण्याचा अर्ज नि.क्र.17 नुसार दाखल केला. सदर अर्ज दि.23.5.2011 ला मंजूर करुन गै.अ.क्र.2 ला नोटीस काढण्यात आले. परंतु, तो नोटीस परत आल्यामुळे, पुन्हा अर्जदार हिने नि.क्र.21 नुसार केलेल्या अर्जाप्रमाणे गै.अ.क्र.2 चे मुख्य कार्यालयाचा पत्ता Micromax House, 697,
... 6 ... (ग्रा.त.क्र.3/2011)
Udyog vihar, phase V, Gurgaon, Haryana, India आणि ग्राहक संपर्क पत्ता Micromax Mobile Company Ltd., Plot No.21/14, Block A, Nariman Industrial Area, Phase II, New Delhi-110028, India, या दोन्ही पत्यावर नोटीस काढले असता, गै.अ.क्र.2 ला नोटीस तामील झाल्याचा अहवाल नि.25 व 26 नुसार प्राप्त होऊनही आपले म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे, गै.अ.क्र.2 चे बाबत अर्जदाराचे म्हणणे विनाआव्हान असल्याने ग्राह्य धरण्यास पाञ आहे.
11. अर्जदार हिने दि.31.8.2010 ला भ्रमणध्वनी घेतला. लगेच त्यात बिघाड आल्यामुळे गै.अ.क्र.1 कडे दिला. गै.अ.क्र.1 यांनी दिलेल्या दस्त अ-1 नुसार 12 महिन्याचा वॉरंटी पिरेड दिला असून 6 महिने बॅटरी वॉरंटी दिलेली आहे. अर्जदार हिने भ्रमणध्वनी घेतल्यानंतर प्रत्यक्ष भेटून गै.अ.क्र.1 ला तक्रार केली, वकीलामार्फत नोटीस दिला हा सर्व कालावधी एक वर्षाचे आतच असल्याने आणि भ्रमणध्वनी गै.अ.क्र.1 ने विक्री केल्याचे मान्य केल्यामुळे सदर मोबाईल हा वॉरंटी कालावधीत आहे आणि वॉरंटी कालावधीतच बिघाड आल्यामुळे तो दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी गै.अ.क्र.1 व 2 ची आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे. गै.अ.क्र.1 यांनी लेखी उत्तरात अर्जदाराने घेतलेला भ्रमणध्वनी दुरुस्त न होता, दिल्ली वरुन परत आले आहे सांगितले असल्यामुळे सदर मोबाईल हा दुरुस्ती योग्य नसल्याने, अर्जदाराने त्याच कंपनीचा, त्याच मॉडेलचा दुसरा नवीन मोबाईल देण्याची केलेली मागणी मंजूर करण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
12. अर्जदार हिने, मोबाईल घेतल्यानंतर, त्या मोबाईलच्या उपभोगापासून वंचीत राहावे लागले. गै.अ.क्र.1 यांनी, अर्जदार ही व्यवसायाने डॉक्टर असल्याचे मान्य केले आहे. अशास्थितीत, डॉक्टरकरीता आपतकालीन परिस्थितीत मोबाईल फार उपयुक्त असून सुध्दा अर्जदारास मोबाईलच्या उपभोगापासून वंचीत राहावे लागले. तसेच, वारंवार गै.अ.क्र.1 कडे जावून विचारपूस करावे लागले असल्याने मानसिक, शारीरीक ञास सहन करावा लागला असल्याचे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होत असल्याने, गै.अ.क्र.1 व 2 हे अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी नुकसान भरपाई देण्यास पाञ आहे.
13. गै.अ.क्र.1 यांनी, लेखी उत्तरात असा मुद्दा उपस्थित केला आहे की, अर्जदाराचे मोलकरीनने मोबाईल खाली पाडल्यामुळे बिघाड आला. परंतु, गै.अ.क्र.1 यांनी याबाबत कोणताही पुरावा सादर केला नाही. वर विवेचन केल्याप्रमाणे जॉबकार्ड सादर केला नाही आणि दुसरी महत्वाची बाब अशी की, अर्जदाराकडून भ्रमणध्वनी मिळाल्याचे मान्य करुनही मंचासमक्ष सादर केला नाही. अशास्थितीत, गै.अ.क्र.1 यांनी घेतलेला बचाव हा पूर्णपणे निरर्थक असून संयुक्तीक नाही.
... 7 ... (ग्रा.त.क्र.3/2011)
14. सदर तक्रार ही निकाली काढण्यास उशीर होत आहे. अर्जदाराने तक्रार दाखल केल्यानंतर गै.अ.क्र.2 ला पक्ष केल्यामुळे व त्यास नोटीस तामील करण्यास विलंब झाला. गै.अ.क्र.2 ला नोटीस तामील झाल्यानंतरही हजर न झाल्यामुळे नि.क्र.1 वर दि.29.10.2011 ला एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. सदर तक्रार निकाली काढण्यास अर्जदारामुळेच विलंब झाला.
15. अर्जदार हिने गै.अ.क्र.1 कडून गै.अ.क्र.2 निर्मीत मोबाईल खरेदी केला. अर्जदार व गै.अ.क्र.2 यांचेशी करारात्मक संबंध (Privities of contract) गै.अ.क्र.1 मार्फत अस्तित्वात आले असल्याने आणि कंपनीच्या शर्ती व अटीनुसार 12 महिन्याचा वॉरंटी कालावधी असूनही भ्रमणध्वनी दुरुस्त करुन दिला नाही ही दोन्ही गै.अ.च्या सेवेतील न्युनता आहे. त्यामुळे, दोन्ही गै.अ. नवीन भ्रमणध्वनी देण्यास जबाबदार आहेत आणि नवीन भ्रमणध्वनी देणे शक्य नसल्यास त्याची किंमत परत करण्यास जबाबदार आहेत, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
16. एकंदरीत, अर्जदाराने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन आणि गै.अ.क्र.1 चे कथनावरुन गै.अ.क्र.1 व 2 यांनी वॉरंटी कालावधीत अर्जदाराचा मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही किंवा निर्मीतीत दोष असल्यास तो बदलवूनही दिला नाही, ही गै.अ.क्र.1 व 2 याचे सेवेतील न्युनता आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
17. वरील कारणे व निष्कर्षावरुन गै.अ.यांनी अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब करुन सेवा देण्यात न्युनता केली या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येते.
// अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.1 व 2 नी, वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या अर्जदार हिला नवीन मायक्रोमॅक्स मोबाईल क्यु 55 चा मॉडेल आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत नवीन वॉरंटीसह द्यावे.
(2) गैरअर्जदार क्र. 2 यांनी, मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 2000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/-, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपेय 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
... 8 ... (ग्रा.त.क्र.3/2011)
(3) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना, मायक्रोमॅक्स कंपनीचा नवीन मोबाईल देणे शक्य नसल्यास नादुरुस्त मोबाईलची किंमत रुपये 5600/- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या दि.31.8.10 पासून 12 % व्याजाने रक्कम अर्जदाराचे पदरी पडेपर्यंत आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/12/2011.