Maharashtra

Kolhapur

CC/11/78

Vilas Dnyanoba Kudalkar - Complainant(s)

Versus

Shri. Mahaveer Nagri Sahakari Patsanstha Ltd and others - Opp.Party(s)

B.D.Gole

29 Sep 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/78
1. Vilas Dnyanoba KudalkarPethvadgaon, Tal. HatkanangaleKolhapur.Maharashtra.2. Sou. Kanchan Vilas KudalkarPethvadgaon, Tal. HatkanangaleKolhapur.3. Kunal Chandrakant HawalPethvadgaon, Tal. HatkanangaleKolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Shri. Mahaveer Nagri Sahakari Patsanstha Ltd and others431, Tej Appt. Basant-Bahar Road, Shahupuri,Kolhapur.Kolhapur.Maharashtra.2. Chairman Shri. Bharat Sonmal Oswal431 Tej Appt, Basant-Bahar, Shahupuri,Kolhapur.Kolhapur.3. Manager, Shri. Satish Bapuso Kapse431 Tej Appt, Basant-Bahar, Shahupuri,Kolhapur.Kolhapur.4. Vice Chairman, Shri. Vyanktesh Digambar Samangad1165/6, B ward, Mangalwar Peth,Kolhapur.Kolhapur.5. Bharat Shantilal SanghaviPlot no.3, Mahaveernagar,Kolhapur.Kolhapur.6. Hemant Chunilal GandhiPlot no.6, Yashshri Banglow, Mahaveernagar,Kolhapur.Kolhapur.7. Rameshchandra Narpatlal Wadeja645 E ward, Shahupuri third lane,Kolhapur.Kolhapur.8. Girish Mahamaya KamatHotel Vrishali, Tarabai Park,Kolhapur.Kolhapur.9. Nitin Jaysingrao ManeShahajiganj, Shivaji Park,Kolhapur.Kolhapur.10. Jayant Kantilal Goyani1122, E ward, Rajlaxmi Appt, Shahupuri,Kolhapur.Kolhapur.11. Narendra Gejmal Bafna206 C ward,Kolhapur.Kolhapur.12. Narendra Bhagutmal ChouhanPlot no.35,Mahaveernagar,Kolhapur.Kolhapur.13. Jitendra Ratilal RathodPlot no.24, Mahaveernagar,Kolhapur.Kolhapur.14. Narendra Lilachand Rathod1549 C ward, Panline, Laxmipuri,Kolhapur.Kolhapur.15. Sou. Ranjana Ashok PolPlot no.1, Renuka Vila, Jawaharnagar,Kolhapur.Kolhapur.16. Sou. Aasha Surendra JainPlot no.41, Mahaveernagar,Kolhapur.Kolhapur.17. Sou. Lata Kantilal Oswal461 B/203, Bhawani Chembers, Bhawani Mandap,Kolhapur.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :B.D.Gole, Advocate for Complainant

Dated : 29 Sep 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 

नि का ल प त्र:- (दि.29/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 
(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 3, 5, 6, 10, 11 व 13 यांनी एकत्रितपणे म्‍हणणे दाखल केले. सामनेवाला क्र. 4 यांचे नोटीसीचा लखोटा परत आलेला आहे तो प्रस्‍तुत कामी दाखल आहे. व उर्वरीत सामनेवाला यांना नोटीसा लागू होऊनही ते गैरहजर आहेत. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
 
           सामनेवाला क्र.1 संस्‍था ही महाराष्‍ट्र सहकार कायद्याखाली नोंद झालेली सहकारी पतसंस्‍था आहे. सामनेवाला क्र.2 हे चेअरमन असून सामनेवाला क्र. 3 हे व्‍हाईस चेअरमन व क्र. 4 ते 17 हे सामनेवाला संस्‍थेचे संचालक आहेत. तक्रारदार हे एकत्र कुटूंबातील सदस्‍य आहेत. यातील तक्रारदारांनी आपल्‍या आर्थिक अडचणीच्‍यावेळी व कौटुंबिक गरजेकरीता, औषधोपचार व शिक्षणाकरिता सामनेवाला पतसंस्‍थेकडे  शुभमंगल ठेवी च्‍या स्‍वरुपात ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
रुपये
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
व्‍याजासह येणे रक्‍कम
1.
000058
6,250/-
11/02/1994
11/02/2008
51,000/-
2.
000057
6,250/-
11/02/1994
11/02/2008
51,000/-
3.
000047
6,250/-
20/01/1994
20/07/2008
51,000/-

 (3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि, सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि. 09/11/2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. सदरच्‍या ठेव रक्‍कमा देणेची सामनेवाला यांची वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदारी येत असतानाही सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस व नोटीसींच्‍या पोहच पावत्‍या इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र. 1 ते 3, 5, 6, 10, 11 व 13  संस्‍थेने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सदरचा वाद हा सहकार न्‍यायालयात चालणेस पात्र आहे. महाराष्‍ट्र सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे संचालकांची जबाबदारी निश्चित करणेचे अधिकार निबंधक यांना आहेत. त्‍यामुळे निबंधकांच्‍या खेरीज संचालकांची जबाबदारी निश्चित करणेचे अधिकार क्षेत्र या मे. कोर्टास नाही त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार संचालकांच्‍या विरुध्‍द चालणेस पात्र नाही. संचालकांनी वैयक्‍तीक‍ ठेवीच्‍या रक्‍कमा देणेचा प्रश्‍नच निर्माण होत नाही.  संचालकांनी संस्‍थेतून कोणतीही कर्जाची उचल केलेली नाही. सहकार खात्‍यातर्फे चौकशी होऊन संचालकांना जबाबदार धरलेले नाही.   ठेवींदारांकडून घेतलेल्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा कर्जरुपाने वाटप केलेल्‍या असून त्‍या अद्याप येणेबाकी आहेत. कर्जाच्‍या मुदती अद्याप संपायच्‍या आहेत. त्‍यामुळे कर्जाची वसुली करणे अडचणीचे झाले आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(6)        या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे व उपलब्‍ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी संस्‍थेने सामनेवाला संस्‍थेमध्‍ये शुभमंगल ठेव ठेवली आहे व त्‍यांची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्‍कमा व्‍याजासह दिलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे दि.15/02/2011 रोजी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाला यांनी सदर रक्‍कमा देणेची कायद्याने कोणतीही जबाबदारी त्‍यांचेवर येत नसल्‍याचे नमूद केले आहे. परंतु, वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदार संस्‍थेने सामनेवाला संस्‍थेकडे शुभमंगल ठेव रक्‍कम ठेवली आहे व दि.09/11/2010 रोजी नोंद पोच डाकेने वकिलामार्फत नोटीस पाठवून मागणी केली आहे व मागणी करुनही सदर रक्‍कम सामनेवाला संस्‍थेने दिलेली नाही. त्‍यामुळे सदर ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 2 ते 17 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्‍कम देणेबाबत आहे तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत कथन केले आहे. परंतु, महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्‍थेच्‍या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्‍तुत सामनेवाला यांची त्‍याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्‍थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 ते 17 यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचा तक्रारदारांचे कथन हे मंच फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्‍हणून मा.ना.उच्‍च न्‍यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्‍त्‍वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :-
 
“The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.”
 
(7)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या शुभमंगल ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या शुभमंगल ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्‍त विवेचन व पूर्वाधार विचारात घेता हे मंच खालीलप्रमाणे एकत्रितपणे आदेश पारीत करीत आहे.
 
आ दे श
 
(1)   तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येतात.
(2)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना खालील तपशिलातील शुभमंगल ठेव  रक्‍कमा द्याव्‍यात.   सदर रक्‍कमांवर मुदतपूर्ण नमूद तारखेपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
रुपये
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम
1.
000058
6,250/-
11/02/1994
11/02/2008
51,000/-
2.
000057
6,250/-
11/02/1994
11/02/2008
51,000/-
3.
000047
6,250/-
20/01/1994
20/07/2008
51,000/-

  (4) सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT