Maharashtra

Additional DCF, Thane

CC/12/300

Mr. Suresh Pannalal Singh - Complainant(s)

Versus

Shri. Laxmiprasad anant Desai Prop. of M/s. Kohinoor Enterprises - Opp.Party(s)

Adv. Sunil k mokal

12 Feb 2014

ORDER

ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच,
कोंकण भवन, नवी मुंबई.
 
Complaint Case No. CC/12/300
 
1. Mr. Suresh Pannalal Singh
Room No.806,Neelkanth Pride, Plot No. 34/36 ,Sector 42A, Seawoods, Nerul (W),Navi Mumbai 400706
Thane
Mah
...........Complainant(s)
Versus
1. Shri. Laxmiprasad anant Desai Prop. of M/s. Kohinoor Enterprises
828/829 ,8TH FLOOR, gROHITAM BUILDING PLOT NO 14 B, OPP. GRAIN MARKET, PHASE-II,APMC ,SEC-19,TURBHE VASHI , NAVI MUMBAI- 400705
THANE
MAH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Sneha S.Mhatre PRESIDENT
 HON'ABLE MR. S.S.Patil MEMBER
 
PRESENT:
तक्रारदार व त्‍यांचे वकील मानसी वल्‍लम हजर.
......for the Complainant
 
वि.प गैरहजर.
......for the Opp. Party
ORDER

ठाणे अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,

कोंकण भवन, नवी मुंबई.

                                        ग्राहक तक्रार क्रमांकः-  300/2012

                                  तक्रार दाखल दिनांकः-  22/07/2013

                                             आदेश दिनांक : -   12/02/2014.

 

1. श्री. सुरेश पन्नालाल सिंग,

   रा. रुम नं. 806, नीळकंठ प्राईड,

   प्लॉट नं. 35 व 36, सेक्टर 42ए,

   सीवूडस, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई. 400706.                ..... तक्रारदार

 

                         विरुध्‍द

 

 श्री. लक्ष्मीप्रसाद अनंत देसाई,

 प्रोप्रा. मे. कोहिनूर एंटरप्रायझेस,

 828 व 829, आठवा मजला, ग्रोहितम बिल्डींग,

 प्लॉट नं. 14 बी, ग्रेन मार्केटच्या समोर, फेज II,

 ए.पी.एम.सी., सेŒटर, 19, तुर्भे – वाशी, नवी मुंबई 400705.         .....  विरूध्‍दपक्ष

 

समक्ष :-  मा. अध्‍यक्षा, स्‍नेहा एस. म्‍हात्रे 

        मा. सदस्‍य, एस.एस. पाटील  

 

उपस्थिती :-  तक्रारदार स्‍वतः व त्‍यांचे वकील अॅड. मानसी वल्‍लभ हजर.

 

                    निकालपत्र

    (दि.  12/02/2014)

                 द्वारा सौ.स्‍नेहा एस. म्‍हात्रे, मा. अध्‍यक्षा

 

1.           तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.

            विरूध्दपक्ष श्री.लक्ष्मीप्रसाद अनंत देसाई हे व्यवसायाने बिल्डर असून ते कामोठे, प्लॉट नं. 18, सेक्टर 10, नवी मुंबई येथे बांधलेल्या कोहिनूर एन्क्लेव्ह या इमारतीचे प्रवर्तकही आहेत.

 

2.          दि. 09/06/2006 रोजीच्या विकास कराराद्वारे सदर प्लॉटवर इमारत बांधण्यासाठी व इतर विकासाच्या कामांसाठी सदर प्लॉटचे मूळ जमिन मालक (Licensee of Cidco) श्री. रामदास शंकर चिपलेकर, श्रीमती चिंदाबाई शंकर चिपलेकर, श्रीमती सुलाबाई रामदास ´हसकर, श्रीमती वंदना दिनकर नावडेकर यांनी सदर प्लॉट विरु¨पक्षाला सदर विकास कराराच्या अटीशर्तींनुसार विकसित करण्यास दिला.

 

3.          विरु¨पक्षाने सदर प्लॉटवर इमारत बांधण्याचे काम सुरु केले.  दरम्यान तक्रारदारांनी सदर इमारतीत जागा घेण्यासाठी एका इस्टेट एजंटमार्फत विरु¨पक्षाशी संपर्क केला व उभयपक्षांत ठरल्यानुसार सदर कोहिनूर एन्क्ले¾ह हया इमारतीतीमधील सदनिका क्र. 702, सातवा माळा, (509.37 चौ.फूट बि»टअप एरिया ) ही रु. 17,88,500/- हया एकूण मोबदल्याच्या किंमतीत विकत घेण्याचे तक्रारदाराने नक्की केले व त्यासाठी आवंटीत रकमेपोटी रु. 5001/- विरु¨पक्षाकडे धनादेशाद्वारे जमा केले.  सदर सदनिका खरेदीबाबत दि. 04/04/08 रोजी उभयपक्षांत करारनामा स्वाक्षरित करुन दि. 04/04/08 रोजी दुµयम निबंधक, पनवेल – 3 यांचेसमोर नोंदविण्यात आला व कराराच्या अटीशर्तींनुसार तक्रारदारांनी विरु¨पक्षाला सदर सदनिकेच्या खरेदीपोटी एकूण मोबदल्याच्या किंमतीपैकी रु. 3,88,500/- अदा केले व त्याबाबत विरु¨पक्षाने तक्रारदारांना वेळोवेळी पावत्याही दिल्या.  तक्रारदारांकडून एवढी मोठी रŒकम घेऊनही विरु¨पक्षाने इमारतीचे बांधकाम अचानक थांबविल्याने तक्रारदारांनी विरु¨पक्षाला त्यांनी केलेल्या मागणीनुसार पुढील रŒकम देण्यास दि. 08/10/12 रोजीच्या पत्राद्वारे हरकत घेतली व विरु¨पक्षाने तक्रारदारांना त्यांनी विरु¨पक्षाकडे भरलेली रŒकम परत घ्यावी व उभयपक्षांत झालेला सदनिका खरेदीचा ¾यवहार रद्द करावा असा पर्याय तक्रारदारांना दिला परंतु तक्रारदारांना तो मा­य न¾हता.   एकीकडे सन 2011 मध्ये विरु¨पक्ष तक्रारदारांशी सदर वाद सामोपचाराने मिटविण्याचा ˉÎÖŸ­Ö करीत असल्याचे सांगत होते.  परंतु दि. 02/07/12 रोजी अचानकपणे व गुˉतपणे विरु¨पक्षाने  तक्रारदारांनी सदनिका खरेदीबाबत दिलेली रु. 3,88,500/- हीŒकम तक्रारदारांच्या H.D.F.C. या बँकेच्या डॉरमंट (सुˉत खात्यात) धनादेशाद्वारे जमा केली व तक्रारदार व विरु¨पक्षामधील ¾यवहार संपुष्टात आल्याचे दाखविण्याचा ˉÎÖŸ­Ö केला.  तक्रारदारांना बँकेच्या कर्मचा-यांनी याबाबत कळविल्यावर दि. 08/10/12 रोजी तक्रारदारांनी विरु¨पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली व सदर नोटीसीद्वारे तक्रारदारांनी विरु¨पक्षाला सदर सदनिकेच्या खरेदीपोटीची उर्वरित रŒकम विरु¨पक्षाकडे तक्रारदार भरण्यास तयार असल्याचे कळविले.  परंतु सदर नोटीसीला विरु¨पक्षाने काहीच उत्‍तर दिले नाही किंवा तक्रारदारांशी कोणत्याही ˉÖÎकारे संपर्क केला नाही.  ´हणून तक्रारदारांनी विरु¨पक्षाने तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली असून ते अनुचित व्यापारी ˉÖÎथा अवलंबित असल्याचे नमूद करुन ग्राहक मंचात त्‍यांच्‍या विरुध्‍द तक्रार दाखल केली आहे व ती मंचाच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात, आर्थिक कार्यक्षेत्रातील असून तक्रारीचे कारण हे कायम असल्याने सदर तक्रार ही विहित मुदतीत दाखल केल्याचे आपल्या तक्रारीत ´हटले आहे.  तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाकडून 1. विरु¨पक्षाने तक्रारदारांना सदर सदनिकेच्या ¾यवहारातील दोष / त्रुटी काढून टाकून, सदर सदनिकेचा रितसर करारनामा करुन ताबा द्यावा.  2.  सदर इमारतीमधील सदनिका क्र. 702 चा ताबा देणे शŒ नसल्यास तेवढेच क्षेत्रफळ (बि»टअप एरिया 47.339 चौ.मी. + 18.115 चौ.मी. टेरेस)  असलेल्या दुस-या सदनिकेचा ताबा तेवढयाच मोबदल्‍याच्‍या किंमतीस  द्यावा.

किंवा

3.  तक्रारदारांना विरु¨पक्षाने रु. 16,00,000/- नुकसानभरपाई व त्यावर सदर तक्रार फाईल केल्यापासून ते ˉÎÖŸयक्ष रŒकम अदा करेपर्यंतचे 2% ˉÎÖमाणे द.सा.द.शे. व्याज द्यावे. (4. रु. 50,000/- मानसिक त्रास व रु. 20,000/- न्यायिक खर्च व रु. 20,000/- इतर वाहतुकीसाठीचा खर्च इत्यादींची मागणी केली आहे.

 

4.          सदर ˉÖÎकरणात विरु¨पक्षाला जबाब दाखल करण्यासाठी पाठविलेली नोटीस  ´हणून परत आल्याने विरु¨पक्षाचे विरु¨  दि. 08 / 10 / 13  रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला व त्यानंतर तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे ˉÖÎतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद दाखल केल्यावर तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकून सदर ˉÖÎकरणात खालील ˉÖÎमाणे  अंतिम आदेश पारीत करण्यात आला.

 

5.          सदर अंतिम आदेश पारीत करताना मंचाने तक्रारदारांचे पुराव्याचे ˉÖÎतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद व इतर आव¿यक कागदपत्रे इत्यादींचे अवलोकन करुन खालील मुद्दे विचारात घेतले.

मुद्दा कमांक  -   1               तक्रारदार हे विरु¨पक्षाचे अद्याप ग्राहक आहेत काय ?

Ÿतर          -          होय.

 

मुद्दा कमांक  -   2           विरु¨पक्षाने तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ?

Ÿतर          -          होय.

 

मुद्दा कमांक  -   3           विरु¨पक्षाकडून तक्रारदार त्यांनी मागितलेल्या मागण्या पूर्ण                 

                           करुन घेण्यास पात्र आहेत काय ?

Ÿतर          -          होय. (अंतिम आदेशाˉÖÎमाणे )

 

मुद्दा कमांक  -   4           विरु¨पक्षाकडून  तक्रारदार नुकसानभरपाई व इतर न्यायिक

                           खर्च इत्यादी मिळण्यास पात्र आहेत काय ?

Ÿतर          -          होय.

 

विवेचन मुद्दा क  1 व 2  -            सदर ˉÖÎकरणात मूळ जमिन मालक श्री. चिपळेकर यांना प्लॉट क्र. 18, सेक्‍टर 10, कामोठे  हयावर दि. 13/04/7 रोजी सिडको यांच्याकडून सदर प्लॉट विकसित करण्याची परवानगी मिळाली व त्यानुसार हा प्लॉट विकसित करण्यासाठी दि. 13/04/07 रोजी Commencement Certificate मिळाल्यावर मूळ जमिन मालकांशी झालेल्या विकास करारानुसार विरु¨पक्षाने सदर प्लॉट नं. 18 वर कोहिनूर एन्क्ले¾ह हया इमारतीचे बांधका सुरु केले.  तक्रारदारांनी दि. 23/02/08 रोजी रु. 5001/- बुकींगची रŒकम विरु¨पक्षाकडे भरुन सदर कोहिनूर एन्क्ले¾ह या इमारतीमध्ये सदनिका क्र. 702 (क्षेत्रफळ बि»टअप एरिया 47.339 चौ.मी. + 18.115 चौ.मी) आरक्षित केली व सदर सदनिकेच्या एकूण मोबदल्याची रŒकम  रु. 17,88,500/- एवढी तक्रारदारांनी विरु¨पक्षाला देण्याचे उभयपक्षांत ठरले.  त्यानुसार दि. 04/04/08 रोजी उभयपक्षांत सदर सदनिका क्र. 702, कोहिनूर एन्क्ले¾ह हिच्या विक्रीचा करारनामा स्वाक्षरित करुन दुµयम निबंधक, पनवेल – 3 यांचेसमोर नोंदविण्यात आला.  सदर करारनाम्याच्या नोंदणीप्रिŸयर्थ्य तक्रारदारांनी एकूण रु. 18,540/- व मुद्रांकशु»कापोटी रु. 81,250/- असे एकूण रु. 99,750/-  शासनाकडे भरले.

      सदर करारनाम्यातील क्लॉज क. 2 वर नमूद केल्याˉÖÎमाणे तक्रारदारांनी रु. 5001/- आवंटीत रकमेपोटी विरु¨पक्षाला दिले असल्याचे दिसून येते व त्याबाबत विरु¨पक्षाने तक्रारदारांना दि. 10/04/08 रोजी दिलेली पावती नि. 48 वर अभिलेखात आहे.  सदर क्लॉज क. 2 वर तक्रारदारांनी विरु¨पक्षाला द्यावयाची  सदनिकेच्या खरेदीपोटीची उर्वरित  Œकम  रु. 17,83,499/- खालील टप्प्यांत द्यावयाची असे उभयपक्षांनी स्‍वाक्षरित केलेल्‍या  करारनाम्यावरुन  दिसून येते.

 

Earnest money deposit on booking                      30%

On Commemcement of Plinth                             20%

On Casting of 1st slab                                 12%

On Casting of 2nd  slab                                10%

On Casting of 3rd  slab                                10%

On Casting of 4th  slab                                02%

On Casting of 5th  slab                                02%

On Casting of 6th  slab                                02%

On Casting of 7th  slab                                02%

On Casting of 8th  slab                                02%

On Brick masonry / plastering                               02%

On plumbing & sanitary                                02%

On painting & electric work                           02%

On Possession                                         02%

            त्यानुसार तक्रारदारांनी विरु¨पक्षाकडे खालीलˉÖÎमाणे रŒकम भरल्याचे विरु¨पक्षाने तक्रारदारांना दिलेल्या पावत्यांवरुन सि¨ होते.

पावती क्रमांक.

दिनांक

धनादेश क्रमांक

बँकेचे नांव

Œकम रु.

57

23/02/2008

0355651

एच.डी.एफ.सी.बँक,अंधेरी शाखा

5001/-

75

10/04/2008

035478

एच.डी.एफ.सी.बँक,अंधेरी शाखा

1,00,000/-

76

10/04/08

035479

एच.डी.एफ.सी.बँक, अंधेरी शाखा

1,00,000/-

77

10/04/08

035480

एच.डी.एफ.सी.बँक, अंधेरी शाखा

83,499/-

74

07/04/2008

035477

एच.डी.एफ.सी.बँक,  अंधेरी शाखा

1,00,000/-

 

 

 

एकूण रक्‍कम रु.

3,88,500/-

 

      अशाप्रकारे सन एप्रिल 2008 पर्यंत तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाकडे एकूण रु. 3,88,500/- भरले असल्‍याचे दिसते.  व त्‍याबाबत विरुध्‍दपक्ष श्री. लक्ष्‍मीप्रसाद अनंत देसाई  यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या पावत्‍यांखाली कोहिनूर एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर म्‍हणून स्‍वाक्षरी केल्‍याचे दिसून येते. (सदर पावत्‍या नि. पान क्र. 45 ते 49 वर अभिलेखात उपलब्‍ध आहेत.)  तक्रारदारांनी  विरुध्‍दपक्षाकडे सदर रक्‍कम भरल्‍यावर दि. 29/09/08 रोजी तक्रारदारांना विरुध्‍दपक्षाने सदर इमारतीच्‍या बांधकामापैकी 88% बांधकाम पूर्ण केले असून, तक्रारदारांनी रु. 3,88,500/- विरुध्‍दपक्षाकडे भरले असल्‍याने एकूण मोबदल्‍यापैकी उर्वरित रक्‍कम रु. (17,88,500 – 3,88,500 = 15,73,880/-)  रु.15,73,880/- पैकी रक्‍कम रु. 11,85,300/- विरुध्‍दपक्षाकडे सदर पत्र तक्रारदारांना मिळाल्‍यापासून सात दिवसांत भरावे असे मागणीपत्र पाठविले व सदर मागणीपत्रांत पुढील उर्वरित रक्‍कम रु. 2,14,620/- ही सदर इमारतीचे उर्वरित 12% बांधकाम पूर्ण झाल्‍यावर भरण्‍याचे विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना कळविले आहे. व त्‍यानंतर दि. 17/02/09 रोजीच्‍या (पान क्र. 51) मागणीपत्राद्वारे विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांकडून एकूण 11,85,300 + 214620 = 12,92,690/- ची मागणी केली असून सदर रक्‍कम तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाकडे पत्र मिळाल्‍यापासून 7 दिवसांत भरावी अशी मागणी केली आहे.

            तक्रारदारांकडे विरुध्‍दपक्षाने अशाप्रकारे सतत मागणीपत्रे पाठवून उर्वरित रक्‍कम भरण्‍याचा तगादा लावला असल्‍याने तक्रारदारांनी सदर प्‍लॉटवर प्रत्‍यक्ष भेट देऊन बांधकाम कुठपर्यंत पूर्ण झाले आहे याची पहाणी केली असता, विरुध्‍दपक्षाने सदर इमारतीचे काम पूर्णपणे बंद ठेवले असल्‍याचे त्‍यांना आढळले व त्‍यामुळे तक्रारदारांनी पुढील रक्‍कम अदा करणे थां‍बविले व तक्रारदारांनी दि. 08/10/12 रोजी पत्र पाठवून विरुध्‍दपक्षाने इमारतीचे बांधकाम थांबविल्‍याने त्‍याबाबत विचारणा करुन पुढील रक्‍कम अदा करण्‍यास हरकत नोंदविली.  त्‍यानंतर विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांशी सदर वाद समझोत्‍याने मिटविण्‍यासाठी तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाकडे भरलेली रक्‍कम परत घ्‍यावी असा पर्याय तक्रारदारांना दिला. तसेच सदर समझोत्‍याबाबत व विरुध्‍दपक्षाकडे भरलेली रक्‍कम परत घेण्‍याबाबत विरुध्‍दपक्षाने सन 2011 मध्‍येही तक्रारदारांना पर्याय दिला होता.  परंतु तक्रारदार त्‍या पर्यायास तयार नव्‍हते.  त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाने सदर सदनिकेचा व्‍यवहार रद्द करण्‍यासाठी दि. 02/07/12 रोजी तक्रारदारांच्‍या पूर्वपरवानगीशिवाय व सहमतीशिवाय तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाकडे सदर सदनिका क्र. 702 कोहिनूर एनक्‍लेव्‍हच्‍या खरेदीपोटी तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाकडे भरलेली एकूण रक्‍कम रु. 3,88,500/- ही तक्रारदारांच्‍या एच.डी.एफ.सी. बँकेच्‍या सुप्‍त खात्‍यात (Dormant A/c. no. 01141140008163)  मध्‍ये अपना सहकारी बँक लि., वाशी शाखेचा दि.21/06/12 रोजीचा धनादेश क्र. 201306, या धनादेशाद्वारे दि. 30/06/12 रोजी गुप्‍तपणे भरली.  (सदर धनादेशाची प्रत व डिपॉझिट स्लिपची) प्रत (पान क्र. 52 वर) अभिलेखात उपलब्‍ध आहे.  सदर डिपॉझिट स्लिपवर विरुध्‍दपक्ष श्री. लक्ष्‍मीप्रसाद देसाई यांची जमाकर्ता म्‍हणून स्‍वाक्षरी दिसून येते.  अशाप्रकारे तक्रारदारांच्‍या सुप्‍त खात्‍यात विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांच्‍या सहमतीशिवाय व गुप्‍तपणे रक्‍कम भरल्‍याचे तक्रारदारांना बँकेच्‍या कर्मचा-यांकडून कळल्‍यावर तक्रारदारांनी दि. 08/10/12 रोजी वकीलांमार्फत विरुध्‍दपक्षाला कायदेशीर नोटीस बजाविली असल्‍याचे (नि. पान 54 ) वरुन दिसते व सदर नोटीसद्वारे तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाने बांधकाम सन 2011 पर्यंत थांबविले असल्‍याने विरुध्‍दपक्षाला पुढील उर्वरित रक्‍कम अदा करण्‍याचे थांबविले व विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदारांना पाठविलेल्‍या मागणीपत्रांत नमूद केल्‍यानुसार विरुध्‍दपक्षाने बांधकाम पूर्ण न केल्‍याने विरुध्‍दपक्ष व तक्रारदारामधील दि. 04/04/08 रोजीच्‍या कराराच्‍या अटीशर्तींचा (Agreement clause - 2) भंग झाल्‍याने तक्रारदारांनी पुढील रक्‍कम विरुध्‍दपक्षाकडे भरण्‍याचे थांबविले असल्‍याचा उल्‍लेख केला आहे व अशाप्रकारे सदर सदनिका विक्रीबाबत तक्रारदारांशी विरुध्‍दपक्षाने करारनामा करुनही सदर कोहीनूर एन्‍क्‍ल्‍ेोव्‍ह या इमारतीचे बांधकाम योग्‍य  वेळेत पूर्ण केले नाही व तक्रारदारांनी त्‍याबाबत जाब विचारल्‍यावर तक्रारदारांच्‍या सहमतीशिवाय तक्रारदाराने विरुध्‍दपक्षाकडे भरलेली एकूण रक्‍कम रु.3,88,500/- विरुध्‍दपक्षाने दि. 02/07/12 रोजी परस्‍पर व गुप्‍तपणे तक्रारदारांच्‍या सुप्‍तखात्‍यात भरुन तक्रारदार व विरुध्‍दपक्षातील सदनिका खरेदीबाबतचा व्‍यवहार संपुष्‍टात आणण्‍याचा प्रयत्‍न केला. यावरुन विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली आहे हे सिध्‍द होते तसेच विरुध्‍दपक्ष हे अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करतात असे दिसून येते.  

           तसेच तक्रारदार हे अद्याप विरुध्‍दपक्षाचे ग्राहक आहेत हे सिध्‍द करण्‍यासाठी मंचाने खालील न्‍यायनिवाडयाचा विचार केला.

BEFOE THE HON’BLE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MAHARASHTRA, MUMBAI.

Case Law :-  FA No. A/12/636

(Arisen out of order dated 17/03/12-  in 420/10)

1. CEO Country Club & othes

                            V/s. 

Pamela Vishwanath

_________________________________________________________________As per offer made to accept the membership of country club (India) Ltd., a total amount of 2,55,000/- was paid to the opponents by the    complainant.  Said membership was for the period of 30 years & in lieu of said membership by way of compliment one plot admeasuring 3000 sq. yard was offered to complainant.  Further, complainant on her own sweet will decided not to go with the package & requested the opposite party to refund the amount of contribution paid earlier i.e. Rs. 2,55,000/- along with interest.  Thus, complainant voluntarily declined the offer of membership & requested for refund of Rs. 2,55,000/- & at the same claiming for the complimentary  plot offered by the opponent for the same.  Thus, the claim of complainant arose out of an unconcluded contract, and it has nothing to do with any element of hiring of service and therefore, basically, it is not a consumer dispute.   

            प्रस्‍तुत तक्रार क्र. 300/12 मध्‍ये तक्रारदार व विरुध्‍दपक्ष यांच्‍यात  सदनिका क्र.  702, 7 वा माळा, कोहिनूर एनक्‍लेव्‍ह, कामोठे  च्‍या खरेदीबाबत व्‍यवहार सन फेब्रूवारी 2008 मध्‍ये सुरु  झाला व त्‍याबाबतचा करारनामा दि. 04/04/08 रोजी उभयपक्षांच्‍या स्‍वाक्षरी करुन नोंदविण्‍यात आला.  सदर करारानुसार तक्रारदारांनी  विरुध्‍दपक्षाला वेगवेगळया टप्‍प्‍यांत वर नमूद केल्‍याप्रमाणे रु. 3,88,500/- इतकी रक्‍कम  अदा केली व उर्वरित रक्‍कम भरण्‍यास व पुढील व्‍यवहार पूर्ण करण्‍यास तक्रारदार तयार असतानाही विरुध्‍दपक्षाने दि. 02/07/12 रोजी  तक्रारदारांच्‍या सहमतीशिवाय व पूर्वपरवानगीशिवाय सदर रक्‍कम  तक्रारदारांच्‍या Dormant A/c. मध्‍ये गुप्‍तपणे भरुन विरुध्‍दपक्षामधील व्‍यवहार संपुष्‍टात आणण्‍याचा प्रयत्‍न केला, त्‍यामुळे पूर्वीचा करारनामा रद्द न करता विरुध्‍दपक्षाने अशाप्रकारे गुप्‍तपणे सदर रक्‍कम रु. 3,88,500/- तक्रारदारांच्‍या सुप्‍त खात्‍यात त्‍यांच्‍या नकळत व पूर्वपरवानगीशिवाय भरल्‍याने तक्रारदार हे विरुध्‍दपक्षाचे अद्याप ग्राहक आहेत.  व सदर तक्रार ही "ग्राहक वाद" आहे.    

 

विवेचन मुद्दा क्र.   3  -           तक्रारदारांनी सन एप्रिल 2008 पर्यंत विरुध्‍दपक्षाकडे सदर सदनिका क्र. 702, कोहिनूर एनक्‍लेव्‍ह खरेदी करण्‍यासाठी वर नमूद केल्‍याप्रमाणे एकूण रु.3,88,500/- एवढी रक्‍कम भरली व त्‍याबाबत विरुध्‍दपक्षाने दि. 04/04/08 रोजी तक्रारदारांशी रीतसर करारनामा स्‍वाक्षरित केल्‍यावर तक्रारदारांनी तो दि. 04/04/08 रोजी दुय्यम निबंधक, पनवेल – 3 यांचेसमोर नोंदणीकृत केला व त्‍यावर आवश्‍यक ते मुद्रांकशुल्‍क व नोंदणीशुल्‍क तक्रारदारांनी भरले आहे व सदर करारनाम्‍यात नमूद केलेली उर्वरित रक्‍कम भरुन तक्रारदार व्‍यवहार पूर्ण करण्‍यास तयार असूनही विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना विश्‍वासात न घेता खोडसाळपणे व गुप्‍तपणे तक्रारदारांच्‍या एच.डी.एफ.सी. बँक,  शाखेच्‍या Dormant A/c. मध्‍ये तक्रारदारांनी विरुध्‍दपक्षाकडे भरलेली रक्‍कम परस्‍पर (धनादेश क्र. 201306, दि. 21/06/12 अपना सहकारी बँक रु. 3,88,500/-) द्वारे भरली ही विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांची केलेली फसवणूक असून त्‍यासाठी विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांच्‍या Dormant A/c. द्वारे तक्रारदारांना परत केलेली रक्‍कम रु. 3,88,500/- ही परत स्विकारुन सदर सदनिकेच्‍या (702, कोहिनूर एनक्‍लेव्‍ह, सेक्‍टर 18, प्‍लॉट नं. 10, कामोठे ) खरेदीबाबतचा व्‍यवहार पूर्वीच्‍या करारनाम्‍यातील त्रुटी काढून टाकून उभयपक्षांत पूर्वी ठरलेल्‍या एकूण मोबदल्‍याच्‍या किंमतीस (रु. 17,88,500/-) पूर्ण करावा व तक्रारदारांना सदर सदनिका क्र. 702, कोहिनूर एनक्‍लेव्‍ह, सातवा माळा, सेक्‍टर 18, प्‍लॉट नं. 10, कामोठे उभयपक्षांत पूर्वी ठरलेल्‍या एकूण मोबदल्‍याच्‍या किंमतीस पूर्ण करावा व तक्रारदारांना सदर सदनिका क्र. 702, सातवा माळा, कोहिनूर एनक्‍लेव्‍ह, सेक्‍टर 18, प्‍लॉट नं. 10, कामोठे  (क्षेत्रफळ बि»टअप एरिया 47.339 चौ.मी. + 18.115 चौ.मी = 509.37 चौ.फूट) हिचा ताबा आदेश पारीत तारखेपासून  चार महिन्‍यांत द्यावा.  

किंवा

सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा विरुध्‍दपक्षाला तक्रारदारांना देणे शक्‍य नसल्‍यास त्‍यांनी तक्रारदारांना त्‍याच इमारतीमधील तेवढयाच क्षेत्रफळाची दुसरी सदनिका किंवा त्‍याच ठिकाणी बांधलेल्‍या दुस-या इमारतीमध्‍ये तेवढयाच क्षेत्रफळाच्‍या  दुस-या  सदनिकेचा ताबा (क्षेत्रफळ बि»टअप एरिया 47.339 चौ.मी. + 18.115 चौ.मी= 509.37 चौ.फूट) तेवढयाच मोबदल्‍याच्‍या किंमतीत (17,88,500/-) तक्रारदारांशी त्‍याबाबत  नवीन करारनामा स्‍वाक्षरित करुन व  तक्रारदारांकडून वर नमूद केल्‍याप्रमाणे  उर्वरित रकमांचा मोबदला स्विकारुन आदेश पारीत तारखेपासून  चार महिन्‍यांत द्यावा व सदर नवीन करारनाम्‍याच्‍या नोंदणीशुल्‍क व मुद्रांकशुल्‍काचा खर्च विरुध्‍दपक्षाने सोसावा.  

 

विवेचन मुद्दा क्रमांक  4 -        विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना वर नमूद केल्‍याप्रमाणे झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व इतर खर्चापोटी रु. 25,000/- व न्‍यायिक खर्चापोटी रु. 20,000/- आदेश पारीत तारखेपासून चार महिन्‍यांत द्यावेत.

 

6.      सबब, अंतिम आदेश पारीत करण्‍यात येतो,

अंतिम आदेश

1.     तक्रार क्रमांक 300/12 अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    विरुध्‍दपक्षाने आदेश पारीत तारखेपासून चार महिन्‍यांत पूर्वीच्‍या करारनाम्‍यातील त्रुटी काढून टाकून तक्रारदारांशी सदनिका क्र. 702, कोहिनूर एनक्‍लेव्‍ह, सेक्‍टर 18, प्‍लॉट नं. 10, कामोठे, (क्षेत्रफळ बि»टअप एरिया 47.339 चौ.मी. + 18.115 चौ.मी = 509.37 चौ.फूट) च्‍या विक्रीचा व्‍यवहार तेवढयाच मोबदल्‍याच्‍या किमतीत पूर्ण करुन तक्रारदारांना सदर सदनिका क्र. 702, कोहिनूर एनक्‍लेव्‍ह, हिचा ताबा आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह द्यावा.

किंवा

सदर वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा विरुध्‍दपक्षाला तक्रारदारांना देणे शक्‍य नसल्‍यास त्‍यांनी तक्रारदारांना त्‍याच इमारतीमधील तेवढयाच क्षेत्रफळाची दुसरी सदनिका किंवा त्‍याच ठिकाणी बांधलेल्‍या दुस-या इमारतीमध्‍ये तेवढयाच क्षेत्रफळाच्‍या  दुस-या  सदनिकेचा ताबा (क्षेत्रफळ बि»टअप एरिया 47.339 चौ.मी. + 18.115 चौ.मी= 509.37 चौ.फूट) तेवढयाच मोबदल्‍याच्‍या किंमतीत (17,88,500/-) तक्रारदारांशी त्‍याबाबत  नवीन करारनामा स्‍वाक्षरित करुन व  तक्रारदारांकडून वर नमूद केल्‍याप्रमाणे  उर्वरित रकमांचा मोबदला स्विकारुन आदेश पारीत तारखेपासून  चार महिन्‍यांत द्यावा व सदर नवीन करारनाम्‍याच्‍या नोंदणीशुल्‍क व मुद्रांकशुल्‍काचा खर्च विरुध्‍दपक्षाने सोसावा. 

 3.   विरुध्‍दपक्षाने तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी व इतर खर्चापोटी रु. 25,000/- (रु. पंचवीस हजार मात्र) व न्‍यायिक खर्चापोटी रु. 20,000/- (रु. वीस हजार मात्र) आदेश पारीत तारखेपासून चार महिन्‍यांत द्यावेत.

4.    सदर आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभयपक्षांना पाठविण्‍यात याव्‍यात.

 

ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई.

दिनांक – 12/02/2014.

 

                            

                          (एस.एस.पाटील )     (स्‍नेहा एस.म्‍हात्रे )  

                          सदस्‍य             अध्‍यक्षा

               अति.ठाणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
[HON'ABLE MRS. Sneha S.Mhatre]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.S.Patil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.