नि.29 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार अर्ज क्रमांक : 39/2010 तक्रार अर्ज या मंचात वर्ग झाल्याचा दि.16/08/2010 तक्रार अर्ज निकाली झाल्याचा दि.11/11/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्रीमती रेखा अंकुश पावसकर रा.पिंगुळी, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार विरुध्द कोरगांवकर आणि कंपनी तर्फे 1. प्रो.प्रा.लक्ष्मण गोविंद कोरगांवकर 2. प्रो.प्रा.रामचंद्र गोविंद कोरगांवकर रा.कोरगांवकर आणि कंपनी, बाजारपेठ, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग. 3. मॅनेजर, कीर्लोस्कर ब्रदर्स लि., रेल्वेस्टेशन समोर उज्जयन रोड, देवस 455 0018 (मध्य प्रदेश), राज्य मध्यप्रदेश. 4. प्रोप्रायटर- अमेय ट्रेडिंग कंपनी बाजारपेठ, कणकवली, ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे: विधिज्ञ श्री.खानोलकर सामनेवाले क्र.1 व 2 तर्फे : विधिज्ञ सौ.झारापकर सामनेवाले क्र.3 व 4 : गैरहजर. -: नि का ल प त्र :- अ) सदरचा तक्रार अर्ज सिंधुदुर्ग येथील न्यायमंचामध्ये तक्रार अर्ज क्र.47/2010 ने दाखल होता. सदरचा तक्रार अर्ज सन्मा.राज्य आयोग यांचेकडील दि.05/08/2010 रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये या मंचामध्ये वर्ग करण्यात आला. सदरच्या तक्रार अर्जास या मंचाकडे तक्रार अर्ज क्र.39/2010 देण्यात आला व सदर कामी तक्रारदार व सामनेवाला यांना हजर रहाण्यासाठी नोटीस काढण्यात आली. तक्रारदार व सामनेवालातर्फे प्रस्तुत प्रकरणी तडजोड होणेची शक्यता आहे असे वारंवार नमूद करण्यात आले. परंतु तक्रारदार हे स्वतः अगर त्यांच्या प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहीले नाहीत. त्यामुळे नि.1 वर पुढील आदेश करण्यात आला. “तक्रारदार व सामनेवालातर्फे प्रस्तुत प्रकरणी तडजोड होणेची दाट शक्यता असलेने मुदत देणेत यावी असे अर्ज नि.23 व 24 वर देणेत आले. तथापी तक्रारदार अथवा सामनेवाले त्यानंतर वारंवार गैरहजर राहिले आहे. तक्रारदार यांना प्रस्तुत प्रकरण यापूढे चालविणेत स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुतचा तक्रार अर्ज निकाली करणेत येत आहे. ” प्रस्तुतच्या नि.1 वरील आदेशाच्या अनुषंगाने प्रस्तुतचा तक्रार अर्ज निकाली करण्यात येत आहे. रत्नागिरी दिनांक : 11/11/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |