Maharashtra

Nagpur

CC/789/2015

VIJAY BIKKU JAMANPURI - Complainant(s)

Versus

SHRI. KUNAL DEEPAK PADMAWAR, M/S. DEVASHREE PROPERTIES PVT. LTD - Opp.Party(s)

Sham Ambhore

30 Sep 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/789/2015
( Date of Filing : 08 Dec 2015 )
 
1. VIJAY BIKKU JAMANPURI
R/O. CHUNNABHATTI, NEAR HANUMAN MANDIR, VIVEKANAND NAGAR, NAGPUR-5
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. SHRI. KUNAL DEEPAK PADMAWAR, M/S. DEVASHREE PROPERTIES PVT. LTD
DHOK COMPLEX, NEAR HUDKESHWAR NAKA NO. 7, HUDKESHWAR, NAGPUR -10
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 30 Sep 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्री एस.आर. आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम १२ नूसार दाखल केली असून तक्रार खालिलप्रमाणे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे मौजा नरसाळा, पटवारी हलका नंबर ३७, खसरा नंबर ११३/१ नागपूर, तह, जिल्‍हा नागपूर येथील अकृषक जमिन क्षेञफळ २.४७ एकर जमिनीवर उभारण्‍यात येणा-या क्रिष्‍णम नगरी या सदनिकेतील डी. व्हिंग बिल्‍डींगमधील ४ थ्‍या माळ्यावरील सदनिका क्रमांक ४०६ सुपर बिल्‍डअप क्षेञफळ ७२३ चौ. फुट एकूण किंमत रुपये १२,६५,०००/- इतक्‍या रकमेमध्‍ये खरेदी करण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी दिनांक ३१/१२/२०१२ ला केला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला करारानूसार धनादेश क्रमांक १२३६२२, दिनांक २९/१०/२०१२ अन्‍वये रुपये १,२६,०००/-, धनादेश कमांक १२३६२५, दिनांक २२/२/२०१३ अन्‍वये रुपये ७०,०००/-, रुपये २१,०००/- नगदी दिनांक २४/४/२०१२, धनादेश क्रमांक १७०१६४, दिनांक २१/५/२०१२ अन्‍वये रुपये ३०,०००/-, धनादेश क्रमांक १७०१६५, दिनांक ३०/०६/२०१२ अन्‍वये रुपये ८,०००/- असे एकूण २,५७,०००/- विरुध्‍द पक्षाला अदा केले. विरुध्‍द पक्षाने वरीलप्रमाणे रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याची पावती तक्रारकर्त्‍याला दिली.
  3. विरुध्‍द पक्षाने करारातील शर्ती नूसार कराराची पूर्तता केली नाही. तक्रारकर्त्‍याने नियमीतपणे विरुध्‍द पक्षाशी संपर्क ठेवला परंतू विरुध्‍द पक्ष टाळत गेला. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाला संपूर्ण उर्वरीत रक्‍कम देण्‍यास तयार होता. परंतू विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला टाळत होता. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला समाधानकारक उत्‍तर दिले नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञास झाला. न्‍यायाच्‍या दृष्‍टीने विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की,विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून सदनिकापोटी दिलेली रक्‍कम रुपये २,५७,०००/-, द.सा.द.शे १५ टक्‍के दराने रक्‍कम स्विकारली त्‍या तारखेपासून तक्रारकर्त्‍याला व्‍याजासह परत द्यावी.  मानसिक, व शारिरीक ञासाकरीता रुपये ५,००,०००/- अदा करावे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे विक्रीपञ करुन सदनिकेचा ताबा द्यावा.
  2. शारिरीक व मानसिक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च अदा करावे.
  1. विरुध्‍द पक्षाचे कथनानूसार, विरुध्‍द पक्षाने नरसाळा येथे प्रस्‍तावित केलेल्‍या कृष्‍णा नगरी सदनिकेमध्‍ये तक्रारकर्त्‍याने ‘डी’ विंग मधील चौथ्‍या माळ्यावरील सदनिका क्रमांक ४०६, क्षेञफळ ७२३ चौरस फुट रुपये १२,६५,२५०/- इतक्‍या रकमेमध्‍ये विकत घेण्‍याचा करार दिनांक ३१/१०/२०१२ ला विरुध्‍द पक्षाशी केला व करारानूसार सदर सदनिकेचे खरेदीच्‍या एकूण रकमेपैकी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास रुपये २,५७,०००/- इतकी रक्‍कम अदा केली व उर्वरीत बकाया रक्‍कम पुरवणी करारनामा दिनांक ४/३/२०१३ मध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे टप्‍याटप्‍याने खालिलप्रमाणे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाला देणार होता.

Manner of Payment

Sr. No.

Amount

Nature of Payment

1

रुपये २१०००/-

नगदी दिनांक २४/०१/२०१२

2

रुपये ३००००/-

धनादेश क्र. १७०१६४, दिनांक २१/५/२०१२

3

रुपये ८०००/-

धनादेश क्र. १७०१६५, दिनांक ३०/०६/२०१२

4

रुपये १२६०००/-

धनादेश क्र. १२३६२२, दिनांक २६/१०/२०१२

5

रुपये ७००००/-

धनादेश क्र. १२३६२५,  दिनांक २२/०२/२०१३

6

रुपये १२१३५०/-

Plinth चे कामाचे वेळी किंवा त्‍यापूर्वी माहे एप्रिल २०१३ मध्‍ये

7

रुपये १२८१००/-

ग्राऊंड फ्लोअर वरील स्‍लॅब टाकतेवेळी किंवा त्‍यापूर्वी माहे मे २०१३ मध्‍ये

8

रुपये १२८१००/-

प्रथम मजल्‍याचे वेळी किंवा त्‍यापूर्वी माहे जुलै२०१३ मध्‍ये

9

रुपये १२८१००/-

दुस-या मजल्‍याच्‍या वेळी किंवा त्‍यापूर्वी माहे सप्‍टेंबर २०१३ मध्‍ये

10

रुपये १२८१००/-

तिस-या मजल्‍याच्‍या वेळी किंवा त्‍यापूर्वी माहे आक्‍टोंबर २०१३ मध्‍ये

11

रुपये १२८१००/-

चौथ्‍या मजल्‍याच्‍या वेळी किंवा त्‍यापूर्वी माहे डिसेंबर २०१३ मध्‍ये

12

रुपये १२८१००/-

सदनिकेच्‍या विटाचे काम पूर्ण करतेवेळी आणि प्‍लॅस्‍टर काम पूर्ण करतेवेळी किंवा त्‍यापूर्वी माहे मार्च २०१४ मध्‍ये

13

रुपये ६४०५०/-

सदनिकेचा ताबा घेण्‍यापूर्वी

14

एकूण रुपये १२८१०००/-

 

 

  1. सदनिकेचे बांधकाम पूरविणी करारामध्‍ये नमुद केलेल्‍या स्‍टेज प्रमाणे विरुध्‍द पक्षाने पूर्ण केले होते. कराराप्रमाणे तक्रारकर्त्‍याला उर्वरीत शिल्‍लक रक्‍कम विरुध्‍द पक्षाला करारातील वेगवेगळ्या  स्‍टेज प्रमाणे देणे बंधनकारक होते परंतू कराराप्रमाणे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी उर्वरीत रक्‍कम देण्‍यास अपयशी ठरला. करारातील शर्ती व अटीचे तक्रारकर्ता पालन करण्‍यात अपयशी ठरला त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. विरुध्‍द पक्षाने वारंवार स्‍मरणपञे देऊन, आठवण करुन देऊन, मागणीकरुनही तक्रारकर्त्‍याने करारातील अटी व शर्ती नूसार विरुध्‍द पक्षाला रक्‍कम अदा केली नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक ३०/०३/२०१३, १/५/२०१३, १५/७/२०१३, १/९/२०१३, १५/१०/२०१३, १/१२/२०१३ ला स्‍मरणपञे पाठवून मागणी करुनही तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी उर्वरीत रक्‍कम अदा केला नाही. तक्रारकर्त्‍याने जाणूनबुजून करारातील शर्ती व अटीचे उल्‍लंघन केले आहे. विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी उर्वरीत रक्‍कम अदा न करता करार तक्रारकर्त्‍याच्‍या वतीने रद्द झाला आहे.
  2. तक्रारकर्त्‍याला वारंवार तोंडी दुरध्‍वनी द्वारे व लेखी विनंती करुनही तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला रक्‍कम देण्‍याचे टाळले व तो विक्रीपञ करुन घेण्‍यास इच्‍छुक नव्‍हता व तयार नव्‍हता. त्‍याच्‍या जवळ उर्वरीत रक्‍कम विरुध्‍द पक्षाला देण्‍याकरीता रक्‍कम नव्‍हती. कराराप्रमाणे तक्रारकर्त्‍याने करारातील अटीचे व शर्तीचे पालन न केल्‍यामुळे तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍या मधील करार रद्द झाला असून तक्रारकर्त्‍याने सदनिका खरेदी पोटी विरुध्‍द पक्षाला दिलेली रक्‍कम रुपये २,५७,०००/- विरुध्‍द पक्षाकडे जमा (Forfeit) झाली आहे. विरुध्‍द पक्षाने सदर सदनिका विक्रीखत दिनांक २०/०२/२०१६ अन्‍वये स्‍नेहदिप सदानंद मारबदे  यांना विकली आहे आणि सदनिकेचा ताबा दिला आहे.
  3. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दस्‍ताऐवज व लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍द पक्षाने निशानी क्रमांक ९ वर दाखल केलेले दस्‍ताऐवज, लेखी युक्‍तीवाद याचे वाचन व उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर मंचाने  खालिलप्रमाणे मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहे.

अ.क्र.          मुद्दे                                                                उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?               होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

दिली काय ?                                                                         होय  

  1. काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा 

 

  1.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेशी विरुध्‍द पक्षाने मौजा नरसाळा, पटवारी हलका नंबर ३७, खसरा नंबर ११३/१ नागपूर, तह, जिल्‍हा नागपूर येथील अकृषक जमिन क्षेञफळ २.४७ एकर जमिनीवर उभारण्‍यात येणा-या क्रिष्‍णम नगरी या सदनिकेतील डी. व्हिंग बिल्‍डींगमधील ४ थ्‍या   माळ्यावरील सदनिका क्रमांक ४०६ सुपर बिल्‍डअप क्षेञफळ ७२३ चौ. फुट एकूण किंमत रुपये १२,६५,०००/- इतक्‍या रकमेमध्‍ये खरेदी करण्‍याचा करार दिनांक ३१/१०/२०१२ रोजी केला होता. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला करारानूसार दिनांक ३०/०६/२०१२ पर्यंत एकूण रक्‍कम रुपये २,५७,०००/- अदा केली व ही बाब विरुध्‍द पक्षाने आपले जबाबात मान्‍य केली आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे हे सिद्ध होते. विरुध्‍द पक्षाने मंचासमोर सादर केलेले लेखी जबाब निशानी क्रमांक ९ वर दाखल केला असून त्‍यासोबत तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍यामध्‍ये दिनांक ३१/१०/२०१२ ला झालेल्‍या कराराव्‍यतिरीक्‍त त्‍या दोघांमध्‍ये दिनांक ४/३/२०१३ ला झालेला पूरवणी करार सादर केलेला आहे. दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर असे निर्दशनास आले की, दोन्‍ही करारावर तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍या सह्या आहे. विरुध्‍द पक्षांनी लेखी जबाबासोबत सादर केलेल्‍या दिनांक ४/३/२०१३ चे पूरवणी कराराबाबत तक्रारकर्त्‍याने कोठेही आक्षेप नोंदविला नाही आहे. पूरवणी करारानूसार विरुध्‍द पक्षाला कराराचे दिनांकापासून सदनिकेचे बांधकाम १८ महिण्‍यांत पूर्ण करावयाचे होते व सदनिकेच्‍या बांधकामाचा टप्‍प्‍याप्रमाणे उर्वरीत रक्‍कम तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाला अदा करावयाची होती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदनिका खरेदीपोटी उर्वरीत रक्‍कम देण्‍याकरीता वारंवार तोंडी, दुरध्‍वनी द्वारे व लेखी सूचना देऊनही तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला उर्वरीत रक्‍कम अदा केली नाही. तक्रारकर्त्‍याने करारातील शर्ती व अटीचे पालन न करता करारनामा तक्रारकर्त्‍याच्‍या निष्‍काळजीपणा व चूकीने रद्द झाला असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षकार यांचे मध्‍ये झालेल्‍या पूरवणी करारनामा दिनांक ४/३/२०१३ चे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये खालिलप्रमाणे अट नमुद आहे.

     “ That in the event of the purchaser committing breach of any of the terms and conditions herein contained, this agreement shall IPSO FACTO come to an end and the amounts till then subscribed by the purchaser towards the cost of construction of the apartment chosen by her/him shall be refunded to her/him free of any interest accrued thereon and also after deducting there from a fixed sum of Rs. 50,000/-  (Rupees Fifty Thousand) Only by way of liquidated damages within 3 (Three) months from the date, this agreement stands terminated/cancelled and in such event her/his right to purchase the undivided 0.442 percent share and interest in the said plots of land shall also be extinguished and come to an end simultaneously as a matter of course. In such event the vendor shall be at full liberty to sell the said undivided share and interest in the said plots of land and also the said apartment to any prospective/intending buyer as may be approved by it without any further notice or reference to the purchaser.”

  1. करारातील नमुद वरील अटी व शर्ती नूसार तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांचेमधील करार रद्द झाल्‍यावर विरुध्‍द पक्षाने सदनिका विक्रीपोटी तक्रारकर्त्‍याकडून प्राप्‍त रक्‍कम रुपये २,५७,०००/- मधुन करारातील अटी व शर्तीनूसार रुपये ५०,०००/- कमी करुन उर्वरीत रक्‍कम रुपये २,०७,०००/- तक्रारकर्त्‍यास बिनव्‍याजी करार रद्द झाल्‍याच्‍या तारखेपासून ३ महिण्‍याच्‍या आत अदा करावयास पाहिजे होती. परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास करार रद्द झाल्‍याच्‍या तारखेपासून म्‍हणजे दिनांक १/१२/२०१३ पासून ३ महिण्‍यांच्‍या आत रक्‍कम परत केली नाही. तक्रारकर्त्‍याने दिनांक १२/९/२०१५ ला विरुध्‍द पक्षाला पञाद्वारे  मागणी करुनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती दोषपूर्ण सेवा आहे व तक्रारकर्ता सदनिका खरेदीपोटी उर्वरीत रक्‍कम रुपये २,०७,०००/- व्‍याजासह  घेण्‍यास पाञ आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षकार यांचेमध्‍ये झालेल्‍या दिनांक ३१/१०/२०१२ व पूरवणी करारनामा दिनांक ४/३/२०१३ मध्‍ये तक्रारकर्त्‍याने करारातील अटीचा भंग केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सदनिका खरेदी पोटी विरुध्‍द पक्षाला दिलेली रक्‍कम जमा (Forfeit) करण्‍यात येईल अशी कुठलीही अट करारनाम्‍यात नमूद नाही आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची मागणी अंशतः मंजूर करण्‍यात येत असून खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

अंतिम आदेश 

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून सदनिका खरेदीपोटी घेतलेल्‍या रकमेपैकी करारातील शर्ती व अटी नूसार देय रक्‍कम रुपये २,०७,०००/- दिनांक १२/९/२०१५ पासून ८ टक्‍के व्‍याजासह रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारकर्त्‍याला अदायगी पर्यंत अदा करावी.
  3. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञासाकरीता २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.