सं यु क्त नि का ल प त्र:- (दि.24.06.2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत ग्राहक तक्रार क्र. 169/2011 ते 176/2011 या आठही तक्रारीतील तक्रारीतील तक्रारदार हे वेगवेगळे असले तरी सामनेवाला हे एकच आहेत व तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य असलेने सदरच्या आठही तक्रारीत एकत्रित निकाल पारीत करीत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचे वेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र.1 संस्था ही महाराष्ट्र सहकार कायद्याखाली नोंद झालेली सहकारी पतसंस्था आहे. सामनेवाला क्र. 2 हे चेअरमन व 3 हे व्हा. चेअरमन आहेत. सामनेवाला क्र. 4 ते 16 हे संस्थेचे संचालक आहेत. सामनेवाला क्र. 17 हे मॅनेजर आहेत. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत व दामदुप्पट ठेवींच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांचातपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | तक्रार क्रमांक | ठेव पावती क्रमांक | ठेव रक्कम रुपय | ठेवीची तारीख | मुदतपूर्ण तारीख | व्याज दर % | 1. | 169/2011 | 465 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 2. | --"-- | 467 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 3. | --"-- | 466 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 4. | --"-- | 469 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 5. | 170/2011 | 891 | 20,000/- | 13/10/2003 | 13/11/2005 | 13 | 6. | --"-- | 942 | 25,000/- | 19/05/2004 | 19/05/2006 | 13 | 7. | --"-- | 886 | 25,000/- | 23/09/2003 | 23/10/2005 | 13 | 8. | 171/2011 | 648 | 45,000/- | 20/05/2002 | 20/03/2003 | 15 | 9. | --“-- | 1025 | 15,590/- | 18/04/2007 | 02/06/2007 | 15 | 10. | 172/2011 | 198 | 25,000/- | 26/01/1999 | 12/03/1999 | 15 | 11. | --"-- | 1018 | 4,122/- | 20/10/2006 | 04/12/2006 | 10 | 12. | --"-- | 1022 | 2,836/- | 15/02/2007 | 01/04/2007 | 10 | 13. | --"-- | 1002 | 8,650/- | 24/04/2006 | 08/06/2006 | 10 | 14. | --"-- | 1030 | 2,523/- | 23/06/2007 | 07/08/2007 | 8 | 15. | --"-- | 604 | 25,000/- | 06/12/2001 | 20/01/2002 | 14 | 16. | --"-- | 525 | 25,000/- | 03/07/2001 | 17/08/2001 | 15 | 17. | 173/2011 | 44 | 5,000/- | 17/08/2002 | 17/02/2007 | दामदुप्पट | 18. | --"-- | 590 | 6,000/- | 20/01/2001 | 04/12/2001 | 14 | 20. | 174/2011 | 53 | 5,000/- | 20/04/2003 | 21/04/2008 | दामदुप्पट | 21. | --"-- | 1027 | 20,000/- | 24/04/1997 | 24/04/1998 | 10 | 22. | 175/2011 | 063 | 2,500/- | 26/11/2003 | 11/03/2009 | दामदुप्पट | 23. | --"-- | 046 | 1,000/- | 02/10/2002 | 02/04/2007 | दामदुप्पट | 24. | 176/2011 | 932 | 11,000/- | 06/04/2004 | 21/05/2004 | 10 |
(4) सदर ठेवींच्या मुदती संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्कमांची शैक्षणिक व कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी आवश्यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी करुन व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. परंतु संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण सांगून रक्कमा देण्याचे परत दिल्या नाहीत. तरीदेखील सामनेवाला क्र. 2 ते 17 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी असतानाही सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व शपथपत्रे आणि तक्रार क्र. 170/2011 व 176/2011 मध्ये मृत्यू दाखले इत्यादींच्या प्रती दाखल केल्या आहेत. (6) सामनेवाला क्र. 1 ते 7 व 9 ते 17 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार हे ग्राहक नसून संस्थेचे सभासद आहेत. तक्रारदारांनी केलेली ठेवींच्या व्याजाची आकारणी चुकीची आहे. ठेवींची रक्कम मुदतीनंतर परत करणेची वैयक्तीक व संयुक्तिक जबाबदारी संचालकाची होती हे चुकीचे आहे. तक्रार अर्जास कारण घडलेले नाही. प्रस्तुत तक्रार अर्ज मुदतीत नाही. ब-याचशा कर्जदार सभासदांनी घेतलेली कर्जे संस्थेने मागणी करुनही वेळेत परतफेड केलेली नाहीत त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत करणेस अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तक्रारदारांनी ठेवींच्या रक्कमची मुदतीनंतर मागणी केलेली नव्हती. सदरच्या ठेव पावत्या रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे मुदतीत नुतनीकरण केलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांना मुदतीनंतरचे व्याजाची मागणी करता येणार नाही. शासनाचे शेती कर्जाची माफी केलेने व इतर कारणांमुळे संस्थेच्या कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची परत फेड केलेली नाही. थकीत कर्जदारांचे विरुध्द म.स. कायदा कलम, 101 अन्वये वसुलीचे दाखले घेतले असून वसुलीची कारवाई चालू आहे. सदर वसुली कारवाईमध्ये रक्कम वसुल होताच ठेवीदारांना रक्कमा परत करीत आहोत. तक्रारदार हे संस्थाचे ग्राहक होत नसल्याने ठेवीबाबत तक्रार अर्ज दाखल करता येणार नाही. सदरची तक्रार मुदतीत दाखल केली नसल्याने तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे. (7) सामनेवाला क्र. 8 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला हे संचालक म्हणून सन 2004 पासून पदावर होते. तक्रारदारांच्या ठेवी हया 2002 पूर्वीच्या आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी ठेवी ठेवल्या त्यावेळी सामनेवाला हे संचालक नव्हते. त्यामुळे तक्रारदारांच्या ठेवी परत देणेची वैयक्तीक व संयुक्तिक जबाबदारी सामनेवाला यांची येत नाही. प्रस्तुत सामनेवाला यांना तक्रार अर्जातून वगळणेत यावे अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे. (8) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे व उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार हे संस्थाचे ग्राहक होत नसल्याने ठेवीबाबत तक्रार अर्ज दाखल करता येणार नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु तक्रारदार हे सामनेवाला संस्थेचे ठेवीदार असलेने ते ग्राहक आहेत. सबब, तक्रार अर्ज चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (9) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेमध्ये मुदतबंद व दामदुप्पट स्वरुपात ठेवी ठेवल्या आहेत व त्यांच्या मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्कमा व्याजासह दिलेल्या नाहीत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाला क्र. 2 ते 17 यांनी सदर रक्कमा देणेची कायद्याने कोणतीही जबाबदारी त्यांचेवर येत नसल्याचे प्रतिपादन केले आहे. परंतु, वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदार संस्थेने सामनेवाला संस्थेकडे मुदत ठेव खात्याच्या स्वरुपात रकमा ठेवल्या आहेत व लेखी व तोंडी मागणी करुनही सदर रकमा सामनेवाला संस्थेने दिलेल्या नाहीत. त्यामुळे सदर ठेव रक्कमा व्याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्थेची येत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 2 ते 17 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्कम देणेबाबत आहे असा युक्तिवाद तक्रारदारांच्या वकिलांनी केलेला आहे. परंतु, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्थेच्या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्तुत सामनेवाला यांची त्याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल नाही. त्यामुळे सामनेवाला क्र. 2 ते 17 यांची ठेव रक्कमा व्याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचा तक्रारदारांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्कमा व्याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्हणून मा.ना.उच्च न्यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्त्वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :- “The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.” (10) तक्रारदारांना सामनेवाला यांनी तक्रारीत नमूद ठेवींच्या रक्कमा अद्याप मागणी करुनही तक्रारदारांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारीस अद्यापी सातत्याने कारण घडत आहे. सबब, प्रस्तुतचे सर्व तक्रार अर्ज मुदतीत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रार क्र. 169/2011 ते 176/2011 मध्ये तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या मुदतबंद व दामदुप्पट ठेवींच्या असून त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत असे दिसून येते. खालील तपशिलाप्रमाणे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेवींच्या रक्कमा या पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना ठेवींची संपूर्ण रक्कमा मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच दामदुप्पट ठेवींच्या रक्कमा सदर ठेवीच्या मुदती संपलेपासून संपूर्ण रक्कमा मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. अ.क्र. | तक्रार क्रमांक | मुदत ठेव पावती क्रमांक | ठेव रक्कम रुपये | ठेवीची तारीख | मुदतपूर्व तारीख | व्याज दर % | 1. | 169/2011 | 465 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 2. | --"-- | 467 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 3. | --"-- | 466 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 4. | --"-- | 469 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 5. | 170/2011 | 891 | 20,000/- | 13/10/2003 | 13/।11/2005 | 13 | 6. | --"-- | 942 | 25,000/- | 19/05/2004 | 19/05/2006 | 13 | 7. | --"-- | 886 | 25,000/- | 23/09/2003 | 23/10/2005 | 13 | 8. | 171/2011 | 648 | 45,000/- | 20/05/2002 | 20/03/2003 | 15 | 9. | --“-- | 1025 | 15,590/- | 18/04/2007 | 02/06/2007 | 15 | 10. | 172/2011 | 198 | 25,000/- | 26/01/1999 | 12/03/1999 | 15 | 11. | --"-- | 1018 | 4,122/- | 20/10/2006 | 04/12/2006 | 10 | 12. | --"-- | 1022 | 2,836/- | 15/02/2007 | 01/04/2007 | 10 | 13. | --"-- | 1002 | 8,650/- | 24/04/2006 | 08/06/2006 | 10 | 14. | --"-- | 1030 | 2,523/- | 23/06/2007 | 07/08/2007 | 8 | 15. | --"-- | 604 | 25,000/- | 06/12/2001 | 20/01/2002 | 14 | 16. | --"-- | 525 | 25,000/- | 03/07/2001 | 17/08/2001 | 15 | 18. | --"-- | 590 | 6,000/- | 20/01/2001 | 04/12/2001 | 14 | 19. | 174/2011 | 1027 | 20,000/- | 24/04/1997 | 24/04/1998 | 10 | 20. | 176/2011 | 932 | 11,000/- | 06/04/2004 | 21/05/2004 | 10 |
अ.क्र. | तक्रार क्र. | दामदुप्पट ठेव पावती क्र. | मुदतपूर्ण रक्कम | 1. | 173/2011 | 44 | 10,000/- | 2. | 174/2011 | 53 | 10,000/- | 3. | 175/2011 | 63 | 5,000/- | 4. | 175/2011 | 46 | 2,000/- |
(12) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. उपरोक्त विवेचन व पूर्वाधार विचारात घेता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आ दे श (1) तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 संस्थेने तक्रारदारांना खालीलप्रमाणे मुदत ठेव रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर ठेव पावत्यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | तक्रार क्रमांक | ठेव पावती क्रमांक | ठेव रक्कम रुपय | ठेवीची तारीख | मुदतपूर्व तारीख | व्याज दर % | 1. | 169/2011 | 465 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 2. | --"-- | 467 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 3. | --"-- | 466 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 4. | --"-- | 469 | 25,000/- | 08/03/2001 | 22/04/2001 | 15 | 5. | 170/2011 | 891 | 20,000/- | 13/10/2003 | 13/।11/2005 | 13 | 6. | --"-- | 942 | 25,000/- | 19/05/2004 | 19/05/2006 | 13 | 7. | --"-- | 886 | 25,000/- | 23/09/2003 | 23/10/2005 | 13 | 8. | 171/2011 | 648 | 45,000/- | 20/05/2002 | 20/03/2003 | 15 | 9. | --“-- | 1025 | 15,590/- | 18/04/2007 | 02/06/2007 | 15 | 10. | 172/2011 | 198 | 25,000/- | 26/01/1999 | 12/03/1999 | 15 | 11. | --"-- | 1018 | 4,122/- | 20/10/2006 | 04/12/2006 | 10 | 12. | --"-- | 1022 | 2,836/- | 15/02/2007 | 01/04/2007 | 10 | 13. | --"-- | 1002 | 8,650/- | 24/04/2006 | 08/06/2006 | 10 | 14. | --"-- | 1030 | 2,523/- | 23/06/2007 | 07/08/2007 | 8 | 15. | --"-- | 604 | 25,000/- | 06/12/2001 | 20/01/2002 | 14 | 16. | --"-- | 525 | 25,000/- | 03/07/2001 | 17/08/2001 | 15 | 18. | --"-- | 590 | 6,000/- | 20/01/2001 | 04/12/2001 | 14 | 19. | 174/2011 | 1027 | 20,000/- | 24/04/1997 | 24/04/1998 | 10 | 20. | 176/2011 | 932 | 11,000/- | 06/04/2004 | 21/05/2004 | 10 |
(3) सामनेवाला क्र.1 संस्थेने तक्रारदारांना खालीलप्रमाणे दामदुप्पट रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर नमूद तारखेपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | मुदतपूर्ण रक्कम | व्याज देय तारीख | 1. | 173/2011 | 44 | 10,000/- | 18/02/2007 | 2. | 174/2011 | 53 | 10,000/- | 22/04/2008 | 3. | 175/2011 | 63 | 5,000/- | 12/03/2009 | 4. | 175/2011 | 46 | 2,000/- | 03/04/2007 |
(4) सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या मुदत ठेवींपोटी यापूर्वी जर काही व्याजाच्या रक्कमा अदा केल्या असतील तर सदर व्याजाच्या रक्कमा वळत्या करुन घेण्याचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षित ठेवणेत येतो. (5) सामनेवाला क्र.1 संस्थेने प्रत्येक तक्रारीकरिता तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |