नि.65 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली अर्ज क्रमांक : 25/2008 वसूली अर्ज दाखल झाल्याचा दि.07/11/2008 वसूली अर्ज निकाली झाल्याचा दि.21/12/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या विजया विजय घवाळी मु.पो.टिके (कांबळेवाडी), ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द कल्पतरु बायोटेक कॉर्पोरेशन लि.,करीता मॅनेजींग डायरेक्टर / अध्यक्ष श्री.जयकृष्ण सिंह राणा, ए/ए, 43, चंदनवन, रेल्वे स्टेशन ब्रिज जवळ, मथुरा (उत्तर प्रदेश), - 281 001. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.ए.ए.शिंदे सामनेवाले : अनुपस्थित. -: नि का ल प त्र :- अ) सदर कामी तक्रारदार यांनी विधिज्ञांसह होवून नि.64 वर पुरशीस दाखल केली. सदर पुरशिसचे अनुषंगाने प्रस्तुत वसूली प्रकरण निकाली करणेत येते असा आदेश करणेत आला. ब) सदर नि.64 वरील पुरशीसमधील मजकूर खालीलप्रमाणेः- “ प्रस्तुत वसुली अर्जाच्या कामी मला सामनेवाले यांच्याकडून देय असलेल्या रकमेपैकी रु.8,000/- इतकी रक्कम धनादेश क्र.641431 अन्वये प्राप्त झाली आहे व सदर धनादेश वटला आहे. सदर रक्कम मी मला सामनेवालांकडून येणे असलेल्या रकमेपोटी full & final settlement म्हणून स्वीकारली आहे. आता मला सर्टिफिकेट नं.R.10008530 या अन्वये गुंतवलेल्या रकमेच्या मॅच्युरिटी पोटी कोणतीही रक्कम येणे बाकी नाही. तरी प्रस्तुत वसुली अर्ज निकाली करण्यात यावा.” क) सदर पुरशिसवर पुढीलप्रमाणे आदेश करण्यात आला. ‘‘तक्रारदार विधिज्ञासह उपस्थित. सदर पुरशिसचे अनुषंगाने प्रस्तुत वसूली अर्ज निकाली करणेत येत आहे. ’’ तक्रारदारतर्फे नि.64 वर दाखल पुरशिसच्या अनुषंगाने प्रस्तुत वसूली अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 21/12/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |