निकालपत्र :- (दि.24/08/2010) (व्दारा-सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला सदर कामी वकीलांमार्फत हजर झालेत व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सुनावणीचे वेळेस उभय पक्षकारांचे वकीलांनी युक्तीवाद केला. प्रस्तुतची तक्रार ठेव रक्कम तक्रारदारास अदा न करुन सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केली आहे. (2) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी:– अ) सामनेवाला क्र.1 ही महाराष्ट्र सहकार कायदयानुसार नोंदणीकृत सहकार संस्था आहे. सामनेवाला क्र.2 ते 11 हे सामनेवाला क्र.1 चे संचालक आहेत. तक्रारदार हे सामनेवाला संस्थेचे सभासद असून त्यांच्या सामनेवाला संस्थेकडे ठेव रक्कम आहेत.सबब ते सामनेवाला यांचे ठेवीदार ग्राहक आहेत. सामनेवालांचे विश्वास व हमी यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने पावती क्र.6 ने दि.05/06/1998 रोजी रक्कम रु.3,000/-व पावती क्र.30 अन्वये दि.30/10/1998 रोजी रक्कम रु.2,000/-अशी एकूण रक्कम रु.5,000/- रक्कम दामदुप्पटीने पाच वर्ष मुदतीने गुंतवलेली होती व आहे. सदर ठेवीची मुदत संपलेनंतर वारंवार मागणी करुनही सदर ठेवी तक्रारदारास दिलेल्या नाहीत. राजकीय भावनेने व तक्रारदारास त्रास देणेचे दुष्ट हेतुने तक्रारदारास ठेव रक्कमा दिलेल्या नाहीत. त्यामुळे सदर तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करावी. ठेव पावती क्र.6 ची मुदतीनंतर मिळणारी रक्कम रु.6,000/- त्यावर सन 2005 अखेर 5 वर्षाचे 18 टक्के प्रमाणे व्याज रु.6,195/-,ठेव पावती क्र.30 ची मुदतीनंतरची मिळणारी रक्कम रु.4,000/-व त्यावरील व्याज रु.3,852/-तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-,तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/-असे एकूण रु.30,047/-व्याजासहीत सामनेवालांकडून वैयक्तिकव संयुक्तिकरित्या जंगम/स्थावर वारस इस्टेटीतून रक्कम वसुल होऊन मिळणेबाबत हुकूम व्हावा अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्या सत्यप्रती, व सहाय्यक निबंधक सह.संस्था राधानगरी यांचेमार्फत मिळालेली सामनेवाला संस्थेची संचालकांची यादी इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा व लबाडीचा असून त्यातील मान्य केले कथनाखेरीज इतर सर्व कथनाचा सामनेवाला संस्था इन्कार करतात. तक्रार अर्जातील कलम 1 मधील सामनेवाला क्र.1संस्था ही--------- संचालक आहेत हा मजकूर खरा व बरोबर आहे. सामनेवाला ही कृषी पुरक संस्था असून सभासदांचे बिगर सभासदांचे शेतीसाठी पाणी पुरवठा करणेच्या एकमेव उद्दाष्टाने स्थापन केलेली आहे. तक्रारदार सामनेवाला क्र.1 संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. सामनेवाला संस्थेने पाणी पुरवठा स्कीमसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचेकडून रक्कम रु.9,78,750/-कर्ज घेतलेले आहे. त्यावेळी नमुद बँकेने स्वभांडवलाची अट घातली आहे. सदर अटीप्रमाणे सामनेवाला संस्थेचे सभासदांनी स्वभांडवल उभारणेसाठी बरीचशी रक्कम संस्थेत गुंतवलेली असून ते संस्थेचे स्वभांडवल आहे. त्याप्रमाणे तक्रारदाराने गुंतवलेली रक्कम ही ठेव रक्कम नसून स्वभांडवल आहे. तसेच नमुद संस्थेचे अटीप्रमाणे नमुद सामनेवाला संस्था कर्जमुक्त झालेवरच सभासदांचे सवभांडवल गुंतवणूक परत करणेचे आहे व तशी स्पष्ट अट कर्ज मंजूरी आदेशामध्ये ओह. व्याज देणेचा प्रश्न उदभवत नाही. तक्रारदार सभासद असलेचे नातेने मालकच आहे. नमुद बॅंकेचे अटीप्रमाणे तक्रारदाराची स्वभांडवलपोटी जमा असणारी रक्कम रु.5,000/-परत करणेची आहे. सदर रक्कम कोणत्याही वित्तीय संस्थेत गुंतवलेली नसून त्यावर नफा मिळवलेला नाही. याउलट तक्रारदाराने सामनेवाला संस्थेचे कार्यक्षेत्रामध्ये स्वमालकीची विहीर खुदाई केली असून त्याचे पाणी तक्र स्वत:चे व अन्य शेतक-यांचे शेतासाठी पुरवठा करतात. त्यामुळे संस्थेचे नुकसान झाले आहे. त्याबद्दल त्यांचेविरुध्द पाझर पाणीपट्टी वसुल करणेबाबत कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे चिडून जाऊन प्रसतुत तक्रार दाखल केली आहे. माहिती अधिकार कायदयाचा गैरवापर करुन त्रास दिेलेला आहे. ती कागदपत्रे देऊनही मा.आयुक्त माहितीचा अधिकार यांचेकडे अपील केले होते. तक्रारदार हा संस्थेचा ग्राहक होत नाही हा प्राथमिक मुद्दा काढून निर्णय देणेत यावा. सेक्रेटरींना पक्षकार केले नाही. त्यामुळे Non Joinder of Necessary Party ची बाधा येते. सहकार कायदयान्वये 164 प्रमाणे दावापूर्व नोटीस तक्रारदाराने दिलेली नाही. त्यामुळे प्रसतुतचा अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रारदाराचे कृत्यामुळे सामनेवाला संस्थेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. सबब तक्रारदाराचा अर्ज खर्चासह नामंजूर करावा. तसेच तक्रारदाराकडून सामनेवाला संस्थेस आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.10,000/-मिळणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सामनेवाला संसथेच्या संस्थापक सभासदांची यादी, सामनेवाला संस्थेचा स्वगुंतवणूकीचा ठराव क्र.2, तसेच शेअर्स व ठेव रक्कम परत न करणेबाबतचा ठराव क्र.5, स्व.वेणूताई चव्हाण वि.का.स.सेवा संस्था मर्या.कपिलेश्वर यांनी दिलेला दाखला, के.डी.सी.सी.बँकेचे पत्र, स्व.वेणूताई चव्हाण वि.का.स.सेवा संस्था मर्या.कपिलेश्वर यांनी तक्रारदारांना दिले कर्जाबाबतचे करारपत्र, त्यास श्री रामचंद्र शिवराम शेळके यांना जामीन झालेबाबतचे करारपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे, उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रसतुतचा वाद हा ग्राहक वाद होते का? --- नाही. 2. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1 :- तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 संस्थेचे सभासद असलेचे तक्रारदाराने व सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे. सामनेवाला क्र.1 ही सहकारी पत संस्था नसून पाणी पुरवठा करणारी सहकारी संस्था आहे. सामनेवाला संस्थेचा मुख्य उद्देश हा त्यांचे सभासद व बिगर सभासदांना शेतीसाठी पाणी पुरवठा करणे हाच असून पत निर्मीती करणेचा नाही. किंवा बँकींग सेवा पुरविणेचा नसलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
सदर सामनेवाला संस्थेने पाणी पुरवठा योजनेसाठी के.डी.सी.सी. बँकेचे कर्ज घेतले होते. त्यांनी सभासदांकडून स्वभांडवल गुंतवणूक म्हणून रक्कम रु.5,000/- घेतलेचे सामनेवालांनी मान्य केले आहे. तसेच प्रस्तुत रक्कम या सर्व कर्ज फेड झालेशिवाय अदा करता येणार नाही अशी स्पष्ट अट कर्जाचे वेळी नमुद बॅंकेने घातलेली असलेने त्याप्रमाणे रक्कम अदा करणेस सामनेवाला बांधील आहेत या प्रतिपादनाचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाला संस्थेचे संस्थापक सभासद असलेचे दाखल सभासद यादीवरील क्र.4 वरील नमुद नावावरुन निर्विवाद आहे. तसेच दि.25/12/1998 मधील ठराव क्र.2 वरुन स्वभांडवल गुंतवणूक म्हणून ठेवी जमा असून कर्ज फेड होईपर्यंत त्या परत करता येणार नसलेचा व्यक्तीश व सामुदायिकरित्या हमी घेतलेचा ठराव सर्वानुमते मंजूर आहे. तसेच दि.06/06/1998चा ठराव क्र.5 सभासदांची जमीन विक्री केली जाणार नसलेचा ठराव दाखल आहे. तसे रामचंद्र शिवराम शेळके यांचे कर्जास तक्रारदार जामीनदार आहेत. या कागदपत्रानुसार व संस्थेचे मुळ उद्देश, कार्यपध्दती, तसेच स्वभांडवल गुंतवणूक व त्यासंबंधीच्या अटी या सर्वांचा विचार करुन चालणा-या कार्यपध्दतीचा विचार करता तसेच तक्रारदार हे संस्थापक सभासद असून मालक आहेत. तसेच प्रस्तुत सामनेवाला संस्था ही पाणी पुरवठा करणारी संस्था असून ती पत संस्था नाही. सबब प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. तक्रारदार या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश
(1) तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते.
(2) खर्चाबद्दल आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |