नि.29
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल – रजेवर
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 438/2010
तक्रार नोंद तारीख : 17/08/2010
तक्रार दाखल तारीख : 18/08/2010
निकाल तारीख : 02/07/2013
----------------------------------------------
1. श्री अनिल एकनाथ जाधव-पाटील
2. श्री जयदिप अनिल जाधव-पाटील
3. श्री संदिप अनिल जाधव-पाटील
4. श्री एकनाथ हरी जाधव-पाटील
5. सौ मालती एकनाथ जाधव-पाटील
सर्व रा.हिंगणगांव खुर्द, ता.कडेगांव जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. श्री डोंगराई को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. कडेगांव
ता.कडेगांव जि. सांगली
2. श्री तानाजी विष्णू जाधव, चेअरमन
रा.आसद, ता.कडेगांव जि. सांगली
3. श्री अशोक शंकर साळुंखे, व्हा.चेअरमन
रा.हिंगणगांव खुर्द, ता.कडेगांव जि. सांगली
4. श्री शशिकांत संपतराव मोहिते, संचालक
रा.तोंडोली, ता.कडेगांव जि. सांगली
5. श्री रामचंद्र गणपतराव देशमुख, संचालक
रा.वांगी, ता.कडेगांव जि. सांगली
6. श्री दत्तात्रय आकाराम मोहिते, संचालक
रा.मोहिते वडगांव, ता.कडेगांव जि. सांगली
7. श्री मारुती लक्ष्मण माळी, संचालक
रा.कडेपुर, ता.कडेगांव जि. सांगली
8. श्री महादेव लक्ष्मण सुर्यवंशी, संचालक
रा.कडेपूर, ता.कडेगांव जि. सांगली
9. श्री तानाजी विश्वनाथ ननवरे, संचालक
रा.येवलेवाडी, ता.कडेगांव जि. सांगली
10. श्री गजेराव दत्तात्रय रास्कर, संचालक
रा.कडेपूर, ता.कडेगांव जि. सांगली
11. श्री अमर शामराव पाटणकर, संचालक
रा.वाजेगांव ता.कडेगांव जि. सांगली
12. श्री संजय मुरलीधर क्षीरसागर, संचालक
रा.शाळगांव ता.कडेगांव जि. सांगली
13. श्री सुरेश प्रल्हाद वायदंडे, संचालक
मु.पो. ता.कडेगांव जि. सांगली
14. सौ मंदाताई लालासो कारंडे, संचालिका
रा.करांडेवाडी, ता.कडेगांव जि. सांगली ........ सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री बी.आर.टकले
सामनेवाला क्र.1 ते 14 : अॅड सौ उज्वला पाटील
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार सामनेवालांनी मुदत ठेवपावत्यांची रक्कम व्याजासह ठेवींची मुदत संपूनही न दिल्याने दाखल करण्यात आली आहे. प्रस्तुत तक्रार अर्ज स्वीकृत करुन सामनेवाला क्र.1 ते 14 यांना नोटीस आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी हजर होवून म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 ते 14 यांनी सदर म्हणणे त्यांचे म्हणणे म्हणून वाचण्यात यावे अशी पुरसीस नि.25 वर दिली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात हकीकत अशी -
सामनेवाला क्र.1 ही बँकींगचे व्यवहार करते व ठेवी स्वीकारते तसेच गरजू सभासदांना त्यांचे मागणीप्रमाणे कर्ज वाटप करते. सामनेवाला क्र.1 ते 14 हे सदर संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक असून या संस्थेचे दैनंदिन व आर्थिक व्यवहारास सर्व सामनेवाला वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेत खालीलप्रमाणे ठेवीची रक्कम ठेवलेली होती.
अ.नं. |
नांव |
ठेवपावती क्र. |
ठेव रक्कम |
ठेवपावतीचा दिनांक |
ठेवपरतीची तारीख |
मुदती/ आजअखेर होणारे व्याज |
1 |
अनिल एकनाथ जाधव |
500 |
30000 |
20/1/07 |
21/4/07 |
673 |
2 |
जयदिप अनिल जाधव |
263 |
13000 |
14/2/03 |
15/11/07 |
दामदुप्पट |
3 |
संदिप अनिल जाधव |
264 |
12000 |
14/2/03 |
15/11/07 |
दामदुप्पट |
4 |
एकनाथ हरी जाधव |
291 |
10000 |
24/12/03 |
25/12/08 |
दामदुप्पट |
5 |
सौ मालती एकनाथ जाधव |
292 |
10000 |
24/12/03 |
25/12/08 |
दामदुप्पट |
6 |
संदिप अनिल जाधव |
293 |
10000 |
24/12/03 |
25/12/08 |
दामदुप्पट |
7 |
जयदिप अनिल जाधव |
294 |
10000 |
24/12/03 |
25/12/08 |
दामदुप्पट |
8 |
एकनाथ हरी जाधव |
424 |
10000 |
2/12/04 |
3/7/11 |
5876 |
9 |
सौ मालती एकनाथ जाधव |
425 |
10000 |
2/12/04 |
3/7/11 |
5876 |
सदर दामदुप्पट ठेव पावत्यांची मुदत संपल्यामुळे व तक्रारदार यांना त्यांचे मुलांचे शिक्षणाकरिता व वयोवृध्द वडिलांचे औषधोपचाराकरिता आवश्यकता असलेने तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी ठेवपावतीचे रकमेची मागणी केली असता सामनेवाला रक्कम देण्यास टाळाटाळ करु लागले. त्यामुळे सामनेवाला यांनी त्यांचे सेवेमध्ये कसूर केला आहे व ती सामनेवालांचे सेवेमधील त्रुटी आहे. म्हणून तक्रारदार यांनी सामनेवालांना दि.7/4/2010 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवून रकमेची मागणी केली परंतु तरीही सामनेवाला यांनी रक्कम देणेचे टाळले असून तक्रारदार यांचे नोटीसीस उत्तरही दिलेले नाही. सबब तक्रारदार यांनी ठेवपावत्यांची एकूण रक्कम रु.1,92,425/- व सदर रकमेवर ठेवीची मुदत संपलेपासून होणारे व्याज, व संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष तक्रारदार यांना मिळेपावेतो सदर रकमेवर 14 टक्के व्याजदराने व्याज मिळावे, मानसिक शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
3. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.3 ला शपथपत्र व नि.5 चे कागदयादीप्रमाणे ठेवपावत्यांच्या प्रती, रक्कम मागणीची नोटीस, सामनेवाला संस्थेच्या संचालक मंडळाची यादी व कुलमुखत्यार अशी एकूण 13 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.24 ला दाखल केलेले असून तक्रारदाराचे तक्रारीतील कथन नाकारले आहे. परंतु नमूद ठेवपावत्यांचा तपशील सर्वसाधारण बरोबर आहे असे म्हणणे मांडले आहे. मात्र सदर रकमेची तक्रारदार यांना मुलाचे शिक्षणाकरिता, घरगुती देणी भागविणेसाठी व मुलीचे लग्नाकरिता आवश्यकता असलेचे कथन मान्य नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेत ठेवी ठेवल्या, त्यावेळी सदरील सामनेवाला हे संचालक म्हणून काम पहात नव्हते. त्यावेळी श्री माधवराव पांडुरंग पाटील हे चेअरमन होते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन त्यांनी स्वतः व त्यांचे संचालकांनी जाबदार संस्थेकडून ब-याच मोठया रकमांचे कर्ज बेकायदेशीरपणे उचलले आहे व त्याची अद्यापी परतफेड केलेली नाही. सदरचे माधवराव पाटील हे तक्रारदार यांचेच गावचे रहिवासी असल्याने याची तक्रारदार यांना पुरेपूर माहिती आहे. त्यामुळे मागील संचालक मंडळाने घेतलेले कर्ज भरल्याशिवाय तक्रारदारांच्या ठेवीच्या रकमा परतफेड करु शकत नाहीत. सबब सामनेवालांनी तक्रारदारांना कोणतीही त्रुटीयुक्त सेवा दिलेली नाही. सबब तक्रारअर्ज खर्च खर्चासह रद्द करावा असे म्हणणे सामनेवालांनी मांडले आहे.
5. सामनेवाला यांनी आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ शपथपत्र दाखल केले असून पुराव्यादाखल कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
6. तक्रारदाराची तक्रार, सामनेवालाचे म्हणणे व पुराव्यादाखल कागदपत्रे यांचा विचार करता सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 ते 14 यांचे ग्राहक होतात काय ? होय.
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? होय.
3. तक्रारदार ठेव रकमा व्याजासह व अन्य मागण्या मिळण्यास पात्र
आहे काय ? होय.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1 ते 4
7. तक्रारदार क्र.1 व 5 हे पती पत्नी आहेत. तक्रारदार क्र.2 व 3 तक्रारदार क्र.1 यांची मुले आहेत व तक्रारदार क्र.4 ही क्र.1 चे वडील आहेत. सदर तक्रारदार एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार एकत्रितरित्या दाखल केली आहे. त्यासाठी अनिल एकनाथ जाधव यांना त्या पध्दतीने कुलमुखत्यारपत्र लिहून दिलेले आहे. तक्रारदारांनी आपले कौटुंबिक गरजांसाठी तसेच भविष्यकालीन तरतुदीसाठी सामनेवाला पतसंस्थेकडे खालील तपशीलाप्रमाणे ठेवी ठेवलेल्या होत्या. त्यामुळे तक्रारदार सामनेवालेचे ठेवीदार ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे.
अ.नं. |
नांव |
ठेवपावती क्र. |
ठेव रक्कम |
ठेवपावतीचा दिनांक |
ठेवपरतीची तारीख |
मुदती/ आजअखेर होणारे व्याज |
1 |
अनिल एकनाथ जाधव |
500 |
30000 |
20/1/07 |
21/4/07 |
673 |
2 |
जयदिप अनिल जाधव |
263 |
13000 |
14/2/03 |
15/11/07 |
दामदुप्पट |
3 |
संदिप अनिल जाधव |
264 |
12000 |
14/2/03 |
15/11/07 |
दामदुप्पट |
4 |
एकनाथ हरी जाधव |
291 |
10000 |
24/12/03 |
25/12/08 |
दामदुप्पट |
5 |
सौ मालती एकनाथ जाधव |
292 |
10000 |
24/12/03 |
25/12/08 |
दामदुप्पट |
6 |
संदिप अनिल जाधव |
293 |
10000 |
24/12/03 |
25/12/08 |
दामदुप्पट |
7 |
जयदिप अनिल जाधव |
294 |
10000 |
24/12/03 |
25/12/08 |
दामदुप्पट |
8 |
एकनाथ हरी जाधव |
424 |
10000 |
2/12/04 |
3/7/11 |
5876 |
9 |
सौ मालती एकनाथ जाधव |
425 |
10000 |
2/12/04 |
3/7/11 |
5876 |
8. वर तपशीलाप्रमाणे ठेवीच्या साक्षांकित केलेल्या प्रती नि.27/1 ते 27/9 अन्वये दाखल केल्या आहेत. यावरुन सदर ठेवी सामनेवाला संस्थेत ठेवल्याचे सिध्द होते. सामनेवाला क्र.1 पतसंस्था असून सामनेवाला क्र.2 व 3 अनुक्रमे सदर पतसंस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन आहेत तर सामनेवाला क्र.4 ते 14 प्रस्तुत पतसंस्थेचे संचालक आहेत ही वस्तुस्थिती नि.5/12 वर दाखल असलेल्या सहायक निबंधक सहकारी संस्था ता.कडेगांव यांचे सहीशिक्क्यानिशी असलेल्या यादीवरुन सिध्द होते. सामनेवाला याने दाखल केलेल्या लेखी म्हणण्यातील कलम 2 मध्ये ठेवपावत्यांचा तपशील बरोबर असल्याचे मान्य केले आहे. तसेच कलम 3 पान 2 मध्ये सदर ठेवी ठेवतेवेळी नमूद संचालक हे कामकाज पहात नव्हते. तत्कालिन चेअरमन माधवराव पांडुरंग पाटील यांनी पदाचा गैरवापर करुन त्यांनी स्वतः व त्यांच्या संचालकांनी बेकायदेशीरपणे कर्ज उचलले, त्याची परतफेड त्यांनी केलेली नाही. सदर कर्ज भरल्याशिवाय सामनेवाला ठेवीदारांच्या रकमांची परतफेड करु शकत नाही. यासाठी पूर्वीचे संचालक मंडळ जबाबदार आहेत. त्यामुळे सामनेवाला यांची सेवात्रुटी नसल्याचे कथन केले आहे. मात्र त्या अनुषंगाने कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. याउलट नि.5/12 यादीप्रमाणे प्रस्तुत संचालक मंडळाचा कालावधी हा सन 2003-2004 ते सन 2007-08 असल्याचे दिसून येते. तसेच अद्यापही सदरचे संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यांनी सदर संस्थेची जबाबदारी स्वीकारलेली आहे. तसेच सन 2008 नंतर आम्ही संचालकपदावर नव्हतो असेही स्पष्टपणे कोठे कथन केलेले नाही अथवा त्या अनुषंगाने पुरावा दाखल केलेला नाही. याचा विचार करता तक्रारदारांच्या ठेव रकमांची व्याजासहीत परतफेड करण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.1 ते 14 यांचेवरच वैयक्तिक व संयुक्तरित्या आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9. तक्रारदारांनी ठेवपावत्यांची मुदती संपल्याने मुलाच्या शिक्षणाकरिता, मुलीचे लग्नाकरिता, वयोवृध्द वडीलांचे औषधोपचाराकरिता सामनेवाला यांचेकडे वारंवार रकमेची मागणी करुनही रकमा देणेस टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळे शेवटी नि.5/10 अन्वये दि.7/4/10 रोजी वकीलांमार्फत यु.पी. सी.ने नोटीस पाठवून दिली आहे. तक्रारदारांनी मागणी करुनही ठेव रकमा व्याजासह अदा न करुन सामनेवाला याने सेवात्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10. सामनेवाला यांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे त्यामुळे झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रकमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच कलम 7 मध्ये नमूद तपशीलाप्रमाणे ठेवरकमा मिळणेस पात्र आहेत.
11. सदर ठेव रकमा अनुक्रमांक 2 ते 7 मध्ये नमूद दामदुप्पट ठेवपावतीप्रमाणे दामदुप्पट रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. तसेच अनुक्रमांक 1, 8 व 9 वरील मुदतबंद ठेव पावतीवरील ठेवरकमा सदर ठेवपावत्यांवरील नमूद मुदतीसाठी नमूद व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच अनुक्रमांक 1 ते 9 मधील ठेवपावत्यांची मुदत संपलेनंतर सदर ठेव रकमा पूर्णतः मिळेपावेतोपर्यंत सदर ठेव रकमांवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
12. वरील संपूर्ण रकमा देणेसाठी सामनेवाला क्र.1 ते 14 हे वैयक्तिक व संयुक्तरित्या देण्यास जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या वर नमूद कलम 7
मध्ये नमूद केल्याप्रमाणे ठेवरकमा आणि कलम 11 मध्ये नमूद केल्याप्रमाणे व्याज अदा
करावे.
3. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या शारीरिक आर्थिक,
मानसिक ञासापोटी रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
4. तक्रारदार यांना सामनेवाला नं.1 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारीच्या खर्चापोटी
रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार माञ) अदा करावेत.
5. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
6. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 02/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष