Exh.No.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
दरखास्त क्रमांक 12/2011
श्री श्रीधर शंकर सावंत
वय सुमारे 65 वर्षे, धंदा- रिटायर्ड व शेती
रा.माजगाव, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादित सावंतवाडी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
प्रधान कार्यालय, केसरकर कॉम्प्लेक्स,
गांधी चौक, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग तर्फे
विदयमान चेअरमन श्री विकास भालचंद्र सावंत
वय सुमारे 52 वर्षे, धंदा- व्यवसाय,
रा.माजगाव, हरसावंतवाडी, ता.सावंतवाडी,
जिल्हा – सिंधुदुर्ग
2) भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादित सावंतवाडी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
तर्फे विदयमान सेक्रेटरी श्री संजय विठ्ठल कानसे
वय सुमारे 42 वर्षे धंदा – व्यवसाय
प्रधान कार्यालय, केसरकर कॉम्प्लेक्स,
गांधी चौक, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
3) सौ.मनिषा धोंड
पुर्वाश्रमीची कु.मनिषा अंकुश म्हापसेकर
वय सु.26 वर्षे, धंदा- नोकरी,
रा.कोलगाव, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. एम.डी. देशमुख, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फेः- गैरहजर
विरुद्ध पक्षातर्फे- गैरहजर
(मंचाच्या निर्णयाद्वारे द्वारा श्री एम्. डी. देशमुख, अध्यक्ष)
आदेश
(दि.24/05/2012)
1) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार व सामनेवाला यांचे वकील गैरहजर आहेत. प्रस्तुतचा अर्ज हा ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25(3) अन्वये दाखल केलेला आहे. सदरच्या अर्जाचे अवलोकन केले असता, मूळ तक्रार क्र.01/2011 मध्ये या मंचाने दि.02/04/2011 रोजी आदेश पारीत करुन तक्रारदाराची तक्रार मंजूर केलेली आहे. त्यामधील आदेश खालीलप्रमाणे.
- आदेश -
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) भाईसाहेब सावंत सहकारी पतसंस्था मर्यादित, सिंधुदुर्ग व विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकपणे निकालपत्राचे परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या दिनांकापासून दि.11/10/2010 पर्यंत कॉलम नं.4 मधील कॉल डिपॉझिटच्या रक्कमा व त्यावर कॉलम नं.5 मध्ये नमूद केलेल्या व्याजदराने रक्कमा तक्रारदार यांस अदा करणेचे आदेश पारीत करणेत येतात.
3) तसेच विरुध्द पक्ष पतसंस्था व विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे निकालपत्राचे परिशिष्ट ‘ब’ मध्ये नमूद केलेली सेव्हिंग अकाऊंटची रक्कम रु.11,274/- (रुपये अकरा हजार दोनशे चौ-याहत्तर मात्र) तक्रारदार यांस अदा करणेचे आदेश पारीत करणेत येतात.
4) ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी ठेवल्याबद्दल नुकसान भरपाई व प्रकरण खर्च मिळून रक्कम रु.4,000/-(रुपये चार हजार मात्र) तक्रारदार यांस विरुध्द पक्ष पतसंस्था व विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी दयावेत.
5) तक्रारदारांच्या अन्य मागण्या फेटाळण्यात येतात.
6) सदर आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत करणेत यावी.
वर नमूद आदेशाप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदाराची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 25(3) प्रमाणे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे सदरचे प्रकरण पाठविण्यात यावे, अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. सदरच्या अर्जाला सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले आहे. त्या म्हणण्याचे अवलोकन केले असता, त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सामनेवाला संस्थेची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. तसेच थकीत कर्जदाराकडून होत असलेली अत्यल्प वसुली व येणे असलेली रक्कम जमा होत नसल्याने सामनेवाला यांची इच्छा असूनही तक्रारदार यांचेसारख्या ठेवीदारांना त्यांच्या देय रक्कमा वेळीच पोहोच करता येत नाहीत. तक्रारदार मागणी करतात त्याप्रमाणे सामनेवाला पतसंस्थेचे कार्यालय सिल करुन कार्यालयातील सामान जप्त करुन तसेच सामनेवाला यांना दिवाणी तुरुंगात टाकून रक्कम वसुल होणारी नसल्याने तशी कोणतीही मागणी मान्य करण्यात येऊ नये. सामनेवाला यांनी तक्रारदारांना देय असलेली रक्कम जमेल तशी अदा करण्याची परवानगी मागीतली आहे.
उपरोक्त विवेचन विचारात घेता मूळ तक्रार अर्जात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सामनेवाला यांनी केलेली नाही, ही वस्तुस्थिती या मंचाच्या निदर्शनास येते. सदरची वस्तुस्थिती विचारात घेता तसेच तक्रारदार व त्या पुष्टयर्थ दाखल केलेले शपथपत्र यांचा विचार करता ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25(3) अन्वये वसुली दाखला जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे पाठविण्यात यावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब आदेश -
आदेश
1) ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25(3) अन्वये जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे वसुलीचा दाखला देण्यात येतो.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 24/05/2012
sd/- sd/- sd/-
(वफा खान) (एम.डी. देशमुख) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.