निकालपत्र :- (दि.23/08/2010) (व्दारा-सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला सदर कामी वकीलांमार्फत हजर झालेत व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सुनावणीचे वेळेस उभय पक्षकारांचे वकीलांनी युक्तीवाद केला. (2) यातील तक्रारदार व सामनेवाला या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार नोंदणीकृत संस्था आहेत. सामनेवाला क्र.1 संस्था सामनेवाला क्र.2 शाखेमार्फत कामकाज करते. तक्रारदार संस्थेची वरणगे पाडळी ता.करवीर खेरीज अन्यत्र शाखा नाही. सामनेवाला क्र.3 ते 13 हे सामनेवाला क्र.1 चे संचालक म्हणून काम पाहतात. सामनेवाला क्र.13 ते 20 हे सामनेवाला क्र.1 संस्थेच्या सामनेवाला क्र.2 शाखेच्या शाखा कमिटीचे सदस्य आहेत. सामनेवाला क्र.16 हे शाखा कमिटी चेअरमन आहेत. सामनेवाला क्र; 3 व4 हे सामनेवाला क्र.1 चे अनुक्रमे चेअरमन व व्हा.चेअरमन असून सामनेवाला क्र.3 ते 15 हे सामनेवाला क्र.1 चे संचालक आहेत. तर सामनेवाला क्र.16ते 21 हे सामनेवाला क्र.2 शाखा संस्थेचे समिती सदस्य आहेत. सामनेवाला क्र.1 संस्थेचा कारभार सामनेवाला क्र. 2 ते 21 मार्फत चालतो. त्यामुळे सामनेवाला क्र.2 ते 21 जबाबदार आहेत. तक्रारदार संस्थेने सामनेवाला संस्थेवर विश्वास ठेवून सामनेवाला क्र.1 संस्थेमध्ये कॉल डिपॉझीट आणि फिक्स डिपॉझीट स्वरुपात काही रक्कमा ठेवल्या होत्या. अ.क्र. | ठेवीचा प्रकार | ठेव पावती क्र. | ठेव ठेवल्याचा दि. | ठेवीची मुदत संपलेचा दि. | ठेवलेली रक्कम | -व्याजदर | 01 | कॉल ठेव | 5868 | 01/01/04 | 46 दिवस | 35,000/- | 11 % | 02 | कॉल ठेव | 5866 | 01/01/04 | 46 दिवस | 30,000/- | 11 % | 03 | कॉल ठेव | 5883 | 05/02/04 | 46 दिवस | 39,000/- | 11 % | 04 | कॉल ठेव | 5914 | 03/03/04 | 46 दिवस | 37,000/- | 11 % | 05 | कॉल ठेव | 5936 | 31/03/04 | 46 दिवस | 40,000/- | 11 % | 06 | कॉल ठेव | 5990 | 08/07/04 | 46 दिवस | 44,000/- | | 07 | कॉल ठेव | 6516 | 07/09/04 | 46 दिवस | 18,000/- | 10 % | 08 | कॉल ठेव | 6526 | 04/10/04 | 46 दिवस | 44,700/- | 10 % | 09 | कॉल ठेव | 6545 | 04/12/04 | 46 दिवस | 40,000/- | 10 % | 10 | कॉल ठेव | 6549 | 01/01/05 | 46 दिवस | 30,000/- | 10 % | 11 | कॉल ठेव | 6551 | 01/01/05 | 46 दिवस | 44,000/- | 10 % | 12 | कॉल ठेव | 6583 | 03/02/05 | 46 दिवस | 42,000/- | 10 % | 13 | कॉल ठेव | 6626 | 20/05/05 | 46 दिवस | 33,000/- | 10 % | 14 | कॉल ठेव | 6650 | 12/07/05 | 46 दिवस | 34,000/- | 10 % | 15 | कॉल ठेव | 10 | 28/09/05 | 46 दिवस | 25,000/- | 10 % | 16 | कॉल ठेव | 16 | 10/10/05 | 46 दिवस | 31,000/- | 10 % | 17 | कॉल ठेव | 31 | 07/11/05 | 46 दिवस | 32,000/- | 10 % | 18 | कॉल ठेव | 503 | 03/01/06 | 46 दिवस | 30,500/- | 10 % | 19 | कॉल ठेव | 519 | 02/03/06 | 46 दिवस | 27,000/- | 10 % | 20 | कॉल ठेव | 524 | 05/04/06 | 46 दिवस | 31,000/- | 10 % | 21 | कॉल ठेव | 610 | 05/09/06 | 46 दिवस | 24,000/- | 10 % | 22 | कॉल ठेव | 622 | 10/10/06 | 46 दिवस | 22,000/- | 10 % | 23 | कॉल ठेव | 626 | 05/12/06 | 46 दिवस | 20,000/- | 10 % | 24 | कॉल ठेव | 645 | 17/01/07 | 46 दिवस | 15,000/- | 10 % | 25 | कॉल ठेव | 647 | 06/02/07 | 46 दिवस | 17,000/- | 10 % | 26 | कॉल ठेव | 652 | 06/11/07 | 46 दिवस | 79,000/- | 10 % | 27 | मुदत बंद | 5928 | 12/03/04 | 12/04/07 | 1,00,000/- | 13 % | 28 | मुदत बंद | 5998 | 21/07/04 | 21/08/07 | 54,000/- | 12 % | 29 | मुदत बंद | 5929 | | | 51,000//- | | 30 | मुदत बंद | 5935 | | | 15,000/- | |
(3) सामनेवाला क्र. 3 ते 21 यांनी बेकायदेशीर व अनागोंदी कारभार केलेला आहे. बेकायदेशीर कर्ज वाटप करुन संस्थेची आर्थिक स्थिती खराब केली आहे. त्यास सामनेवाला क्र. 3 ते 21 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत. नमुद ठेवीची मागणी केली असता दि.23/08/2008 रोजी पत्राने ठेव रक्कम मान्य करुन रक्कम परत करणेचे कबूल केले. परंतु आजअखेर पूर्ण रक्कम व्याजासह परत केलेली नाही. तक्रारदाराचे के.डी.सी.सी. बँक शाखा गारगोटी यांचेकडे जमा असलेल्या रिझर्व्ह फंड रक्कमेतून ठेव रक्कम मिळणेकरिता मागणी केलेली होती. त्याप्रमाणे रक्कम रु.5,00,000/-सामनेवाला संस्थेच्या संचालकांनी उचल केलेली आहे. पण तक्रारदारास फक्त रु.2,00,000/-अदा करुन रु.3,00,000/-देणेचे टाळले आहे. संस्था स्वत:ची स्थावर मिळकत तबदील करणेचे प्रयत्नात असलेचे कळलेमुळे कोल्हापूर येथील सि.स.नं.729 क शशी प्लाझा अपार्टमेंटमधील ऑफिस युनीट एफ-4 क्षेत्र 20.46 चौ.मि.चे विक्रीतून ठेव रक्कम वसुल होणेबाबत व ती कोणत्याही प्रकारे तबदील करु नये म्हणून कायम मनाई आदेश होणेकरिता तक्रारीत आदेश व्हावा यासाठी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार मंजूर करावी. ठेव रक्कम रु.11,25,734/-सामनेवालांकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या मिळणेबाबत आदेश व्हावा व वर नमुद मिळकत सि.स.नं.729 क युनीट क्र.एफ-4 विक्रीतून ठेवीची रक्कम तक्रारदारास मिळावी तसेच सामनेवालांनी नमुद मिळकत तबदील करु नये म्हणून कायम व तूर्तातूर्त मनाई आदेश व्हावा आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,00,000/-व तक्रारीच्या खर्च व इतर अनुषंगीक खर्चापोटी रक्कम रु.30,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत कॉल डिपॉझीट व मुदत बंद ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व तक्रारदाराने सामनेवाला संस्थेस दिलेली पत्रे, सामनेवाला संस्थेच्या संचालक मंडळाची व कमिटी मंडळाची यादी, सामनेवाला संस्थेचे जिल्हा उपनिबंधकांना पत्र, सामनेवाला संस्थेच्या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (5) सामनेवाला क्र.1 ते 17, 19 ते 21 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार-अ) तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा व लबाडीचा व रचनात्मक असून तो सामनेवाला यांना मूळीच मान्य नाही.त्यातील आरोपांचा व कथनांचा सामनेवाला स्पष्ट शब्दात इन्कार करतात. तक्रारदार व सामनेवाला संस्था ही महाराष्ट्र सहकार कायदयानुसार नोंदणीकृत सहकारी पत संस्था आहे. दोन्ही संस्थांचे उद्देश समान आहेत. तक्रारदार हे ग्राहक संज्ञेत बसत नाहीत. सबब तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रारदाराने सहकार कायदा कलम 70 च्या तरतुदींचा भंग केला आहे. त्यांना ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदीचा आधार घेता येणार नाही. तक्रारदार संस्थेचे व्यवस्थापक आबाजी गोंधळी हे वैयक्तिक जबाबदार आहेत. सामनेवाला क्र.16 ते 20 हे शाखेच्या कमिटीमध्ये सदस्य आहेत. सामनेवाला क्र. 3 ते 15 हे सामनेवाला संस्थेचे संचालक आहेत. शाखा संस्था सामनेवाला क्र.16 ते 21 यांना सस्थेच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेणेचा अधिकार नाही. अथवा स्वतंत्र स्थान नाही. त्यामुळे ते संस्थेचे पदाधिकारी नाहीत. त्यांना चुकीने पक्षकार केलेले आहे. त्यांचेविरुध्द तक्रार चालणेस पात्र नाही. सामनेवाला क्र. 2 ते 21 यांचा तक्रार संस्थेबरोबर काहीही संबंध आलेला नव्हता व नाही. तक्रारदाराने कायदयाच्या तरतुदीचा भंग करुन व्यवहार केलेला असलेने त्यांना कायदेशीर मार्गाने ठेव रक्कम परत मागण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सामनेवाला क्र. 2 ते 21 वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार नाहीत. ब)सामनेवाला क्र.1 संस्थेने तक्रारदार संस्थेला वेळोवेळी मुद्दल रु.42,00,000/- व व्याज रु.19,00,000/- असे एकूण रु.61,00,000/- अदा केलेले आहेत. त्याचा उल्लेख तक्रार अर्जात केलेला नाही. सबब तक्रारदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेले नाहीत. रिझर्व्ह फंडातील रक्कम सहकार खात्याचे परवानगीशिवाय वापरता येत नाहीत. तशी परवानगी घेऊन सामनेवाला क्र.1 यांनी दि.08/08/2008 रोजी रु.5,00,000/- काढलेले आहेत. पैकी रु.2,00,000/- दि.09/08/2008 रोजी तक्रारदारास दिलेले आहे व सहकार कायदयाच्या परिपत्रकाप्रमाणे हार्डशिप व व्यक्तीगत ठेवीदारास रक्कम अग्रक्रमाने दयावी लागते. तक्रारदारास रक्कम रु.61 लाख एवढी रक्कम दिेलेली आहे. व्याजावर व्याज मिळण्याची रचनात्मक विधाने करुन खोटी तक्रार दाखल केलेली आहे. सबब तक्रारदार ग्राहक नसलेचा प्राथमिक मुद्दा काढून त्यावर निर्णय होणे आवश्यक आहे. तक्रारदाराने ठेव रक्कमेचा दिलेला तपशील चुकीचा आहे. रक्कम रु.10,18,200/- पैकी रु.6,84,200/- ही व्याज रक्कम आहे व पुन्हा त्याच रक्कमेवर व्याज दाखवून येणे दाखवली आहे. तसेच रक्कम रु.3,35,000/- रोखीने दिली होती. इतर व्याजाच्या पावतीची रक्कम ही व्याजच्या जमा रक्कमेपोटी आहे ही बाब विचारात घेणे आवश्यक आहे. पावत्या मुदतीत नाही. मुदतीच्या कारणावरुन देखील तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे. क) तक्रारदार संस्थेने नफा मिळवणेचे दृष्टीने वाणिज्य हेतूने सदर ठेवी ठेवल्या होत्या. सबब तक्रार चालणेस पात्र नाही. सामनेवाला तक्रारदाराचा चुकीचा तक्रार अर्ज दाखल केलेने निष्कारण त्रास झालेला आहे. सबब तक्रार अर्ज खर्चासहीत फेटाळणेत यावा. रक्कम रु.10,000/- कॉम्पेसेंटरी कॉस्ट तक्रारदाराकडून सामनेवाला यांना देणेबाबत हुकूम व्हावा अशी विंनती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (6) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत तक्रारदार संस्थेचा वादातील ठेवी संदर्भातील सेव्हींग खात्याचा उतारा दाखल केला आहे. (7) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचा बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. तक्रारीस मुदतीचा बाध येतो का ? --- नाही. 2. तक्रार ग्राहक संज्ञेस पात्र आहे का ? --- होय. 3. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय.अंशत: 4. तक्रारदार ठेव रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? --- होय. 5. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे वर नमुद केलेल्या तपशीलातील रक्कम वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी तक्रारदारांना अदा केलेल्या नाहीत. सबब तक्रारीत सातत्याने कारण घडत आहे. सबब Continueus cause of action असलेने प्रस्तुत तक्रारीस मुदतीचा बाध येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदार व सामनेवाला संस्था या महाराष्ट्र सहकार कायदा अधिनियम 1960 नुसार नोंदणीकृत संस्था आहेत. तक्रारदार संस्थेने सामनेवाला संस्थेत ठेवी ठेवलेचे सामनेवालांनी मान्य केले आहे. सबब तक्रारदार हा सामनेवाला यांचा ठेवीदार ग्राहक आहे. तसेच ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये तक्रारदार ग्राहक या संज्ञेस पात्र आहे. त्यांना तक्रार दाखल करणेचा हक्क आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला संस्थेचे ठेवीदार ग्राहक असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- तक्रारदाराने दाखल केलेल्या ठेव पावत्यांच्या सत्यप्रतीवरुन खालीलप्रमाणे ठेव रक्कमा ठेवल्याची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. .क्र. | ठेवीचा प्रकार | ठेव पावती क्र. | ठेव ठेवल्याचा दि. | ठेवीची मुदत संपलेचा दि. | ठेवलेली रक्कम | -व्याजदर | 01 | कॉल ठेव | 5868 | 01/01/04 | 46 दिवस | 35,000/- | 11 % | 02 | कॉल ठेव | 5866 | 01/01/04 | 46 दिवस | 30,000/- | 11 % | 03 | कॉल ठेव | 5883 | 05/02/04 | 46 दिवस | 39,000/- | 11 % | 04 | कॉल ठेव | 5914 | 03/03/04 | 46 दिवस | 37,000/- | 11 % | 05 | कॉल ठेव | 5936 | 31/03/04 | 46 दिवस | 40,000/- | 11 % | 06 | कॉल ठेव | 5990 | 08/07/04 | 46 दिवस | 44,000/- | | 07 | कॉल ठेव | 6516 | 07/09/04 | 46 दिवस | 18,000/- | 10 % | 08 | कॉल ठेव | 6526 | 04/10/04 | 46 दिवस | 44,700/- | 10 % | 09 | कॉल ठेव | 6545 | 04/12/04 | 46 दिवस | 40,000/- | 10 % | 10 | कॉल ठेव | 6549 | 01/01/05 | 46 दिवस | 30,000/- | 10 % | 11 | कॉल ठेव | 6551 | 01/01/05 | 46 दिवस | 44,000/- | 10 % | 12 | कॉल ठेव | 6583 | 03/02/05 | 46 दिवस | 42,000/- | 10 % | 13 | कॉल ठेव | 6626 | 20/05/05 | 46 दिवस | 33,000/- | 10 % | 14 | कॉल ठेव | 6650 | 12/07/05 | 46 दिवस | 34,000/- | 10 % | 15 | कॉल ठेव | 10 | 28/09/05 | 46 दिवस | 25,000/- | 10 % | 16 | कॉल ठेव | 16 | 10/10/05 | 46 दिवस | 31,000/- | 10 % | 17 | कॉल ठेव | 31 | 07/11/05 | 46 दिवस | 32,000/- | 10 % | 18 | कॉल ठेव | 503 | 03/01/06 | 46 दिवस | 30,500/- | 10 % | 19 | कॉल ठेव | 519 | 02/03/06 | 46 दिवस | 27,000/- | 10 % | 20 | कॉल ठेव | 524 | 05/04/06 | 46 दिवस | 31,000/- | 10 % | 21 | कॉल ठेव | 610 | 05/09/06 | 46 दिवस | 24,000/- | 10 % | 22 | कॉल ठेव | 622 | 10/10/06 | 46 दिवस | 22,000/- | 10 % | 23 | कॉल ठेव | 626 | 05/12/06 | 46 दिवस | 20,000/- | 10 % | 24 | कॉल ठेव | 645 | 17/01/07 | 46 दिवस | 15,000/- | 10 % | 25 | कॉल ठेव | 647 | 06/02/07 | 46 दिवस | 17,000/- | 10 % | 26 | कॉल ठेव | 652 | 06/11/07 | 46 दिवस | 79,000/- | 10 % | 27 | मुदत बंद | 5928 | 12/03/04 | 12/04/07 | 1,00,000/- | 13 % | 28 | मुदत बंद | 5998 | 21/07/04 | 21/08/07 | 54,000/- | 12 % |
सामनेवाला यांनी तक्रारदार यांना वर नमुद रक्कमा अदा न करुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब सामनेवाला क्र.1, 3 ते 15 हे तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमा व्याजासहीत देणेस वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत. तसेच सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला संस्थेचे कर्मचारी असलेने फक्त संयुक्तिकरित्या जबाबदार असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवाला क्र.16 ते 21 हे शाखा कमिटी मंडळाचे सदस्य असलेने ते सामनेवाला संस्थेचे संचालक नसलेने त्यांना तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देणेस जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.4 :- अ)मुद्दा क्र.3 मधील विस्तृत विवेचनानुसार तक्रारदारास ठेवीवीरल व्याज रक्कमा रोखीत देणे ऐवजी सामनेवाला यांनी ठेव पावत्या दिलेल्या आहेत. सदर रक्कम रोखीत दिल्या असत्या तर हा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. सबब प्रस्तुतच्या ठेवी या व्याजाच्या रक्कमेच्या असलेने त्यावर पुन्हा व्याज मागता येणार नाही हा मुद्दा हे मंच ग्राहय धरु शकत नाही. सबब व्याजाच्या रक्कम रोखीत देणेऐवजी ठेव पावत्यांच्या स्वरुपात दिेले आहे. त्यामुळे प्रस्तुत दाखल पावत्यांवरुन त्या ठेव रक्कमा म्हणूनच ग्राहय धरणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब सदर ठेवी व्याजासहीत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. मुदत बंद ठेव पावती क्र.5928 व 5998 वरील रक्कमेवर नमुद मुदतीसाठी नमुद व्याजदराप्रमाणे व तदनंतर द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे सदर रक्कमेवर व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहे. तर कॉल डिपॉझीटवर ठेव तारखेपासून ते वकील नोटीस पाठविलेली तारीख 04/01/2008 पर्यंत ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व तदनंतर द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. ब) तक्रारदाराने आपल्या तक्रारीत ठेव पावती क्र.5929 व 5935 अनुक्रमे रक्कम रु.51,000/- व रु.15,000/- रक्कमेची मागणी केली आहे. मात्र प्रस्तुत ठेव पावत्यांच्या सत्यप्रती सदर मंचासमोर दाखल केलेल्या नाहीत. तसेच सामनेवालांनी सदर ठेव पावत्यांच्या अस्सल पावत्या हजर करणेबाबत आदेश करणेत यावा असा अर्ज दिला होता. तरीही तक्रारदाराने सदर अस्सल पावत्या हजर केलेल्या नाहीत. तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या निशान क्र.3 वरील हजर केलेल्या कागदपत्रांच्या यादीमध्ये प्रस्तुत दोन पावत्यांची नोंद केली आहे. परंतु ती खोडलेली दिसून येते. सबब प्रस्तुत ठेव रक्कमांची तक्रारदाराची मागणी मान्य करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.5:- तक्रारदार संस्था ही स्वतंत्र व्यक्तीमत्व असलेली संस्था आहे. ती व्यक्ती नसलेने मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र नाही. मात्र तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश
(1) तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
(2) सामनेवाला क्र. 1,3 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालीलप्रमाणे रक्कमा अदा कराव्यात. अ्.
क्र. | ठेवीचा प्रकार | ठेव पावती क्र. | ठेव ठेवल्याचा दि. | ठेवीची मुदत संपलेचा दि. | ठेवलेली रक्कम | -व्याजदर | 01 | कॉल ठेव | 5868 | 01/01/04 | 46 दिवस व पुढे | 35,000/- | 11 % | 02 | कॉल ठेव | 5866 | 01/01/04 | 46 दिवस व पुढे | 30,000/- | 11 % | 03 | कॉल ठेव | 5883 | 05/02/04 | 46 दिवस व पुढे | 39,000/- | 11 % | 04 | कॉल ठेव | 5914 | 03/03/04 | 46 दिवस व पुढे | 37,000/- | 11 % | 05 | कॉल ठेव | 5936 | 31/03/04 | 46 दिवस व पुढे | 40,000/- | 11 % | 06 | कॉल ठेव | 5990 | 08/07/04 | 46 दिवस व पुढे | 44,000/- | | 07 | कॉल ठेव | 6516 | 07/09/04 | 46 दिवस व पुढे | 18,000/- | 10 % | 08 | कॉल ठेव | 6526 | 04/10/04 | 46 दिवस व पुढे | 44,700/- | 10 % | 09 | कॉल ठेव | 6545 | 04/12/04 | 46 दिवस व पुढे | 40,000/- | 10 % | 10 | कॉल ठेव | 6549 | 01/01/05 | 46 दिवस व पुढे | 30,000/- | 10 % | 11 | कॉल ठेव | 6551 | 01/01/05 | 46 दिवस व पुढे | 44,000/- | 10 % | 12 | कॉल ठेव | 6583 | 03/02/05 | 46 दिवस व पुढे | 42,000/- | 10 % | 13 | कॉल ठेव | 6626 | 20/05/05 | 46 दिवस व पुढे | 33,000/- | 10 % | 14 | कॉल ठेव | 6650 | 12/07/05 | 46 दिवस व पुढे | 34,000/- | 10 % | 15 | कॉल ठेव | 10 | 28/09/05 | 46 दिवस व पुढे | 25,000/- | 10 % | 16 | कॉल ठेव | 16 | 10/10/05 | 46 दिवस व पुढे | 31,000/- | 10 % | 17 | कॉल ठेव | 31 | 07/11/05 | 46 दिवस व पुढे | 32,000/- | 10 % | 18 | कॉल ठेव | 503 | 03/01/06 | 46 दिवस व पुढे | 30,500/- | 10 % | 19 | कॉल ठेव | 519 | 02/03/06 | 46 दिवस व पुढे | 27,000/- | 10 % | 20 | कॉल ठेव | 524 | 05/04/06 | 46 दिवस व पुढे | 31,000/- | 10 % | 21 | कॉल ठेव | 610 | 05/09/06 | 46 दिवस व पुढे | 24,000/- | 10 % | 22 | कॉल ठेव | 622 | 10/10/06 | 46 दिवस व पुढे | 22,000/- | 10 % | 23 | कॉल ठेव | 626 | 05/12/06 | 46 दिवस व पुढे | 20,000/- | 10 % | 24 | कॉल ठेव | 645 | 17/01/07 | 46 दिवस व पुढे | 15,000/- | 10 % | 25 | कॉल ठेव | 647 | 06/02/07 | 46 दिवस व पुढे | 17,000/- | 10 % | 26 | कॉल ठेव | 652 | 06/11/07 | 46 दिवस व पुढे | 79,000/- | 10 % | 27 | मुदत बंद | 5928 | 12/03/04 | 12/04/07 | 1,00,000/- | 13 % | 28 | मुदत बंद | 5998 | 21/07/04 | 21/08/07 | 54,000/- | 12 % |
सदर मुदत बंद ठेव पावती क्र.5928 व 5998 वरील रक्कमेवर नमुद मुदतीसाठी नमुद व्याजदराप्रमाणे व तदनंतर द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे सदर रक्कमेवर व्याज अदा करावे. तसेच कॉल डिपॉझीटवर ठेव तारखेपासून ते वकील नोटीस पाठविलेली तारीख 04/01/2008 पर्यंत ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व तदनंतर द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. (3) सामनेवाला क्र. 1,3 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.2 यांनी फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त)दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |