तक्रार क्र.- 27/2017
दि. 28/02/2018
(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती. रोझा खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.))
(पारित दिनांक :- 28/02/2018)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे...
1. तक्रारकर्ता हा अहेरी येथील रहीवासी असुन विरुध्द पक्ष यांचे स्वतःचे श्रीराम ऑटोमोबार्इल या नावाने दुकान आहे. तक्रारकर्त्याने दि.06.05.2017 रोजी विरुध्द पक्षांचे दुकानातून हिरो माईस्ट्रो गाडी क्र.एमएच-33/एन-3323 साठी MOBIKER 1440 मॉडेल SF Sonic कंपनीची बॅटरी रु.1,050/- ला खरेदी केली होती. तक्रारकर्ता पुढे नमुद करतो की, सदर बॅटरी जवळपास 4 महिन्यात गाडी सेल्फने सुरू केली असता सुरू होत नसल्याने ती निकामी झाल्याचे लक्षात आले तेव्हा सदरची बाब तक्रारकर्त्याने दि.11.06.2017 रोजी विरुध्द पक्षाकडे निकामी झाल्याचे सांगितले असता त्यांनी तक्रारकर्त्यास बॅटरी व्यवस्थीत असुन गाडीत बिघाड असल्याचे सांगून वेळ मारुन नेली. तक्रारकर्त्याने पुढे म्हणणे असे आहे की, त्याने सदर गाडी राज ऑटोमोबाईल्स, अहेरी यांचेकडे चार्ज करुन तपासली असता त्यांनी ती व्यवस्थित असून बॅटरी खराब झाली असल्याचे सांगितले व याकरीता तक्रारकर्त्यास रु.200/- चा र्भूदंड सहन करावा लागला. त्यानंतर एक महिन्यानंतर पुन्हा गाडी सेल्फने सुरु होत नसल्यामुळे सदर बॅटरी विरुध्द पक्षाकडे नेली असता ती निकामी झाल्याचे त्यांनी कबुल केले, परंतु बॅटरी बदलवुन देण्यास नकार दिली. त्यामुळे तक्रारकर्त्यास पून्हा राज ऑटोमोबाईल्स यांचेकडे जाऊन पुन्हा बॅटरी चार्ज करावी लागली व रु.200/- चा र्भुदंड सोसावा लागला तसेच बॅटरीचे वारंवार बिघडण्यामुळे दि.29.09.2017 रोजी नवीन बॅटरी खरेदी करावी लागली. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याने विरुध्द पक्षास बॅटरी बदलवुन देण्याची विनंती केली असता त्यांनी त्याला असभ्य भाषेत बॅटरी बदलवुन देण्यांस नकार दिली त्यामुळे सदरची कृति ही विरुध्द पक्षांची सेवेतील कमतरता आहे.
2. तक्रारकर्ताने आपल्या तक्रारीत नवीन बॅटरी खरेदी केल्यामुळे जुन्या बॅटरीची किंमत व्याजासह परत मिळावी तसेच त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी 10,000/- नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च रु.6,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
3. तक्रारकर्ताने निशाणी क्र.2 नुसार 6 झेरॉक्स दस्तावेज दाखल केले. तक्रारकर्त्याची तक्रार नोंदणीकरुन विरुध्द पक्षांना नोटीस काढण्यांत आली. विरुध्द पक्षांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर प्रकरणात हजर होऊन निशाणी क्र. 7 वर आपले लेखीउत्तर दाखल केले.
4. विरुध्द पक्षांनी निशाणी क्र.7 वर दाखल केलेल्या लेखीउत्तरात तक्रारकर्त्याने दि.06.05.2017 रोजी हिरो माईस्ट्रो गाडी क्र.एमएच-33/एन-3323 साठी MOBIKER 1440 मॉडेल SF Sonic कंपनीची बॅटरी रु.1,050/- ला 24 महिन्यांचे वारंटीसह खरेदी केली होती ही बाब मान्य केली आहे. तसेच बॅटरीची वारंटी ही 48 महिन्यांकरीता होती हे अमान्य करुन तक्रारकर्त्याचे कथन खोटे व बनावटी असल्याचे म्हटले आहे.
5. विरुध्द पक्षाने आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याची बॅटरी तपासली असता ती निकामी झाल्याचे कबुल केलेंडर परंतू बॅटरी बदलवुन देण्यास नकार दिला त्यामुळे तक्रारकर्त्याला नाईलाजास्तव राज ऑटोमोबाईल्स, अहेरी यांचेकडे बॅटरी चार्ज करावी लागली व नवीन बॅटरी करावी लागली हे अमान्य केले आहेत.
6. विरुध्द पक्षाने आपल्या विशेष कथनात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने बॅटरी चार्ज केल्यानंतर सुध्दा ती उपयोगात आली नाही तेव्हा सदर बॅटरी वारंटी कार्डसह कंपनीकडे रिप्लेसमेंटकरीता पाठवावी लागते असे सांगितले होते. तरी सुध्दा तक्रारकर्त्याने सदर बॅटरी राज ऑटोमोबाईल्स यांचेकडे चार्ज कारण्यास दिली, वास्तविक जेथे बॅटरी घेतली तेथेच चार्ज करण्यास देणे आवश्यक असते. तसेच तक्रारकर्त्यास बॅटरी रिप्लेस करुन मिळेल असे सांगूनही तक्रारकर्ता त्यास तयार झाला नाही व जोर-जोराने बोलून गोंधळ घातला. वास्तविक वारंटी पिरिएडमध्ये बॅटरी खराब झाल्यास फक्त दुरुस्त करुन दिल्या जाते, मात्र विरुध्द पक्ष बॅटरी रिप्लेस करुन देण्यांस तयार असून सुध्दा तक्रारकर्ता त्यास तयार झाला नाही व विरुध्द पक्षास त्रास देण्याचे उद्देशाने सदरची तक्रार दाखल केली आहे. करीता विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केलेली तक्रारीस कुठलेही कारण घडलेले नसुन सदरची तक्रार खर्चासह खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
7. तक्रारकर्ताची तक्रार, शपथपत्र, विरुध्द पक्षांनी दाखल केलेले बयान, तसेच दाखल दस्तावेज, शपथपत्र व तोंडी युक्तिवादावरून खालिल मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता ही विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
2) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्ताप्रती सेवेत न्युनतापूर्ण होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
8. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्त्याने दि.06.05.2017 रोजी विरुध्द पक्षांचे दुकानातून हिरो माईस्ट्रो गाडी क्र.एमएच-33/एन-3323 साठी MOBIKER 1440 मॉडेल SF Sonic कंपनीची बॅटरी रु.1,050/- ला खरेदी केली होती ही बाब तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत निशाणी क्र.2 वरील दस्त क्र.1 वरुन स्पष्ट होत असल्याने तक्रारकर्ता विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे ही बाब सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्योत येत आहे.
9. मुद्दा क्रमांक 2 बाबतः- विरुध्द पक्षाने आपल्या विशेष कथनात तक्रारकर्त्याने बॅटरी चार्ज केल्यानंतर सुध्दा ती उपयोगात आली नाही तेव्हा सदर बॅटरी वारंटी कार्डसह कंपनीकडे रिप्लेसमेंटकरीता पाठवावी लागते असे नमुद करुनही तक्रारकर्ता जेव्हा त्यांचेकडे वारंवार बॅटरीबाबत तक्रार करण्यांस गेला असता त्यांनी सदर बॅटरी काढून कंपनीकडे पाठवली नाही व ती तक्रारकर्त्यास रिप्लेसमेंट करुन दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास राज ऑटोमोबाईल्स यांचेकडे जाऊन ती चार्ज करण्यांस अतिरिक्त खर्च करावा लागला, अर्जदाराने दाखल केलेले दस्तावेज नि.क्र. 2 नुसार दिसून येते, तसेच अर्जदाराने घेतलेली बॅटरी 48 महिनेची वॉरंटी असल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास बॅटरी बदलून देणे गरजेचे होते, तरीपण त्यांनी बॅटरी बदलून दिलेली नाही, ही बाब विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे, असे या मंचाचे मत आहे. सबब मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्ताची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल विरुध्द पक्षांविरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास बॅटरीची किंमत रु.1,050 परत करावे.
3. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.500/- व तक्रारीचा खर्च रु.300/- अदा करावा.
4. विरुध्द पक्षांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावी..
- दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
6. तक्रारकर्त्यास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.