नि.16 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 30/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.17/06/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.31/07/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या 1. सौ.वैदेही विनोद कदम 2. श्री.विनोद विश्राम कदम दोन्ही रा.सी-203, दुसरा मजला, गोल्डन पार्क, माळनाका, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. वास्तुरचना कन्स्ट्रक्शन्स करीता प्रोप्रा.अनिस इस्माईल काझी, रा.784/आय, राजापूरकर कॉलनी, मुस्लिम हॉस्टेल जवळ, उद्यमनगर, रत्नागिरी. 2. सौ.आबी इब्राहिम कुमूनदान रा.मु.नायरी, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी करीता मुखत्यार सामनेवाला नं.1. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.आठवले सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.आंबुलकर -: नि का ल प त्र :- प्रस्तुत प्रकरण आज रोजी तक्रारदार व सामनेवाला यांचे दरम्यान तडजोडीसाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आले होते. सदर लोकअदालतीमध्ये तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ उपस्थित होते तसेच सामनेवाला व त्यांचे विधिज्ञ उपस्थित होते. तक्रारदार व सामनेवाला यांनी त्यांच्यात झालेल्या तडजोडीची पुरशीस लोकअदालत समिती सदस्यांपुढे दाखल केली आहे. ती नि.14 वर दाखल आहे. सदस्यांचा निर्णय नि.15 वर दाखल आहे. सदर तडजोड पुरशीसमध्ये पुढील बाबी अंतर्भूत करणेत आल्या आहेत. 1. तक्रारदार व सामनेवाला यांनी सदरहू तक्रार तडजोडीने मिटविली आहे. 2. प्रस्तुत तक्रारीतील कामांचे पूर्ततेकरीता सामनेवालाकडून तक्रारदार यांनी रक्कम रु.8,500/- (रु.आठ हजार पाचशे) स्वीकारुन सदरची तक्रार निकाली झाल्याचे घोषित करणेस कबूली दिली आहे. 3. तक्रारीतील कामाचे पूर्तते व्यतिरिक्त अन्य तक्रारी तक्रारदार यांनी सोडून दिल्या आहेत. 4. प्रस्तुतची तक्रार वरील परिस्थितीत निकाली व्हावी. 5. प्रस्तुतचे कामाकरीता लागणारे मटेरियल, 5 लिटरचे दोन बॉक्स (वॉटर प्रुफ केमिकल – कोंडयूरा), क्रॅक फिल 3 कि.ग्रॅ. (कोंडयुरा) हे देखील तक्रारदार यांना सामनेवाला यांनी आज रोजी दिले आहे. याप्रमाणे पुरशीस आहे. सदर पुरशीसच्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरण निकाली करणेत येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतो. आदेश सदर नि.14 वरील तडजोड पुरशीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रस्तुतचा तक्रार अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 31/07/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |