(मंचाचे निर्णयान्वये, श्री. सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य)
अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार प्रकरण दाखल करुन अर्जदाराने दाखल केलेला चौकशी अर्ज क्र.7/2014 चे अंतिम आदेशानुसार गैरअर्जदाराकडून मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी या मंचाच्या अंतिम आदेशानुसार मिळालेल्या वसुली दाखलाच्या वतीने गैरअर्जदार क्र.1 कडून वसुली दाखल्या अंतर्गत वसुली करता आली नाही. कारण गैरअर्जदार क्र.1 यांचा मृत्यू झाला असल्यामुळे व त्याच्या नावाने असलेली स्थावर मालमत्ता त्यांनी आपल्या वारसानाचे नावाने केली असल्यामुळे वसुली करता येत नाही. म्हणून अर्जदाराने वारसानाकडून वसुली करुन द्यावी यासाठी सदर किरकोळ अर्ज दाखल केला. सदर अर्जावर सुनावणी एकूण गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदारानी हजर होऊन आपले उत्तर दाखल केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकूण हे मंच खालिल कारण मिमासेवरुन अंतिम आदेश पारित करीत आहे.
- // कारणमिमांसा// -
अर्जदाराचा चौकशी अर्ज क्र. 7/2014 नुसार गैरअर्जदार क्र.1 यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल तहसिलदारांकडून प्राप्त झाला असल्यामुळे व अर्जदाराचे सदर किरकोळ अर्ज मंजूर केल्या नंतर चौकशी अर्जातील गैरअर्जदार क्र.1 चे वारसान हजर होऊन आपले उत्तर दाखल केले व आमच्याकडे कुठलीही जागा नाही असे कथन केलेले आहे. परंतु गैरअर्जदारांनी त्याचे वडीलांकडून मिळालेल्या जागेचा उल्लेख केला असुन सदर जागा अतिक्रमणची आहे, असे म्हटलेले आहे. एकंदरीत गैरअर्जदार हे कोणते न कोणते काम करत असेल, तसेच त्यांनी वडीलामार्फत भोगलेले सुख उदा. शिक्षण, जेवण, राहण्याची सोय, नोकरी इ. विसरता कामा नये आता वडीलांचे कर्ज फेडण्याची वेळ आली तर आम्हाला काहीही मिळाले नाही आणि जे आहे ते आम्ही आमच्या मेहनतीने केले, हे जरी योग्य असले तरी इथपर्यंत पोटपाण्यासाठी वडीलांनी घेतलेले परिश्रम विसरता कामा नये. म्हणून गैरअर्जदार हे वासरान असल्यामुळे अर्जदार/ फिर्यादीस रक्कम देण्यास पात्र आहे, असे यान्याय मंचाचे मत आहे. तरी हे मंच ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25(3) नुसार वसुली दाखला देण्यास हरकत नाही, असे गृहीत धरुन खालिल प्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गडचिरोली यांना आदेशीत करण्यांत येते की, त्यांनी चौकशी अर्ज क्र.7/2014 मधील ग्राहक तक्रार क्र.45/1998 चे आदेशानुसार आजपर्यंत देय असलेल्या रकमेचा हीशोब लावुन तेवढी रक्कम थकीत झाली म्हणून त्या रकमेचा वसुली दाखला या किरकोळ अर्जातील गैरअर्जदाराचे विरुध्द व जे गैरअर्जदार मयत झाले असेल त्यांच्या वारसानाचा तपास करुन त्यांचेकडून वसुली करण्याचा वसुली दाखला मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचेकडे पाठविण्यात यावा.
2. मा. जिल्हाधिकारी यांना आदेशीत करण्यात येते की, त्यानी सर्व हजर गैरअर्जदार व मयत झाले असलेले गैरअर्जदार याच्या वारसांचे जंगम मालमत्तेचा शोध घेऊन वसुली दाखल्याची थकीत रक्कम वसुलीसाठी त्वरीत कार्यवाही करावी.
3. मा. जिल्हाधिकारी यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी लिलाव खर्चाची व इतर प्रशासकीय खर्चाची रक्कम एकूण रु.5,000/- गैरअर्जदाराकडून वसुल करावे.
4. प्रबंधक यांनी वसुली दाखल्या सोबत न्याय नर्णियाची प्रत देखील मा. जिल्हाधिकारी यांना पाठविण्यांत यावी.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य द्यावी