नि.49 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 278/2010 नोंदणी तारीख – 21/12/2010 निकाल तारीख – 28/2/2011 निकाल कालावधी – 67 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ----------------------------------------------------------------------------------- 1. श्री दिनकर महादेव थोरात 2. सौ कमल दिनकर थोरात 3. श्री विश्वास दिनकर थोरात 4. सौ सारीका विश्वास थोरात 5. कु.प्रतिक्षा विश्वास थोरात 6. कु.गौरव विश्वास थोरात अर्जदार क्र.5 व 6 तर्फे अ.पा.क. वडील श्री विश्वास दिनकर थोरात 7. सौ राणी उत्तम थोरात 8. कु.प्रिया उत्तम थोरात 9. कु.आसू उत्तम थोरात अर्जदार क्र.8 व 9 तर्फे अ.पा.क. आई सौ राणी उत्तम थोरात 10. श्री अधिक दिनकर थोरात 11. सौ मेघा अधिक थोरात 12. कु.अंकुश अधिक थोरात 13. कु.यश अधिक थोरात अर्जदार क्र.12 व 13 तर्फे अ.पा.क. वडील श्री अधिक दिनकर थोरात अर्जदार क्र.1 ते 9 व 11 ते 13 तर्फे मुखत्यारधारक श्री अधिक दिनकर थोरात सर्व रा.मु.पो.रेठरे बु. ता.कराड जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री. जी.सी.काटकर) विरुध्द 1. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे चेअरमन श्री मारुती यशवंत चव्हाण ---- जाबदार क्र. 1 (अभियोक्ता श्री जे.एम.पाटील) 2. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे व्हा.चेअरमन श्री सुजय विलासराव पवार 3. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक श्री दिलीप दिनकरराव शिंदे 4. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक मोहन दिनकर कदम 5. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक श्री शरद नामदेवराव धर्मे 6. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक श्री धैर्यशील दिनकरराव चव्हाण 7. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक श्री दिपक दिनकरराव चव्हाण 8. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक श्री हणमंत विष्णू होलमुखे 9. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक श्री फारुख ईब्राहिम आंबेकरी 10.कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक श्री कुमार बाबा जाधव 11. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक श्री अनिल गणपती बनसोडे 12. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक सौ सारिका सोमनाथ पंडीत 13. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. तर्फे संचालक सौ सिताराणी शंकर कदम सर्व रा. 1. कै युवराजसिंह उर्फ भैया ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रेठरे बु. ता.कराड जि. सातारा ---- जाबदार क्र. 2 ते 13 (एकतर्फा ) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजासहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु. 6,22,321/- तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- ची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.2 ते 10 यांना झालेली आहे. नोटीस मिळालेच्या पोचपावत्या प्रस्तुतकामी दाखल आहेत. जाबदार क्र.11 ते 13 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे प्रस्तुतकामी दाखल आहेत. जाबदार क्र.2 ते 13 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. जाबदार क्र.1 यांनी नि.33 ला म्हणणे दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. सार्वत्रिक बँकाच्या कर्ज माफीमुळे कर्जदारांमध्ये कर्जफेडीबाबत भ्रम निर्माण झाला आहे. जाबदार संस्थेचे पदाधिकारी कर्जवसुलीसाठी अथक प्रयत्न करीत आहेत. जाबदार संस्था अवसायानात निघालेली नाही. अर्जदार यांना रक्कम देणेचे जाबदार यांनी नाकारलेले नाही. जसजशी कर्जाची वसुली होईल तसतशा ठेवीदारांच्या रकमा परत करण्याचा कालबध्द कार्यक्रम संस्थेने आखला आहे. जून 2011 पर्यंत ठेव रक्कम परत करण्यास मुदत मिळावी असे जाबदार क्र.1 यांनी कथन केले आहे. 4. अर्जदार यांचेतर्फे मुखत्यार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. तसेच अर्जदार यांनी नि. 41 ते 46 ला दाखल केलेली शपथपत्रे पाहिली. 5. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये असे कथन केले आहे की, कर्जदारांनी कर्जफेड न केल्याने ठेवीदारांच्या रकमा परत करता येत नाही. ठेवी परत करण्यासाठी जून 2011 पर्यंत मुदत मिळावी. परंतु ठेवींच्या रकमा परत करण्यासाठी सदरची कारणे ही कायदेशीर कारणे ठरु शकत नाहीत. जाबदार संस्थेच्या एकूण आर्थिक व्यवहारासाठी संस्थेचे संचालक मंडळ जबाबदार आहे. ठेवीची मुदत संपलेनंतर ठेवीची रक्कम परत मिळण्याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 6. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र.449, 456, 460, 000296, 483, 450, 451, 455, 458, 459, 481, 482, 457, 454, 452, 453, वरील मूळ रक्कम ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह रक्कम द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 28/2/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |