Maharashtra

Kolhapur

CC/11/237

Sou. Madhavi Balkrushna Gavai - Complainant(s)

Versus

Shri Vitthlai Mahila Nagri Sahakari Pat sanstha Ltd. - Opp.Party(s)

S S Gavli

30 Sep 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/237
1. Sou. Madhavi Balkrushna Gavai2573 D ward, Toraskar Chowk, Kolhapur2. Puja Balkrushna Gavli2573 D Ward Kolhapur3. Prajakta Balkrushna Gavli2573 D Ward Kolhapur4. Prasad Balkrushna Gavli2573 D Ward Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Vitthlai Mahila Nagri Sahakari Pat sanstha Ltd.Kasba Tarle, Tal. Radhanagri, Kolhapur2. Sou. Shailaja Ashok PatilKasba Tarle 3. Sou. Savitri Kundlik PatilHasur Dumala4. Sou. Malti Maruti KirulkarKolhapur5. Sou. Pushpanjali Paygondarao KoliKolhapur6. Sou. Shalan Anandrao MetilKurukli7. Sou. Rajashree Vasantrao KesarkarSheloli8. Sou. Sunita Serjerao PatilMangoli9. Sou. Suman Anantrao PotdarKasba Tarle10. Sou. Shubhangi Chandrakant PatilGudhal11. Sou. Smita Chandrakant PowarKolhapur12. Sou. Shelabai Anand PatilAarle13. Sou. Yashodha Krushna MithriPirwadi 14. Sou. Anjani Anandrao KambleKaranjfen15. Sou. Indubai Lahu BaitTalgaon16. Ashok Shamrao PatilKasba Tarle17. Madhukar Dhondiram BhugulkarKasba Tarle18. Rajendra Pandurang MagdumKolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S S Gavli, Advocate for Complainant

Dated : 30 Sep 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

 
 
 
 
नि का ल प त्र :- (दि.30/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)
 
(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला.   सामनेवाला क्र. 2, 3, 5, 6, 7, 9, 10, 11, 13, 14, व 16 ते 18 यांना नोटीसा लागू होऊनही ते गैरहजर आहेत. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही.  उर्वरीत सामनेवाला क्र. 1, 4, 8, 12 व 15 यांना फेरनोटीस काढणेसाठीचा अर्ज मंजूर होऊनसुध्‍दा तक्रारदारांनी पुढील कोणत्‍याही स्‍टेप्‍स घेतलेल्‍या नाहीत.   सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           सामनेवाला क्र.1 संस्‍था ही महाराष्‍ट्र सहकार कायद्याखाली नोंद झालेली सहकारी पतसंस्‍था आहे. सामनेवाला क्र.2 हे चेअरमन व सामनेवाला क्र. 3 ते 15 हे संस्‍थेचे संचालक आहेत. सामनेवाला क्र.16 हे जनरल मॅनेजर, क्र. 17 हे बोर्ड सेक्रेटरी, व क्र. 18 हे मॅनेजर आहेत. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे दामदुप्‍पट ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
रुपये
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम/व्‍याज
1.
2207
21,000/-
28/01/2004
28/07/2010
42,000/-
2.
2208
22,000/-
28/01/2004
28/07/2010
44,000/-
3.
2209
23,000/-
28/01/2004
28/07/2010
46,000/-
4.
2210
21,500/-
28/01/2004
28/07/2010
43,000/-

   (3)       सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदारांना सदर रक्‍कमांची घर दुरुस्‍तीकरिता व मुलांचे शिक्षणासाठी व  औषधोपचारासाठी आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि. 10/01/2011 रोजी नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली.  तरीदेखील सामनेवाला क्र. 2 ते 18 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी असतानाही सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत.   त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        या मंचाने तक्रारदारांची तक्रार व उपलब्‍ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये दामदुप्‍पट ठेवीच्‍या स्‍वरुपात ठेव ठेवली आहे व त्‍याची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्‍कमा व्‍याजासह दिलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.    परंतु, वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदार संस्‍थेने सामनेवाला संस्‍थेकडे दामदुप्‍पट ठेव खात्‍याच्‍या स्‍वरुपात रक्‍कम ठेवली आहे व दि. 10.01.2011 रोजी नोंद पोच डाकेने मागणी केली आहे व मागणी करुनही सदर रक्‍कम सामनेवाला संस्‍थेने दिलेली नाही. त्‍यामुळे सदर ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 2 ते 18 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्‍कम देणेबाबत आहे असा युक्तिवाद तक्रारदारांच्‍या वकिलांनी केलेला आहे. परंतु, महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्‍थेच्‍या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्‍तुत सामनेवाला यांची त्‍याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्‍थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 ते 18 यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचा तक्रारदारांच्‍या वकिलांनी केलेला युक्तिवाद फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्‍हणून मा.ना.उच्‍च न्‍यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्‍त्‍वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :-
 
“The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.”
 
(6)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता सदर ठेव दामदुप्‍पट ठेवींच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(7)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.      उपरोक्‍त विवेचन व पूर्वाधार विचारात घेता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आ दे श
(1)   तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
(2)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना खालील तपशिलातील दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर तपशिलात नमूद तारखेपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
अ.क्र.
ठेव पावती क्र.
मुदतपूर्ण रक्‍कम रुपये
मुदतपूर्ण तारीख
1.
2207
42,000/-
29/07/2010
2.
2208
44,000/-
29/07/2010
3.
2209
46,000/-
29/07/2010
4.
2210
43,000/-
29/07/2010
  
(3)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT