Exh.No.17
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 24/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि. 05/08/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि. 09/01/2014
श्री सुभाष लक्ष्मण मांजरेकर
वय 46 वर्षे, धंदा- शेती,
रा.वराड, सावरवाड, ता.मालवण,
जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) भाईसाहेब सावंत सहकारी पतसंस्था
मर्यादित सावंतवाडी करिता
श्री विकास भालचंद्र सावंत
चेअरमन, भाईसाहेब सावंत सहकारी पतसंस्था
मर्यादित सावंतवाडी
2) हेड ऑफिस भाईसाहेब सावंत सहकारी पतसंस्था
मर्यादित सावंतवाडी,
सालईवाडा- सावंतवडी, जि.सिंधुदुर्ग.
3) भाईसाहेब सावंत सहकारी पतसंस्था
मर्यादित सावंतवाडी करिता
श्री संजय विठ्ठल कानसे
जनरल मॅनेजर, भाईसाहेब सावंत सहकारी पतसंस्था
मर्यादित सावंतवाडी करिता ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारातर्फेः- व्यक्तीशः
विरुद्ध पक्ष क्र.1 ते 3 तर्फे- श्री संजय कानसे.
निकालपत्र
(दि.09/01/2014)
श्री डी.डी. मडके, अध्यक्षः - तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या भाईसाहेब सावंत सहकारी पतसंस्थेमध्ये रक्कम गुंतवली होती, परंतू सदर रक्कम परत न मिळाल्याने सदरची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
2) आज रोजी प्रकरण युक्तीवादासाठी ठेवण्यात आले होते. संस्थेने आज तक्रारदारास रक्कम रु.2,000/-(रुपये दोन हजार मात्र) अदा केले व उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने अदा केली जाईल असे कथन केले.
3) तक्रारदार यांनी नि.15 वर अर्ज देऊन संस्था माहे एप्रिल 2014 पर्यंत पूर्ण रक्कम देण्यास तयार आहे. त्यानुसार सदर रक्कम स्वीकारण्यास ते तयार आहेत व वरीलप्रमाणे तडजोड मान्य आहे असे नमूद केले आहे. त्यावर संस्थेतर्फे संजय कानसे यांनी रक्कम एप्रिल 2014 पर्यंत व्याजासहीत देण्यात येईल असे मान्य केले. तसेच नि.16 वर विरुध्द पक्षातर्फे अर्ज देण्यात आला व त्यात एप्रिल 2014 पर्यंत तक्रारदारास रु.24,200/- व त्यावरील व्याज देण्यात येईल असे नमूद केले आहे. त्यावर तक्रारदार यांनी ते मान्य केल्याचे नमूद केले आहे.
4) तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचे वरील दोन्हीही अर्ज पाहता प्रस्तुत तक्रार अर्ज तडजोडीने निकाली काढणे योग्य होईल असे आम्हांस वाटते.
त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1) तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचे नि.14 व 15 वरील तडजोड अर्ज मान्य करण्यात येतात.
2) विरुध्द पक्ष भाईसाहेब सावंत सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी यांनी तक्रारदार यांना दि.30/04/2014 पूर्वी रक्कम रु.24,200/(रुपये चोवीस हजार दोनशे मात्र)- व त्यावरील व्याज दयावे.
3) विरुध्द पक्ष भाईसाहेब सावंत सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी यांनी तक्रारदार यांना वरील मुदतीत रक्कम न दिल्यास तक्रारदार कलम 25 व 27 नुसार कार्यवाही करण्यास पात्र राहतील.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 09/01/2014
सही/- सही/- सही/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.