नि.२०
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २०६०/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २०/०८/२००९
तक्रार दाखल तारीख : २९/०८/२००९
निकाल तारीख : १७/१०/२०११
---------------------------------------------------------------
श्री जयजयराम जगन्नाथ बांदल
वय ४५ वर्षे, धंदा-सुखवस्तू,
रा.शिवनगर, इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली ...तक्रारदारú
विरुध्दù
१. श्री विजयभाऊ गणपतराव पाटील, चेअरमन
दि इस्लामपूर अर्बन को.ऑप.बॅंक लि.
इस्लामपूर, यल्लामा चौक, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली
२. मुख्य व्यवस्थापक,
दि इस्लामपूर अर्बन को.ऑप.बॅंक लि.
इस्लामपूर, यल्लामा चौक, इस्लामपूर,
ता.वाळवा जि. सांगली ...जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एस.व्ही.माळी
जाबदार क्र.१ व २ तर्फे : +ìb÷. श्री ए.व्ही.परमणे
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या शेअर्सची रक्कम परत मिळण्यासाठी दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हे जाबदार बॅंकेचे सभासद असून तक्रारदार यांनी जाबदार बॅंकेमध्ये रु.१०,०००/- गुंतवणूक करुन शेअर्स खरेदी केले. तक्रारदार यांना पैशाची गरज असल्याने तक्रारदार यांनी सभासदत्वाचा राजीनामा देवून शेअर्सच्या रकमेची मागणी केली. जाबदार बॅंकेने शेअर्सची रक्कम परत दिली नाही त्यामुळे तक्रारदार यांनी दि.२२/८/२००८ रोजी लेखी अर्ज सादर केला. तथापि, जाबदार यांनी शेअर्सची रक्कम परत केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी सहायक निबंधक, वाळवा यांचेकडे दाद मागितली. सहायक निबंधक वाळवा यांनीही मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आदेश दिला. जाबदार यांनी शेअर्सची रक्कम परत न केल्यामुळे सदरची रक्कम व्याजासह मिळणेसाठी व इतर तदनुषंगिक मागण्यांसाठी तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ४ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ व २ यांनी नि.११ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून रक्कम रु.१०,०००/- चे शेअर्स घेवून गुंतवणूक केली ही बाब जाबदार यांनी नाकारली आहे. तक्रारदार यांनी रक्कम रु.२५/- चे १२० शेअर्स घेतले आहेत. त्याचा क्रमांक ४५३९८७ ते ४५४१०६ असा आहे व त्याची किंमत रक्कम रु.३,०००/- होती. तक्रारदार यांनी राजीनामा हा सहकार कायद्यातील तरतुदींनुसार दिला नसल्याने तो मंजूर होणेचा प्रश्न येत नाही. याबाबत तक्रारदार यांना वारंवार कल्पना देवूनही तक्रारदार हे वेगवेगळया ठिकाणी तक्रारी करीत आहेत. तक्रारदार यांनी कायद्यातील तरतुदींनुसार राजीनामा दिल्याशिवाय व त्यांच्या शेअर्सचे मूल्यांकन झाल्याशिवाय तक्रारदार हे शेअर्समधील रक्कम परत मिळण्यास पात्र नाहीत. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१२ व १३ ला प्रतिज्ञापत्र व नि.१५ च्या यादीने २ कागद दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांनी नि.१६ ला प्रतिउत्तर शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदारतर्फे नि.१८ ला व जाबदारतर्फे नि.१९ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. जाबदार यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात का ? हा प्रमुख मुद्दा मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतो. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून शेअर्स खरेदी केले आहेत. शेअर्स खरेदी करण्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात का ? हे ठरविण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्यामधील कलम 2(1)(i) मध्ये “Goods” means goods as defined in the Sale of Goods Act, 1930 असे नमूद केले आहे. Sale of Goods मध्ये कलम 2(7) मध्ये “Goods” means every kind of movable property other than actionable claim and money, and includes stock and shares, growing crops, grass, and things attached to or forming part of the land which are agreed to be severed before sale or under the contract of sale. सदर व्याख्येचे अवलोकन केले असता Shares चा समावेश वस्तुमध्ये केला आहे. त्यामुळे शेअर्स खरेदी करणारा हा ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
५. तक्रारदार यांनी शेअर्स खरेदी केले आहेत. सदरचे शेअर्सची रक्कम जाबदार यांनी अदा केली नाही असे तक्रारदार यांचे कथन आहे. प्रस्तुत तक्रारअर्जातील तक्रारदार हा केवळ शेअर्स खरेदी करणारा नसून बॅंकेचा सभासद आहे. तक्रारदार याने बॅंकेचा सभासद या नात्याने गुंतवणूक केलेली आहे. तक्रारदार यांनी राजीनामा दिला आहे. तो जाबदार यांनी मंजूर केला नाही. जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सदरचा राजीनामा हा कायद्यातील तरतुदींप्रमाणे देणे आवश्यक आहे. तसा तो दिला नसल्याने राजीनामा मंजूर करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच तक्रारदार यांच्या शेअर्सचे व्हॅल्युएशन होणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी राजीनामा देणे व जाबदार यांनी तो स्वीकारणे या बाबी ग्राहक कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत असे या मंचाचे मत आहे. शेअर्सचे भागमुल्यांकन करणे व त्याप्रमाणे रक्कम परत करणे हाही मुद्दा याकामी उपस्थित झाला आहे. तक्रारदार यांनी त्याबाबत कोणताही सखोल पुरावा मंचासमोर आणलेला नाही. या सर्व विवेचनावरुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मंजूर होणेस पात्र नाही असे या मंचाचे मत झाले आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: १७/१०/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११