तक्रारकर्त्याचा अर्ज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांक :29/10/2009 आदेश पारित दिनांक :04/10/2010 किरकोळ अर्ज क्रमांक :- एम-151/2009 अर्जदार :– श्री. बैजनाथ रामदिन यादव, वय अंदाजेः 73 वर्षे, व्यवसायः सेवानिवृत्त, राह. नागार्जून कॉलनी, नागपूर. -// वि रु ध्द //- गैरअर्जदार :– 1. श्री. विजय शंकरलाल रेवते (पटेल), 2. श्री. राजेंद्र शंकरलाल रेवते (पटेल), 3. श्री. शेकरलाल बाबुलाल रेवते (पटेल), सर्व राह. पांचपावली रेल्वे लाईन पहिला गेट, नागपूर-17. 4. श्री. शंकर व्ही. कदम, सचिव साई सेवाश्रम सहकारी गृहनिर्माण संस्था लि., नागपूर, प्लॉट नं.152, नागमाळे ले-आऊट, रेशिमबाग, नागपूर. अर्जदाराचे वकील :– श्री. डी.बी. देशभ्रत्तार. गैरअर्जदाराचे वकील :– श्रीमती अनुराधा देशपांडे. गणपूर्ती :– 1. श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष 2. श्री. मिलींद केदार - सदस्य (मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 04/10/2010) 1. अर्जदाराने सदर अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 अंतर्गत दाखल केला असुन त्या अन्वये अर्जदाराने दि.20.11.2003 रोजी मंचाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता दाखल केलेला आहे. दि.20.11.2003 रोजी मंचाने प्रकरण क्र.56/2003 मध्ये आदेश पारित केलेला आहे. सदर प्रकरण ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अन्वये दाखल केलेले असून त्यामध्ये ‘गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी दाखल केलेल्या हमीपत्रावर विश्वास ठेवून व तक्रारकर्त्यानेही यावर ना-हरकत दर्शविली असल्याने मंच सदर प्रकरण या आदेशान्वये निकाली काढीत आहे’ असा आदेश पारित केलेला आहे. सदर आदेश ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अंतर्गत अर्जावर मंचाने दिलेला आहे. 2. गैरअर्जदाराने सदर अर्जाला उत्तर देतांना दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबीत असल्याने विक्रीपत्र करुन व मंचाने पारित केलेल्या दि.20.11.2003 रोजी तक्रार क्रमांकः मी.स. 56/2003 मध्ये विक्रीपत्र करुन देण्यासंबंधी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करता आली नाही. तसेच गैरअर्जदारांनी केलेला दिवाणी दावा क्रमांकः 1321/2003 दि.17.04.2004 रोजी खारिज झाली. त्यावर दिवाणी अपील क्र. 320/2004 अन्वये करण्यांत आली आहे, त्यामुळे सदर दावा कायदेशिररित्या संपुष्टात आलेला नाही. 3. गैरअर्जदार क्र.1 ते 3 ने हमीपत्रात नमुद केल्याप्रमाणे गजमुख सोसायटीने विशेष दिवाणी दावा दाखल केला होता. हा दावा दि.26.08.2008 रोजी निकाली निघाला. सदर निकाला विरुध्द गैरअर्जदार क्र.3 यांनी माननीय उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केली आहे, त्यामुळे गैरअर्जदारांनी मंचाचा कोणताही अवमान केला नसुन विक्रीपत्र करुन दिल्यास मा. उच्च न्यायालयाचा अवमान होईल, असे आपल्या उत्तरात नमुद केले आहे. त्यामुळे सदर अर्जातील प्रतिज्ञा अमान्य करावी असे गैरअर्जदारांनी म्हटले आहे. 4. मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलांमार्फत ऐकूण घेतला तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व दोन्ही पक्षांचे कथन यावरुन मंचासमक्ष असलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच अशा निष्कर्षांप्रत पोहचते की, तक्रारकर्त्याने मंचासमक्ष तक्रार क्र. 256/2002 दाखल केले होते. सदर प्रकरणामध्ये मंचाने दि.25.11.2002 रोजी आदेश पारित केला आणि सदर आदेशाचे अंमलबजावणी करता अर्जदार/तक्रारकर्त्याने 56/2003 ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. सदर अर्ज निकाली काढीत असतांना मंचाने खालिल प्रमाणे आदेश पारित केला आहे. ‘गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी दाखल केलेल्या हमीपत्रावर विश्वास ठेवून व तक्रारकर्त्यानेही यावर ना-हरकत दर्शविली असल्याने मंच सदर प्रकरण या आदेशान्वये निकाली काढीत आहे’यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या अनुपालन अर्जावर निर्णय देणे म्हणजे पुर्वी दिलेल्या आदेशाचे पुर्ननिरीक्षण अथवा पुर्नविलोकन होते व तसे करण्याचा मंचास अधिकार नसल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. 5. सदर प्रकरणामध्ये जागे संबंधीचा वाद मा. उच्च न्यायालय यांचेकडे प्रलंबीत आहे असे असतांना विक्रीपत्र करुन देणे वैध होणार नाही. तसेच अर्जदारांनेच प्रकरण 56/2003 मध्ये गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या हमीपत्रावर विश्वास ठेवला असुन भविष्यात जेव्हा कायदेशिर अडचणी येतील तेव्हा गैरअर्जदार क्र.1 ते 4 तक्रारकर्त्यास प्लॉटचे विक्रीपत्र करुन देतील ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे अर्जदाराने दाखल केलेला सदर अर्ज वैध नसुन तो नस्तीबध्द करण्यांत येतो व गैरअर्जदाराने कायदेशिर अडचण दूर झाल्यानंतर अर्जदारास विक्रीपत्र करुन द्यावे. मंचाने पारित केलेल्या दि.25.11.2002 रोजीच्या आदेशाचे पालन करावे असे मंचाचे मत आहे. वरील सर्व बाबींसह सदर अर्ज निकाली काढण्यांत येतो. -// आ दे श //- 1. अर्जदाराचा अर्ज निकाली काढण्यांत येत असुन गैरअर्जदारांनी कायदेशिर अडचणी दुर झाल्यानंतर तक्रारकर्ता/ अर्जदारास मंचाने दि.25.11.2002 रोजी पारित केलेल्या आदेशाचे पालन करावे. (मिलींद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष निकाली काढण्यात येत आहे दि.04.10.2010.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |