Final Order / Judgement | आदेश (आदेश पारित दिनांक 03.07.2019) मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने, यांच्या आदेशान्वये - - तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून तक्रारीत असे कथन केले आहे की, त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडून गोधनी, म्हाडा कॉलनी जवळ, नागपूर येथे डेव्हलप करण्यात येणारे प्रफुल्ल पार्क फहेस 1, रो- हाऊस क्रं. 84–ए, क्षेत्रफळ 710 स्के. फिट हा रुपये 17,99,000/- मध्ये विकत घेण्याचा करार दि. 22.03.2013 रोजी केला व त्याच दिवशी बुकिंग राशी म्हणून रुपये 21,000/- दिले व उर्वरित रक्कम बुकिंग फॉर्म कम पेमेंट शेडयुलप्रमाणे अदा करावयाची होती. तसेच तक्रारकर्त्याने दि. 03.05.2013 ला स्टेट बॅंक ऑफ इंडिया, तह. पवनी, जि. भंडारा या बॅंकेचा 3,00,000/- रुपयाचा धनोदश क्रं. 446856 हा पहिला हप्ता म्हणून विरुध्द पक्षाला अदा केला. तक्रारकर्त्याला बुकिंग फार्म कम पेमेंट शेडयुलप्रमाणे विरुध्द पक्षाला खालीलप्रमाणे रक्कम अदा करावयाची होती.
Sr. No. | Stage | Amount | -
| 25% On Plinth Level | 4,49,750/- | -
| 15% On RCC Structure | 2,69,850/- | -
| 15% On Brick Work, Door, Frame etc. | 2,69,850/- | -
| 15% On Flooring & Finishing Work | 2,69,850/- | (E) | 5% On Taking over Possession | 89,950/- | | Total | 17,99,000/- |
- तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद केले की, त्याने विरुध्द पक्षाला 3,21,000/- रुपये दिल्यानंतर तक्रारकर्ता स्वतः बांधकामाच्या ठिकाणी गेला असता त्याला कुठल्याही प्रकारचे बांधकाम सुरु असल्याचे आढळले नाही. तेव्हा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या कार्यालयास भेट दिली असता त्याच्या असे निदर्शनास आले की, विरुध्द पक्षाने त्याचे ऑफिस हरिगंगा रियालिटी, प्लॉट नं. 50, लेंड्रा पार्क रामदासपेठ येथील कार्यालय बंद करुन त्याचे ऑफिस /कार्यालय – प्लॉट नं. 5-9, कृषी नारा सोसायटी, सोमलवाडा, नागपूर – 15 येथे स्थानांतरीत केले व याबाबत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कळविले सुध्दा नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाशी त्याच्या नविन ऑफिसच्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता विरुध्द पक्ष तिथे ही मिळाला नाही. विरुध्द पक्षाने वरीलप्रमाणे 3,21,000/- रुपये घेऊन तब्बल 5 वर्ष 6 महिने लोटून ही बांधकामाला सुरुवात केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 24.12.2017 ला विरुध्द पक्षाला पैसे परत करण्याकरिता पत्र दिले. त्यानंतर दि. 15.02.2018 ला रेरा ट्रीब्युनल यांच्याकडे तक्रार करण्यात आली व सदरची तक्रार रेरा ट्रीब्युनलला चालविण्याचा अधिकार नसल्यामुळे दि. 27.07.2018 ला परत घेण्यात आली.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याशी केलेल्या बुकिंग फॉर्म कम पेमेंट शेडयुलप्रमाणे बांधकाम करार करुन ही वादातीत रो-हाऊसचे बांधकाम करुन दिले नाही. तसेच तक्रारर्त्याने वादातीत रो-हाऊसच्या बांधकामा पोटी दिलेली रक्कम रुपये 3,21,000/- परत करण्यास नकार दिल्यामुळे नाईलाजास्तव तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली की, त्याने विरुध्द पक्षाकडे रो-हाऊसकरिता भरलेली रक्कम रुपये 3,21,000/- दि. 03.05.2013 पासून 18 टक्के दराने व्याजासह परत करण्याचे आदेश द्यावा. तसेच मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्याची मागणी केलेली आहे.
- विरुध्द पक्ष यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊन ही ते मंचासमक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 18.03.2019 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, नि.क्रं.4 वर दाखल दस्तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद ऐकून मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन खालीलप्रमाणे निष्कर्ष नोंदविले.
मुद्दे उत्तर - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे कायॽ होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ होय
- काय आदेश ॽ अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक – 1 व 2 बाबत - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडून गोधनी, म्हाडा कॉलनी जवळ, नागपूर येथे डेव्हलप करण्यात येणारे प्रफुल्ल पार्क फहेस -1, रो-हाऊस क्रं. 84-ए, क्षेत्रफळ -710 स्के.फिट. हा रुपये 17,99,000/- मध्ये खरेदी करण्याचा बुकिंग फार्म कम पेमेंट शेडयुलप्रमाणे दिनांक 22.03.2013 रोजी करार केला व त्याच दिवशी बुकिंग राशी म्हणून रुपये 21,000/- दिले. त्याबाबतची पावती नि.क्रं. 4 (2) वर दाखल आहे. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे वरील नमूद रो-हाऊसकरिता स्टेट बॅंक ऑफ इंडिया, तह. पवनी,जि. भंडारा या बॅंकेचा दि. 03.05.2013 रोजी रुपये 3,00,000/- चा धनादेश दिला होता. ही बाब तक्रारकर्त्याने नि.क्रं. 4 (3) वरील दाखल दस्तावेजावरुन सिध्द होते. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता सोबत बुकिंग फॉर्म कम पेमेंट शेडयुल प्रमाणे करार करुन त्याकरिता तक्रारकर्त्याकडून रक्कम स्वीकारुन ही वादातीत रो-हाऊसचे बांधकाम केले नाही व घेतलेली रक्कम परत केली नाही. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाला रो-हाऊसची बुकिंग फॉर्म कम पेमेंट शेडयुलप्रमाणे संपूर्ण रक्कम अदा करावयास तयार असतांना ही विरुध्द पक्षाने उपरोक्त रो- हाऊसचे बांधकाम सुरुच केलेले नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याने साडे पाच वर्षा नंतर बुकिंग करिता दिलेली रक्कम परत मागितली असता विरुध्द पक्षाने रो-हाऊस पोटी घेतलेली रक्कम परत करण्यास नकार दिला. ही बाब विरुध्द पक्षाची तक्रारकर्त्या प्रति दोषपूर्ण सेवा असून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब दर्शवितो व सिध्द होते.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येते. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम रुपये 3,21,000/- दिनांक 03.05.2013 पासून द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजासह प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत तक्रारकर्त्याला अदा करावे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई म्हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
- उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |