(मंचाचा निर्णय : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 16/01/2014)
- तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे...
विरुध्द पक्ष क्र.1 उमाशंकर दयाराम अलोणे यांनी त्यांच्या मालकीचा भुखंड क्र.409, क्षेत्रफळ 413 चौ.मि., नगर भूमापन क्र.254, शीट क्र.319, मौजा नागपूर, मेडीकल कॉलेज ले आऊट मधील नागपूर मनपा घर क्र.1464/409, वार्ड क्र.9, हनुमान नगर, तह.जि. नागपूर हा दि.12.05.1992 च्या करारनाम्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.2 आराध्य बिल्डर्स डेव्हलपर्स, प्रोमोटर्स तर्फे नरेंद्र नामदेवराव लहाणे यांना विकासासाठी दिला. सदर भुखंडावर बांधण्यांत येणा-या ‘वैदेही अपार्टमेंटस’, मधील 4 त्या मजल्यावरील सदनिका क्र. टीपीओ-2 ही क्षेत्रफळ 85.378 चौ.मि. रु.2,90,000/- मध्ये तक्रारकर्ती क्र.1 व तिचे पती नसर इनामदार यांना बांधकाम व सदर भूखंडातील जमीनीच्या प्रमाणशीर हिस्स्यासह दस्त क्र.42 नुसार विकण्याचा नोंदणीकृत करारनामा विरुध्द पक्ष क्र.2 विकासक यांनी दि.04.12.1992 रोजी करुन दिला.
2. दि.04.12.1992 च्या नोंदणीकृत करारनाम्याप्रमाणे तक्रारकर्त्यांनी वरील सदनिकेची पूर्ण किंमत रु.2,90,000/- विरुध्द पक्ष क्र.2 व 1 ला पूर्णपणे अदा केलेली आहे. त्यासाठी तक्रारकतर्यांनी एल.आय.सी. हाऊसिंग फायनान्स लि. कडून रु.1,50,000/- चे कर्ज घेतले होते. पूर्ण किंमत मिळाल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दि.31.05.1994 रोजी तक्रारकर्ता क्र.1 व तिचे पतीस सदनिकेचा ताबा दिला आहे व तेव्हापासून तक्रारकर्त्यांचा सदर सदनिकेवर ताबा व वहिवाट आहे. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सदर अपार्टमेंटमधील इतर सदनिका धारकांना नोंदणीकृत खरेदीखत करुन दिले परंतू त्यांना नोंदणीकृत खरेदीखत करुन देण्यांस टाळाटाळ चालविली आहे. नसर इनामदार यांचा दि.08.11.2009 रोजी मृत्यू झाला त्यामुळे त्यांचे वारस म्हणून तक्रारकर्ती क्र.1 बरोबर तक्रारकर्ता क्र.2 (मुलगी) व 3 (मुलगा) यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना दि.25.08.2011 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठविली असता विरुध्द पक्ष क्र.1 ने न स्विकारता परत पाठविली तर विरुध्द पक्ष क्र.2 ‘जागा सोडून गेले’, अशा शे-यासह नोटीस परत आली. म्हणून तक्रारकर्त्यांनी तक्रारीत विरुध्द पक्ष क्र.1 किंवा विरुध्द पक्ष क्र.2 अथवा उभयतांनी संयुक्तपणे वरील सदनिकेचे खरेदीखत नोंदवुन द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रु.2,00,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च द्यावा असा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे.
3. मंचातर्फे विरुध्द पक्ष क्र.1 ला पाठविलेली नोटीस मिळाली परंतु तो हजर झाला नाही म्हणून त्याचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्यांत आले. विरुध्द पक्ष क्र.2 ला त्याच्या माहित असलेल्या पत्त्यावर नोंदणीकृत डाकेव्दारे पाठविलेली नोटीस परत आली नसल्याने ती देण्यांत आली असे गृहीत धरुन प्रकरण त्याचे विरुध्द एकतर्फी चालविण्यांत आले.
4. प्रकरणाच्या निर्मीतीसाठी खालिल मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले, त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढील प्रमाणे...
मुद्दे निष्कर्ष
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्यूनतापूर्ण
व्यवहार केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणी प्रमाणे दाद मिळण्यांस
पात्र आहे काय ? अंशतः
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
5. मुद्दा क्र.1 ते 3 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्त्यांनी दस्तावेज यादी सोबत अनुक्रमांक 1 वर आखिव पत्रिकेची प्रत दाखल केली असून त्याप्रमाणे प्लॉट क्र.409, मौजा-नागपूर, भू. क्र.254, क्षेत्रफळ 413 चौ.मि. हा विरुध्द पक्ष क्र.1 उमाशंकर दयाराम अलोणे यांच्या मालकीचा आहे. दस्त क्र.2 वर विरुध्द पक्ष क्र.1 ने विरुध्द पक्ष क्र.2 मे. आराध्य बिल्डर्स, प्रो.नरेंद्र नामदेव लहाणे यांना सदर प्लॉटचा करुन दिलेला दि.12.05.1992 चा विकसन करारनामा आहे. दस्त क्र.3 वर विरुध्द पक्ष क्र.2 ने तक्रारकर्त्यांना दि.04.12.1992 रोजी करुन दिलेला विक्री व बांधकामाचा नोंदणीकृत करारनामा आहे. दस्त क्र.4 वर तक्रारकर्त्यांनी एल.आय.सी. हाऊसिंग फायनान्स यांना सदर सदनिका खरेदीसाठी घेतलेल्या रु.1,50,000/- कर्जाचा करारनामा आहे. दस्त क्र.5 वर विरुध्द पक्ष क्र.2 ने तक्रारकर्ती क्र.1 उमाशंकर अलोणे त्यांचा मुखत्यार नरेंद्र एन लहाणे तसेच विरुध्द पक्ष क्र.2 यांनी याच अपार्टमेंटमधील तिस-या मजल्यावरील सदनिका क्र.टी-3 चे विजय दामोधर देव यांना 3 एप्रिल-1999 रोजी दि.12.05.1992 च्या विकसन करारनाम्याचे अनुषंगाने करुन दिलेले नोंदणीकृत खरेदीखताची प्रत आहे. दस्त क्र.7 वर तक्रारकर्त्यांनी त्यांच्या ताब्यातील फ्लॅट क्र.803/एन, वार्ड क्र.10 जो सध्या विरुध्द पक्ष क्र.1 च्या नावाने आहे त्याबाबत दि.01.04.2011 ते 31.03.2012 या कालावधीसाठी भरलेल्या कराची पावती आहे. दस्त क्र.8 वर मुळ करारनामाधारक क्र.1 मोहम्मद नासर इनामदार यांच्या मृत्यूचा दाखला असून त्याप्रमाणे त्यांचा मृत्यू दि.8.11.2009 रोजी झालेला आहे. दस्त क्र.10 वर तक्रारकर्त्यानी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना खरेदीखत करुन द्यावे म्हणून ऍड. व्ही.एस. देशपांडे यांचे मार्फत दि.25.08.2011 रोजी पाठविलेल्या नोटीसची प्रत आहे.
6. वरील सर्व दस्तावेजांवरुन विरुध्द पक्ष क्र.1 ने विरुध्द पक्ष क्र.2 बरोबर त्याच्या मालकीचा वरील वर्णनाचा भुखंड विकासाचा करार केला आणि विरुध्द पक्ष क्र.1 कडून मिळालेल्या पैशाच्या मोबदल्यात विरुध्द पक्ष क्र.2 ने सदर भूखंडावर बांधलेल्या सदनिका त्याच्या मर्जिप्रमाणे विकण्याचा अधिकार दिला हे सिध्द होते. सदर अधिकाराप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.2 ने वरील भुखंडावर बांधलेल्या चवथ्या माळयावरील सदनिका क्र. टॉप-2 तक्रारकर्ती व तिचे पतीस विकण्याचा नोंदणीकृत करार केला आणि बांधकामाचे पूर्ण पैसे मिळाल्यावर सदनिकेचा तक्रारकर्तीस ताबा दिला आहे. मात्र कराराप्रमाणे विरुध्द पक्ष्ज्ञ क्र.1 ने स्वतः अगर प्राधीकृत व्यक्तिमार्फत सदनिकेच्या प्रमाणात भूखंडाच्या जागेचे नोंदणीकृत खरेदीखत करुन देण्याची जबाबदारी पार न पाडता सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केलेला आहे.
7. इतर सदनिका धारकांना मात्र विरुध्द पक्ष क्र.1 ने आपल्या मुखत्यारामार्फत नोंदणीकृत खरेदीखत करुन दिलेले असल्याने तक्रारकर्ते देखिल विरुध्द पक्ष क्र.2 कडून त्यांनी खरेदी केलेल्या सदनिकेच्या प्रमाणात भूखंडाच्या जागेचे खरेदीखत लिहून व नोंदवून मिळण्यांस पात्र असतांना विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी ते करुन ने दिल्यामुळे तक्रारकर्त्यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि सदर तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विरुध्द आदेश होणे उचित होईल असे मंचास वाटते.
वरील कारणामुळे मुद्दा क्र.1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले असून खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- // आदेश //-
1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी संयुक्तरित्या किंवा विरुध्द पक्ष क्र.1 भूखंड
मालक यांनी वैयक्तिकरित्या विकसक विरुध्द पक्ष क्र.2 यांनी भूखंड क्र.409 वर दि.12.05.1992 च्या विकसन करारनाम्याप्रमाणे बांधलेल्या आणि दि.04.12.1992 च्या बांधकाम व विक्रीच्याकरारनाम्याप्रमाणे तक्रारकर्ती क्र.1 व तिचे मयत पती यांना विक्रीचा करार केलेल्या ‘वैदेही अपार्टमेंटस’, मधील चवथ्या मजल्यावरील सदनिका क्र.टॉप-2 चे खरेदीखत लिहून व नोंदवुन द्यावे.
3) सदर खरेदीखत लिहीण्यांस व नोंदणीस लागणारा खर्च तक्रारकर्त्यांनी करावा.
4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी संयुक्त व वैयक्तिकरित्या तक्रारकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि या तक्रारखर्चाबाबत रु.5,000/- द्यावेत.
5) वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याच्या दिनांकापासुन 1 महिन्यांचे आंत करावी.
6) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
7) तक्रारकर्त्यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.