सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 18/2012
श्री विवेक अनंत सडवेलकर
वय 42 वर्षे, व्यवसाय- मोबाईल सेल्स आणि सर्व्हिस,
गौरांग मोबाईल सर्व्हिस
1242/2 वडेर कॉम्प्लेक्स, बांदेश्वर मंदीरजवळ
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
श्री तेजस चंद्रकांत तारी
वय 27 वर्षे, व्यवसाय कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस
बांदेश्वर कॉम्प्युटर अँड पी.सी. सोल्युशन
मु.पो.बांदा देऊळवाडी,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
- आदेश नि.1 वर -
(दि.27/02/2013)
श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या:- विरुध्द पक्ष यांच्याकडून खरेदी केलेला कॉम्प्युटर व्यवस्थित चालत नसल्याने व विरुध्द पक्ष यांनी त्याबाबत योग्य सेवा दिलेली नसल्याने सदरची तक्रार जिल्हा मंचात दाखल केली आहे.
2) सदरची तक्रार दि.02/06/2012 रोजी जिल्हा मंचात नोंद करण्यात येऊन विरुध्द पक्ष यांना नोटीस काढण्यात आली. दरम्यान उभय पक्षात तडजोड झाली असलेबाबत व कॉम्प्युटरचे सर्व काम विरुध्द पक्षाने करुन दिले असलेबाबत व नुकसानीपोटी रु.8900/- (रुपये आठ हजार नऊशे मात्र) मिळाले असलेबाबत नि.6 वर तक्रारदाराने पुरसीस दाखल केली आहे.
3) दरम्यान जिल्हा मंचाची बैठक न झाल्याने सदरचे प्रकरण आज रोजी आदेशासाठी ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे आम्ही सदरचे प्रकरण निकाली करणेच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदाराची कोणतीही मागणी शिल्लक नसल्याने व तक्रारदाराने नि.6 वर दिलेल्या अर्जानुसार सदरचे तक्रार प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
3) प्रकरण नस्तीबध्द करणेत येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 27/02/2013
Sd/- sd/- sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग