Maharashtra

Nagpur

CC/10/496

Shri Sudhakar Natthuji Gudhe - Complainant(s)

Versus

Shri Tajshree Infrastructure and Builders Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Adv.Bisen

17 Oct 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/496
 
1. Shri Sudhakar Natthuji Gudhe
Plot No. 53, Vivek Nagar, Mul Road, Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Tajshree Infrastructure and Builders Pvt. Ltd.
Near Sakkardara Police Station, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HON'ABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्‍यक्ष )     
                आ दे श
                        ( पारित दिनांक : 17 आक्‍टोबर 2011 )
 
 तक्रारदार ह्यांनी प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारदाराची तक्रार अशी आहे की त्‍यांनी गैरअर्जदार जे भुखंड खरेदी /विक्रीचा प्रचार करतात व सवलतीच्‍या किमतीत भुखंड विक्रीचा व्‍यवसाय करतात त्‍यांचे लक्ष्‍मीनगर या प्रोजेक्‍ट मधील भुखंड क्रं.102, वींग नं. ए, मधील फ्लॅट खरेदीचा व्‍यवहार केला. फ्लॅटचे मोबदल्‍यापोटी तक्रारदाराने गैरअर्जदारास रुपये 50,000/- चा धनादेश दिला. त्‍याबाबत गैरअर्जदाराने पावती दिली तीचा क्रं.28 आहे. फ्लॅट खरेदीवेळी गैरअर्जदाराने प्रथम बूकींग करावे लागते त्‍यानंतर एक महिन्‍यानंतर बुकींग केलेल्‍या फ्लॅटचे अलॉटमेंट लेटर दिल्‍या जाते. फ्लॅट खरेदीकरिता पुरेशी रक्‍कम नसल्‍यास कर्ज उपलब्‍ध करुन देण्‍याची हमी दिली व फ्लॅटची संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर विक्रीपत्र व कब्‍जा दिल्‍या जाईल असे सांगीतले. जर गैरअर्जदार तक्रारदारास फ्लॅट देण्‍यास असमर्थ ठरला तर संपुर्ण रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याची हमी गैरअर्जदाराने दिली होती. त्‍याप्रमाणे तक्रारदाराने फ्लॅट खरेदीनंतर एक महिन्‍यानंतर गैरअर्जदाराचे कार्यालयात दुरध्‍वनी करुन अलॉटमेंट लेटर बद्दल विचारणा केली असता पुढच्‍या आठवडयात कार्यालयातुन घेऊन जावे असे सांगण्‍यात आले. दरम्‍यान तक्रारदाराने फ्लॅट खरेदीसाठी कर्ज मिळण्‍याकरिता बॅकेकडे चौकशीकरिता गेले असता त्‍यांनी काही कागदपत्रांची मागणी केली. सदर कागदपत्रे मिळविण्‍याकरिता तक्रारदार गैरअर्जदाराकडे गेले असता गैरअर्जदाराने तुम्‍ही मागत असलेले कागदपत्रे माझ्याकडे उपलब्‍ध नाही, हे दस्‍तऐवज देण्‍यास मी जबाबदार नाही. असे बोलुन दस्‍तऐवज देण्‍यास स्‍पष्‍टपणे नकार दिला म्‍हणुन तक्रारदाराने दिनांक 14/5/2010 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली व फ्लॅट उपलब्‍ध करुन देण्‍याची विनंती केली. परंतु गैरअर्जदाराने नोटीसला दाद दिली नाही. म्‍हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन रुपये 50,000/-, 18 टक्‍के व्‍याजासह व येण्‍याजाण्‍याचा खर्च रुपये 2,000/-,वारंवार सुटीमुळे नोकरीत झालेन्‍या नुकसानीपोटी रुपये 5,000/-, किरकोळ खर्च रुपये 1,000/- असे एकुण 8,000/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली.
  
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्‍यात आली. गैरअर्जदाराची नोटीस “ Intimation, Not Claimed returned to sender ”  या शे-यासह परत आली. म्‍हणुन त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 23/3/2011 रोजी पारित करण्‍यात आला.
 
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्‍तऐवज यादीनुसार एकुण 6 कागदपत्रे दाखल केलीत. गैरअर्जदार एकतर्फी.
तक्रारदार व त्‍यांचे वकील हजर. गैरअर्जदार गैरहजर.
 
 #####-    का र ण मि मां सा    -#####
    यातील गैरअर्जदाराने नोटीस मिळुनही आपला बचाव केला नाही. तक्रारदाराचा दाखल प्रतिज्ञालेख आणि दस्‍तऐवज यावरुन तक्रारदाराने आपले म्‍हणणे सिध्‍द केलेले आहे. गैरअर्जदाराने तक्रारदाराजवळुन रुपये 50,000/- एवढी रक्‍कम घेतली आणि पुढे कराराचे कोणत्‍याही प्रकारे अनुपालन केले नाही. यावरुन गैरअर्जदार यांचा केवळ पैसे उकळण्‍याचा हेतू होता हे स्‍पष्‍ट होते. तक्रारदाराने गैरअर्जदार यांना नोटीस दिली. तक्रारदाराची ती नोटीस गैरअर्जदाराला प्राप्‍त होऊनही त्‍या नोटीसला साधे उत्‍तर गैरअर्जदाराने दिलेले नाही. गैरअर्जदाराने तक्रारदारकडुन पैसे स्विकारुन कोणत्‍याही सेवेचे अनुपालन करुन दिलेले नाही. यातुनच त्‍यांचे सेवेत दोष सिध्‍द होतो. यास्‍तव आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहोत. 
 
         -// अं ति म आ दे श //-
1.     तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2.    गैरअर्जदाराने रुपये 50,000/- एवढया रक्‍कमेवर ती दिल्‍याचे दिनांक 9/3/2010 पासुन रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपावेतो 18 टक्‍के द.सा.द.शे व्‍याजासह मिळुन येणारी रक्‍कम तक्रारदारास   द्यावी.  
3.    मानसिक व शारिरिक त्रासापोटी व इतर सर्व गैरसाईबद्दल रुपये 10,000/- एवढी नुकसानीची रक्‍कम तक्रारदारास द्यावी.
4.    तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- द्यावा.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदाराने 1 महिन्‍याचे आत करावे न पेक्षा रुपये 50,000/-या रक्‍कमेवर द.सा.द.शे 18 टक्‍के व्‍याजाऐवजी 24 टक्‍के व्‍याज देण्‍यास गैरअर्जदार जबाबदार राहतील.
 
 
 
[HON'ABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.