नि.17 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 9/2011 नोंदणी तारीख - 17/1/2011 निकाल तारीख - 19/3/2011 निकाल कालावधी - 62 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री बबन कृष्णा सोनवणे रा.मु.पो. विरमाडे, ता.वाई जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आर.जी.बेंद्रे) विरुध्द 1. व्यवस्थापक, श्री स्वामी विवंकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची पतसंस्था मर्यादीत, कोल्हापूर शाखा – सातारा सौ सुशिलादेवी साळुंखे हायस्कूल, सातारा यांचे इमारतीमध्ये, मल्हार पेठ, सातारा 2. सचिव श्री स्वामी विवंकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची पतसंस्था मर्यादीत, कोल्हापूर 3. चेअरमन श्री स्वामी विवंकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची पतसंस्था मर्यादीत, कोल्हापूर नं.2 व 3 चा पत्ता 101, साईप्लाझा, 726/अ, शाहुपूरी, 3 री गल्ली, कोल्हापूर मु.पो.ता.जि.कोल्हापूर ----- जाबदार (अभियोक्ता श्री पी.जे.पोवार) न्यायनिर्णय 1. अर्जदार हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत नोकरीस होते. ते धोम येथून मुख्याध्यापक पदावर असताना निवृत्त झाले. अर्जदार हे जाबदार क्र.1 संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेचे अर्जदारचे नावे रक्कम रु.25,000/- चे शेअर्स आहेत. सेवानिवृत्तीनंतर अर्जदार यांनी जाबदार संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व शेअर्सचे रकमेची मागणी केली. परंतु जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. याउलट जाबदार यांनी अर्जदार यांना असे कळविले की, अर्जदार हे मुख्याध्यापक असताना त्यांनी त्यांच्या शाखेतील एक सेवक श्री सुरेश देवळेकर यांचे कर्जाचे हप्त्याचा डीडी पाठविणेस उशिर केल्यामुळे रु.8,000/- व्याजापोटी अर्जदारकडून करावेत असे देवळेकर यांनी कळविलेमुळे जाबदार हे अर्जदारची भागाची रक्कम देत नाहीत. श्री देवळेकर यांचे कर्जाचे रकमेशी अर्जदार यांचा काहीही संबंध नाही. श्री देवळेकर यांना त्यांचेवर अन्याय झाला आहे असे वाटत असल्यास त्याबाबत न्यायालयात दाद मागावी. त्यासाठी जाबदार यांनी अर्जदारची रक्कम अडवून ठेवू नये. सबब शेअर्सची रक्कम रु.25,000/-, त्यावरील व्याज, नोटीस खर्च, त्रासापोटीची नुकसान भरपाई व अर्जाचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांनी नि. 12 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक नाहीत. अर्जदार यांनी खरी वस्तुस्थिती मांडलेली नाही. अर्जदारने श्री देवळेकर यांचे कर्जाच्या हप्त्याचा डीडी वेळेत न पाठविल्याने श्री देवळेकर यांचे नुकसान झाले आहे. त्यास अर्जदार हे जबाबदार आहेत. अर्जदार यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. जाबदार यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला तसेच अर्जदार यांचा नि.15 कडील लेखी युक्तिवाद पाहिला तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. अर्जदारची तक्रार पाहता जाबदार यांनी कायदेशीर हक्क नसताना अर्जदारची शेअर्सची रक्कम अडवून ठेवली आहे. सबब सदर रक्कम व्याजासह देणेचा आदेश व्हावा अशी अशी तक्रार दिसते. 5. जाबदार यांनी नि. 12 कडे म्हणणे देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार जाबदारचे अर्जदार सभासद सुरेश देवळेकर यांचे कर्जाचा हप्ता मुख्याध्यापक या नात्याने अर्जदार यांनी कपात करुनही वेळेत डीडी जाबदारकडे पाठविला नाही. सबब देवळेकर यांचे नुकसान झाले व सदर नुकसान हे अर्जदारकडून वसूल करावे कारण अर्जदार त्यास वैयक्तिक जबाबदार आहेत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी देवळेकर यांची जाबदारकडे वेळोवेळी दिल्या आहेत. सबब अर्जदार यांचा राजीनामा मंजूर केला नाही. जाबदार यांनी काहीही सदोष सेवा दिली नाही. सदर तक्रार ग्राहक मंचास चालविणेचे अधिकारक्षेत्र नाही. अर्जदार ग्राहक नाहीत वगैरे अनेक मुद्दे जाबदारने कथनात नमूद केलेले आहेत. 6. निर्विवादीतपणे जाबदारचे कथनानुसार अर्जदारचा सभासदत्वाचा राजीनामा अर्जदारविरुध्द तक्रारी दाखल असलेने अद्याप मंजूर केलेला नाही असे दिसते व जोपर्यंत एखादी व्यक्ती सभासद आहे तोपर्यंत शेअर्सपोटीची रक्कम मिळणेस तो पात्र नाही हे कायद्याने स्पष्ट आहे व सभासद त्याच राजीनामा मंजूर करणेचा किंवा नाही ही बाब संस्थेचे अखत्यारितील आहे. अर्जदारही युक्तिवादामध्ये देवळेकर काय आरोप करतात ते पाहणेचे जाबदारचे काम नाही. देवळेकर यांचे आरोप व त्याचा निर्णय होणे न्यायालयाचे काम आहे. जाबदारचे काम नाही असे कथन करतात. परंतु यावरुन अर्जदार विरुध्द देवळेकरांच्या तक्रारी आहे हे अर्जदारला माहित आहे. अशा परिस्थितीमध्ये जाबदारने अर्जदारला काही सदोष सेवा दिली आहे असे दिसत नाही. अर्जदार सेवानिवृत्त झालेनंतर आपोआप सभासदत्व रद्द होते असे कथन करतात परंतु सदर कथनाचे पृष्ठयर्थ कोणताही कायद्याचा आधार दाखल करत नाहीत. सबब अर्जदारचे सदर कथनमान्य करणे ग्राहय होणार नाही असे मे. मंचाचे मत आहे. सबब अर्जदार जाबदार विरुध्द आपली तक्रार शाबीत करु शकले नाहीत या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. 2. खर्चाबाबत आदेश नाही. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 19/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |