सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचेसमोर.
दरखास्त क्रमांक – 11/2012
श्री संजय कृष्णा ठाकूर
वय वर्षे 41, व्यवसाय – नोकरी,
स्वयंभू अपार्टमेंट, दुसरा मजला,
कणकवली कॉलेज नजीक,
मु.पो.कणकवली, विद्यानगर,
ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग ... तक्रारदार/फिर्यादी
विरुद्ध
श्री सुरेश मालवीय,
रामदेव फर्निचर मार्ट, राणे बिल्डिंग,
हॉटेल मंजुनाथच्या बाजूला,
कणकवली, जि. सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का अंकुश पावसकर (गावकर), सदस्या
तक्रारदारतर्फे - प्रतिनिधी उपस्थित.
विरुध्द पक्षातर्फे – गैरहजर.
आदेश नि.1 वर
(दि.29/04/2013)
श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष :- मूळ तक्रार क्रमांक 06/2012 मध्ये दि. 21/05/2012 रोजी मंचाने आदेश पारीत केलेला होता. सदर आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अन्वये प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) दरम्यान तक्रारदार यांना आरोपी यांनी आदेशीत सर्व रक्कमेची अदायगी केली असल्याने प्रकरण निकाली काढणेबाबत नि.8 वर तक्रारदाराने अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदाराची विरुध्द पक्ष यांचेविरुध्द कोणतीही मागणी शिल्लक नसल्याचे नमूद केले आहे. वरील म्हणणे पाहता, आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
- आदेश –
तक्रारदार यांना मंचाचे आदेशाप्रमाणे पूर्ण रक्कम फेड झाली असल्याने सदरचे प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते.
ठिकाण- सिंधुदुर्गनगरी.
दिनांक – 29/04/2013
Sd/- sd/- sd/-
(वफा जमशीद खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर) (गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग