::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केल्याने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदारांचा प्लॉट क्र. ६५ मौजा चांदा रै. तलाठी साझा क्र. १० परावर्तीत सर्व्हे क्रमांक ३३८/३ मधिल प्लॉट नं. १६ आराजी २११५.०० चौ.फुट या मिळकतीमध्ये सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या आवश्यकतेप्रमाणे घराचे बांधकाम करुन वैध ताबा देण्याबाबतचा करार दिनांक ०६/०२/२०१२ रोजी तक्रारदारांनी सामनेवाले यांना एकत्रित रक्कम रु. १०,००,०००/- अदा करुन करण्यात आला. करारानुसार दिनांक ०७/०२/२०१२ रोजी तक्रारदारांनी सामनेवाले यांना रक्कम रु. १,००,०००/- दिनांक ०७/०२/२०१२ रोजी अदा केले. त्यांनतर दिनांक ०६/०६/२०१२ पर्यंत वेळावेळी रक्कम रु. ५,६०,०००/- अदा केले. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी २ खोली साईज १४ X १० , किचन साईज १३ X १०, एक ओटा व छोटी अलमारी, १ संडास, १ बाथरुम, १ जिना, वॉलकंपाऊड ऐवढे बांधकाम करुन दिले. त्यानंर उर्वरीत काम करुन देण्यासाठी तक्रारदारांनी सामनेवाले यांना विनंती करुनही सामनेवाले यांनी कराराप्रमाणे काम न करुन तक्रारदारांकडुन झालेल्या बांधकामाचा खर्च रक्कम रु. ३,१३,२४०/- झाला असुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांना अतिरीक्त रक्कम रु. २,४६,७६०/- परत मागीतले. परंतु सामनेवाले यांनी सदर रक्कम परत न केल्याने व कराराप्रमाणे उर्वरीत रक्कम स्विकारुन सदनिकेचे बांधकाम न केल्याने तक्रारदाराने वकीलामार्फत दिनांक १६/१०/२०१२ रोजी सदर रक्कम परत मागणी करणारी नोटीस पाठवुण देखील सामनेवाले यांनी तक्रारदारास सदर रक्कम परत न केल्याने प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदारांनी सामनेवाले यांनी तक्रारदारास रक्कम रु. ३,९६,७६०/- शारीरीक त्रास, असुविधा, आर्थिक नुकसान, घरभाडे व तकार खर्च यापोटी एकत्रित रक्कम रु. ३,९६,७६०/-, १८ टक्के द.सा.द.शे. व्याजासह परत करावे, अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे.
सामनेवाले यांनी तक्रारीचे मुद्दयाचे खंडन करुन दिनांक ०६/०२/२०१२ रोजी करारनाम्यानुसार सामनेवालेयांनी घर बांधुन दिल्यानंतर तक्रारदारांनी सदरची मिळकत अन्य व्यक्तीस विक्री केली. त्यानंतर तक्रारदारांनी कलश अपार्टमेंट मांऊन्ट कॉन्व्हेंटच्या बाजुला, चंद्रपुर येथिल सदनिकेची दुरुस्ती करण्यास सामनवाले यांना सांगीतले. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी दुरुस्ती केल्यानंतर तक्रारदारांनी सदरची मिळकतही अन्य व्यक्तीस विक्री केली. त्रकारदारांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे बांधकाम सामनेवाले यांनी पुर्ण केले व सदर बांधकामाचा एकत्रित खर्च रक्कम रु. १०,००,०००/- असे सामनेवाले यांनी तक्रारदारास सांगीतले होते. त्याप्रमाणे सामनेवालेयांनी संपुर्ण बांधकाम केले आहे. कलश अपार्टमेंट मधिल दुरुस्ती करीता केलेल्या कामाची रक्कम रु. ३९,०००/- तक्रारदार यांनी अदा केलेली नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांना रक्कम रु. १०,००,०००/- चा ठेका दिल्याने सामनेवाले यांनी रक्कम रु. १९,५००/- सुट त्रकारदारास दिली. त्यापैकी तक्रारदारांनी रक्कम रु. १०,०००/- एप्रील – २०१२ मध्ये अदा केली व उर्वरीत रक्कम रु. ९,५००/- अद्याप अदा केलेली नाही. कराराप्रमाणे बांधकाम करण्यासाठी तक्रारदाराच्या प्लॉट वरुन उच्च दाब विद्युत वाहीनी जात असल्याने अन्यत्र स्थंलांतरीत केल्याशिवाय पुढील बांधकाम करता येणार नाही असे तक्रारदाराला कळवहुनही तक्रारदारांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने पुढील काम सामनेवाले करु शकले नाही. पाय-यासाठी खोदलेल्या खड्यामध्ये अतिरीक्त भरणा न टाकल्यामुळे कराराप्रमाणे बांधकाम होऊ न शकल्याची बाब तक्रारदारांनी मान्य केली आहे. बदललेल्या परिस्थीमुळे सामनवाले यांनी तकारदारास तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे संपुर्ण बांधकाम रक्कम रु. १०,००,०००/- मध्ये करण्याचे ठरले होते. व त्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारास सदर बांधकाम पुर्ण करुन देवुनही तक्रारदाराने सामनेवाल्यास केवळ रक्कम रु. ४,९२,०००/- अदा केले असुन सामनेवाले यांना तक्रारदार यांचेकडुन ५,०८,०००/- दिनांक ३०/०५/२०१२ पासुन १८ टक्के द.सा.द.शे. व्याजासह परत करण्याचे होणे न्यायोचीत आहे. तक्रारदार यांनी यापुर्वी घरांची विक्री केली असुन कराराप्रमाणे केलेल्या मिळकतीवरुन उच्च दाब विद्युत वाहीनी जात असल्याने व सदरची मिळकत डब्लु.सि.एल. चे डंपीग एरीया जवळ असल्याने धुळीच्या त्रासामुळे सदर मिळकतीस ग्राहक मिळत नाही. त्यामुळे प्रस्तुत तकार दाखल करुन सामनेवाले यांचेकडुन रक्कम परत मागण्याची विनंती न्यायोचीत नसल्याने तक्रार खर्चासह अमान्य करावी अशी विनंती सामनवाले यांनी केली आहे
तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवादाबाबतची पुरशिस, सामनेवाले यांचे लेखी म्हणने, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व तोंडी युक्तीवादावरुन तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिध्द करतात काय ? होय
२. सामनेवाले तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशतः मान्य
कारणमिमांसा
मुद्दा क्र. १ व २ :
सामनेवाले यांनी लेखी म्हणन्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे पुराव्याकामी कोणतीही कागदपत्रे मंचात दाखल केली नाही, तसेच तक्रारदाराकडुन येणे रक्कम मागणी करीता कायदेशिर नोटीस पाठविल्याबाबत कोणताही पुरावा कागदोपत्री दाखल नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे बांधकाम करुन दिल्याबाबत कोणतीही कागदपत्रे सामनेवाले यांनी दाखल केली नाही. तक्रारदार हे नफा कमावण्याच्या उद्देशाने प्लॉट व सदनिका खरेदी विक्री करतात ही बाब सिध्द करण्याकरीता सामनेवाले यांनी सक्षम न्यायोचीत पुरावा कागदोपत्री दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी दिनांक २१/१०/२०१२ रोजी वास्तुविशारद तज्ञ शाम तलरेजा यांचा मुल्यांकन अहवाल कागदोपत्रीदाखल केला असुन सदर अहवालाप्रमाणे मिळकतीची किंमत रु. ३,१३,२४०/- नमुद आहे. सदर तज्ञ अहवालाचे अवलोकन केले असता बांधकामाचा एकुण खर्च रक्कम रु. ६,२३,९९६/- नमुद आहे. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारासोबत दिनांक ०६/०२/२०१२ रोजी केलेल्या करारनाम्याप्रमाणे व त्यानंतर बदललेल्या परिस्थिमध्ये प्रत्यक्षात केलेल्या बांधकामामध्ये तफावत असुन तज्ञ अहवालात नमुद केल्याप्रमाणे तक्रारदार सामनेवाले यांना केवळ रक्कम रु. ३,१३,२४० /- अदा करण्यास पात्र आहे. ही बाब सिध्द होते. सामनेवाले यांनी सदर तज्ञ अहवाल सक्षम न्यायाधिकरणाकडे आवाहनीत केलेला नसुन मंचा समक्ष विवादीत केला नाही. सामनेवाले यांना पुरेशी संधी देवुन देखील तक्रारीतील कायदेशिर मुद्दे व तज्ञ अहवाल यामधिल वाद कथनाबाबत कोणताही अन्य पुरावा कागदोपत्री दाखल न केल्याने तक्रारदारांची तक्रारीतील वाद कथने व तज्ञ अहवाल यावरुन तसेच तक्रारदाराने सामनेवाले यांना रक्कम अदा केल्याबाबत कागदपत्रावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे सेवा सुविधा न पुरवुन तक्रारदारांना आर्थिक, शारीरीक, मानसिक व तक्रार खर्चापोटी नुकसान भरपाई अदा करण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे. वरील मुद्दा क्रमांक १ व २ चे निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
- ग्राहक तक्रार क्रमांक १७३/२०१२ अंशत: मान्य करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास ग्राहक संरक्षण अधिनीयम तरतुदीनुसार कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास रक्कम रु. २,४६,७६०/- अदा करेपर्यत दिनांक १८/०४/२०१७ पासुन १२ टक्के द.सा.द.शे. व्याजासह अदा करावे.
- सामनेवाले यांनी तक्रारदारास आर्थिक, शारीरीक, मानसिक व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. ५०,०००/- या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३० दिवसात अदा करावे.
- तक्रारदारांची घरभाडेपोटी रक्कमेची मागणी कागदोपत्री पुराव्या अभावी अमान्य करण्यात येत आहे.
- न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती गाडगीळ
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)