(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 27/05/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 24.11.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीत नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा बिल्डर व डेव्हलपर्सचा व्यवसाय असुन गैरअर्जदार क्र.3 व 4 यांचेतर्फे ते आममुखत्यार म्हणून काम पाहतात. तक्रारकर्त्याने स्वयंरोजगाराचे दृष्टीने गैरअर्जदारांकडे मौजा दिघोरी खुर्द, प.ह.नं. 34, राज्य नि.मंडळ, पारडी, वार्ड नं.21, तह.जि.नागपूर येथील खसरा नं.87/1, मधील प्लॉट नं.11, शिट नं.382/20, सिटी सर्व्हे नं.247, येथील आयुष अपार्टमेंट मधील तळमजल्यावरील रुम नं.2 व 3 एकूण रु.3,00,000/- ला खरेदी करण्याचे ठरविले. त्यानुसार दि.25.07.2005 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी ऍग्रीमेंट ऑफ डेव्हलपमेंट दस्त नं.2459 आणि आममुखत्यार पत्र दस्त नं.2460 हे गैरअर्जदार क्र.3 व 4 यांनी लिहून दिले. त्यानुसार तक्रारकर्त्याने रु.1,50,000/- धनादेश क्र.733595 व्दारे दि.11.10.2006 रोजी श्री. सुनिल उमरेडकर यांना व रु.1,50,000/- धनादेश क्र.733594 व्दारे दि.11.10.2006 रोजी श्री. संजय उमरेडकर यांना असे एकूण रु.3,00,000/- देऊन करारनामा व कब्जापत्र लिहून घेतल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदारांना संपूर्ण रक्कम देऊनही त्यांनी तळमजल्यावरील रुम नं.2 व 3 चे विक्रीपत्र करुन दिले नाही. तसेच तक्रारकर्ता काही दिवसांकरीता बाहेरगावी गेला असता गैरअर्जदारांनी कुठलीही पूर्व सुचना न देता त्याचे ताब्यातील दोन्ही रुमचे कुलूप तोडून जबरदस्तीने रुमचा ताबा घेतला. 4. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदारांना वारंवार विक्रीपत्र करुन देण्याबाबत विनंती केली असता ते टाळाटाळ करीत आहे, तसेच गैरअर्जदारांनी जबरदस्तीने रुमचा ताबा घेतल्यामुळे त्याचा व्यवसाय बंद पडल्यामुळे त्याला नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन सदर जागेचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केलेली आहे. तसेच त्याला होत असलेल्या नुकसानी दाखल रु.30,000/-, मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल रु.30,000/- नुकसानीची मागणी केलेली आहे. तसेच जोपर्यंत विक्रीपत्र होत नाही तोपर्यंत दररोज रु.1,000/- प्रमाणे नुकसान भरपाई व रु.1,000/- ची मानसिक त्रासाबद्दल मागणी केलेली असुन तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.10,000/- व नोटीसचा खर्च रु.5,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत. 5. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता त्यांनी सदर तक्रारीची नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाही व त्यांनी आपला जबाब दाखल केला नाही. त्यामुळे मंचाने दि.25.03.2011 रोजी गैरअर्जदार क्र.1 विरुध्द विना लेखी जवाब आदेश व गैरअर्जदार क्र.2 ते 4 विरुध्द एकतर्फी कारवाईचा आदेश पारित केलेला आहे. 6. सदर प्रकरण मंचासमक्ष दि.16.05.2010 रोजी युक्तिवादाकरीता आली असता तक्रारकर्त्याचे वकील हजर, त्यांचा युक्तिवाद ऐकण्यांत आला, सर्व गैरअर्जदार गैरहजर. मंचासमक्ष दाखल दस्तावेज व तक्रारकर्त्याचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रामाणे निष्कर्षाप्रत पाहचले. -// नि ष्क र्ष //- 7. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून मौजा दिघोरी खुर्द, प.ह.नं. 34, राज्य नि.मंडळ, पारडी, वार्ड नं.21, तह.जि.नागपूर येथील खसरा नं.87/1, मधील प्लॉट नं.11, शिट नं.382/20, सिटी सर्व्हे नं.247, येथील आयुष अपार्टमेंट मधील तळमजल्यावरील रुम नं.2 व 3 एकूण रु.3,00,000/- ला खरेदी केल्याचे, तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 6. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याने रु.1,50,000/- धनादेश क्र.733595 व्दारे दि.11.10.2006 रोजी श्री. सुनिल उमरेडकर यांना व रु.1,50,000/- धनादेश क्र.733594 व्दारे दि.11.10.2006 रोजी श्री. संजय उमरेडकर यांना असे एकूण रु.3,00,000/- देऊन करारनामा व कब्जापत्र लिहून घेतल्याचे तक्रारीसोबत दाखल दस्तावेज क्र.2, नागपूर नागरीक सहकारी बॅंक लि. यांनी धनादेशाबाबत दिलेल्या प्रमाणपत्रावरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्ता काही दिवसांकरीता बाहेरगावी गेला असता गैरअर्जदारांनी कुठलीही पूर्व सुचना न देता त्याचे ताब्यातील दोन्ही रुमचे कुलूप तोडून जबरदस्तीने रुमचा ताबा घेतला व रुम नं.2 व 3 ची संपूर्ण रक्कम मिळूनही तक्रारकर्त्यास सदर जागेचे विक्रीपत्र करुन दिले नाही, ही गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्त्याने त्याला होत असलेल्या नुकसानी दाखल रु.30,000/-, मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल रु.30,000/- नुकसानीची मागणी केलेली आहे. तसेच जोपर्यंत विक्रीपत्र होत नाही तोपर्यंत दररोज रु.1,000/- प्रमाणे नुकसान भरपाई व रु.1,000/- ची मानसिक त्रासाची मागणी केलेली असुन तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.10,000/- व नोटीसचा खर्च रु.5,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत. परंतु सदर मागण्या कोणत्याही दस्तावेजाव्दारे सिध्द केल्या नाहीत, त्यामुळे पुराव्या अभावी मान्य करता येत नाही. करीता न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.5,000/- मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 8. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही वरील निष्कर्षांच्या आधारे खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला मौजा दिघोरी खुर्द, प.ह.नं. 34, राज्य नि.मंडळ, पारडी, वार्ड नं.21, तह.जि.नागपूर येथील खसरा नं.87/1, मधील प्लॉट नं.11, शिट नं.382/20, सिटी सर्व्हे नं.247, येथील आयुष अपार्टमेंट मधील तळमजल्यावरील रुम नं.2 व 3 चे विक्रीपत्र व ताबापत्र आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करुन द्यावे. 3. गैरअर्जदार क्र.1 ते 4 आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.5,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |