सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 96/2009
तक्रार दाखल झाल्याचा दि. 13/11/2009
तक्रार निकाल झाल्याचा दि.30/06/2010
1) श्री प्रेमानंद हरिश्चंद्र सावंत
वय वर्षे 49, धंदा – नोकरी,
तर्फे कुलमुखत्यारी
सौ.अर्चना प्रेमानंद सावंत
वय वर्षे 47, धंदा – घरकाम,
रा.प्लॉट नं.5, रँको बंगलो वसाहत,
मु.पो.तुळस, ता.वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
श्री सुधिर विष्णू राणे
वय वर्षे सज्ञान, धंदा – ठेकेदारी,
रा.युनिट नं.2, पहिला माळा,
गुडविल प्रिमायसेस को.ऑप.सोसायटी,
स्वस्तिक इन्डेन इस्टेट, 176, विदयानगर मार्ग,
सांताक्रुझ (पूर्व) मुंबई – 400 098 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या 3) श्रीमती वफा जमशिद खान, सदस्या
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री निखिल गावडे
विरुद्धपक्षातर्फे- विधिज्ञ श्री एस.के. तायशेटे, श्री एस.एस. राऊळ.
आदेश नि.1 वर
(दि.30/06/2010)
1) विरुध्द पक्षाकडून तक्रारदाराने खरेदी केलेल्या भुखंडावर बांधण्यात आलेल्या निवासी इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे, सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तक्रारीचे नोटीस विरुध्द पक्षास बजावण्यात आले. त्यानुसार विरुध्द पक्ष हे मंचासमोर हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.9 वर दाखल केले.
2) दरम्यान तक्रारदाराने, बांधकामाची वस्तुस्थिती मंचासमोर येणेसाठी नि.11 वर कोर्ट कमीशनरची नेमणूक करणेसाठी अर्ज दाखल केला. तो अर्ज मंचाने मंजूर करुन कोर्ट कमीशनरची नेमणूक केली. त्यानुसार उशिराने कोर्ट कमीशन होऊन कोर्ट कमीशनरने त्यांचा अहवाल नि.24 वर प्रकरणात दाखल केला.
3) तक्रारदाराने दिलेल्या शपथपत्रावर विरुध्द पक्षातर्फे उलटतपासाची प्रश्नावली देण्यात आली. त्यावर तक्रारदाराने उत्तरावली नि.30 वर दाखल केली असून आपला पुरावा संपल्याचे पुरसीस नि.31 वर दाखल केले. त्यामुळे विरुध्द पक्षाने त्यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.32 वर दाखल केले. मात्र दरम्यान तक्रारदाराच्या वकीलांनी मंचासमोर हजर होऊन तक्रारदारास सदरची तक्रार पुढे चालवावयाची नसल्याचे स्पष्ट केले व नि.35 वरील दस्तऐवजाच्या यादीसोबत तक्रारदारास पाठविलेली नोटीस, तक्रारदाराने मंचाच्या नावाने केलेल्या अर्जाची प्रत व वकीलांना पाठविलेल्या पत्राची प्रत दाखल केली.
4) नि.35/2 वरील तक्रारदाराचे अर्जाचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने, त्याने दाखल केलेली तक्रार बंद करण्याची विनंती केल्याचे दिसून येते. मात्र प्रत्यक्षात तक्रारदार मंचासमोर हजर झाली नसल्यामुळे मंचाने तक्रारदाराचे वकीलांना सूचना करुन नोटीस पाठवावयास सांगीतले; परंतु नोटीस प्राप्त होऊन देखील तक्रारदार मंचासमोर झाले नाहीत; परंतु तक्रारदाराचे वकीलांनी दाखल केलेल्या तक्रारदाराचे पत्राचे (नि.35/3) व मंचाचे नावाने पाठविलेल्या अर्जाचे (नि.35/2) अवलोकन केल्यास तक्रारदारास तक्रार चालवावयाची नाही, हे स्पष्ट होत असल्यामुळे आम्ही सदरचे प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराने दाखल केलेल्या नि.35/2 वरील अर्जामध्ये केलेल्या विनंतीनुसार तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 30/06/2010
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-