नि.33 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 156/2010 नोंदणी तारीख – 18/6/2010 निकाल तारीख – 1/10/2010 निकाल कालावधी – 103 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री रामदास लक्ष्मण बर्गे 2. सौ विजयमाला रामदास बर्गे 3. सौ स्वाती सुनिल जाधव (पूर्वाश्रमीची स्वाती रामदास बर्गे) सर्व रा. कसबा पेठ, फलटण ता. फलटण जि. सातारा नं.1 ते 3 यांचे कुलमुखत्यार श्री रणजीत रामदास बर्गे, रा. कसबा पेठ, फलटण ता. फलटण जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आर.पी.घोरपडे) विरुध्द 1. श्री सिध्दीविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण कार्यालय – नारळीबाग, फलटण ता.फलटण जि.सातारा तर्फे चेअरमन श्री विनायक मनोहर नामजोशी 2. श्री सिध्दीविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण तर्फे चेअरमन श्री विनायक मनोहर नामजोशी रा.बारवबाग, लक्ष्मीनगर, फलटण ता.फलटण जि. सातारा 3. श्री सिध्दीविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण तर्फे व्हा.चेअरमन श्री प्रतापराव आनंदराव देशमुख रा. बुधवार पेठ, शिवाजी रोड, फलटण ता. फलटण जि.सातारा ----- जाबदार क्र.1 ते 3 (एकतर्फा) 4. श्री सिध्दीविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण तर्फे व्यवस्थापक श्री दिलीप वामन ढमाळ नारळीबाग, फलटण ता. फलटण जि. सातारा ----- जाबदार क्र.4 (अभियोक्ता श्री किशोर सटाले) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे प्रस्तुतकामी दाखल आहेत. जाबदार क्र. 1 ते 3 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. जाबदार क्र.4 यांनी नि.28 कडे लेखी म्हणणे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे सभासद आहेत त्यामुळे ते ग्राहक होत नाहीत. अर्जदार क्र.1 व 2 यांचा मुलगा व अर्जदार क्र.3 यांचा सख्खा भाऊ श्री अजित रामदास बर्गे हा जाबदार संस्थेचा संचालक होता व त्याच्या शिफारशीवरुन अनेक व्यक्तींना कर्जे दिली होती. सदरची कर्जे थकबाकीत गेलेने त्यांचेविरुध्द वसुली दावे सुरु आहेत. श्री अजित बर्गे यांनी ज्या ज्या कर्जदारांना कर्जे देणेस सांगितली ती कर्जे जोपर्यंत वसुल होत नाहीत, तोपर्यंत अर्जदार यांना त्यांच्या ठेवी परत मागणेचा अधिकार नाही. श्री अजित बर्गे यांना याकामी पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. जाबदार संस्थेच्या सर्व संचालकांनी राजीनामे दिलेले आहेत तसेच सदरचे संस्थेवर प्रशासकांची नेमणूक केलेली आहे. सबब प्रशासक यांना याकामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील करण्यात यावे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.4 यांनी कथन केले आहे. 4. अर्जदारतर्फे लेखी युक्तिवाद पाहिला तसेच अर्जदार व जाबदार क्र.4 तर्फे दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 5. अर्जदारचा तक्रारअर्ज पाहता अर्जदार क्र. 1 ते 3 यांचेतर्फे कुलमुखत्यार रणजीत रामदास बर्गे यांनी तक्रारअर्ज दाखल केलेला दिसतो. तक्रारअर्जदार यांच्या सहया नाहीत. कुलमुखत्यार यांनी स्वतःचे सहीने तक्रारअर्ज दाखल केलेला दिसतो. तक्रारअर्जावरती तारीख नाही म्हणजेच तक्रारअर्ज नियमानुसार दाखल नाही. 6. नि.1 चे पुराव्यासाठी दाखल केलेले नि.2 कडील शपथपत्र हे कुलमुखत्यार यांचे आहे. कायद्यानुसार कुलमुखत्यार यांचे शपथपत्र पुरावा म्हणून वाचता येणार नाही. 7. अर्जदार क्र.3 सौ स्वाती सुनिल जाधव (पूर्वाश्रमीची स्वाती रामदास बर्गे) या कुलमुखत्यार रणजीत रामदास बर्गे यांची बहीण असावी असे नावावरुन दिसते. नियमानुसार बहिणीसाठी रणजीत बर्गे यांना तक्रारअर्ज दाखल करता येणार नाही. सबब नियमानुसार योग्य पध्दतीने तक्रारअर्ज दाखल नसलेने सदर तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 8. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज निकाली काढणेत येत आहे. 2. खर्चाबाबत आदेश नाही. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 1/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |