Maharashtra

Additional DCF, Pune

cc/05/517

Sou Rajani Gopal Madane. - Complainant(s)

Versus

Shri Shriram Vaidya.(Director) Gurunath Travels Pvt Ltd. - Opp.Party(s)

Gandre

11 Mar 2011

ORDER

 
Complaint Case No. cc/05/517
 
1. Sou Rajani Gopal Madane.
28,Tulashibaug Colony, Pune.
...........Complainant(s)
Versus
1. Shri Shriram Vaidya.(Director) Gurunath Travels Pvt Ltd.
Sadashiv Peth, Madiwale Colony, Sanas Plaza, Pune.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Pranali Sawant PRESIDENT
  Smt SA Bichkar Member
  Smt. S.L.Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा: मा.अध्‍यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत

                         

  //  नि का ल प त्र  //

 

1)          सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्‍हा ग्राहक मंच येथे दाखल केला होता तेव्‍हा त्‍यास पिडिएफ/335/2001 असा नोंदणिकृत नंबर देण्‍यात आला होता. मा.राज्‍य आयोग, मुंबई  यांचे आदेशान्‍वये सदरचे प्रकरण अतिरिक्‍त पुणे जिल्‍हा मंच येथे वर्ग केल्‍यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपिडिएफ/517/2005 असा नोंदविण्‍यात आला आहे. 

 

2)          प्रस्‍तुत  प्रकरणातील जाबदारांनी दिलेल्‍या सदोष सेवे बाबत  झालेली नुकसानभरपाई  मिळण्‍यासाठी तक्रारदारानी सदरहू  अर्ज दाखल केलेला आहे.  या बाबत थोडक्‍यात हकीकत अशी की,  तक्रार श्रीमती. रजनी मदने हया त्‍यांचे पतीसह    जाबदार गुरुनाथ ट्रॅव्‍हल्‍स  यांनी आयोजीत  केलेल्‍या चारीधाम यात्रेला  दिनांक  25/05/2001 रोजी गेल्‍या असता दिल्‍ली ते हरिद्वार या प्रवासाचे दरम्‍यान त्‍यांचे बसला अपघात झाला.  झालेल्‍या अपघातामुळे तक्रारदार व त्‍यांचे पती प्रवास अर्धवट सोडून पुण्‍याला परत आले.   या नंतर जाबदारांना पत्र पाठवून आपण प्रवासासाठी भरलेली रक्‍कम व वैद्दकिय खर्च तसेच नुकसानभरपाईसह रक्‍कम  देण्‍यात यावी  अशा  आशयाचे पत्र दिले.  मात्र या पत्राला  जाबदारांनी सकारात्‍मक  प्रतीसाद न दिल्‍यामुळे तक्रारदारांनी सदरहू  अर्ज दाखल केला आहे.  आपण आपली व पतीची प्रवासासाठी  भरलेली एकुण रक्‍कम रु. 27,568/- , वैद्दकिय उपचारांच्‍या रकमांसह अन्‍य अनुषंगीक  रक्‍कम मंजूर काण्‍यात यावी  अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.

             तक्रारदारांनी  आपल्‍या तक्रार अर्जाचे पुष्‍ठयर्थ  शपथपत्र  व काही कागदपत्रे  हजर केली आहेत.

            प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदारांवरती  मंचाच्‍या नोटिसीची बजावणी झाले नंतर  विधिज्ञां मार्फत आपले म्‍हणणे दाखल केले.  आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये  तक्रारदारांच्‍या जाबदारांनी सर्व तक्रारी  नाकारलेल्‍या असून जाबदारांच्‍या प्रवास काळांच्‍या   शर्ती व अटी  तक्रारदारांला घडलेल्‍या घटने बाबत  तक्रार करण्‍याचा  अधिकार  नाही असे नमुद केले आहे.  घडलेला अपघात ही  एक  जाबदारांच्‍या अवाक्‍या बाहेरची घटणा असून ही घटणा   घडल्‍यानंतर जाबदारांनी तक्रारदारांला  व त्‍यांच्‍यासह  प्रवाशांना आवश्‍यक ती सर्व सेवा दिली होती असे   जाबदारांचे म्‍हणणे आहे.  अपघात घडला  त्‍या ठिकाणी  तक्रारदारालो व त्‍यांचे पतीला वैद्दकिय सेवा पुरविण्‍यात आली होती तसेच त्‍यांचया परतीची व्‍यवस्‍था  करण्‍यात आली होती­.   याचा विचार  करता तक्रारदाराचा अर्ज नामंजूर होण्‍यास पात्र ठरतो असे जाबदारांचे म्‍हणणे आहे.    अपघात घडल्‍यावर जाबदारांनी सर्व प्रवासांची  उत्‍तम काळजी घेतली अशा आशयाची  पत्रे त्‍यांना प्राप्‍त  झााली आहेत याचा विचार करता तक्रारदारानी फक्‍त आर्थिक  लाभ करुन घेण्‍याच्‍या हेतूने  अर्ज दाखल  केला आहे असे जाबदारांनी म्‍हणण्‍यात नमुद केले आहे.  प्राप्‍त परिस्थितीमध्‍ये   जाबदारांनी तक्रारदाराला सर्वोत्‍तम सोयी दिल्‍या होत्‍या.  याचा विचार करता  तक्रारदारांचा  अर्ज खर्चासह नामंजूर करावा  अशी जाबदारांनी विनंती केली आहे.

            जाबदारांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ  प्रतिज्ञापत्र व 20 कागदपत्रे मंचापुढे  दाखल केली आहेत.  प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदारांचे म्‍हणणे दाखल झाले नंतर तक्रारदारांनी निशाणी 23 अन्‍वये एकुण 4 कागदपत्रे  तर जाबदारांनी निशाणी 26 अन्‍वये  आपला लेखी युक्तिवाद मंचापुढे  दाखल केला.  यानंतर  तक्रारदाराचा स्‍वत:चा व जाबदारां तर्फे अड. श्री गानू यांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी ठेवण्‍यात आले.

 
[ Smt. Pranali Sawant]
PRESIDENT
 
[ Smt SA Bichkar]
Member
 
[ Smt. S.L.Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.