Maharashtra

Nagpur

CC/10/759

Shri Ramlal Baburao Meshram - Complainant(s)

Versus

Shri Shrawan Chirkutji Vidhya - Opp.Party(s)

Adv. Avinash Ramteke

10 Dec 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/759
 
1. Shri Ramlal Baburao Meshram
Ramabai Chowk, Vidya Nagar, Bramhapuri
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Shrawan Chirkutji Vidhya
Dhadiwal Layout, Ring Road, Suyog Nagar Chowk, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. M/s. Shri Builders and Developers
(1) Shri Bhujang Wamanrao Thakare, (2) Shri Rupesh Sudhakar Karemore (3) Shri Rupesh Shrawan Vaidya, R/o. Dhadiwal Layout Ring Road, Suyog Nagar Chowk, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE PRESIDENT
 HON'ABLE MRS. ALKA PATEL MEMBER
 HON'ABLE MS. GEETA BADWAIK MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती रोहीणी कुंडले - अध्‍यक्षा यांचे आदेशांन्‍वये)
 
                          -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 10/12/2012)
 
 
1.          तक्रारकर्त्‍यातर्फे अविनाश रामटेके यांचा युक्तिवाद ऐकला, विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 युक्तिवादाच्‍या दिवशी गैरहजर, उत्‍तर रेकॉर्डवर आहे.
2.          तक्रार प्‍लॉटची विक्री करुन मिळावी म्‍हणून दाखल आहे.
 
            तक्रार थोडक्‍यात...
3.          तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 मालकाकडून प्‍लॉट नं.35 (A) मधील जागेवर 130.92 sq.meter स्‍वामी समर्थ निवास अपार्टमेंट मधील 201 क्रमांकाचा दुस-या मजल्‍यावरील फ्लॅट, धडीवाल ले-आऊट, नरेन्‍द्र नगर जवळ, मौजा बाबुळखेडा, खसरा नं.58, प.ह.नं.39, सिटी सर्व्‍हे नं.6793/3, शीट नं.54, नागपूर. अशा वर्णनाचा फ्लॅट खरेदी करण्‍यासाठी दि.16.12.2009 रोजी रजिस्‍टर्ड करार केला, हा करार मालक विकासक आणि खरेदीदार यांच्‍यातील त्रिपक्षीय करार आहे. याची किंमत रु.14,00,000/- ठरली होती, पैकी रु.2,50,000/- तक्रारकर्त्‍याने करारनामा करतेवेळी विरुध्‍द पक्ष क्र.1 जागेचे मालक यांना दिले. उर्वरित रु.11,50,000/- रक्‍कम करारात ठरल्‍याप्रमाणे 7 महिन्‍यांत द्यायची होती. त्‍यानंतर विक्री व ताबा देण्‍याचे विरुध्‍द पक्ष क्र.1 ने मान्‍य केल्‍याचे करारात नमूद आहे. विरुध्‍द पक्ष क्र.2 मधे नमूद तीनही व्‍यक्ती विकासक आहेत.
4.          तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांना अनेकवेळा विक्री व ताबा देण्‍याची विनंती केली, त्‍याला प्रतिसाद मिळाला नाही म्‍हणून कराराप्रमाणे 7 महिनयांची मुदत संपल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 दि.06.07.2010 रोजी नोटीस दिली. नोटीसच्‍या उत्‍तरात विरुध्‍द पक्षांनी कोणताही व्‍यवहार तक्रारकर्त्‍यासोबत केला नाही, असे म्‍हटले आहे.
5.          असे असले तरी विरुध्‍द पक्ष क्र.2 ने मंचासमोरील हातातील तक्रारीला उत्‍तर देतांना दि.16.12.2009 रोजीचा करारनामा मान्‍य केला आहे. विरुध्‍द पक्ष क्र.2 (विकासक) विक्री व ताबा देण्‍यांस तयार आहेत. परंतु विरुध्‍द पक्ष क्र.1 (मालक) तयार नसल्‍याने तक्रारकर्त्‍याने पून्‍हा दि.28.10.2010 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 ला नोटीस दिली.
6.          तक्रारीस कारण घडले आहे, ती मुदतीत आहे व मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येते, असे तक्रारकर्ता म्‍हणतो.
7.          तक्रारकर्त्‍याची प्रार्थना...
      1)    उपरोक्‍त वर्णनाच्‍या फ्लॅटची विक्री व ताबा मिळावा.
      2)    नुकसान भरपाई रु.50,000/- विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 कडून मिळावी.
     3)    शारीरिक मानसिक त्रासाबद्दल खर्च रु.20,000/- मिळावा.
      4)    तक्रार खर्च रु.5,000/- मिळावा.
      5)    तक्रारीसोबत एकूण 9 दस्‍त जोडले आहेत.
8.          विरुध्‍द पक्ष क्र.1 चे उत्‍तर खालिलप्रमाणे...
            मंचाला अधिकारक्षेत्र नसल्‍याबद्दल प्राथमिक आक्षेप आहे. दि.16.12.2009 चा करार मान्‍य केला आहे. विरुध्‍द पक्ष क्र.1 म्‍हणतात की, कराराचे पालन तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी केले नाही, ठरल्‍याप्रमाणे मुदतीत रकमा भरल्‍या नाहीत.
 
9.          विरुध्‍द पक्ष क्र.1 मालक यांनी दिवाणी न्‍यायालयात विशेष दिवाणी वाद क्र.816/2010 तक्रारकर्त्‍याच्‍या व या प्रकरणातील विरुध्‍द पक्ष क्र.2 च्‍या विरोधात दाखल केलेला दावा सध्‍या कोर्टासमोर सुरु आहे. म्‍हणून ही तक्रार खारिज होण्‍यांस पात्र ठरते.
10.         विरुध्‍द पक्ष क्र.2 व तक्रारकर्ता यांचे संगनमताने ही तक्रार दाखल केली आहे.
 
11.         विरुध्‍द पक्ष क्र.2 विकासक यांच्‍यासोबत विरुध्‍द पक्ष क्र.1 मालकाने केलेल्‍या दि.19.05.2010 कराराचे पालन विरुध्‍द पक्ष क्र.2 ने व तक्रारकर्त्‍याने केले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांच्‍यातील करारही विरुध्‍द पक्ष क्र.1 वर बंधनकारक नसल्‍याचे ते म्‍हणतात.
12.         विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 (विकासक/मालक) आणि तक्रारकर्ता यांच्‍यात झालेला डेव्‍हलपमेंटचा करार दिवाणी दावा क्र.816/2010 चा विषय असल्‍याने त्‍याबाबत अंतिम निर्णय झाल्‍याशिवाय तक्रारकर्त्‍या सोबतच्‍या दि.16.12.2009 च्‍या कराराबाबत निर्णय होऊ शकत नाही.
 
13.         उपरोक्‍त कारणास्‍तव तक्रार खारीज करण्‍यायोग्‍य ठरते असे विरुध्‍द पक्ष क्र.1 म्‍हणतात.
            विरुध्‍द पक्ष क्र.2 चे उत्‍तर खालिल प्रमाणे...
 
14.         विरुध्‍द पक्ष क्र.2 विकासक विरुध्‍द पक्ष क्र.1 मालक यांच्‍यामधे जागेचा विकास करण्‍याचा रजिस्‍टर्ड करार दि.19.05.2010 रोजी झाला. त्‍याप्रमाणे ताबा मिळाला व बांधकाम सुरु असल्‍याचे नमूद आहे.
15.         तक्रारकर्त्‍यासोबतचा फ्लॅट खरेदीबाबत त्रिपक्षीय रजिस्‍टर्ड करार दि.16.12.2009 विरुध्‍द पक्ष क्र.2 मान्‍य करतात. ते पुढे म्‍हणतात की, तक्रारकर्त्‍याने करारात ठरल्‍याप्रमाणे मुदतीत वेळोवेळी रकमा भरल्‍या नाहीत. तक्रारकर्त्‍याकडून रु.11,50,000/- घेणे आहे त्‍यामुळे त्‍यांनी कराराचा भंग केला आहे.
16.         असे असले तरी विरुध्‍द पक्ष क्र.2 तक्रारकर्त्‍याला विक्रीपत्र व ताबा देण्‍यांस तयार असल्‍याने मंचासमोरील उत्‍तरात व दि.06.07.2010 च्‍या तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीसच्‍या उत्‍तरात मान्‍य केले आहे. दि.16.12.2009 रोजीचा करार त्रिपक्षीय आहे, विरुध्‍द पक्ष क्र.2 ताबा व विक्रीसाठी तयार असतांना विरुध्‍द पक्ष क्र.1 विरोध करीत असल्‍याने कराराचे पालन होऊ शकत नाही. यामधे विरुध्‍द पक्ष क्र.2 च्‍या सेवेत त्रुटी नाही, सबब तक्रार खारिज करण्‍याची विनंती ते करतात.
 
17.         मंचाने तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलांचा युक्तिवाद ऐकला, रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली त्‍यावरुन मंचाची निरीक्षणे व निष्‍कर्ष.
18.         दि.19.12.2009 रोजी तक्रारकर्ता (खरेदीदार), विरुध्‍द पक्ष क्र.1 (मालक) व विरुध्‍द पक्ष क्र.2 (विकासक) यांच्‍यात तक्रारीत वर्णनाच्‍या फ्लॅटखरेदीबाबत रजिस्‍टर्ड करारानुसार तक्रारकर्त्‍याला फ्लॅटचा ताबा व विक्रीपत्र करुन मिळण्‍यासाठी मंचासमोर तक्रार दाखल आहे.
 
19.         दस्‍त तपासले असता पुढे असे दिसते की, विरुध्‍द पक्ष क्र.1 मालक व विरुध्‍द पक्ष क्र.2 विकासक यांच्‍यातही दि.19.05.2010 रोजी एक करार झाला व या करारासंबधाने वाद उत्‍पन्‍न झाला.
20.         विरुध्‍द पक्ष क्र.1 मालक यांनी तक्रारकर्त्‍याविरुध्‍द आणि विरुध्‍द पक्ष क्र.2 विकासक यांच्‍या विरुध्‍द विशेष दिवाणी दावा क्र.816/2010 दाखल केला आहे व तो सुरु आहे. हा दावा मंचातील तक्रार दाखल करण्‍यापूर्वी दाखल करण्‍यांत आला आहे, असे निष्‍पन्‍न होते. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत ही बाब जाणूनबुजून उघड केली नाही. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने दिवाणी कोर्टात दावा दाखल केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने मंचात तक्रार दाखल केली आहे. दिवाणी दाव्‍यातील वादग्रस्‍त जागेचे/फ्लॅटचे वर्णन व या तक्रारीतील वादग्रस्‍त जागा/फ्लॅटचे वर्णन एकच आहे. म्‍हणून या तक्रारीवर निर्णय देणे उचित ठरणार नाही, असे मंचाचे मत आहे.
 
21.                  तक्रारकर्त्‍याने फ्लॅटसंबधाने उपस्थित केलेले मुद्दे दिवाणी न्‍यायालयातील प्रकरणात विरुध्‍द पक्ष क्र.1 ने उपस्थित केलेले मुद्दे हे दोन्‍ही विषय निर्णयार्थ सक्षम न्‍यायालयापुढे प्रलंबित आहेत अशा परिस्थितीत तक्रारीबाबत निर्णय देणे उचित ठरत नाही.             
 
            सबब तक्रारीच्‍या अन्‍य तपशिलात न जाता व कोणत्‍याही मुद्यावर finding न देता ही तक्रार निकाली काढण्‍यांत येते, सबब आदेश.
                -// अं ति म आ दे श //-
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार निकाली काढण्‍यांत येते.
2.    खर्चाबद्दल आदेश नाहीत.
 
 
[HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. ALKA PATEL]
MEMBER
 
[HON'ABLE MS. GEETA BADWAIK]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.