नि. २८
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.३५/२०११
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ०२/०२/२०१२
तक्रार दाखल तारीख : ०८/०२/२०११
निकाल तारीख :१४/०२/२०१२
-------------------------------------------
१. श्री नथुराम ज्ञानदेव सकरे,
व.व. – ५५, धंदा – शेती व कापड व्यवसाय
२. सौ निता नथुराम सकरे
व.व. – ४७, धंदा – घरकाम
३. कु.अनुपम नथुराम सकरे
व.व. – २०, धंदा – शिक्षण
४. कु.किरण नथुराम सकरे
व.व. – १६, धंदा – शिक्षण
५. कु.निलम नथुराम सकरे,
व.व. – १७, धंदा – शिक्षण
अर्जदार नं.१ ते ३ रा.आरळा ता.शिराळा,
जि. सांगली
अर्जदार नं.४ व ५ तर्फे अ.पा.क. वडील
अर्जदार नं.१ रा.आरळा ता.शिराळा,
जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. श्री शिवाजीराव देशमुख ग्रामीण बिगरशेती सहकारी
पतसंस्था मर्यादित आरळा, ता.शिराळा जि.सांगली
२. श्री वसंतराव रामचंद्र येसले, चेअरमन
वय सज्ञान, धंदा – मेडीकल,
रा. आरळा, ता.शिराळा जि.सांगली
३. श्री आनंदा ज्ञानू पाटील, व्हाईस चेअरमन
वय सज्ञान, धंदा – व्यापार,
रा. मणदूर, ता.शिराळा जि.सांगली
४. श्री अशोक ज्ञानदेव मोहिते. मानद सचिव
वय सज्ञान, धंदा – व्यापार,
रा. आरळा, ता.शिराळा जि.सांगली
५. श्री शामराव यशवंत कासार, संचालक
वय सज्ञान, धंदा – व्यापार,
रा. आरळा, ता.शिराळा जि.सांगली
६. श्री डॉ आनंद गणपती चौगुले, संचालक
वय सज्ञान, धंदा – डॉक्टर,
रा. आरळा, ता.शिराळा जि.सांगली
७. श्री मारुती ज्ञानदेव जाधव, संचालक
वय सज्ञान, धंदा – शेती व गिरणी,
रा. सोनवडे, ता.शिराळा जि.सांगली
८. श्री ज्ञानदेव हरी नाईक, संचालक
वय सज्ञान, धंदा – व्यापार,
रा. सोनवडे, ता.शिराळा जि.सांगली
९. श्री बाळासो विठोबा माने, संचालक
वय सज्ञान, धंदा – शेती,
रा. वारणावती, ता.शिराळा जि.सांगली
१०. श्री अनंत शंकर भुसारी, संचालक
वय सज्ञान, धंदा – व्यापार,
रा. आगाशिवनगर (मलकापूर),
ता.कराड जि.सातारा
११. श्री विनोदकुमार ओमप्रकाष अगरवाल, संचालक
वय सज्ञान, धंदा – व्यापार,
C/o अगरवाल जनरल स्टोअर्स, बुधवार पेठ, कराड
रा. कराड, जि.सातारा
१२. श्री सर्जेराव केशव फसाले, संचालक
वय सज्ञान, धंदा – नोकरी,
(पाटबंधारे विभाग कडेगाव)
रा.देवराष्ट्रे ता.कडेगांव जि.सांगली
१३. श्री गणपत राणोजी कांबळे, संचालक
वय सज्ञान, धंदा – व्यापार,
रा. मणदूर, ता.शिराळा जि.सांगली
१४. सौ अमृता अनिल बाजारे, संचालिका
वय सज्ञान, धंदा – व्यापार,
रा. वारणावती, ता.शिराळा जि.सांगली
१५. श्री विजय तुकाराम भाडुगळे, मॅनेजर
वय सज्ञान, धंदा – नोकरी,
रा. भाडुगळेवाडी-आरळा, ता.शिराळा जि.सांगली .....जाबदार
तक्रारदारú तर्फेò : +ìb÷. श्री एस.एम.घोलप
जाबदार क्र.१ ते १५ : +ìb÷. ÷. सौ उज्वला पाटील
नि का ल प त्र
द्वारा- मा.अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेव, दामदुप्पट ठेव व लखपती ठेव योजनेअन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार श्री शिवाजीराव देशमुख ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आरळा, ता.शिराळा जि.सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे विविध मुदतठेव योजनेअंतर्गत रकमा गुंतविल्या होत्या. तक्रारदार यांनी ठेवीच्या रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी रक्कम अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.३ अन्वये एकूण ३५ कागदपत्रे दाखल केली आहेत.
२. जाबदार क्र.१ ते १५ यांनी नि.२४ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्येजाबदार क्र.२ ते १५ यांना तक्रारदार यांनी विनाकारण पक्षकार केले आहे. तक्रार अर्ज कलम ५ मधील अ.नं.६ चे ठेवपावतीची संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळाल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. जाबदारक्र.२ ते १५ यांचेवर तक्रारदारांच्या रकमा देणेबाबत कोणतीही कायदेशीर जबाबदारी ठरविली जात नाही तोपावेतो त्यांनी ठेवी परत देण्यास जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रश्न उदभवत नाही. जाबदार क्र.१ संस्थेची सध्याची स्थिती अतिशय हलाखीची असून तक्रारदारांच्या संपूर्ण रकमा एकदम देण्याची परिस्थिती नाही. मात्र जसजसा वसूल येईल त्या प्रमाणात तक्रारदारांच्या रकमा परतफेड करणेस जाबदार तयार आहेत. सन्मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन क्र.५२२३/०९ प्रकरणी दिलेल्या निर्णयानुसार जाबदार क्र.२ ते १५ यांचेविरुध्द कोणताही रकमा देण्याबाबत आदेश करणे उचित होणार नाही. वरील कारणांचा विचार करुन तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे.
३. तक्रारदारांनी त्यांची रक्कम जाबदार पतसंस्थेमध्ये गुंतविल्याबाबतच्या ठेवपावत्यांच्या सत्यप्रती नि.२६ चे यादीने दाखल केल्या आहेत. सदर ठेवपावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी जाबदार संस्थेमध्ये विविध ठेव योजनेअंतर्गत रकमा गुंतविल्याचे दिसून येते. या ठेवपावत्यांपैकी काही ठेवींची मुदत पूर्ण झाल्याचे दिसून येते परंतु काही ठेवींची मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही. तक्रारदार यांचे ठेवपावत्यांचे पटकन अवलोकन व्हावे म्हणून खालीलप्रमाणे परिशिष्टमध्ये तपशील नमूद करण्यात येत आहे.
परिशिष्ट अ
अ.क्र. | पावती क्र. | नाव | ठेव रक्कम | ठेव ठेवल्याचा दिनांक | मुदत पूर्ण होण्याचा दिनांक | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
१ | १० | नथुराम ज्ञानदेव सकरे | २५००० | २७/८/०२ | २७/११/१२ | १००००० |
२ | ६२८ | नथुराम ज्ञानदेव सकरे | ६२४१८ | १८/२/०५ | १८/१/१२ | १२४८३६ |
३ | १४४४ | नथुराम ज्ञानदेव सकरे | ५००० | १३/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
४ | १४८५ | नथुराम ज्ञानदेव सकरे | ५००० | १३/६/०५ | १०/१२/१२ | ५००० |
५ | ११ | निता नथुराम सकरे | २५००० | २७/८/०२ | २७/११/१२ | १००००० |
६ | ४८९ | निता नथुराम सकरे | ५००० | १०/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
७ | ४९५ | निता नथुराम सकरे | ५००० | १०/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
८ | ४९८ | निता नथुराम सकरे | ५००० | १०/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
९ | १२ | अनुपम नथुराम सकरे | २५००० | २७/८/०२ | २७/११/१२ | १००००० |
१० | १४०७ | अनुपम नथुराम सकरे | ५००० | १३/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
११ | १४१९ | अनुपम नथुराम सकरे | ५००० | १३/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
१२ | १४३१ | अनुपम नथुराम सकरे | ५००० | १३/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
१३ | १३ | किरण नथुराम सकरे | २५००० | २७/८/०२ | २७/११/१२ | १००००० |
१४ | ४५९ | किरण नथुराम सकरे | ५००० | १०/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
१५ | ४६८ | किरण नथुराम सकरे | ५००० | १०/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
१६ | ४७१ | किरण नथुराम सकरे | ५००० | १०/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
१७ | १४ | निलम नथुराम सकरे | २५००० | २७/८/०२ | २७/११/१२ | १००००० |
१८ | ४४१ | निलम नथुराम सकरे | ५००० | १०/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
१९ | ४४६ | निलम नथुराम सकरे | ५००० | १०/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
२० | ४५६ | निलम नथुराम सकरे | ५००० | १०/६/०५ | १०/१२/१२ | १०००० |
परिशिष्ट ब
अ.क्र. | पावती क्र. | नाव | ठेव रक्कम | ठेव ठेवल्याचा दिनांक | मुदत पूर्ण होण्याचा दिनांक | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
१ | ६२० | नथुराम ज्ञानदेव सकरे | २०००० | ४/१२/०३ | ४/११/१० | ४०००० |
२ | ६२७ | नथुराम ज्ञानदेव सकरे | १२००० | १६/१/०५ | १६/१२/११ | २४००० |
३ | ६१९ | निता नथुराम सकरे | २०००० | ४/१२/०३ | ४/११/१० | ४०००० |
४ | ६२२ | अनुपम नथुराम सकरे | २०००० | ४/१२/०३ | ४/११/१० | ४०००० |
५ | ६१८ | किरण नथुराम सकरे | २०००० | ४/१२/०३ | ४/११/१० | ४०००० |
६ | ६२१ | निलम नथुराम सकरे | २०००० | ४/१२/०३ | ४/११/१० | ४०००० |
वरीलप्रमाणे रक्कम विविध ठेवींअन्वये तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे गुंतविली आहे. तसेच तक्रारदार यांनी बचत खात्यामध्ये खालीलप्रमाणे रक्कम गुंतविलेली आहे.
परिशिष्ट क
अ.क्र. | खाते क्र. | नाव | खात्यावरील रक्कम जमा केल्याची शेवटची तारीख | शेवटच्या दिनांकास जमा असलेली रक्कम रु. |
१ | १६४१ | नथुराम ज्ञानदेव सकरे | दि.२३/३/१० | ५६२१८ |
२ | १७३६ | निता नथुराम सकरे | दि.२३/३/१० | ८४५६६ |
तक्रारदार यांनी मागणी करुनही तक्रारदार यांना जाबदार यांनी रक्कम अदा केली नाही व सदोष सेवा दिली आहे त्यामुळे परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या मुदतपूर्व दामदुप्पट पावत्यांची मूळ रक्कम ठेव ठेवल्याचे तारखेपासून द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या मुदतपूर्ण पावत्यांची मुदतीनंतर होणारी रक्कम मुदत संपले तारखेच्या दुसरे दिवशीपासून द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. तसेच परिशिष्ट क मधील तक्रारदार यांच्या बचत खात्यावरील शेवटच्या तारखेस नमूद असलेली रक्कम त्या शेवटच्या तारखेपासून द.सा.द.शे. १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येते. ठेवपावती क्र.३०३१ व ३०३० वरील रक्कम बचत खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याने सदरचे ठेवपावत्या विचारात घेण्यात आलेल्या नाहीत.
४. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते १४ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. तसेच जाबदार क्र.१५ हे संस्थेचे कर्मचारी असलेने त्यांनाही तक्रारदाराची रक्कम देण्यास जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. सबब, रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
५. तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्कम मिळण्यासाठी या न्यायमंचात धाव घ्यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्यामुळे सदरची मागणी अंशत: मान्य करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था अथवा पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना वर
विवेचनातील परिच्छेद ३ मधील परिशिष्ट अ मध्ये नमूद असलेल्या दामदुप्पट
ठेवपावत्यांवरील मूळ रकमा तक्रारदारास अदा करावी तसेच सदर रकमांवर ठेव ठेवल्या
तारखेपासून द.सा.द.शे. १०% दराने व्याज अदा करावे असा आदेश करण्यात येतो.
२. यातील जाबदार पतसंस्था अथवा पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना वर
विवेचनातील परिच्छेद ३ मधील परिशिष्ट ब मधील ठेवपावत्यांची मुदतीनंतर होणारी
रक्कम तक्रारदारास अदा करावी तसेच सदर रकमेवर मुदत संपले तारखेचे दुसरे
दिवशीपासून द.सा.द.शे. १०% दराने व्याज अदा करावे असा आदेश करण्यात येतो.
३. यातील जाबदार पतसंस्था अथवा पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना वर
विवेचनातील परिच्छेद ३ मधील परिशिष्ट क मध्ये नमूद असलेल्या खात्यांवर शेवटच्या
दिनांकास नमूद असलेली रक्कम व सदर रकमेवर शेवटच्या दिनांकापासून द.सा.द.शे. १०%
दराने व्याज अदा करावे असा आदेश करण्यात येतो.
४. यातील जाबदार पतसंस्था अथवा पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना
शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- अदा
करावेत.
५. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्था अथवा पतसंस्थेतर्फे अधिकृत
प्रतिनिधी यांनी दि.२९/३/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण
कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: १४/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.