Maharashtra

Kolhapur

CC/10/317

Jawaharlal Annaso Rote. - Complainant(s)

Versus

Shri Shivaji Sah Bank Ltd. - Opp.Party(s)

S.K.kumbhar

23 Sep 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/317
1. Jawaharlal Annaso Rote.644 Shahupuri 1st lane Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Shivaji Sah Bank Ltd.Branch Kolhapur Gadhinglaj Kolhapur2. Shri Tanaji Ishwar Mohite, ChairmanAt Post Atyal, Tal.Gadhinglaj, dist.Kolhapur.3. Shri Uday Baburao Kadam, Vice ChairmanAt Post Saraswati Nagar, Gadhinglaj, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur.4. Shri Kisanrao Vitthalrao Kurade, DirectorAt Post Saraswatinagar, Gadhinglaj, Dist.Kolhapur.5. Shri Prakash Bhimrao Chavan, DirectorAt Post Chanekupi, Tal.Gadhinglaj, dist.Kolhapur6. Shri Kiran Dhondiram Kadam, DirectorAt Post Mata Niwas, Vadarage Road, Gadhinglaj, Dist.Kolhapur.7. Shri Vijaysingh Dattajirao Nalawade, DirectorAt Post Hanimnal, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur.8. Shri Pramod Jaysingrao Rananavare, Directorat Post Kadgaon, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur9. Shri Sanjay Tanajirao Mokashi, DirectorAt Post Nangnur, Tal.Gadhinglaj, Dist.Kolahpur.10. Shri Dipak Bhaiyaso Jadhav, DirectorAt Post Batakangale, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur.11. Shri Sangamsingh Khanderao Ghatage, DirectorAt Post Kadgaon, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur12. Shri Dattajirao Bajirao Desai, DirectorAt Post Inchnal, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur13. Shri Nishikant Ganpatrao Chote, Directorat Post Bhadgaon Road, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur.14. Shri Chandrakant Mayappa Kambale, DirectorAt Post Harali Khurd, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur.15. Shri Bhimrao Mallappa Pattankudi, DirectorAt Post Bhadgaon, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur.16. Shri Jotiram Shankarrao Kesarkar, DirectorAt Post Belgundi, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur.17. Shri Vishnupant Ramchandra Shinde, DirectorAt Post Dr.Rajendra Prasad Road, Gadhinglaj, Dist.Kolhapur.18. Shri Shrikant Pandurang Patil,DirectorShri Shivaji Sahakari Bank Ltd.,Gadhinglaj, Branch Kolhapur.19. Smt.Vijaymala Vijaysingh Rananavare, DirectorAt Post Kadgaon, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur.20. Sou.Nandprabha Krishnrao Chavan, DirectorAT Post Nul, Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur.21. Shri Sudhir Ramchandra Desai, General Manager,At Post Near Jagruti Highschool, Gadhinglaj, Dist.Kolhapur.22. Shri Tukaram Ganpati Patil, Branch ManagerAt Post Uchgaon, Karveer, Dist.Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.K.kumbhar, Advocate for Complainant

Dated : 23 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1, 20 व 21 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद ठेवीच्‍या स्‍वरुपात व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
1.
20189
14008/-
04.05.2005
04.07.2008
2.
20190
14008/-
04.05.2005
04.07.2008

 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. सदर ची रक्‍कम तक्रारदारांनी त्‍यांचे कौटुंबिक गरजेपोटी व जेंव्‍हा कुटुंबास गरज भासेल त्‍यावेळी ती रक्‍कम व्‍याजासह उपलब्‍ध व्‍हावी या उद्देशाने सामनेवाला यांचेकडे ठेवली होती. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.23.04.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, ठेवी मागणीसाठी केलेला पत्रव्‍यवहार व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.1, 20 व 21 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांना काही रक्‍कम उपलब्‍ध करुन देण्‍याची व्‍यवस्‍था करीत असलेचे कळविले होते. सध्‍या केंद्र व राज्‍य सरकारने शेतक-यांची शेती कर्जे माफ करणेचा निर्णय घेतल्‍याने शेतीकरिता घेतलेली कर्जे काही प्रमाणात माफ केली आहेत. माफ केलेल्‍या कर्जाची रक्‍कम अद्याप शासनाकडून बँकेस येणे आहेत. त्‍यामुळे ठेवी परत करणे अडचणीचे झाले आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.1, 20 व 21 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍यापुष्‍टयर्थ तक्रारदारांना ठेवीच्‍या रक्‍कमा घेवून जाणेबाबत दिलेल्‍या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. 
 
(7)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ तक्रारदारांना ठेव रक्‍कमा घेवून जाणेबाबत पाठविलेल्‍या पत्राची प्रत दाखल केली आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता सदरचे पत्र हे दि.08.06.2010 रोजीचे आहे व प्रस्‍तुतची तक्रार ही दि.26.05.2010 रोजी दाखल केलेली आहे. म्‍हणजेच सामनेवाला यांनी सदरचे तक्रारदारांना पाठविलेले पत्र हे पश्‍चातबुध्‍दीने पाठविलेचे स्‍पष्‍ट होते. तसेच, सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍यातील इतर कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 20 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.21 व 22 हे संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांची केवळ संयुक्तिक‍ जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2) सामनेवाला क्र.1 ते 20 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.21 व 22 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
20189
14008/-
2.
20190
14008/-
 
 
 
 
 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 20 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.21 व 22 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER