जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १३३/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २६/०७/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १६/०४/२०१३
१. श्री. बन्सीलाल हरी चौधरी
वय- ६५ वर्षे, धंदा – काहीनाही
२. सौ. लिलाबाई हरी चौधरी
वय- ६० वर्षे, धंदा – घरकाम
३. श्री. मिलींद बन्सीलाल चौधरी
वय – ४२ वर्षे, धंदा – नोकरी
४. श्री. अनिल बन्सीलाल चौधरी
वय – ४० वर्षे, धंदा – व्यवसाय
५. सौ. मिनाबाई दिनकर चौधरी
वय – ३८, धंदा – घरकाम
६. श्री. नितीन बन्सीलाल चौधरी
वय – ३५ वर्षे, धंदा – व्यवसाय
वरील सर्व राहणार – प्लॉट नं.१५, नविन एकता नगर,
देवपुर, धुळे.
एम.आय.सी.डी. जवळ ता.जि. धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
१. श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
सोनगीर ता.जि. धुळे
राहणार – सोनगीर ता.जि. धुळे.
श्री. शेखर कासार – म. व्यवस्थापक सो.
राहणार – सोनगीर ता.जि. धुळे.
२. श्री. ए.के. कासार – चेअरमन
श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
सोनगीर ता.जि. धुळे
राहणार – सोनगीर ता.जि. धुळे.
३. श्री. सुरेश रघुनाथ देशमुख – व्हा.चेअरमन
श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
सोनगीर ता.जि. धुळे
राहणार – सोनगीर ता.जि. धुळे.
४. श्री. सुधिर एकनाथ देशमुख – संचालक
श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
सोनगीर ता.जि. धुळे
राहणार – सोनगीर ता.जि. धुळे.
५. श्री. भटू पूंडलिक माळी – संचालक
श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
सोनगीर ता.जि. धुळे
राहणार – सोनगीर ता.जि. धुळे.
६. श्री. विनायक काशीराम वाणी – संचालक
श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
सोनगीर ता.जि. धुळे
राहणार – सोनगीर ता.जि. धुळे.
७. श्री. सत्तरखान नामदारखान पठाण – संचालक
श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत
सोनगीर ता.जि. धुळे
राहणार – सोनगीर ता.जि. धुळे. ........... विरूध्द पक्ष
कोरम
(मा. अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा. सदस्या – सौ.एस.एस. जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.के.आर. लोहार)
(विरुध्दपक्ष तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
सौ.एस.एस. जैन, सदस्याः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत सोनगीर ता.जि. धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
क्र. |
मुदत ठेव नं. |
ठेव तारीख |
देयक तारीख |
व्याज दर |
ठेव रक्कम |
देय रक्कम |
1. |
००४०५५ |
१५.०४.०८ |
१५.०४.०९ |
११.५० |
३९००० |
४३४८५ |
2. |
००४१२८ |
१८.०४.०८ |
१८.०४.०९ |
११ |
२४८८८ |
२७६२५ |
3. |
००४१२९ |
०६.०५.०८ |
०६.०५.०९ |
११ |
१४४७३ |
१६०६५ |
4. |
००४१३० |
०८.०५.०८ |
०८.०५.०९ |
११ |
१६७२५ |
१८५६५ |
5. |
००४१३७ |
२०.०३.०८ |
२०.०३.०९ |
११ |
१९८९० |
२२०७८ |
6. |
००४१४० |
१३.०५.०८ |
१३.०५.०९ |
११ |
७५०५५ |
८३३११ |
7. |
००४१४१ |
१३.०५.०८ |
१३.०५.०९ |
११ |
७५०५५ |
८३३११ |
8. |
००४१४२ |
१३.०५.०८ |
१३.०५.०९ |
११ |
७५०५५ |
८३३११ |
9. |
००४१४३ |
१३.०५.०८ |
१३.०५.०९ |
११ |
७५०५५ |
८३३११ |
10. |
००४१७० |
२९.०५.०८ |
२९.०५.०९ |
११ |
७२१५ |
७९७९ |
11. |
००४१७१ |
२१.०५.०८ |
२१.०५.०९ |
११ |
१६२९८ |
१८०९० |
12. |
००४२२६ |
२७.०६.०८ |
२७.०६.०९ |
११ |
३४००० |
३७७४० |
13. |
००४५४८ |
२९.१०.०८ |
२९.१०.०९ |
११ |
४१४८५ |
४६२५६ |
14. |
००४४५२ |
३१.१०.०८ |
३१.१०.०९ |
११ |
१६०९५ |
१७८६५ |
15. |
००४५४९ |
११.०२.०९ |
११.०२.१० |
११ |
४६७० |
५१८३ |
16. |
००४५५० |
३१.०१.०९ |
३१.०१.१० |
११ |
१३६८८ |
१५१९४ |
17. |
००४५५१ |
०९.०३.०९ |
०९.०३.१० |
११ |
१४०४२ |
१५५८७ |
18. |
००४५५२ |
२५.०२.०९ |
२५.०२.१० |
११ |
१३६८८ |
१५१९४ |
19. |
००४५५३ |
१४.०१.०९ |
१४.०१.१० |
११ |
१३६८८ |
१५१९४ |
20. |
००४५५४ |
०६.१२.०८ |
०६.१२.०९ |
११ |
३०१०५ |
३३५६० |
21. |
००४५५५ |
०७.०६.०८ |
०७.०६.०९ |
११ |
२१०९० |
२३४१० |
एकुण देय रक्कम |
७१२३१४ |
३. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावती मधील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
४. विरूध्द पक्ष यांनी मे. मंचाची नोटीस घेण्यास नकार दिल्याने त्यांचे नोटिस पाकिट परत आले आहे. सबब विरूध्द पक्ष यांचे विरूध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला आहे.
५. तक्रारदार यांची तक्रारव दाखल कागदपत्रे व युक्तीवाद यांचा विचार होता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हेग्राहकआहेतकाय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या
सेवेतत्रुटीकेलीआहेकाय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिमआदेशा प्रमाणे.
४. आदेशकाय? खालीलप्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतीच्या छायांकित प्रती नि. ११ ते नि. ३१ सोबत दाखल केलेल्या आहेत. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावत्यांवरील रक्कमा नाकारलेल्या नाहीत. मुदत ठेव पावत्या व त्यातील रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावत्यांमध्ये मध्ये रक्कमा गुंतवल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती मधील व्याजासह होणारी रक्कम श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत सोनगीर ता.जि. धुळे यांचेकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी विरूध्द पक्ष यांच्याकडून मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रू. ३०,०००/- व तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रककम रू.५,०००/- दयावेत अशी मागणी केली आहे.
९. तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावत्या मधील व्याजासह होणारी रक्कम श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत सोनगीर ता.जि. धुळे व विरूध्द पक्ष क्र.२ ते ७ यांच्याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of co-operation, which is the very foundation of establishment oftheco-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे संचालक मंडळाला वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत सोनगीर ता.जि. धुळे यांच्याकडुन रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत सोनगीर ता.जि. धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत सोनगीर ता.जि. धुळे यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
१०. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत सोनगीर ता.जि. धुळे यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्या मुदत ठेव पावत्यांमधील मुदतअंती देय रक्कम ठरलेल्या व्याजदरानुसार दयावी व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. मुदत ठेव पावतींचा तपशील खालील प्रमाणे.
क्र. |
मुदत ठेव नं. |
ठेव तारीख |
देयक तारीख |
व्याज दर |
ठेव रक्कम |
देय रक्कम |
1. |
००४०५५ |
१५.०४.०८ |
१५.०४.०९ |
११.५० |
३९००० |
४३४८५ |
2. |
००४१२८ |
१८.०४.०८ |
१८.०४.०९ |
११ |
२४८८८ |
२७६२५ |
3. |
००४१२९ |
०६.०५.०८ |
०६.०५.०९ |
११ |
१४४७३ |
१६०६५ |
4. |
००४१३० |
०८.०५.०८ |
०८.०५.०९ |
११ |
१६७२५ |
१८५६५ |
5. |
००४१३७ |
२०.०३.०८ |
२०.०३.०९ |
११ |
१९८९० |
२२०७८ |
6. |
००४१४० |
१३.०५.०८ |
१३.०५.०९ |
११ |
७५०५५ |
८३३११ |
7. |
००४१४१ |
१३.०५.०८ |
१३.०५.०९ |
११ |
७५०५५ |
८३३११ |
8. |
००४१४२ |
१३.०५.०८ |
१३.०५.०९ |
११ |
७५०५५ |
८३३११ |
9. |
००४१४३ |
१३.०५.०८ |
१३.०५.०९ |
११ |
७५०५५ |
८३३११ |
10. |
००४१७० |
२९.०५.०८ |
२९.०५.०९ |
११ |
७२१५ |
७९७९ |
11. |
००४१७१ |
२१.०५.०८ |
२१.०५.०९ |
११ |
१६२९८ |
१८०९० |
12. |
००४२२६ |
२७.०६.०८ |
२७.०६.०९ |
११ |
३४००० |
३७७४० |
13. |
००४५४८ |
२९.१०.०८ |
२९.१०.०९ |
११ |
४१४८५ |
४६२५६ |
14. |
००४४५२ |
३१.१०.०८ |
३१.१०.०९ |
११ |
१६०९५ |
१७८६५ |
15. |
००४५४९ |
११.०२.०९ |
११.०२.१० |
११ |
४६७० |
५१८३ |
16. |
००४५५० |
३१.०१.०९ |
३१.०१.१० |
११ |
१३६८८ |
१५१९४ |
17. |
००४५५१ |
०९.०३.०९ |
०९.०३.१० |
११ |
१४०४२ |
१५५८७ |
18. |
००४५५२ |
२५.०२.०९ |
२५.०२.१० |
११ |
१३६८८ |
१५१९४ |
19. |
००४५५३ |
१४.०१.०९ |
१४.०१.१० |
११ |
१३६८८ |
१५१९४ |
20. |
००४५५४ |
०६.१२.०८ |
०६.१२.०९ |
११ |
३०१०५ |
३३५६० |
21. |
००४५५५ |
०७.०६.०८ |
०७.०६.०९ |
११ |
२१०९० |
२३४१० |
एकुण देय रक्कम |
७१२३१४ |
३. श्री. गुरूगोविंद महाराज नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत सोनगीर ता.जि. धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या दिनांकापासून३० दिवसाचे आत अदा करावेत.
४. वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.