सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 06/2016
श्री. प्रल्हाद उत्तम कांबळी
वय 41 वर्षे, धंदा – व्यापार,
राहा.सातेरी मोटर्स, शॉप नंबर ए -4,
सत्तार कॉम्प्लेक्स, थिवीम इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी,
मुंबई – गोवा हायवेजवळ, करासवाडा,
म्हापसा, गोवा. ... तक्रारदार
विरुध्द
श्री. शशिकांत भिकाजी ठाकूर
वय सुमारे 55 वर्षे, धंदा – ठेकेदार,
रा.निवी-निवी आर्केड, मोरेश्वर बिल्डिंग,
बांदा, मुंबई-गोवा हायवे नजिक,
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री रामनाथ बावकर
आदेश नि.1 वर
(दि. 24/02/2016)
द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
- तक्रारदार यांनी सदरचे प्रकरण दि.10/02/2016 रोजी दाखल केलेले असून सदरचे प्रकरण दि.23/02/2016 रोजी अॅडमिशन हिअरिंगकरीता ठेवण्यात आलेले होते. तक्रारदारचे विधिज्ञ श्री बावकर यांनी दि.23/02/2016 रोजी अर्ज दाखल करुन न्यायनिर्णय दाखल करणेसाठी पुढील तारीख मिळणेसाठी केलेला विनंती अर्ज मंचाने मंजूर करुन पुढील ता.09/03/2016 देण्यात आली.
- दरम्यान आज तक्रारदार यांनी प्रकरण बोर्डवर घेण्याबाबत अर्ज दाखल केला. तसेच तक्रारदारास सदरची तक्रार तांत्रिक कारणामुळे मागे घ्यावयाची असलेबाबत पुरसीस दाखल केली.
- सबब हे मंच पुरसीसला अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराने दाखल केलेल्या पुरसीसला अनुसरुन सदरची तक्रार तांत्रिक कारणावरुन मागे घेण्यास परवानगी देण्यात येते व सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
- तक्रारदार यांना मूळ तक्रारीव्यतिरिक्त अन्य संच परत करण्यात यावेत.
- खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 24/02/2016
(वफा ज. खान) (अपर्णा वा. पळसुले)
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.