निकालपत्र :- (दि.10.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांच्या ठेव पावती तसेच प्राची कारेकर, रविंद्र कारेकर, प्रीती कारेकर, साक्षी कारेकर, जयश्री कारेकर, अविराज सांब्रेकर, विनीता सांब्रेकर, राजेश कळसुलकर, तुषार कळसुलकर, करण कारेकर, कल्पना भुर्के, प्रमोद कारेकर, शिवाजी कारेकर, शैलजा कारेकर, संजय कारेकर, प्रभाकर कारेकर, स्मित कारेकर इतयादीच्या ठेवी सामनेवाला संस्थेमध्ये ठेवलेल्या आहेत. सदर ठेवींची रक्कम सामनेवाला यांनी दिलेली नसल्याने सामनेवाला संस्थेच्या मालकीची कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सी वॉर्ड येथील सि.स.नं.1883/1 ते 6 या अंबाई चेंबर्स मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.101 क्षेत्र 56.89 चौ.मि.टेरेस हक्कासह सदर ठेव रक्कमांच्या फेडीपोटी दि.26.05.2007 रोजी सामनेवाला यांनी संचकारपत्र लिहून दिलेले आहे. परंतु, सदर संचकारपत्रानुसार सामनेवाला हे तक्रारदारास खरेदीखत करुन देणेस टाळाटाळ करीत आहेत. सबब, सदर संचकारपत्रानुसार खरेदीपत्र करुन देणेचे आदेश व्हावेत, तसेच उर्वरित रक्कम रुपये 5,67,010/- द.सा.द.शे.13 टक्के व्याजासह व मानसिक त्रासापोटी रुपये 1 लाख देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व संचकारपत्राची छायाप्रत तसेच, शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे व प्राथमिक मुद्दे काढून टाकणेत यावेत अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकणेत आले. तक्रारदारांनी दि.17.09.2009 रोजी तक्रारदारांना मिळकतीबाबतचे सर्व अधिकार दिले आहेत व तशी दुरुस्ती त्यांनी मागितली आहे. सामनेवाला यांनी प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही याबाबतचा प्राथमिक मुद्दा काढणेत यावा याबाबतचा अर्ज दिला आहे. सदर अर्जावरती तक्रारदारांनी म्हणणे दिले आहे. परंतु, प्रस्तुत तक्रारीमध्ये असलेली गुणवत्ता विचारात घेतली असता त्यावर या मंचाने युक्तिवाद ऐकून घेतलेले आहेत. या मंचामध्ये चालणारी प्रकरणे ही संक्षिप्त स्वरुपामध्ये चालत असतात. दिवाणी व्यवहार संहिता तसेच पुराव्याचा कायदा तंतोतंत लागू होत नाही. इत्यादीचा या मंचाने विचार केलेला आहे व त्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणात असलेल्या गुणवत्तेवर विचार करुन हे मंच निकाल पारीत करीत आहे. (6) तक्रारदार, प्रकाश प्रभाकर कारेकर व उपरोक्त उल्लेख केलेल्या प्राची कारेकर, रविंद्र कारेकर, प्रीती कारेकर, साक्षी कारेकर, जयश्री कारेकर, अविराज सांब्रेकर, विनीता सांब्रेकर, राजेश कळसुलकर, तुषार कळसुलकर, करण कारेकर, कल्पना भुर्के, प्रमोद कारेकर, शिवाजी कारेकर, शैलजा कारेकर, संजय कारेकर, प्रभाकर कारेकर, स्मित कारेकर इत्यांदींच्या नांवे असलेल्या ठेव पावत्यांच्या मोबदल्याच्या पोटी सामनेवाला यांच्याबरोबर वर नमूद मिळकतीबाबत संचकारपत्र केलेले आहे. सदर संचकारपत्रात तक्रारदार, प्रकाश कारेकर यांच्या व्यतिरिक्त कोणीही पक्षकार नाहीत. प्रस्तुत प्रकरणी स्थावर मिळकतीबाबतचा करार झालेला आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(ओ) यातील तरतुदींचा विचार करता स्थावर मिळकतीचा व्यवहाराबाबतचा वाद हा ग्राहक वाद होत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच, उपरोक्त उल्लेख केलेल्या सामनेवाला यांच्या ठेवीदारांनी स्वत: तक्रार दाखल केलेली नाही व त्यांनी स्वत: ठेवींची मागणी केलेली नाही. इतर ठेवीदारांच्या वतीने तक्रारदार, प्रकाश कारेकर यांना ठेव रक्कमा मागणेचा कोणताही अधिकार असलेचे दिसून येत नाही. तसेच, ठेव रक्कमांची मागणी तक्रारदारांनी केलेली नाही. इत्यादीचा विचार करता सदर तक्रारीत कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब, आदेश. आदेश (1) प्रस्तुतची तक्रार फेटाळणेत येते. (2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |