निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 13/07/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 23/07/2012
तक्रार निकाल दिनांकः- 18/11/2013
कालावधी 01 वर्ष. 03महिने. 26दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
गंगाधर पिता बापुराव पतंगे. अर्जदार
वय 65 वर्षे. धंदा.शेती. अॅड.सुनिल.बी.जाधव.
रा. रुढी ता.मानवत जि परभणी.
विरुध्द
1 प्रेाप्रायटर,श्री दत्तप्रसाद बांगड. गैरअर्जदार.
श्री.सिड्स अँन्ड फर्टीलायझर्स, मेन रोड, मानवत. अॅड.एस.एन.वेलणकर.
ता.मानवत जि.परभणी.
2 व्यवस्थापक
वेष्टर्ण अॅग्री सिड्स लि.802/11 वेष्टर्ण हाउस,
जि.आय.डि.सी. (इ एन जि सी)
इस्ट सेक्टर – 28 गांधी नगर 382 028 (गुजरात)
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा रुढी ता.मानवत जि.परभणी येथील रहिवाशी असून त्याला मौजे कोल्हा ता.मानवत शिवारामध्ये गट क्रमांक 285 मध्ये 3 हेक्टर 14 आर.पैकी 1 हेक्टर 04 आर जमिनीचा कायदेशिर मालक व कब्जेदार आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तो शेतकरी असून त्याने दिनांक 26/12/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडून “ भुईमुग वेष्टर्ण 44 ” या कंपनीचा म्हणजे गैरअर्जदार क्रमांक 2 याने निर्मित केलेली प्रत्येकी 20 किलोच्या एकुण 5 नग भुईमुगाच्या बॅग प्रत्येकी 22,00/- प्रमाणे एकुण 11,000/- रु.चे बी खरेदी केले, अर्जदाराचे म्हणणे की, सदरचे बी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून खरेदी केल्यानंतर दिनांक 30/12/2011 रोजी अर्जदाराने आपल्या सदरील शेतामध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 याने सांगीतल्या प्रमाणे पेरणी केली व भुईमुग पिकाची मशागत केली तसेच मुबलक प्रमाणात पाणी देण्यात आले. तसेच सदरचे पाणी देण्याकरीता अर्जदारास 24,000/- रु.चे खर्च करण्यात आले. त्यामुळे भुईमुग पिकाची मोठया प्रमाणात वाढ झाली, परंतु भुईमुगात माल लागला नाही म्हणजे शेंगा लागल्या नाहीत.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरची गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याने लगेच तालुका कृषी अधीकारी मानवत यांचेकडे अर्ज देवुन स्थळ पाहणीची विनंती केली, त्यानंतर कृषी अधिकारी मानवत याने मा.कृषी अधिकारी जि.प. परभणी यांना पत्रक देवुन अर्जदाराच्या शेतीची पाहाणी करुन दिनांक 15/05/2012 रोजी अहवाल पाठविले अर्जदाराचे म्हणणे की, कृषी अधिकारी मानवत यांनी केलेल्या पंचनाम्या मध्ये सदरचे बी हे सदोष असलेमुळे पिकास शेंगा जास्त प्रमाणात आलेले नाही, असा अहवाल दिला. त्यामुळे अर्जदाराचे 2,00,000/- रु.पेक्षा जास्त नुकसान झाले. गैरअर्जदार क्रमांक 1 याने सदोष बियाणाची विक्री करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, त्यामुळे अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले, व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन सदोष बियाणे दिल्याबद्दल गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, गैरअर्जदाराने अर्जदारास 2,00,000/- रु. द्यावे तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी 10,000/- रु. व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह 6 कागदपत्रांच्या प्रती दाखल केले आहे. ज्यामध्ये अर्जदाराने दिनांक 07/05/2012 रोजी कृषी अधिकारी मानवत यांना केलेला अर्ज, तालुंका कृषी अधिकारी यांचा पहाणी अहवाल, पंचनामा, 7/12 ऊतारा, बियाणाची खरेदी पावती व खत पावती दाखल केले आहे.
लेखी जबाब सादर करणेसाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 8 वर गैरअर्जदार क्रमांक 2 याने आपला लेखी जबाब सादर केला. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने 15,062/- एवढया किमतीचे युरिया खत श्री गणेश एजन्सी अॅग्रो एजन्सी मानवत कडून खेदी केल्याचे म्हंटले आहे. या बाबत खोटी व बनावटी पावती दाखल केलेली आहे. म्हणून ते ग्राहय धरणे योग्य नाही, गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने बियाणे खरेदीची जी पावती घेतली आहे, ती सी.एस.टी. नंबर वॅट नंबर सिड्स लायसेंन्स नंबरसह आहे व अशी पावती त्याने खताच्या दुकानातून का घेतली नाही. जी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. व तो गुन्हा आहे, तसेच गैरअर्जदाराने हे अमान्य केले आहे की, अर्जदारास खुरपणीसाठी 20,000/- रु. व पाण्यासाठी 24,000/- रु सदरच्या भुईमुग पिकासाठी आला. व तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने स्वतःच मान्य केले आहे की, भुईमुगाच्या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे. म्हणजे उगवणशक्ती बद्दल अर्जदाराची काही तक्रार नाही, परंतु अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, वाढ चांगली होवुनही भुईमुगास माल लागला नाही. हे म्हणणे अर्जदाराचे चुकीचे आहे तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 07/05/2012 रोजीच्या अर्जात तालुका कृषी अधिकारी मानवत यांनी व 17/05/2012 रोजी कृषी विकास अधिकारी जिल्हा परीषद परभणी यांना दिलेल्या पत्रात फळ धारणा कमी झाली हाच उल्लेख आहे, परंतु शेतकरी अर्जदार यांनी जास्त पैसे मिळवण्याच्या हेतुने तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संगणमत करुन टेबलावर बसून खोटा पंचनामा करुन घेतला आहे. उगवणी बाबत पंचनामा तयार केला व तेथेच तक्रारदार फसला त्याने जर कंपनीशी संपर्क केला असता तर निश्चितच त्यास योग्य मार्गदर्शन मिळाले असते, गैरअर्जदार क्रमांक 2 कंपनी गेल्या अनेक वर्षा पासून भुईमुगावर संशोधन करुन त्यांच्या अनेक वाणाची निर्मिती केली असून आज गुजराथ, महाराष्ट्र अनेक राज्यात भुईमुग बियाणे विकतात व शेतकरी प्रचंड पिक घेतात. अर्जदाराची सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. कृषी अधिकारी यांचा पंचनामा देखील खोटा आहे. म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 8/1 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
नि. क्रमांक 10 वर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी पुरशिस दिली आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचाच लेखी जबाब गैरअर्जदार क्रमांक 1 यांचा समजण्यात यावा.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास भुईमुगाचे सदोष बियाणे विक्री करुन
अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 अर्जदार गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मिळवण्यास
पात्र आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 26/12/2011 रोजी भुईमुगाच्या बी चे प्रत्येकी 20 किलो प्रमाणे एकुण 5 बॅगा गैरअर्जदार क्रमांक 1 कडून 11,000/- रु देवुन खरेदी केल्या होत्या, ही बाब नि.क्रमांक 4/5 वरील पावती वरुन सिध्द होते. तसेच अर्जदाराने सदरचे बियाणे खरेदी केल्यानंतर अर्जदाराने दिनांक 07/05/2012 रोजी तालुका कृषी अधिकारी मानवत यांना सदरच्या बियाण्यांची पाहणी करुन पंचनामा करणे बाबत तक्रारी अर्ज केला होता ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. तसेच तालुका कृषी अधिकारी मानवत यांनी पाहणी करुन प्रक्षेत्र पाहणी अहवाल व पंचनामा केला होता ही बाब नि.क्रमांक 4/2 व 4/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. सदरच्या प्रक्षेत्र पाहणी अहवाला मध्ये तालुका कृषी अधिकारी मानवत यांनी सदरच्या कंपनीचे बियाणे सदोष असून उगवण फक्त 90 टक्के झाली असा निष्कर्श दिला, ही बाब 4/3 वरील कागदपत्रावरुन दिसून येते. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरच्या बियाणास बियाणे पेरणी केल्यानंतर शेंगा जास्त न लागल्यामुळे अर्जदाराचे 2,00,000/- रुपायांचे नुकसान झाले, हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. कारण त्या बद्दल अर्जदाराने फक्त पुरावा म्हणून तालुका कृषी अधिकारी मानवत यांनी प्रक्षेत्र पाहणी अहवाल व पंचनामाची प्रत दाखल केलेली आहे. जे की, कायद्यान्वये योग्य नाही. याबाबत राष्ट्रीय आयोग दिल्ली यांनी 2013 (4) C.P.R. 219 ( N.C.) Shamsher Singh V/s M/s Magri Beej Bhandar & Anr. मध्ये Review Petition No. 2597/2012 मध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने असे म्हंटले आहे की, Based on report of one officer of Agricultural Department. It cannot be stated that version of complainant is true. व सदरचा निकाल हा प्रस्तुत तक्रारीस तंतोतंत लागु पडतो, तसेच राष्ट्रीय आयोग दिल्ली यांनी रिपोर्टेड केस (अ) 2007 (2) सी.पी.जे.पान 148 (राष्ट्रीय आयोग) (ब) 2008 (2) सी.पी.आर.पान 193 (राष्ट्रीय आयोग) या मध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने असे म्हंटले आहे की, When there was no laboratory testing report, then complaint wasliable to be dismissed. व सदरचा निकाल प्रस्तुत तक्रारीस लागु पडतो.कारण अर्जदाराने त्याने पेरलेल्या बियाचे Lab Testing report सदर प्रकरणात दाखल केला नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे सिध्द होत नाही. अर्जदार आपली तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.