नि.नं. ३९
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १०७६/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – १८/०९/२००८
तक्रार दाखल तारीखः – २५/०९/२००८
निकाल तारीखः - २४/०२/२०१२
----------------------------------------------
१. निवृत्ती मारुती यादव
व.व. – सज्ञान, धंदा – सेवानिवृत्त
२. विलास राजाराम यादव
व.व. – सज्ञान, धंदा – सेवानिवृत्त
३. हिराबाई भगवान कदम
व.व. – सज्ञान, धंदा – सेवानिवृत्त
४. हरीदास जालंधर गायकवाड
व.व. – सज्ञान, धंदा – सेवानिवृत्त
सर्व रा.सुखवाडी ..... तक्रारदारú
विरुध्द
१. श्री संतसेना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंकलखोप
मुख्य कार्यालय, ता.पलूस जि.सांगली
रजी नंबरSAN/TGN/RSR/CR 803/91/92
२. श्री भालचंद्र भरमु कुंभोजकर
३. श्री शिवाजी सखाराम सुर्यवंशी, व्हाईस चेअरमन
४. श्री ज्ञानदेव दत्तात्रय गायकवाड, संचालक
(दि.११/८/११ रोजीचे मंचाचे आदेशान्वये वगळले.)
५. श्री जनार्दन निवृत्ती गायकवाड, संचालक
६. श्री दिलीप नारायण साळुंखे, संचालक
७. श्री विकास शंकर कुराडे, संचालक
८. श्री रामचंद्र दाजी चौगुले, संचालक
९. श्री वसंत कृष्णा गायकवाड, संचालक
(दि.११/८/११ रोजीचे मंचाचे आदेशान्वये वगळले.)
१०. श्री आनंदा म्हलारी कुराडे, संचालक
११. श्री नारायण सुखदेव हजारे, संचालक
१२. गोपाळराव आ. सुर्यवंशी, संचालक
१३. श्री ताजुदीन अब्दुल मुल्ला,
सर्व रा. मु.पो. सुखवाडी, ता.पलुस जि. सांगली .....जाबदार
तक्रारदारú तर्फेò: +ìb÷. पी.एम.मैंदर्गी
जाबदार क्र.१ ते ३, ५ ते ८, १० ते १३: एकतर्फा
जाबदार क्र.४ व ९: वगळले
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेव व दामदुप्पट ठेवींअन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार श्री संतसेना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंकलखोप ता.पलूस जि.सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्या होत्या. यातील एका ठेवीची मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही. उर्वरीत ठेवींच्या मुदती पूर्ण झाल्या आहेत. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.६ अन्वये एकूण ६ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १ ते ३, ५ ते ८, १० ते १३ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले. जाबदार क्र.४ व ९ यांना मंचाचे दि.११/८/११ चे आदेशान्वये प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले.
३. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २, ३, ५ ते ८, १० ते १३ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
४. तक्रारअर्जाचे अवलोकन करता ४ तक्रारदारांनी मिळून सदरहू तक्रारअर्ज दाखल केल्याचे दिसून येते. हे चारही तक्रारदार एकाच कुटुंबातील नसल्याचे त्यांचे आडनावावरुन कळून येते. मात्र तक्रारदारांनी नि.४ अन्वये ग्राहक संरक्षण कायदा कलम १२सी अन्वये एकत्रित तक्रार दाखल करण्यास परवानगी मिळावीयाकरिता अर्ज दाखल केला असून, तो मंजूर करणेत आलेला आहे. सबब ठेवींतील रकमा तक्रारदारांना मंजूर करणेत येत आहेत.
५. तक्रारदारांनी नि.३४ अन्वये ठेवपावत्यांच्या सत्यप्रती प्रस्तुत प्रकरणी दाखल केल्या आहेत. या सत्यप्रतींचे अवलोकन करता तसेच तक्रारदारांनी नि.३३ अन्वये दाखल केलेल्या व्याज निवेदनाचे अवलोकन करता सदर ठेवपावत्यांतील रकमांवर तक्रारदारांना काहीही व्याज प्राप्त झाले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मुदत ठेवीतील गुंतविण्यात आलेली रक्कम ठेव ठेवल्या तारखेपासून पावतीवर नमूद व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. तसेच ज्या दामदुप्पट ठेवपावत्यांची मुदत पूर्ण झाली आहे, त्या पावत्यांतील मुदतीनंतर मिळणारी रक्कम ठेवीची मुदत संपलेनंतर दुसरे दिवशीपासून द.सा.द.शे. १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत तर ज्या दामदुप्पट ठेवपावतीची मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या पावतीतील गुंतविण्यात आलेली रक्कम ठेव ठेवल्या तारखेपासून द.सा.द.शे. १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. हे व्याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.२६१ मधील रक्कम रु.४०,०००/- (रुपये चाळीस हजार फक्त) दि.२५/३/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.२५४ मधील रक्कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) दि.८/७/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
३. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.४० मधील रक्कम रु.२०,०००/- (रुपये वीस हजार फक्त) दि.११/७/२०११ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
४. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.६४ मधील रक्कम रु.२०,०००/- (रुपये वीस हजार फक्त) दि.३/१२/२०११ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
५. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.७३ मधील रक्कम रु.२०,०००/- (रुपये वीस हजार फक्त) दि.८/९/२००५ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
६. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
७. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.९/४/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: २४/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.