जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/120. प्रकरण दाखल तारीख - 16/05/2009 प्रकरण निकाल तारीख – 16/12/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य भानुदास पि.रामचंद्र कलवले वय,53 वर्षे, धंदा वकीली, रा. गांधी नगर, नांदेड ता.जि. नांदेड अर्जदार विरुध्द. 1. श्री. संजय गुजराती अधिकृत प्रेमियम डिलर, (नोकिया) हँडसेट कंपनी, हॅलो पॉईट, दि कम्पालिट शॉपी दुकान नंबर 7, आयटीआय कॉर्नर, व्हीआयपी रोड, नांदेड. 2. अधिकृत विक्रेता, हि टेक कम्यनिकेशन, गोदावरी कॉम्प्लेक्स, नांदेड-2. गैरअर्जदार 3. प्राधिकृत अधिकारी, मोबाईल वर्ल्ड-5, कोठारी कॉम्पलेक्स, शिवाजी नगर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.जी.एस.भालेराव गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.इम्रानखान पठाण. गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) सर्व गैरअर्जदार यांचे विरुध्द वॉरंटी काळात हँडसेट दूरुस्त करुन दिला नाही म्हणून ञूटीची सेवा दिल्याबददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार यांनी दि.23.5.2008 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून नोकिया मॉडेल 5310 हा हँडसेट रु.9000/- विकत घेतला. त्यासाठी गैरअर्जदार यांनी एक वर्षाची वॉरंटी दिली होती परंतु लवकरच दि.17.12.2008 रोजी हँडसेट बंद पडला. म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे दूकानात गेले व बीघडलेला हॅडसेट बदलून देण्याची विनंती केली परंतु त्यांनी बीघडलेला हँडसेट तपासणीसाठी व बदलण्यासाठी रु.200/-घेऊन त्यांची पावती दिली व दोन दिवसानंतर येण्याचे सांगितले. परत अर्जदार हे दि.19.12.2008 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे गेले असता त्यांनी ब्ल्यू टयूथ बसवून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रु.1500/- किंमतीस ब्ल्यू टूथ बसवून दिला. परंतु नंतर थोडया दिवसांतच हँडसेट परत बंद पडला. म्हणून परत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे संपर्क साधला असता त्यांनी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे जाऊन सदरचा हॅडसेट बदलून घेण्याचा सल्ला दिला. याप्रमाणे ते दि.22.12.2008 रोजी गेले असता गैरअर्जदार क्र.3 यांनी सदर हॅडसेट हा सदर कंपनीस पाठविला. यानंतर काही दिवसांत गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून असे पञ मिळाले की नोकिया हँडसेट खोलण्यात आलेला असल्यामूळे तो आता वॉरंटीत नाही. म्हणून बदलून मिळणार नाही. गैरअर्जदार क्र.3 हे दाद देत नाहीत म्हणून शेवटी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना दि.7.2.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. परंतु यापैकी कोणीही नोटीसला उत्तर दिले नाही. नोकिया हॅडसेट वॉरंटीच्या काळात बीघडल्यामूळे गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे हॅडसेट बदलून देण्यास जबाबदार आहेत. गैरअर्जदार क्र.1 हे हॅडसेट दूरुस्तीचे काम करणारे असल्याने त्यांना हॅडसेट उघडल्यावर कंपनी हॅडसेट बदलून देत नसते यांची जाणीव असतानासूध्दा त्यांनी हॅडसेट उघडला व ब्ल्यू टूथ बसविले. त्यांना रु.1500/- खर्चात टाकले. त्यामूळे त्यांनीही रु.1500/- वापस दयावेत तसेच नूकसान भरपाई रु.5000/- व कारवाईचा खर्च रु.5000/- मिळावेत म्हणून हा अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे अर्जदाराची तक्रार ही असत्य व बनावट असून अर्जदार हा प्रथम मोबाईल संच बीघडला असता त्याचेकडे आले त्यांनी सांगितले की, सदरील मोबाईल संच आमच्या दूकानात खरेदी केलेला नाही तूम्ही गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे जा ते नोकिया अधिकृत सेवा देणारे आहेत. तेव्हा ते विनामूल्य मोबाईल संच बनवून देतील. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे गेले असता सदरील मोबाईल संच बनवून मिळण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल असे सांगितले. गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे ते परत आले व गैरअर्जदार क्र.3 हे उशिर लावत आहेत म्हणून तूम्ही तूमच्या कडून मोबाईल संच दूरुस्त करुन दया, यावर गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास समजावून सांगितले की, सदरील मोबाईल संच आमच्या प्रायव्हेट सर्व्हीस सेंटरवर मोबाईल दूरुस्तीस आणला तर तूमच्या मोबाईलची वॉरंटी संपूष्टात येईल व तूम्हास पून्हा गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून सदरील मोबाईल संच वॉरंटीमध्ये विनामूल्य दूरुस्त करुन मिळणार नाही हे सांगून देखील अर्जदाराने मोबाईल संच दूरुस्त करण्यास सांगितले. त्यामूळे गैरअर्जदाराने मोबाईल मध्ये माईक प्रोब्लेम असल्याचे व रु.200/- खर्च लागेल असे सांगितले. परंतु सदर मोबाईल दूरुस्त करुन देण्यासारखा नव्हता. म्हणून अर्जदारास तो विनामूल्य दोन दिवसानंतर परत दिला. अर्जदाराने परत विनंती केली की, सदरील मोबाईल संच चालू करुन दया तेव्हा गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास ब्ल्यू टूथ 207 घेण्याचा सल्ला दिला व त्याचेकडून रु.1500/- घेतले, ब्ल्यू टूथ बसवून दिला हे म्हणणे खोटे आहे कारण हे संचामध्ये खोलून बसविले जात नाही हे एक वायरलेस सर्व्हीस आहे. ज्यासाठी फक्त मोबाईल संचातील एक फंक्शन ब्ल्यू टूथ ऑन करावे लागते व त्याप्रमाणे सदरील मोबाईल संचास हा ब्ल्यू टूथ कनेक्ट करुन अर्जदारास देण्यात आला. म्हणून अर्जदाराने दाखल केलेली तक्रार ही खोटी असून त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना विनाकारण या प्रकरणात गोवली आहे म्हणून तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना नोटीस तामील होत नाही म्हणून जाहीर वर्तमान पञात समन्स काढण्यात आले. यानंतरही ते हजर न राहील्याकारणाने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रारीत सूरुवातीसच अतीशय स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून नोकीया हॅडसेट मॉडेल 5310 रु.9000/- खरेदी केला होता व त्यांस एक वर्षाची वॉरंटी होती व मग असे असताना अर्जदार हे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे हॅडसेट दूरुस्तीसाठी न जाता त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे का गेले ? कारण जेथून हॅडसेट विकत घेतला आहे तेथेच जाऊन हॅडसेटमध्ये काय प्रोब्लेम आहे हे सांगावयास पाहिजे होते. इतकेच नव्हे तर अर्जदार हे नोकिया सर्व्हीस सेंटर म्हणजे गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे पण सूरुवातीसच गेले नाहीत. गैरअर्जदार क्र.1 यांचे म्हणण्यानुसार त्यांनी अर्जदारास अधिकृत विक्रेते व अधिकृत सर्व्हीस सेंटर यांचेकडे तूमचा मोबाईल संच दाखवावा कारण तो वॉरंटीत आहे परंतु अर्जदाराने न ऐकता गैरअर्जदार क्र.1 यांनाच रु.200/- देऊन प्रोब्लेम पाहण्यास सांगितले. गैरअर्जदार क्र.1 यांच्या म्हणण्यानुसार तो हॅडसेट दूरुस्त होत नव्हता म्हणून त्यांनी तो अर्जदारास वापस दिला व गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे जाण्याचा सल्ला दिला. नोकिया सेटर ने तो हॅडसेट कंपनीला पाठविला असता कंपनीकडून असे पञ आले की, हॅडसेट हा खोलण्यात आलेला असून तो छेडछाड केल्यामूळे तो वॉरंटीत येत नाही. त्यामूळे अधिकृत विक्रेते गैरअर्जदार क्र.2 व अधिकृत सर्व्हीस सेंटर गैरअर्जदार क्र.3 या दोघाचीही जबाबदारी संपली आहे. कारण हॅडसेटमध्ये छेडखानी करण्यात आली आहे व हे स्वतः अर्जदार यांनी कबूल केलेले आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे हा हॅडसेट दिला होता ते म्हणतात आम्ही तो हॅडसेट दूरुस्त होत नव्हता म्हणून रु.1500/- घेऊन ब्ल्यू टूथ बसवून दिला व त्यासाठी हॅडसेट उघडला नाही तो डिव्हाईस वरच्या वर बसवून दिला परंतु या त्यांच्या म्हणण्यात आम्हास काही तथ्य वाटत नाही. कारण गैरअर्जदार क्र.1 यांनी रु.200/- घेतले व दोन दिवसानंतर तो दूरुस्त न करता दूरुस्त होत नाही म्हणून वापस केला. याचा अर्थ त्यांनी तो हॅडसेट उघडला होता. कारण न उघडता तो दूरुस्त होत नाही असे कसे म्हणता येईल ? गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास हॅडसेट उघडल्यास तो वॉरंटीत दूरुस्त करुन मिळणार नाही असा सल्ला दिला हे म्हणणे खोटे वाटते व अर्जदारास देखील गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे न जाता गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे ते गेले यांचा अर्थ यात काही तरी दोघेही लपवत आहेत. कारण कूठलाही ग्राहक हा जेथून हॅडसेट विकत घेतला तेथेच आधी जाईल. त्यामूळे ही सर्व बनवाबनवी वाटते. अर्जदार व गैरअर्जदार हे खरे कारण काय आहे हे समोर आणत नाहीत. तसेच हॅडसेट बंद असला किंवा माईक प्राब्लेम असला तर तो हॅडसेट चालू होण्यासाठी ब्ल्यू टूथ बसविण्याची काय गरज पडली ? याचा हॅडसेट चालू होण्याशी काय संबंध आहे ? त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांनी निश्चितपणे गडबड केलेली आहे व विना कारण अर्जदारास खर्चात टाकलेले आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 एकतर्फा जरी असले तरी वॉरंटीमधील हॅडसेट हा कंपनीने दूरुस्त करुन दिला पाहिजे यात स्पष्टपणे हँडसेटमध्ये छेडखानी केलेली आहे म्हणून कंपनी दूरुस्त करुन किंवा बदलून देणार नाही व अर्जदाराची ही चूक आहे ते गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे गेले. वरील सर्व बाबी पाहिल्या असता गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचेकडून घेतलेली रक्कम मोबाईल जर दूरुस्त होत नसेल तर ते त्यांनी वापस करावयास पाहिजे होते पण तसे त्यांनी केले नाही. म्हणून ञूटीची सेवा दिली व अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असे म्हणण्यास हरकत नाही. म्हणून तेवढी रक्कम अर्जदारास देण्यास ते बांधीत आहेत. शिवाय त्यांनी मानसिक ञासाबददलही भरपाई दिली पाहिजे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 यांनी रु.1700/- अर्जदारास दि.19.12.2008 पासून त्यावर 10 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह वापस दयावेत. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक ञासाबददल रु.1000/- व दावा खर्च म्हणून रु.500/- मंजूर करण्यात येतात. 4. नोकिया मोबाईल हॅडसेटची वॉरंटी संपल्यामूळे अर्जदारास हॅडसेटची किंमत मिळणार नाही. त्यामूळे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे विरुध्द आदेश नाही. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |