जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १३७/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २८/०८/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २४/०६/२०१४
१) श्री.दिलीप भिका वाणी
उ.व. ५९ वर्षे धंदा – जेष्ठ नागरीक
२) सौ.माधुरी दिलीप वाणी
उ.व.४६ वर्षे धंदा – घरकाम
दोघे रा. वृंदावन कॉलनी,
मु.पो. निजामपूर ता.साक्री जि.धुळे - तक्रारदार
विरुध्द
- श्री समर्थ सहकारी पतसंस्था मर्या.धुळे
- , नगरपट्टी समर्थ भवन धुळे
(नोटीसची बजावणी चेअरमन यांच्यावर करण्यात यावी)
- चेअरमन - श्रीमती कुमोदिनी दिनानाथ पंचभाई
उ.व. ५५ वर्षे धंदा – व्यापार
- , नगरपट्टी समर्थ भवन धुळे
- मुख्यकार्यकारी अधिकारी – श्री सचिन सुरेश कुलकर्णी
उ.व. ३५ वर्षे धंदा – नोकरी
श्री समर्थ सहकारी पतसंस्था मर्या, धुळे
- , नगरपट्टी समर्थ भवन धुळे - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.एच.एस. वाणी)
(सामनेवाले तर्फे – वकिल श्री.वाय.बी. जोशी)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
१. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
- ‘श्री समर्थ सहकारी पतसंस्था मर्या धुळे’ या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते मध्ये रक्कम गुंतविली होती. त्याचा तपशील खालील प्रमाणे.
ठेवीदार श्री.दिलीप भिका वाणी
| पावती क्र. | ठेव ठेवल्याचे दि. | मूळ रक्कम | मुदत पूर्ण रक्कम | मुदत पूर्ण दिनांक |
१) | ५१३१७ | १५/३/२०१०, १०% | १,१०,०००/- | १,२५,९०९/- | ३१/८/२०११ |
२) | ५०४०० | ११/४/२००७, १०% | ५०,०००/- | ६४,४३८/- | ३१/८/२०११ |
३) | सेव्हिंग खाते नं.४०/३४२ रक्कम रू.७,९१७/- |
ठेवीदार सौ.माधुरी दिलीप वाणी
| पावती क्र. | ठेव ठेवल्याचे दि. | मूळ रक्कम | मुदत पूर्ण रक्कम | मुदत पूर्ण दिनांक |
१) | ०२९२ | १२/४/२००६, दा.दु. | १०,०००/- | २०,०००/- | १२/१०/२०१२ |
२) | ५१३१८ | १९/३/२०१०, १०% | ४५,०००/- | ५१,५०८/- | ३१/८/२०११ |
३) | सेव्हिंग खाते नं.४०/९४५ रक्कम रू.४,०००/- |
एकूण रक्कम रूपये २,७३,७७२/-
(अक्षरी रक्कम रूपये दोन लाख त्र्यहत्तर हजार सातशे बहात्तर मात्र)
- सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदत ठेव पावतींमधील व बचत खात्यातील एकूण देय रक्कम रूपये २,७३,७७२/- व त्यावर मुदत पुर्ण झालेपासून शेकडा १२ टक्के प्रमाणे व्याज आणि मानसिक,शारिरीक व आर्थिक त्रासाचे नुकसान भरपाईपोटी रक्कम रूपये २५,०००/-. तसेच वरील नमूद रक्कमेवर द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे निकाल तारखेपासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५०००/- सामनेवाला नं.१ ते ३ यांचेकडून मिळावा, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ नि.१० ते नि.१३ वर मुदत ठेव पावतीची छायांकित प्रत, नि.१४ व १६ वर बचत खाते पुस्तकाची छायांकित प्रत आणि नि.१५ वर सामनेवाला यांना पाठविलेली नोटीसीची प्रत दाखल केलेली आहे.
- ‘नो से’ चा आदेश पारित करण्यात आला आहे.
६. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? होय
- तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून देय रक्कम
व्याजासह आणि मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्या
खर्चापोटी भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
- ? अंतिम आदेशा प्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ नि.१० ते नि.१३ वर मुदत ठेव पावतींची छायांकित प्रत आणि नि.१४ व १६ वर बचत खाते पुस्तकाची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची मुदतठेव पावती व बचत खातेमधील रक्कम नाकारलेली नाही. सदरील ठेवपावती व बचत खातेमधील रक्कमेचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘ब’- तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, त्यांनी पतसंस्थेत मुदतठेव पावती व बचत खातेमध्ये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतु मागणी करुनही रक्कम दिलेली नाही ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क’ - तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदतठेव पावती व बचत खातेमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला पतसंस्था व म.अध्यक्ष/ म.संचालक श्री समर्थ सहकारी पतसंस्था मर्या धुळे यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतु या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.५२२३/०९ सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्ष/ संचालक यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. तसेच सामनेवाला नं.३ हे पतसंस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांचा प्रत्यक्षरित्या पतसंस्थेच्या व्यवहारात संबंध नसल्याने त्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले श्री समर्थ सहकारी पतसंस्था मर्या धुळे यांचेकडून मुदतठेव पावतीमधील व बचत खातेमधील मुदतीअंती देय रक्कम रूपये २,७३,७७२/- व त्यावर देय दिनांकापासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
- . तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदतठेव पावतींमधील व बचत खातेमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाले यांच्याकडून परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाले श्री समर्थ सहकारी पतसंस्था मर्या धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.१०००/- भरपाई मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
११. मुद्दा ‘ड’ - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. श्री समर्थ सहकारी पतसंस्था मर्यादीत, धुळे यांनी तक्रारदार यांना या निकालापासून ३० दिवसांच्या आत पुढील प्रमाणे रकमा द्याव्यात.
- दिलीप भिका वाणी यांच्या नावे मुदत ठेवीत असलेली मुदतीअंतीची एकूण रक्कम रू.१,९०,३४७/- दि.३१/०८/२०११ पासून द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह व बचत खात्यात असलेली रक्कम रू.७,९१७/- दि.०९/११/१० पासून ६ टक्के व्याजासह,
ब) माधुरी दिलीप वाणी यांच्या नावे मुदतठेवीत असलेली मुदतीअंतीची एकूण रक्कम रू.२०,०००/- दि.१२/१०/२०१२ पासून द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह व मुदत ठेवीत असलेली मुदतीअंतीची एकूण रक्कम रू.५१,५०८/- दि.३१/०८/२०११ पासून द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह व बचत खात्यात असलेली रक्कम रू.४,०००/- दि.१५/०३/२०१० पासून द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह.
३. मानसिकत्रासापोटी रक्कम रू.२,०००/- (अक्षरी रूपये दोन हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) दयावेत.
४. वर नमूद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/ अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेच आदेश २(अ) मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास, कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच धुळे.