Maharashtra

Nagpur

CC/160/2019

SHRI RAJESH FAKIRA PARATE - Complainant(s)

Versus

SHRI SAINT TAJUDHIN BABA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD THROUGH SECRETARY SHRI RAMNATH RAMCHANDRA - Opp.Party(s)

ADV KANOJ D LAUATUE

24 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/160/2019
( Date of Filing : 28 Feb 2019 )
 
1. SHRI RAJESH FAKIRA PARATE
NEW MANGALWARI, MEDHIBAGH ROAD, NEAR BHIMA MAHAJAN AKHADA, NAGPUR 440017
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHRI SAINT TAJUDHIN BABA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD THROUGH SECRETARY SHRI RAMNATH RAMCHANDRA PARATE
PLOT NO 14, MEDHIBAGH CORNER, HANUMAN HOUSING SOCIETY, NAGPUR 440017
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI RAMNATH RAMCHANDRA PARATE PROP. SECRETARY
PLOT NO 14, MEDHIBAGH CORNER, HANUMAN HOUSING SOCIETY, NAGPUR 440017
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 24 Feb 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे मौजा नारा, पटवारी हलका नंबर ११, तहसिल  जिल्‍हा नागपूर, खसरा नंबर ७०/१ या लेआऊट मधील प्‍लॉट नंबर ११५, एकूण क्षेञफळ १००० चौरस फुट, एकूण रुपये ६,०००/-  एवढ्या रकमेत विकत घेण्‍याचे बयाणापञ दिनांक १६/७/१९९२ रोजी विरुध्‍द पक्षाशी केले. त्‍यापोटी तक्रारकर्त्‍याने बयाणपञाचे दिवशी म्‍हणजे दिनांक १६/७/१९९२ रोजी रुपये ५००/- विरुध्‍दपक्षाला अदा केले व उर्वरीत रक्‍कम रुपये ५,५००/- हप्‍त्‍याहप्‍त्‍याने अदा करावयाची होती. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याला दिनांक १६/७/१९९२ चे बयाणापञाव्‍दारे दिलेला प्‍लॉट नंबर ११५ रद्द करण्‍यात आला व तक्रारकर्त्‍याला दिनांक २१/०२/१९९६ चे नोटीस व्‍दारे त्‍याच मौजा नारा खसरा नंबर ७०/१, पटवारी हलका नंबर ११, तह जिल्‍हा नागपूर मधील भुखंड क्रमांक ६२ वाटप करण्‍यात आला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला नोटीस व्‍दारे उर्वरीत रक्‍कम रुपये ३,५००/- ७ दिवसाचे आत अदा करण्‍याबाबत सुचविले. 
  3. बयाणपञानुसार विरुध्‍द पक्षकार तक्रारकर्त्‍याला जमिनीचे अकृषक व नकाशा मंजूरीनंतर प्‍लॉट चे विक्रीपञ करुन देणार होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला रुपये ५००, दिनांक १६/७/१९९२ रोजी, रुपये २५०/- दिनांक २/१/१९९३, रुपये ५००/- दिनांक ९/८/१९९३, रुपये ४५० दिनांक ६/५/१९९४, रुपये ८,०००/- दिनांक १/७/१९९५, रुपये ३०० दिनांक ७/२/१९९७ व रुपये ३२०० दिनांक ८/३/१९९७ रोजी अदा केले. असे एकूण रुपये ६,०००/- अदा केले व त्‍याबाबतची पावती तक्रारकर्त्‍याला अदा करण्‍यात आली. विरुध्‍द पक्षाचे सुरवातीला कार्यालय, न्‍यु मंगळवारी नागपूर १७ येथे कार्यरत होते. परंतु त्‍यानंतर मध्‍यंतरी २००२ रोजी विरुध्‍द पक्षाने त्‍याचे कार्यालय सध्‍याचे पत्‍त्‍यावर स्‍थानांतरीत केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे कार्यालयाला प्‍लॉट नंबर ६२ चे विक्रीपञ नोंदणीकरीता अनेकवेळा भेटी दिल्‍या परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला प्‍लॉटचे विक्रीपञ करुन दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ला स्‍पीड पोस्‍ट व्‍दारे दिनांक ४/१/२०१९ रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु ती Not Claimed शे-यासह परत आली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर विरुध्‍द पक्ष विरुध्‍द तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, त्‍याने तक्रारकर्त्‍याचे वादातील प्‍लॉट नंबर ६२ चे कायदेशीर विक्रीपञ करुन द्यावे व प्‍लॉटचा कायदेशीर ताबा द्यावा किंवा तक्रारकर्त्‍याला प्‍लॉटचे विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये ६,०००/- द.सा.द.शे. २४ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.
  2. मानसिक व शारिरीक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस प्राप्‍त होऊनही ते मंचासमक्ष हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक २४/१२/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक ४ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमुद आहे.

अ.क्र.                   मुद्दे                                                         उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                      होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?             होय
  3. काय आदेश ?                                                           अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे मौजा नारा, पटवारी हलका नंबर ११, तहसिल  जिल्‍हा नागपूर, खसरा नंबर ७०/१ या लेआऊट मधील प्‍लॉट नंबर ११५, एकूण क्षेञफळ १००० चौरस फुट, एकूण रुपये ६,०००/-  एवढ्या रकमेत विकत घेण्‍याचे बयाणापञ दिनांक १६/७/१९९२ रोजी विरुध्‍द पक्षाशी केले. तक्रारकर्त्‍याने बयाणपञाचे दिवशी म्‍हणजे दिनांक १६/७/१९९२ रोजी रुपये ५००/- विरुध्‍दपक्षाला अदा केले व उर्वरीत रक्‍कम रुपये ५,५००/- विरुध्‍द पक्षाला दिनांक ८/३/१९९७ पर्यंत अदा केली असे एकूण रुपये ६,०००/- विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट खरेदीपोटी अदा केले. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.  विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे. 
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन प्‍लॉट विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम स्विकारुनही तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट नंबर ११५ चे विक्रीपञ नोंदनी करुन दिले नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ता प्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे. 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला वादातील भुखंड क्रमांक ११५ चे कायदेशीर विक्रीपञ करुन द्यावे व विक्रीपञाचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

किंवा

     सदर भुखंड क्रमांक ११५ चे नोंदनी करण्‍यास कोणत्‍याही प्रकारे कायदेशीर व तांञिक अडचण आल्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी १०००  चौ. फुट इतके क्षेञफळ असलेल्‍या भुखंडासाठी नारा झोनमधील अथवा नजीकच्‍या इतर झोनमध्‍ये १००० चौ. फुटाच्‍या अकृषक भुखंडासाठी शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या दिनांकापासुन एक महिण्‍याच्‍या आत द्यावी आणि सदरहु रक्‍कम एक महिण्‍याच्‍या आत न दिल्‍यास त्‍या रकमेवर दिनांक २४/०२/२०२० पासुन द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.

  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  2. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.