Maharashtra

Sangli

CC/09/1738

SHRI SHIVAPPA NAGAPPA JAKUNE - Complainant(s)

Versus

SHRI SAINATH MAHILA NAGARI SAHAKARI PATSANSTHA MARYADIT SANGLI AND OTHERS 10 - Opp.Party(s)

ADV. M. V. PATIL

19 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/09/1738
 
1. SHRI SHIVAPPA NAGAPPA JAKUNE
VIDHATA COLONY VISHRAMBAG SANGLI
SANGLI
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. SHRI SAINATH MAHILA NAGARI SAHAKARI PATSANSTHA MARYADIT SANGLI AND OTHERS 10
S.T. COLONY ROAD VISHRAMBAG SANGLI
SANGLI
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:ADV. M. V. PATIL, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

                                                      नि. ३२
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
                                                   
                                           मा.अध्‍यक्ष :  श्री.अनिल य.गोडसे    
                                         मा.सदस्‍या :  श्रीमती गीता घाटगे
                              मा.सदस्‍या :  सौ सुरेखा बिचकर 
                            
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१७३८/२००९
-------------------------------------------
तक्रार दाखल तारीख  :  २४/०४/२००९
निकाल तारीख        १९/१०/२०११
-------------------------------------------
 
१. श्री शिवाप्‍पा नागाप्‍पा जकुणे
    वय वर्षे   ६०, व्‍यवसाय मजूरी
    रा.विधाता कॉलनी, विश्रामबाग, सांगली                     ..... तक्रारदारú
  
 विरुध्‍द
 
१. श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    स्‍वागत अपार्टमेंट, एस.टी.कॉलनी रोड, विश्रामबाग,
    सांगली
 
२.  सौ विभावरी धनंजय कुलकर्णी,
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय चेअरमन
    रा.खरे ग्रुप हौसिंग, धामणी रोड, सांगली
 
३. सौ संजीवनी अशोक देशपांडे
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय व्‍हाईस चेअरमन
    रा.संजीवनी हॉस्‍पीटल, एस.टी.कॉलनी,
    गणपती मंदिराजवळ, विश्रामबाग, सांगली
 
४. सौ मेघा भास्‍कर कुलकर्णी,
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा. एस.टी.कॉलनी, विश्रामबाग, सांगली
 
५. सौ जयश्री अशोक साठे
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.एस.टी.कॉलनी, सामदेव अपार्टमेंट,
    विश्रामबाग, सांगली
 
६. सौ स्मिता प्रदीप मोहिते
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.१०० फूटी रोड, सांगली
 
७. सौ चारुता चंद्रशेखर चिंचोरे
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.फेडरल बॅंकेशेजारी, विश्रामबाग, सांगली
 
८. कुसुम चंद्रकांत नवले
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.फेडरल बॅंकेशेजारी, विश्रामबाग, सांगली
 
९. सौ शालिनी बाळासो पाटील,
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.दत्‍त नगर, विश्रामबाग, सांगली
 
१०. सौ सुनंदा धुळाप्‍पा बणजवाड
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.सावरकर मार्ग क्र.३, धनंजय बंगला,
    विश्रामबाग, सांगली
 
११. सौ मिना अनिल हेबळीकर
    व.व. सज्ञान, व्‍यवसाय संचालक
    रा.नेमिनाथनगर, विश्रामबाग, सांगली                         ..... जाबदार
 
                      तक्रारदार तर्फे                  -+ìb÷. श्री एम.व्‍ही.पाटील
                      जाबदार क्र.१ ते ११           - एकतर्फा
 
 नि का ल प त्र
 
द्वारा- मा.सदस्‍या - सौ सुरेखा बिचकर 
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने मुदत ठेवी अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार श्री साईनाथ महिला नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. विश्रामबाग, सांगली (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे मुदत ठेवी अन्‍वये रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. यातील सर्व ठेवींच्‍या मुदती पूर्ण झाल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण ११ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. १ ते ११ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. 
 
३.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २ ते ११ यांना पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या पतसंस्‍थेमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
 
४.    तक्रारदारांनी त्‍यांची रक्‍कम जाबदार पतसंस्‍थेमध्‍ये गुंतविल्‍याबाबतच्‍या ठेवपावत्‍यांच्‍या सत्‍यप्रती नि.३० च्‍या यादीने दाखल केल्‍या आहेत. तक्रारदार यांनी नि.५ सोबत खाते क्र.११७३५ ची ठेवपावती दाखल केली आहे. परंतु नि.२८ ला तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या व्‍याजनिवेदनामध्‍ये सदरचे ठेवपावतीमधील रक्‍कम तक्रारदार यांना मिळाल्‍याचे नमूद केले आहे. तसेच खाते क्र.११७३६ च्‍या ठेवपावतीमधील रकमेपैकी रक्‍कम रु.५,०००/- तक्रारदारांना मिळाल्‍याचे तसेच खाते क्र.११८०० च्‍या ठेवपावतीमधील रकमेपैकी काहीही रक्‍कम मिळाली नसल्‍याचे तक्रारदारांनी त्‍यांचे व्‍याजनिवेदनामध्‍ये नमूद केले आहे. त्‍यामुळे खाते क्र.११७३६ च्‍या ठेवपावतीमधील एकूण रक्‍कम रु.६९,८५१/- मधून तक्रारदारांना मिळालेली रक्‍कम रु.५,०००/- वजा जाता उर्वरीत रक्‍कम रु.६४,८५१/- तक्रारदार मिळणेस पात्र आहेत व खाते क्र.११८०० च्‍या ठेवपावतीमधील एकूण रक्‍कम रु.४५,०००/- तक्रारदार मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सदरच्‍या दोन्‍ही ठेवपावत्‍यांमधील देय रकमा ठेव ठेवले तारखेपासून ठेवपावतीमध्‍ये नमूद व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे.
 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
१. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना ठेवपावती क्र.११८०० मधील रक्‍कम रु.४५,०००/- दि.८/३/०६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.११ दराने व्‍याजासह अदा करावी.
 
२. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना ठेवपावती क्र.११७३६ मधील उर्वरीत रक्‍कम रु.६४,८५१/- दि.११/२/०६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.९ दराने व्‍याजासह अदा करावी.
 
३. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.४/१२/२०११ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांक:१९/१०/२०११
 
 
 
 (सुरेखा बिचकर)                (गीता सु.घाटगे)                        (अनिल य.गोडसे÷)
       सदस्‍या                       सदस्‍या                                 अध्‍यक्ष            
जिल्‍हा मंच, सांगली.             जिल्‍हा मंच, सांगली                 जिल्‍हा मंच, सांगली.  
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.