Maharashtra

Nanded

CC/09/183

Sambhaje Ramji Umrekar - Complainant(s)

Versus

Shri Sai Urban Co-Op Bank Ltd.Nava Mondha ,Mukhed - Opp.Party(s)

Adv.Venkatesh Patnoorkar

11 Jan 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/183
1. Sambhaje Ramji Umrekar Fule Negar,Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Sai Urban Co-Op Bank Ltd.Nava Mondha ,Mukhed Nava Mondha,Mukhed.NandedMaharastra2. Karkali Sanchalak,Nanded District Central Co-Op Bank Main Branch,Nanded.NandedMaharastra3. Branch Manager,Nanded District Shakari Bank Branch-Mukhed.NandedMaharastra4. Directer,Shri Sai Urban Co-Op.Bank Ltd.Brach-MukhedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 11 Jan 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2009/183.
                          प्रकरण दाखल तारीख - 17/08/2009
                          प्रकरण निकाल तारीख 07/01/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
संभाजी पि. रामजी उमरेकर
वय, 62 वर्षे, धंदा शेती
रा. फुले नगर, नांदेड ता.जि.नांदेड                           अर्जदार
विरुध्‍द.
1.   कार्यकारी संचालक,
     श्री साई अर्बन सहकारी बँक लि.
     नवा मोंढा, ता. मुखेड जि. नांदेड                      
2.   व्‍यवस्‍थापक,
     श्री साई अर्बन सहकारी बँक लि.
     शाखा मुखेड, ता. मुखेड, जि.नांदेड
3.   कार्यकारी संचालक,                                गैरअर्जदार.                                        नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि.
    शिवाजी पूतळयाजवळ, नांदेड.
4.   शाखा व्‍यवस्‍थापक,
    नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि.
    शाखा मुखेड ता. मुखेड जि. नांदेड.
अर्जदारा तर्फे वकील             - अड. व्‍हि.डी.पाटणूरकर.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील   - अड.ए.व्‍ही.चौधरी.
गैरअर्जदार क्र. 3 व 4 तर्फे        - अड.एस.डी.भोसले.      
   
                           निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
              गैरअर्जदार श्री साई अर्बन को ऑप बँक लि. मुखेड व नांदेड जिल्‍हा सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
 
                             अर्जदारांच्‍या तक्रारीप्रमाणे अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे खातेदार आहेत.  अर्जदार यांनी त्‍यांचे व त्‍यांचे कूटूंबियांचे नांवाने गैरअर्जदार क्र.2 यांचे शाखेमध्‍ये मूदत ठेव ठेवली होती. ठेवीची मूदत संपल्‍यानंतर व्‍याजासह गैरअर्जदार क्र.2 यांना प्रत्‍येकाच्‍या नांवाची रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात जमा केली. त्‍यामूळे अर्जदार ती रक्‍कम उचलून घेण्‍यास पाञ आहेत. अर्जदाराच्‍या खात्‍यामध्‍ये रक्‍कम जमा असल्‍याकारणाने अर्जदाराने पंजाब नॅशनल बँक नांदेड यांचेकडून घेतलेल्‍या कर्जाच्‍या वसूलीसाठी गैरअर्जदार क्र.2 यांचे शाखेवर धनादेश दिला होता. परंतु हे धनादेश न वटविता गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांचेकडेच ठेऊन घेंतले. विचारणा केल्‍यावर उडवाउडवीची उत्‍तरे दिली. शेवटी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 यांचे मूखेड शाखेवर दि.29.7.2009 रोजी  चेक्‍स दिले. त्‍यांची एकूण रक्‍कम रु.4,24,500/- होते. हे धनादेश वटविण्‍यासाठी पाठविले असताना दि.30.07.2009 रोजी गैरअर्जदार क्र.3 यांनी रक्‍कम देण्‍यास नकार दिला. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे दि.10.11.2008 पासून सदरील रक्‍कम प्रंलबित आहे. त्‍यामूळे मागणी प्रमाणे अर्जदर तेवढी रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहे.
 
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे अर्जदार यांनी त्‍यांचे स्‍वतःच्‍या व त्‍यांचे कूटूंबियातील व्‍यक्‍तीच्‍या नांवाने 1998 ला मूदत ठेवीत रक्‍कम गुंतविली होती. मूदत संपल्‍यानंतर एकूण रक्‍कम रु.4,,05,136/- पैकी मूददल रक्‍कम रु.2,00,000/- उचल केली व रु.2,10,000/- च्‍या ठेवी परत त्‍यांचे कूटूंबियांच्‍या व्‍यक्‍तीच्‍या नांवाने ठेवल्‍या. मूदतीनंतर दि.13.07.2008 रोजी त्‍यांना रु.4,26,888/- मिळणार होते. गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍या सेव्‍हींग्‍ज खात्‍यात सदरील रककम दि.10.11.2008रोजी जमा केलेल्‍या आहेत. अर्जदाराच्‍या मागणीनुसार त्‍यांना प्रत्‍येक खातेदाराच्‍या नांवाने चेक्‍स बूक ही दिलेले आहे. ज्‍यांचा नंबर 7891 ते 8810 असा आहे. यानंतर दि.2.1.2009 रोजी पंजाब नॅशनल बँक नांदेड यांनी रु. 4,24,500/- धनादेश वटविण्‍यासाठी गैरअर्जदाराकडे पाठविला होता. परंतु बँकेची परिस्थिती वाईट असल्‍याकारणाने ते त्‍यांनी त्‍यांचेकडेच ठेऊन दिला. या कारणामूळे संतप्‍त झालेला अर्जदार यांनी बँकेत येऊन  बरीच आरडाओरड केली. नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांचेवर 35 अ कलम लावले असल्‍याने बँकेच्‍या ठेवी सदरील बँकेत अडकून पडल्‍या आहेत. ही सत्‍य परिस्थिती त्‍यांना समजावून सांगितली.  परंतु  अर्जदाराने  ऐकले नाही. स्‍वतः शेवटी या निर्णयावर आले की, तूम्‍ही
 
 
मला नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे चेक दया ते चेक वटवून घ्‍यायचे ते मी पाहतो. त्‍यांना हे ही सांगितले की, बॅकेवर 35 अ कलम आहे तरी त्‍यांनी न ऐकता आमच्‍याकडून चेक लिहून घेतले. त्‍यामूळे गैरअर्जदार यांची जबाबदारी संपलेली असून त्‍यांचे कोणतीही रक्‍कम त्‍यांचेकडे जमा नाही. कारण चेक अर्जदाराने स्विकारले आहेत. त्‍यामूळे अर्जदाराच्‍या तक्रारीतून आम्‍हाला वगळण्‍यात यावे अशी विनंती केली आहे.
              गैरअर्जदार क्र.3 व 4 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.गैरअर्जदारावर दि.20.10.2005 पासून आरबीआय ने 35 अ कलम लाऊन आर्थिक व्‍यवहारावर निर्बध घातलेले आहेत. त्‍यामूळे  आरबीआय च्‍या पूर्वपरवानगी शिवाय गैरअर्जदार रक्‍कम देऊ शकत नाहीत.  त्‍यामूळे त्‍यांचे सेवेत ञूटी नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे खाते मध्‍यवर्ती बँक शाखा मूखेड येथे आहे. सदर तक्रारीची ठेवी ही गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे बँकेत आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे खातेवर आर्थिक निर्बध असताना रक्‍कम देता येत नाही व सेवेत ञूटीही होत नाही. त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह नांमजूर करावी असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 आणि 3 व 4 तर्फे पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. अर्जदारांनी  दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                      उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         नाही.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1
              अर्जदारांनी एकंदरीत 1998मध्‍ये त्‍यांचे कूटूंबातील आठ व्‍यक्‍तीच्‍या नांवाने रु.2,00,000/- रक्‍कम गूंतविली आहे. जी की मूदतीनंतर 2002 मध्‍ये रु.4,05,136/- अर्जदार यांना मिळालेले आहेत. त्‍यापैकी रु.2,00,000/- उचलून उर्वरित रक्‍कम रु.2,10,000/- परत मूदत ठेवीत त्‍यांचे व त्‍यांचे कूटूंबातील व्‍यक्‍तीच्‍या नांवाने ठेवलेले आहे. याप्रमाणे 2008 मध्‍ये मिळणारी रक्‍कम रु.4,26,888/- होती. गैरअर्जदारांनी मूदतीनंतर त्‍यांचे मते ही सर्व रक्‍कम अर्जदाराच्‍या त्‍यांचे त्‍यांचे वैयक्‍तीक खात्‍यात जमा
केली आहे. अर्जदाराच्‍या मागणीनुसार  गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्‍यांना 8791  ते  8810  या  क्रमांकाचे धनादेश दिले होते. अर्जदाराची मागणी ही
 
 
त्‍यांनी ठेवलेल्‍या मूदत ठेवीची रक्‍कम ही मिळण्‍यासाठी आहे. पण अर्जदाराने या आपल्‍या मागणीच्‍या पूर्ततेसाठी एकही मूदत ठेवीची पावती जमा केली नाही. त्‍यांचे कारणही त्‍यांने या सर्व मूदत ठेवीच्‍या पावत्‍या गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना परत दिलेल्‍या आहेत व गैरअर्जदार क्र.1व 2 यांचे मते या सर्व रक्‍कमा अर्जदाराच्‍या कूटूंबातील व्‍यक्‍तीच्‍या त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या खात्‍यात जमा केलेल्‍या आहेत. त्‍यामूळे आता अर्जदार यांची मूदत ठेवीवीषयीची मागणी योग्‍य ठरत नाही. अर्जदाराने उल्‍लेख केला की, त्‍यांनी पंजाब नॅशनल बँक नांदेड यांचेकडून कर्ज घेतल्‍यापोटी रु.4,24,500/-चेक्‍स त्‍यांना वसूलीसाठी दिलेले होते. ते धनादेश गेरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे न वटता पडून आहेत. म्‍हणजे अर्जदाराकडे हया चेकचा पूरावा देखील उपलब्‍ध नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी मान्‍य जरी केले त्‍यांनी ते चेक त्‍यांचेकडेच ठेऊन घेतले यामूळे अर्जदाराला काही फरक पडला नसता जेव्‍हा धनादेश कर्जापोटी पंजाब नॅशनल बँकेला दिले होते, पंजाब नॅशनल बँक जोपर्यत हे धनादेश वटले नाही या कारणाने स्लिपसह अर्जदार यांना वापस करणार नाही तोपर्यत एवढी रक्‍कम पंजाब नॅशनल बॅंक यांचेकडे जमा होते असे गृहीत धरावे लागेल व पंजाब नॅशनल बँक यांना ही रक्‍कम मिळाली नसेल तर त्‍यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 वरती कायदेशीर कारवाई करणे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने उचित होते परंतु असे कोणताही पूरावा अर्जदार यांनी समोर आणलेला नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे मते अर्जदार यांनी जबरदस्‍तीने गैरअर्जदार क्र. 3 व 4 बँकेचे चेक त्‍यांचेकडून लिहून घेतले व ते वटविण्‍याची जबाबदारी स्‍वतःवर घेतली कारण गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्‍यांना समजाऊन सांगितले होते, गैरअर्जदार क्र.3व 4 बँकेवर आरबीआय ने निर्बध टाकलेले होते तरी देखील ऐकले नाही. एकंदर गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांचे वरती आरबीआय ने 35 ए कलम लाऊन आर्थिक व्‍यवहारावर निर्बध घातलेले आहेत. त्‍यामूळे त्‍यांचे बँकेत पाठविलेला धनादेश वटू शकला नाही व त्‍यामूळे गैरअर्जदाराच्‍या सेवेत ञूटी होणार नाही. यासंबंधीची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेवर टाकावी तर गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे गैरअर्जदार क्र.4 यांचेकडे खाते आहे. त्‍यामूळे त्‍यांचे सहीचे व त्‍यांनी दिलेले चेकस जर वटले नाही तर जी बँक बंद झालेली आहे त्‍यांचे चेक त्‍यांनी दयायला नको होते असे म्‍हटले तर अर्जदारांनी बंद असलेलया बँकेचे चेक जबरदस्‍तीने घेतलले आहे असे म्‍हटले आहे व गैरअर्जदार यांचे म्‍हणण्‍यावर अर्जदार यांनी आपल्‍या प्रतिउत्‍तरात ही बाब नाकारलेली देखील नाही. यावरुन कळस म्‍हणजे अर्जदार
यांनी जे चेक नंबर 244706, 244708, 244709, 244710 हे धनादेश गैरअर्जदार  क्र. 1 व 2  यांना दिले म्‍हणून दाखल केलेले आहेत हे धनादेश
 
 
पाहिले असता हे धनादेशा त्‍यांनी दिलेले नसून हे धनादेश सेवा सहकारी सोसायटी यांनी दिलेले आहेत व त्‍यावर चेअरमन व सचिव यांच्‍या सहया आहेत असे असताना अर्जदार हे आपल्‍या तक्रारीत चूक विधाने करीत आहेत. ज्‍या सेवा सहकारी सोसायटीने हे चेक दिलेले आहेत त्‍यांना पार्टी न करता त्‍यांना जबाबदार न धरता त्‍यांना का सोडून दिले ? हे ही न कळण्‍या सारखे आहे. साईअर्बन बँकेने ज्‍या चेकचा उल्‍लेख करुन गैरअर्जदार क्र.3 यांना पञ लिहीले आहे त्‍यात फक्‍त एक विशेष बाब म्‍हणून धनादेशाची रक्‍कम देण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. यात हे चेक या नंबरचे धनादेश आम्‍ही दिले असे म्‍हटलेले नाही. त्‍यामूळे जेव्‍हा धनादेशच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे नाहीत त्‍यामूळे त्‍यांना जबाबदार धरता येणार नाही. एकंदर पाहता अर्जदार यांनी आपली मूदत ठेवीचे प्रकरण हे अतीशय गूंतागूंतीचे करुन ठेवले आहे. ज्‍यांची काही गरज नव्‍हती. प्रकरणातील सत्‍यता समोर येत नाही. अर्जदाराची तक्रार खरीच आहे असे म्‍हटल्‍यास अर्जदाराने सरळ सरळ मूदत ठेवीची रक्‍कम गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना मागावयास पाहिजे होती व त्‍यांनी रक्‍कम दयायचे नाकारल्‍यास त्‍यांचेकडून लेखी पञ घेऊन मंचात त्‍यांचे विरुध्‍द तक्रार दाखल करावयाची होती. तर त्‍यांना रक्‍कम मिळू शकली असती. पंजाब नॅशनल बँकचे चेक त्‍यांनी न वटवता त्‍यांचेकडेच ठेऊन घेतली असल्‍याने पंजाब नॅशनल बँकेला त्‍यांचे विरुध्‍द तक्रार करण्‍यास लाऊन अर्जदारांना ही रक्‍कम वसूल करता आली असती परंतु असे काहीही न करता प्रकरण विनाकारण गूंतागूंतीचे करुन ठेवलेले आहे. एकंदर स्‍वतःच्‍या हाताने सर्व पूरावे नष्‍ट केलेले आहेत. आता त्‍यांचेकडे जे धनादेश आहेत ते वटण्‍यासाठी बँक चालू होईपर्यत त्‍यांना वाट पहावी लागेल. याशिवाय त्‍यांचेकडे काहीच करता येण्‍याजोगे नाही. एकंदर प्रकरणावर बारकाईने   नजर टाकली असता कोणत्‍याही गैरअर्जदाराच्‍या सेवेत ञूटी झाल्‍याचे अर्जदार सिध्‍द करु शकलेले नाहीत. म्‍हणून आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.  
                          आदेश
     1.        अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येतो
 
     2.        दावा खर्च पक्षकारांनी आपआपला सोसावा.
     3.        पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                                                                              श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                                                                                                                           सदस्‍य
 
जयंत पारवेकर
लघूलेखक.